माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
स्मिता, मँगो क्रश म्हणजे
स्मिता,
मँगो क्रश म्हणजे पातळसर अस्तो तोच ना? तोच असेल तर त्यामुळेच झाल्या असतिल चिक्कट.
मँगो क्रश ऐवजी मॅगो मावा/आटवलेला आंब्याचा रस घालुन पहा.
आत्ताच ७ कप बर्फी केलीये पण
आत्ताच ७ कप बर्फी केलीये पण घट्ट होईल असं वाटत नाहीये...फ्रीज मधे ठेवावी की अजुन काही उपाय आहे ?
चमकि वेळ लागतो घट्ट व्हायला.
चमकि वेळ लागतो घट्ट व्हायला. पण होते घट्ट. मी परवाच केली. आणी हो घट्ट होत आली की थोडी प्लेटमधे घेउन थंड झाल्यावर घट्ट होते का पहायचे. अशी झाली की ट्रेमधे ओतायचे मिश्रण. ड्रायफृट घाईत लावावे लागतात. लवकर घट्ट होते. माझ्या निम्म्याच बर्फीला ड्रायफृट लावुन झाले
सा(बांचं)काचु? त्यांनी काल
सा(बांचं)काचु? त्यांनी काल खोबरं, शिजवलेला बटाटा आणि दूध एकत्र करुन कढईत थोडावेळ गॅसवर ठेवलं वड्यांसाठी. नंतर मी किं. स. ला गेल्यावर मला वड्यांसाठी आटवायला सांगणार होत्या. मी जाईपर्यंत त्याचा रंग पांढर्याचा ब्राऊन होत गेला. रात्री परत शिजवण्यासाठी गॅसवर ठेवलं तर अजूनच ब्राऊन गुलकंदासारखा झाला. खोबरं बटाटा वड्या अशा कधीच होत नाहीत त्यांच्या असं त्या म्हणाल्या. त्यांचं काय चुकलं? (त्यांनीच विचारायला सांगितलं आहे).
अश्विनी, मिश्रणात साखर होती
अश्विनी, मिश्रणात साखर होती ना ? बहुतेक तिचेच कॅरॅमल होत गेले असणार. गॅस मंद हवा होता, भांडे जाड हवे होते.
माझ्या अंदाजाप्रमाणे चव अजूनही चांगलीच लागत असेल.
चव चांगलीच आहे. पण त्यांनी
चव चांगलीच आहे. पण त्यांनी फक्त २-३ मिनिटंच गॅसवर ठेवलं होतं असं त्या म्हणतायत. आणि नंतर सुद्धा रात्री परत आम्ही पाहिलं तर अजून डार्क कलर झाला होता.
साध्या खोबर्याच्या वड्यांनाही आपण साखर मिसळूनच गॅसवर ठेवतो पण अशा डार्क होत नाहीत त्या. नेहमीच्या वापरातली कढई, ताजा खरवडलेला नारळ, ताजे उकडलेले बटाटे व नेहमीची साखर आणि दूध असं घातलं होतं त्यांनी. कपाळाला हात लावून बसल्यात.
कधी कधी बटाट्यामूळे असा रंग
कधी कधी बटाट्यामूळे असा रंग येतो. (हिरवट रंग आलेला मी बघितला आहे.)
बाकी काही त्यात पडले नसेल ना ?
बाकी काही त्यात पडले नसेल ना
बाकी काही त्यात पडले नसेल ना ?
>>> काय माहीत ! मी गेले तेव्हा नुकतंच उतरवून झाकून ठेवलेलं होतं. एकदम गरम गरम होतं. चव मात्रं चांगली आहे. खायला हरकत नाही ना?
रंग जर फारच वेगळा असेल तर मला
रंग जर फारच वेगळा असेल तर मला शंका आहे. चव बघताना जेवढे खाल्लेय त्याने त्रास झाला नाही, तरच खावे.
मी स्वतःच खाऊन बघितलंय. मी
मी स्वतःच खाऊन बघितलंय. मी अजून व्यवस्थित आहे
मी त्यांना म्हटलं होतं की फोटो काढून माबोवर दाखवते. तर त्यांनी "बिघडलेल्याचा काय फोटो काढतेस" असं म्हणून बेत हाणून पाडला.
खोबर्याच्या वड्या करताना एका
खोबर्याच्या वड्या करताना एका नारळाला फक्त एकच मध्यम आकाराचा बटाटा घातल्यावरच वड्या शुभ्र होतात ,हा माझा अनुभव. दोन बटाटे जरी घेतले तरी वड्या पिवळट होतात .घोटत असताना कढईला गोलाकार कडक मिश्रण जमा होत आल की आच बंद करावी लागते .दुर्लक्ष करून जास्त जास्त ढवळत राहिल व शेगडी बंद केली नाही तर रंग लालसर होऊन वडयाना मुलायमपणा रहात नाही त्या कडक होतात .मिश्रणाचा गोळा वेळेवर ट्रे मध्ये न लाटता तसाच अती तापलेल्या कढईत ठेवला तरी वड्या गुलसर होतात .लालसर वड्या खायला काहीच हरकत नाही ,या पण चांगल्या लागतात .खोब्र न घालता कुणी नुसत्या बटाट्याच्या वड्या करतात त्या गुलसरच असतात त्याही छान लागतात .माझी या वड्या करण्याची कृती अशी [माझ्या आईने शिकवलेली]-
एका मोठ्या नारळाच्या चवाबरोबर एक उकडलेला बटाटा मिक्सरमध्ये एकजीव करून या मिश्रणाच्या बरोबरीने साखर घेवून एक वाटी दुधाची साय घालून मंद आचेवर घोटत रहायच .हे काम करत असताना दुसरी तिसरी काम करत बसू नये .चुलीजवळून उठून इकडे तिकडे जरा गेल तरी तळाला लगेच लालसर होत व ढवळता ढवळता पूर्ण वड्या लालसर होतात .कडाना शुभ्र सफेद कडक टिसूळ किनार जमू लागली की आच बंद करावी .ताटाला /ट्रेला व लाटणीला तूप लावून घ्याव .या मिश्रणाचा गोळा होतो .हात थोडे भाजतात पण झटपट तूप लावलेल्या ट्रेवर प्रथम हाताने घट्ट गोळा जमवून घेवून लाटणीने पसरावा .वड्या पाडण्यालायक थंड झाल्यावरच सुरीने कापाव्या .कापायला खूप उशीर केला तर वडी सफाइदार येत नाही.
छाया, हि टिपीकल मालवणी
छाया, हि टिपीकल मालवणी चुनकापांची कृति ना ?
मी मायक्रोवेव्ह मध्ये ओल्या
मी मायक्रोवेव्ह मध्ये ओल्या खोबर्याच्या वड्या करायचा प्रयत्न केला होता. अर्धा मिनिट जास्त शिजले आणि साखरेचे कॅरॅमल होऊनन वड्यांऐवजी चिक्की झाली!
भरत मायक्रोवेव्ह मधे साखरेचे
भरत मायक्रोवेव्ह मधे साखरेचे असेच होते. शिवाय आपल्याला बाहेरुन कळत नाही, पण पदार्थ आतल्या आत जळत राहतो.
मी माहेरची मालवणीच पण
मी माहेरची मालवणीच पण मालवणच्या आजीने या वड्या केलेल्या कधी पाहिल्या नाहीत .चुरमे लाडू [कडक पुर्या चुरून केलेले ]ही तिची स्पेशालिटी ,या वड्या ही माझ्या आईचीच स्पेशालिटी.ती कुठे शिकली हे मला माहीत नाही.
बुंदिचे लाडु करताना बुंदी कडक
बुंदिचे लाडु करताना बुंदी कडक झालीय्,लाडु वळतच नाहित.काय करु.? कोणाला माहित असेल तर लवकर सांगा प्लीज्.पाक जास्त टाकावा काय?
जरा दुधाचा हात लाव
जरा दुधाचा हात लाव बुंद्यांना, आणि वळून पहा.
बुंदी कडक झालीत म्हणजे पाक
बुंदी कडक झालीत म्हणजे पाक कडक झालाय ना ? कडक लाडवांसाठी पाक करताना तो दोन चार लाडवांपुरताच करावा लागतो.
आता कोमट दूधाचा हात लावून वळता येतीलही पण ते टिकणार नाहीत. मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेऊन, त्यात बुंदींच्या मिश्रणाचे भांडे थोडावेळ ठेऊन मिश्रण मऊ होतेय का ते बघावे लागेल.
बुंदी कडक झालीत म्हणजे पाक
बुंदी कडक झालीत म्हणजे पाक कडक झालाय ना>>>>>>>>. माहित नाहि काय चुकलं ते?:( बुंदित पाक मुरलाच नाहिये. दुधाच हात लाऊन पण फायदा नाहि झाला.
अगदीच काहीच होत नसेल तर त्या
अगदीच काहीच होत नसेल तर त्या बुंदींचा भरड चुरा करुन त्याचे लाडु/वड्या करता येतिल. बुंदी-चुरमा लाडू
नाहीतर कडकबुंदीचे लाडु म्हनून खपवून टाक.
म्हणजे पाकच कडक झालाय. त्याचे
म्हणजे पाकच कडक झालाय.
त्याचे लाडू तर नाही बनू शकत पण पुडींग सदृष्य काहीतरी बनू शकेल. त्या बुंदी चाळणीत ठेवून वर आदणाचे पाणी ओतून निथळू द्यायचे. मग आटवलेल्या दूधात त्या टाकायच्या. (ही ओगलेआज्जींची आयडीया आहे.)
बेसनाचे लाडू दर वर्शी चांगले
बेसनाचे लाडू दर वर्शी चांगले होतात माझे पण या वेळी बेसन तूपात व्यवस्थित परतल. glaze दिसे पर्यंत.मग आर्धी वाटी दूध घातल ( रुचिरा) आणि फिरवून थोड परतून गस वरून काढल थोड कोमत्सर झाल्यावर पिठिसाखर घातली. आणि मळायला घेतल. तर ते एक्नदम कोरडच पडल.:-( थोड तूप वाढ्वून पण काहि होइना म्हणून शेवटी पाववाटी दूध घातल. मुग एकदम सगळ मिळून पण आल आणि वळण्यासारख पण झाल. पन रन्ग एकदम dark brown झाला. चव नेहेमी सरखीच आहे,पण हे लाडू अता टीकतील का? दूध घालण्या एवजी दुसरा काही उपाय करयला हवा होता का?
help please.
-शिरीन
दूध गरम होतं ना ? मग ८/१०
दूध गरम होतं ना ? मग ८/१० दिवस नक्कीच टिकतील. रंग डार्क ब्राऊन आलाय म्हणजे बेसन जास्त भाजले गेलेय किंवा साखर कमी पडलीय. दूधाच्या जागी थोडे गरम तूपही वापरता आले असते.
Thank you दिनेशदा.दूध गरम
Thank you दिनेशदा.दूध गरम घातल. तूप पण घलून बघितल आधि पण ते त्याला दाद देइना दूध एवढ्स शिंपदल पण फरक तरि पडला. हताश झले होते मी त्या मिश्रणा कडे बघुन.

धन्यवाद दिनेशदा,लाजो,मंजूडी.
धन्यवाद दिनेशदा,लाजो,मंजूडी. बुंदित अजुन पाक करुन घातला आणि ४ ५ तास मुरु दिलं.सैलसर का होईना पण लाडु वळता आले.
शिरीन माझं पण काल असंच कोरडं
शिरीन माझं पण काल असंच कोरडं झालं. मी अगदी थोडे तु घालुन ३० सेकंद मावेत ठेवुन , फुप्रो मधुन काढलं मस्त झाले लाडु.
वर्षा thanks ग . फु प्रो च
वर्षा thanks ग . फु प्रो च नाहि लक्षात आल. आयडिया मत्स आहे लक्षात ठेवीन.
-शिरीन.
काल मँगो पाय बनवला त्यासाठी
काल मँगो पाय बनवला त्यासाठी इथली पैली रेसिपी ट्राय केली. ४५ मिन्टं झाल्यावर ते मिश्रण केकसारखं फुगून वर आलं आणि करपलं. आतलं शिजलं नव्हतच. मग आणखी ५-१० मिन्टं ठेवलं. सुरी टेश्ट केल्यावर पाय बाहेर काढला. वरची जळकी लेयर काढून टाकली. बरा लागतोय चवीला पण तरी मस्त यमी वगैरे नाही
सायो एक भारी रेसिपी देणार आहे म्हणाली. पण तरी ह्यात काय चुकलं असेल ते सांगा.
http://www.pachakam.com/recip
http://www.pachakam.com/recipe.asp?id=1574&RecipeName=American%20%20Mang...
या रेसिपीने करतात माझ्या काही मैत्रिणी. छान लागतो. मी कधी केला नाहीये.
सिंडी, मला रेसिपी मिळाली की
सिंडी, मला रेसिपी मिळाली की लग्गेच देते तुला.
Pages