चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गॅसलाईट चा ट्रेलर आवडला. चित्रांगदा सेन आणि सारा अली खान.
https://www.youtube.com/watch?v=bA00GJQbS1s >>>>>

हेच लिहायला आले होते, छान वाटला ट्रेलर!

Misha, who returns to her royal family estate after 15 years to visit her estranged father, only to find him missing. A suspenseful murder mystery, revolving around a girl, a step-mother, a lover, a father, a police officer, and a doctor.

@ गॅसलाईट, स्टोरीलाईन ओळखीची वाटते.
सारा अली खान केदारनाथमध्ये रोमॅंटीक ॲंगलला फार आवडलेली. अश्या भुमिकेत कशी वाटते बघायला हवे.

फुलराणीचा टीजर , ट्रेलर सगळं बघून झालं पण प्रियदर्शिनी अजून हास्यजत्राच्या लर्निंग स्कीट अ‍ॅक्टींग मोड मधे असल्याने सिनेमाचं नाव Fool राणी वाटतंय. यापेक्षा देवानंद + मिसेस अंबानींचा मनपसंद चांगला आहे. भक्ती बर्वेचं नाटक उपलब्ध आहे. ते पुन्हा बघता येईल. ओटीटीवर आला तरी बघणे होईल असे वाटत नाही.

त्यापेक्षा शाहीर साबळेंवर येत असलेला केदार शिंदेचा "महाराष्ट्र शाहीर" आवडेल बघायला. गाणी शाहीरांचीच घेतली आहे. अजय function at() { [native code] }उलयांनी संगीतकार म्हणून काय केलंय हे कळत नाही.

https://youtu.be/7-m9A6tC7A0
ज्युबिली : प्राइम वर, एप्रिल ७ ला ही सीरीज येते आहे. जुन्या काळातले, १९४७ मधले सिने कलाकार, फिल्म इन्डस्ट्री पॉलिटिक्स वगैरे वर आधारित. विषय तसा नविन नाही वाटत, पण कलाकार चांगले दिसतायत - अदिती राव हैदरी, अपारशक्ती, राम कपूर वगैरे.

त्यापेक्षा शाहीर साबळेंवर येत असलेला केदार शिंदेचा "महाराष्ट्र शाहीर" आवडेल बघायला. गाणी शाहीरांचीच घेतली आहे >>> पण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने 'बहरला हा मधुमास' ह्या गाण्याचे ट्रेंडिंग सुरु आहे. त्यावरून 'महाराष्ट्र शाहीर' च्या प्रसिद्धीमधून 'शाहीर साबळे' पूर्णपणे झाकोळले गेले आहेत, आणि केवळ केदार शिंदेंची कन्या 'सना शिंदे' हिच्या प्रदार्पणासाठी बनवलेल्या चित्रपटाचा भास होत आहे.

सोशल मीडियावर ज्या पद्धतीने 'बहरला हा मधुमास' ह्या गाण्याचे ट्रेंडिंग सुरु आहे. त्यावरून 'महाराष्ट्र शाहीर' च्या प्रसिद्धीमधून 'शाहीर साबळे' पूर्णपणे झाकोळले गेले आहेत, >>>> मलाही तसेच वाटले ! त्या गाण्यावर बरीच रील्स दिसत आहेत सोमि वर. गाणे छान आहे पण शाहीरांवर सिनेमा आहे तर त्यांच्यावर फोकस घेतलेले गाणे हवे ना प्रमोशन मधे! ती सना शिंदे केदार शिंदेंची मुलगी हे आत्ताच कळले.

पण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने 'बहरला हा मधुमास' ह्या गाण्याचे ट्रेंडिंग सुरु आहे. त्यावरून 'महाराष्ट्र शाहीर' च्या प्रसिद्धीमधून 'शाहीर साबळे' पूर्णपणे झाकोळले गेले आहेत, आणि केवळ केदार शिंदेंची कन्या 'सना शिंदे' हिच्या प्रदार्पणासाठी बनवलेल्या चित्रपटाचा भास होत आहे.>>> अगदी अगदी !!
अन्कुशच वय जाणवतय यात.

आदीपुरुष चा ट्रेलर आज पहिला !
जरा बरा वाटला ,स्पेशल इफेक्ट्स जागतिक दर्जाच्या तोडीचे वाटले , पूर्वीच्या ट्रेलर मध्ये मात्र पूर्णपणे फसले होते .
https://youtu.be/scNmYjoR-qM

बाकी ठीक आहे पण सीता थेट २१ व्या शतकातून इम्पोर्ट केलेली दिसते आहे Happy वनवासात पण सिल्की केस, आयब्रो इ. फुल ग्रूम्ड लूक, सुळसुळीत पेस्टल कलर च्या शिफॉन साड्या वगैरे!

वनवासात पण सिल्की केस, आयब्रो इ. फुल ग्रूम्ड >> मग काय ऑथेंटीसिटीसाठी हात-पाय वॅक्सिंग न केलेली "आधी-पुरूष" केसाळ सीता दाखवाय्ची म्हणता?

आदिपुरुषच्या ट्रेलरमधले पुरुषही वेल ग्रुम्ड आहेतच की. किती वर्ष पौराणिक कथांचा सिलिंडर पुरवून पुरवून वापरणार आहेत देव जाणे!!

वनवासात पण सिल्की केस, आयब्रो इ. फुल ग्रूम्ड >> मग काय ऑथेंटीसिटीसाठी हात-पाय वॅक्सिंग न केलेली "आधी-पुरूष" केसाळ सीता दाखवाय्ची म्हणता >>>>>>>>>
योग्य मुद्दा उचलला
खर म्हणजे अशीच वैचारिक मानसिक प्रगती प्रत्येक धर्मात झाली पाहिजे होती , नाही तर काहीजण अजून देखील घोंघडी पांघरलेले लांडगे आयेशाचे नुसते नाव घेतले तरी त्यांना कापरे भरते मग तिच्यावर चित्रपट येणे दूर राहिले .....
Happy

ड्युन भाग दोन व ओपनहायमर दोनी सिनेमांचे ट्रेलर आलेत यु ट्युब वर. मस्त. मस्त. ड्युन वन आता प्राइम वर रेंट करुन उपलब्ध आहे.

वैचारिक मानसिक प्रगती म्हणून लक्ष्मणरेषा कटाप. सीतेने अग्निदिव्य करायला नकार द्यावा किंवा रामाला म्हणावं after you.

>> सगळी स्टोरीच रिव्हील केलीय.. थोडातरी सस्पेन्स ठेवायचा...>> च्रप्स, सस्पेन्स कसला हो? रावणाने सीतेला पळवलं का? तिला रामाने स्विकारलं का? तिचं पुढे काय झालं वगैरे?

छान आहे तसा ट्रेलर
पण एक डार्क अंधारलेला लूक आहे जो मला अजिबात नाही आवडत.
आमच्या घरात हॅरी पॉटर लाऊन ठेवतात अध्येमध्ये त्यातही असेच सतत डार्क बॅकग्राऊंड ईरीटेट करते. ब्राईट कलर आणि ऊजेड का नाही जास्त वापरत हे लोकं?

जय श्री रामचा ताल असलेली म्युजिक मस्त आहे. नास्तिक असूनही अंगावर काटा आला. देवाला मानणाऱ्यांच्या अंगावर आणखी रोमांच फुलेल.

कलाकार सगळे घोगऱ्या आवाजाचे दाखवलेत हा अजून एक डोक्याला शॉट.
पण क्रिती सेनॉन बाकी मस्त दिसली आहे. नेहमीच आवडते. त्या झूठी मक्कारमध्येही श्रद्धा कपूरचा काहीतरी वेगळाच सपक लूक बघण्यापेक्षा हिच असती तर बरे असे कित्येकदा वाटले.

Pages