चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामायण मुळात सीतेची कहाणी नाहीये. किंबहुना रामायण ही कथा स्त्रीप्रधान नाहीये. त्यामुळे सीतेच्या पात्राला अभिनय कमीजास्त आला तरी हरकत नाही.

तसेही ईनजनरल अश्या बिग बजेट मल्टीस्टारर स्पेशल ईफेक्टने नटलेल्या चित्रपटांमध्ये अभिनयापेक्षा जास्त महत्वाचे ठरते ते तुमचा स्क्रीन प्रेझेन्स. त्यासोबत तुमच्यात एक्स फॅक्टर असेल तर आणखी उत्तम.

आचार्य, रावण म्हणजे अरविंद त्रिवेदींबद्दल बोलताय का? अहो त्यांनी तर रावणाचे पात्र अजरामर केलेले. काय अभिनय होता!! आणि दारा सिंग , हनुमान. वाह वाह.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट : आदीपुरूष मधे महात्मा गांधी आणि सावरकर फाईट आहे हे कुणाला सांगू नका.

नवीन Submitted by रघू आचार्य on 10 May, 2023 - 08:5

एका चिट्रपटात कालीदास सायकल घेउन ण्युटन बरोबार बघितलाय

मेग 2 चा ट्रेलर पहिला

हास्यास्पद आणि आचरट सिनेमे काढण्यात हॉलिवूड वाले अजिबात कसर सोडत नाहीत, पहिला भाग काय कमी आचरट वाटलं म्हणून आता दुसरा भाग त्यावर कडी करणारा आहे

इतकं निर्बुद्ध कसं कोणी असू शकतं Happy

डीजे तू दिलेली लिंक बघितली, मला रणदीप हुड्डा, रणदीप हुड्डा च वाटतोय, सावरकर म्हणून वाटला नाही, निदान यात तरी.

भारी वाटतोय हुडा चा सावरकर ट्रेलर.
२८ मे लाच साऊथमधून RRR च्या रामचरणने त्याच्याही मुव्हीचा टीझर ड्रॉप केला. सावरकर garu च्या जयंतीला इंडिया हाऊस नामक मुव्ही लॉन्च करतोय असं त्याने म्हटलं आहे.

सैफ क्रितीपेक्षा बुटका व अचपळ आहे, सीताहरण होताना बघणं गंमत होईल. CGI मुळें believable वाटेल कदाचित पण एकंदरीत कठीण वाटतंय. करेल कसतरी ,आपल्याला काय >>>> नविन ट्रेलर बघितलस का अस्मिता ??? तुझी शंका रास्त होती. आता हॉस्पिटल मध्ये पेशंटला जस ढकलगाडीवरून घेउन जातात तस अद्रुश्य स्ट्रेचर वरून घेउन जातोय तो ओढत .

Lol बघून आले स्वस्ति.
कास्टिंग गंडलं की असे 'विक्रम वेताळ' प्रकार करावे लागतात. आता एवढं पारंब्यांनी बांधल्यावर ती दागिने कशी फेकणार ? पुष्पकात 'चेक इन' झाले की पारंब्या काढतील दुसरं काय. लार्जर दॅन लाईफ दाखवायच्या नादात हे ऑरगॅनिक वाटणार नाही.

ट्रेलर इम्प्रेसिव्ह आहे फक्त ग्रेइश टोन फार आहे ओव्हरऑल, शरद केळकरचा आवाज किती पर्फेक्ट मॅच होतो प्रभासला...मला फार आवडतो शरद केळकर, तथाकथित ए लिस्टर नाहिये म्हणून नाहितर राम म्हणुन छान शोभला असता.

नेहमी प्लान बी तयार ठेवावा. तीनशे रूपये घालवायचे आणि निराशा पदरात पाडून घ्यायची यापेक्षा सुरूवातीला थोडा अंदाज आला कि लगेच विनोदी म्हणून बघायला सुरूवात करावी. किंवा सरळ धार्मिक चित्रपट म्हणून थेटरातच भजन सुरू करावं, आरती करावी, टाळ्या वाजवून ताल धरावा. पैसे वसूल होण्याशी मतलब.

ग्रेइश टोन फार आहे ओव्हरऑल >> हो , तोच आवडत नाहीये.
प्रभासला कोणीतरी बाहुबलीच्या प्रभावाखालून बाहेर काढा. सैफचा रावण आवडला , क्रितीपण आवडली. थेटरला जाऊन सकाळचा शो बघायच या निर्णायावर कौटुंबिक सभेत शिक्कामोर्तब झालं आज.
आणखी एक रामायण येतय म्हणे रा-लियाला घेऊन.

शरद केळकरला अभिनय येत नाही म्हणुन तो मागे पडला असं मला वाटतं प्राजक्ता. त्याचा आवाज कमालीचा शोभलाय बाहुबलीत.

शरद केळकरला अभिनय येत नाही म्हणुन तो मागे पडला असं मला वाटतं>>>
लक्ष्मी बाँब मधे तर त्याचा आवेश आणि अभिनय अक्षय ला ही भारी पडलाय असे ऐकले.. असो अ‍ॅक्टींन न येणारे अनेक नग आहेत. अर्जून कपूर कायमस्वरुपी माती खाऊ कॅटॅगरी Lol

मला आवडतो शरद केळकर. दिसायला तळपदे पेक्षा तर नक्कीच भारीये. पण बरीच वर्ष वाया गेलियेत वयाची..

प्रभास हा आळसावलेला वाटतो , मला तर प्रभास बोबडं बोलतो असे वाटते . तो अजून बाहुबलीच्या प्रभावातून बाहेर आलेला नाही. सीता हरण सिन म्हणजे अ आणि अ ... त्यापेक्षा जुन्या सिरीयल मधला सिन जास्त बरा.. पारंब्या काय काहीही ... वर कोणीतरी सांगितल्या प्रमाणे संपूर्ण चित्रपटात ग्रे शेड आहे .. नॉट at all impressive . अजिबात बघणार नाही

Pages