Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण ईशान खट्टर टायगर श्रॉफ
पण ईशान खट्टर टायगर श्रॉफ पेक्षा तरी अभिनयात बरा आहे..तब्बू बरोबर च्या १ सीरीज मधे वहावत गेलेल्या तरूणाचे काम छान केले होते त्याने.
अशा चित्रपटात सहसा अक्षय, टायगर, विद्युत जम्वाल अशांना घेतात.
स्वप्नील जोशी, अभिजीत
स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, ललित प्रभाकर यांचा सुद्धा विचार व्हावा नाहीतर मराठी प्रेक्षकांनी बहीष्कार टाकावा.
ललित प्रभाकरचा विचार नक्कीच
ललित प्रभाकरचा विचार नक्कीच व्हावा
अजून एक कुणीतरी मक्ख
अजून एक कुणीतरी मक्ख चेहऱ्याची हिरोईन आहे>>मृणाल ठाकूर नाव आहे" सीता रामम "मध्ये चांगलं काम केलेलं आणि" घोस्ट स्टोरीज "च्या एका भागातही होती एकंदरीत बरी अभिनेत्री आहे
नाळ भाग 2https://youtu.be
नाळ भाग 2
https://youtu.be/iwRCr0D-W_s?si=xjZQXEB2mim79tmI
रिलीज डेट १०नोव्हेंबर २०२३
सीता रामम "मध्ये चांगलं काम
सीता रामम "मध्ये चांगलं काम केलेलं >>> पण हाही एक भयंकरच सिनेमा होता, ट्रेलर बघून बघण्याचे धाडस केलेलं
तो कोण सलमान डुलकर आणि ही
पूर्ण बघूच शकलो नाही
हो स्टोरी अ आणि अ होती उगाच
हो स्टोरी अ आणि अ होती उगाच त्यात भारत पाकिस्तान घुसडलेलं हिरो दुलकर सलमानचा अभिनय नेहमीच(gulabs & gangs मध्येही) साधारण वाटतो पण हिरोईन प्रॉमिसिंग वाटलेली, चित्रपटात दिसली आहे छान.
सॅम बहादूरचा ट्रेलर
सॅम बहादूरचा ट्रेलर इम्प्रेसिव्ह आहे + मेघना गुलजार.
खूप दिवसांनी थेटरला खेचून नेईल असा सिनेमा वाटतोय.
आपल्या त्या मिस्टर कॅटने चांंगलं बेअरिंग पकडलंय भूमिकेचं.
इकडे यायला हवा सॅम बहादूर,
इकडे यायला हवा सॅम बहादूर, तरच बघता येईल.
मेघना गुलझार + विकी कौशल
मेघना गुलझार + विकी कौशल कॉम्बो चांगले असते. आणि विषयही इंटरेस्टिंग आहे.
आणि मिस्टर कॅट म्हणून नका हो. कॅटपेक्षा हजार पटीने चांगला अभिनेता आहे
सॅम बहादूर बघायला घरचे जाणार
सॅम बहादूर बघायला घरचे जाणार आहेत.. मी त्यांच्या तोंडूनच पहिल्यांदा हे नाव ऐकले. कारण माझा माहितीचा सोर्स एक मायबोलीच आहे. आता बघायला हवा ट्रेलर.
अरे छान आहे.. जायला हवे मलाही
र. आ. +१ कालच ट्रेलर पाहिला.
र. आ. +१ कालच ट्रेलर पाहिला. अगदी थिएटर मधे जाउन बघावासा वाटतोय असा ट्रेलर आहे. होप त्यांनी "या एकाच व्यक्तीला जागतिक, भौगोलिक आणि एकूणच सार्वकालिक राजकारण, अर्थकारण, समाजकारण माहीत होते व पंप्रसकट बाकीचे एकदम गये-गुजरे होते" असे चित्रण केले नसेल. मेघना गुलजार दिग्दर्शक असल्यामुळे तसे नसावे.
मि. कॅटचे (बोक्याचे?
) बेअरिंग ट्रेलरमधे तरी जबरी आहे. दोन अडीच तास राहते का बघू 
हाहाहा. मिस्टर कॅट म्हणजे
हाहाहा. मिस्टर कॅट म्हणजे बोका भारी कोटी.
मला विकी कौशल जाम आवडतो.
मिस्टर कॅट म्हणजे बोका भारी
मिस्टर कॅट म्हणजे बोका भारी कोटी. >>
इथे सांगू नये खरे तर, पण फिल्ड मार्शल माणेकशांवरच्या एका मेजर जनरलने लिहिलेल्या पुस्तकाची पीडीएफ नेट वर मिळाली. वाचतोय. मध्यंतरी कुठल्या तरी एका मासिकात त्यांच्या वर तीन कि चार लेखांची मालिका आली होती. साप्ताहिक पण असेल. टुडे / आउटलुक असेल. त्यातला मजकूर खरा आणि नायकत्व बहाल करणारा नसेल तर माणेकशा कधी कधी सत्तेला पण खरी खोटी सुनावत असे वाटते. पण अशा माणसाला मग पद्मविभूषण, फिल्ड मार्शल कसे मिळाले हे समजले नव्हते.
इंदिरा गांधीचे कास्टिंग शोभत
इंदिरा गांधीचे कास्टिंग शोभत नाहीये असे वाटले.
. त्यातला मजकूर खरा आणि
. त्यातला मजकूर खरा आणि नायकत्व बहाल करणारा नसेल तर माणेकशा कधी कधी सत्तेला पण खरी खोटी सुनावत असे वाटते
>>>> हो. १९७१ च्या युद्धाच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधींना स्पष्ट सांगितले होते की युद्ध सुरु करण्यापूर्वी सेनेला तयारी करावी लागेल. तसेच पावसाळ्यात बांगलादेश युद्ध करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेणे. इंदिरा गांधींसारख्या नेत्याला त्यांचे म्हणणे मानावे लागले. मग बाकीच्यांची काय गोष्ट?
बाय द वे, ते रिटायर झाल्यावर पहिला फिल्ड मार्शल असून त्यांना कित्येक वर्षे पेन्शन मिळाले नव्हते हे ही खरे आहे.
माझेमन - धन्यवाद. मी तेच
माझेमन - धन्यवाद. मी तेच आठवायचा प्रयत्न करत होतो. इंदिरा गांधींनी तेव्हाच्या लष्करप्रमुखांशी सल्लामसलत केली वगैरे वाचले होते. तेच माणेकशा का ते आठवत नव्हते. मात्र पंप्रने लष्करप्रमुखांकडून युद्धाच्या लॉजिस्टिक्स बद्दल सल्ला घेणे व तो मानणे हा "normal discourse" आहे. त्याचे विशेष वाटायचे कारण आजकाल नेते हे सर्वश्रेष्ठ समजायचा काळ आहे
मात्र त्यांना पेन्शन मिळाले नाही ई बद्दल - निवृत्त झाल्यावर त्यांनी बरीच उघड भूमिका घेतली होती. सरकारमधल्या लोकांविरूद्ध सुद्धा. त्याचा परिणाम असावा.
पंतप्रधानांचा उल्लेख ते
पंतप्रधानांचा उल्लेख ते "स्वीटी" असा करत. इंदिरा गांधींचा असा उल्लेख करण्याचे धैर्य कदाचित फिरोज गांधींनीही दाखवले नसेल.
Archies च trailor आलं.
Archies च trailor आलं.
Nepotism , Hinglish उच्चार, lack of expressions , plastic faces या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि जुना काळ , वेषभूषा dreamy picturization , story telling , young blood एकीकडे .
पूर्वीच्या काळी DD metro वर सुट्टीत Fun time लागायचं , त्यातल्या fairy tales ची आठवण आली.
बघेन म्हणतेयं
आर्ची ज पाहिले ट्रेलर. टाइम
आर्ची ज पाहिले ट्रेलर. टाइम वार्प मध्ये आहेत असेच नाही तर स्पेस वार्प पण कथा भारतात घडते की कुठल्यातरी भागात? हे लोक्स श्रीमंत शेट विरुद्ध लढा देतात हे फार विनोदी असणार. सुहाना खान भयंकर ऑर्डिनरी दिसते. बाकी तसलेच नेपो किडस. पण भयंकर टॅलेंटेड असणार. त्यात शरीर प्रदर्शनही मजबूत करत अस्ते. हिटच होणार.
सॅम बहादुर ट्रेलर आवडले.
सॅम बहादुर ट्रेलर आवडले. ते सुंदर स्त्री यांना काँप्लिमेंट्स देत असत असे ऐकले आहे एका सुंदर आर्मी वाइफ कडून. पण मी त्यांच्या पराक्रमा वर कॉन्संट्रेट करणार आहे. ते वेगळ्या जमान्यातले कल्चर होते/ आहे.
भयंकर टॅलेंटेड असणार >>>>
भयंकर टॅलेंटेड असणार >>>>
याची काही गॅरंटी नाही. हां कॅमेर्यासमोर सफाईदारपणा असू शकेल फार तर. बाकी यात नेपो नसलेली पण मुलं आहेत. डिक्लेअर झाली त्यावेळी नावं तरी दिसत होती. आता तर नावंही नाही दाखवत.
सॅम बहादूर चा ट्रेलर फारच
सॅम बहादूर चा ट्रेलर फारच भारी वाटतोय
विकी कौशल ही भूमिका जगलाय असं वाटतंय
भयंकर टॅलेंटेड असणार >> भयंकर
भयंकर टॅलेंटेड असणार >> भयंकर आणि टॅलेंटेड एकाच वाक्यात ,नक्की काय म्हणायचंय अमा
पोरांच्यात टॅलेंटे किती हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल पण प्रोमो वरून polished वाटत आहेत .जसे वरून, आलिया आलेले तयारीने स्टुडंट ऑफ द एयर मध्ये. हो सुहाना यात फारच सामान्य दिसते. खुशी चा आवाज सेम जानवी सारखा आहे.
Archies चा trailor. युरोपियन
Archies चा trailor. युरोपियन कपड्यात भारतीय पोरं. मी एक सोनेरी केसांचा मुलगापण पाहिला त्यात. आणि गावाचं नाव Riverdale. बाकी स्टोरी लुटपुटूचीच दिसली..
झोया अख्तरचे सगळेच पिक्चर larger than life असतात. एक गली बॉय तेवढा मला आवडलेला.
Animal
Animal
रणबीर अनिल कपूर
भडक वाटला फार.. अंगावर आला.. बघणे अवघड आहे
https://youtu.be/8FkLRUJj-o0?si=wN-3UgCDrBPBZCtE
एक गली बॉय तेवढा मला आवडलेला.
एक गली बॉय तेवढा मला आवडलेला.
.>>>>
तो माझा त्यावर्षी सर्वाधिक आवडलेला पिक्चर होता..
"अॅनिमल" खरंच बघवेल की नाही
"अॅनिमल" खरंच बघवेल की नाही वाटतंय. नुसता व्हाय्लंस नसुन कथेत पण घुसमट आहे असं वाटतंय. तसं झालं की खूप अस्वस्थ वाटतं पहाताना. अनिल कपूर व रणबीरचा ट्रेलरमधला पहिला सीन भारी आहे. अनिल कपूरच्या चेहर्यावरचे भाव अचूक आहेत, सगळं सांगुन जातात. मायबोलीकरांकडुन रिव्ह्यु वाचुन मग ठरवणार पहायचा की नाही.
अनिल कपूर व रणबीरचा
अनिल कपूर व रणबीरचा ट्रेलरमधला पहिला सीन भारी आहे
+786
तो एकच सीन दाखवला असता तरी उत्सुकता वाढली असती. त्या सीनने अपेक्षा फार उंचावर नेल्या आणि नंतर काहीतरी वेगळाच भडक ट्रेलर बघतोय असे झाले.
https://youtu.be/zqGW6x_5N0k
https://youtu.be/zqGW6x_5N0k?si=gAxiRqtaO8JpToUw
हे गाणे भारी आहे Animal मधले जर तुम्हाला पंजाबी गाणी आवडत असतील तर
Pages