चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी एखादा प्रोमो बघून पाहावासा वाटणारा चित्रपट आणि विदू विनोद चोप्रा निराश करणार नाही याची गॅरेंटी
https://youtu.be/WeMJo701mvQ?si=Skuv_tGaE5rOEsIP। खरंतर विक्रांत मसी खूप अंडररेटेड ऍक्टर आहे त्याला या ताकदीचे अजून रोल मिळायला हवे.

वरचे दोन्ही प्रोमोज भारी आहेत. नानाला खूप दिवसांनी बघितलं, मेन रोलमधे. पल्लवी, गिरीजा आणि अजुन तिसरी व्हिलन प्रॉमिसिंग वाटतायेत, गिरीजा जाम गोड दिसते.

खरंतर विक्रांत मसी खूप अंडररेटेड ऍक्टर आहे त्याला या ताकदीचे अजून रोल मिळायला हवे. >>> हो तो बालिका वधु मधे साईड रोल करायचा, तेव्हा पहील्यांदा बघितलं, फार सुरेख अभिनय केलेला.

१२ थ फेल भारी दिसतोय.
विधू विनोद चोप्राने गेल्या कित्येक वर्षात स्वतः दिग्दर्शन केलेलं नाही. त्याने पुढे आणलेले दिग्दर्शक आता दिग्गज बनले आहेत. याचा कोण आहे दिग्दर्शक ?

बालिका वधू मधून लहान रोल असतानाही लक्षवेधी काम केलेले पुढे मिर्झापुर मध्ये तो चमकला व जास्त लक्षात राहिला . बालिका वधू मध्ये फार चांगले कलाकार होते. सिद्धार्थ शुक्ला हि त्यातूनच चित्रपटात आला.दुर्दैवाने त्याची कारकीर्द अचानक संपली.

याचा कोण आहे दिग्दर्शक ? >>>>

IMDB / रॉटन टोमॅटो वरच्या श्रेयनामावलीवर विश्वास ठेवला तर पटकथालेखक आणि दिग्दर्शक दोनिही विधू विनोद चोप्रा.

धक धक( dhak dhak) छान स्टोरीलाईन असलेला चित्रपट. https://youtu.be/A33H3ddSOcM?si=K9cBNqGUfiyW7LsM हा नक्की बघ रुन्मेष नाहीतर परत म्हणशील मालूम नहीं था.
13 ऑक्टोबर ला म्हणजे उद्याच रिलीज होतोय.

कल्की ओके धन्यवाद
आत्माचा ट्रेलर तुम्ही त्या धाग्यावर टाकलेला हे बघितले आता. पण नाव लिहिले नव्हते तिथे. अवघडच होते म्हणा ते Happy

मामी, Horror movie Happy
मी सुद्धा काल बायकोला नाव सांगितले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर 'खुळचट आहे का आपला नवरा, कुठल्याही नावाचा पिक्चर बघायला जातो असेच भाव होते Happy

थोडक्यात नाव वेगळे आहे म्हणून कुतूहलाने बघायला जाणारे कमी असतात, उलट असे वेडेवाकडे नाव झेपले नाही म्हणून पटकन काट मारणारे जास्त असतात असे मला वाटते.

धक धक बद्दलच लिहायला आलो होतो
विषय घिसापिटा आहे पण सिनेफोटोग्राफी मस्त वाटतेय
चौघी दिसल्यात ही मस्त आणि राईड खरीखुरी वाटत आहे कँव्हीसिंग
ते अमिताभ चा आलेला एव्हरेस्ट चढण्याचा तो कमालीचा कृत्रिम वाटला होता ट्रेलर मधेच तसं इथं नाही वाटलं

आत्म - आत्मा, pamphlet - प्लांचेट ह्या गोंधळामुळे मला पण तो हॉरर असेल असं वाटलं होतं.

थँक्स फॉर कमींग अशा बोल्ड विषया वरच्या चित्रपट बद्दल इन्स्टा वर कळलं. बालाजी प्रोडक्शन आहे. भुमी पेडणेकर बहुधा लेडी आयुषमान बनू बघतेय. ट्रेलर जरा उथळ वाटतेय. स्त्रियांच्या कमींग बद्दल आहे..सहसा न बोलला जाणारा विषय.

विकी कौशल चा उरी ,शाहिद उद्यम सिंग नंतर मास्टरपीस
सॅम बहादुर https://youtu.be/krXGJzt6vLQ?si=bsyqyW_6A-XD123i
फक्त इंदिरा गांधी फातिमा सना शेख पेक्षा लारा दत्ता (बेलबॉटम चित्रपटासारखी)जास्त शोभली असती ,फातिमा प्रियांका गांधी सारखी जास्त दिसते आणि शोभेल गालावरच्या खळीमुळे.
डिरेक्टर मेघना गुलजार आहे.

"श्यामची आई"
https://youtu.be/bEZ68h-rh3g?si=3jlki59wRPW4mRwF

मुळशी पॅटर्न मधील हाच का तो ओम भुतकर असा प्रश्न पडावा असा लुक आणि काम. ट्रेलर तर बघाच, पण जेव्हा चित्रपट येईल तेव्हा चित्रपट हि बघा, जमल्यास चित्रपटगृहात बघा

पूर्वी आचार्य अत्रेंनी "श्यामची आई " चित्रपट केला होता. त्याला राष्ट्रपती पदक मिळाले होते. पुस्तक वाचले होते. पण तेव्हाचा काल निराळा होता. आता म्हणजे "साने गुरुजी, हू?" "ते क्लासवाले का?"
चालायचेच.
पैसा आणि वेळ असेल तर अवश्य पहा. मुलांना दाखवा. कदाचित आवडेलही.

थ्री ऑफ अस ह्या नावाचा सिनेमा येत आहे हिंदी, शेफाली शाह, अहलावात आणि स्वा किरकिरे आहे. कोकण आहे backdrop ला ani मराठी किल्ला चा दिग्दर्शक आहे. मस्तच आहे प्रोमो. बघेन नक्की हा कारण किल्ला आवडला होता.

"शास्त्री वर्सेस शास्त्री" परेश रावल, शिव पंडित, नीना कुलकर्णी ,अमृता सुभाष यांचा अभिनय असलेला चित्रपट .एक आजोबा आणि एक वडील यांच्यातला म्हणजेच दोन बापां मधील मुलासाठीचा संघर्ष .
https://youtu.be/7FoL7PYsoxs?si=ioJc8LyIwwB8ETvg

शाहरूखचा वाढदिवस 2 नोव्हे ला डांकी चा टीजार येणार आहे...
Exited>>> आता असं म्हंटलं तर इतर लोक ही एक्झिट च मारतील, पक्क्या फॅन ने एक्झिट मारल्या वर.

Exited >> दुसऱ्या धाग्यावरची कमेंट आहे ना?
तिथे पण बहुतेक Excited म्हणायचं असेल.

एका मराठी माणसाने दिल्लीतील वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला होता. त्याला रिमोट एरियातल्या एका ठिकाणी काही पिंप इंधन हवे होते.
ते पत्र इंग्रजी मधे असे लिहिले

X litres of fuel is required for exciting people.

इथे मात्र existing म्हणायचं असेल.

https://youtu.be/vAp-9i4mFBQ?si=msWCNBIb7qgoqvok

पिप्पा चा ट्रेलर
खूप वर्षांनी भारतात एक वॉर मूव्ही आलाय
ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्या बांगलादेश युद्धावर आधारित पुस्तकाची कथा घेतली आहे
प्रोडक्शन चांगलं वाटत आहे पण तो ईशान खट्टर अगदीच सुकडा दिसतोय, त्याला आर्मी चा टॅंक कमांडर म्हणून बघणे फार अवघड जात आहे, एकंदरीत त्याची अभिनय क्षमता पण शंकास्पद आहे
अजून एक कुणीतरी मक्ख चेहऱ्याची हिरोईन आहे
दोघांनी मिळून माती करू नये म्हणजे झालं

बाकी सपोर्ट स्टाफ तगडा आहे, रहमान चे संगीत आहे
मजा येणारे बघायला

Pages