चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गदर २ टिझर मधे सनी देओल कसला भारी दिसतो अजुन, त्याला शोभतात असे फाइट सिन्स !
पण अनिल शर्माने त्याच्या मुलाला लाँच केलय म्हणे यात, सनी किती वेळ दिसणार काय माहित Uhoh

आदिपुरुष च्या ट्रेलर मध्ये व्ही एफ एक्स चा अतिरेकी वापर हास्यास्पद आहे. इन्टरनेट नवे होते तेव्हा अति उत्साही एच टी एम एल वाले आपले होम पेज करत व ब्लिंक, कलर वगैरे चा मुक्त हस्ते वापर करत ते पाहून डोळे दुखत, त्याची आठवण आली. एन्टीआर, कन्नड राजकुमार अरविंद त्रिवेदी वगैरेंनी हे सारे नसतानाही मजा आणली होती. हे फारच बालिश आहे. शिवाय सद्याच्या वातावरणाला पाहून 'भारत की बेटी', भगवा ध्वज' वगैरे घुसवले आहे, टॅक्स फ्री ला उपयोगी होईल.

अरे नव्या ट्रेलर मधे स्ट्रेन्जर थिंग्ज वर डल्ला मारलेला दिसतोय Lol त्या सरपटणार्‍या वेली वगैरे.
भारत की बेटी? तेव्हा "भारत देश" होता? Happy
भगवा ध्वज >>> ते त्या राऊत ने तान्हाजी मधेही घुसडले होते.

चित्रपट नाही वेबसिरीज .
कलाकारांची निवड अजिबात आवडली नाही. मूळ सिरीजमधल्या कलाकार आणि पात्रांशी तुलना केली तर मग अगदीच अपेक्षाभंग
https://youtu.be/AJ7QzqJi9YE

विद्या बालन आहे तर मग नक्की पहाणार. राहुल बोसपण चांगला आहे पण त्याला फार विशेष रोल आहे असं वाटलं नाही.

नीयत चा ट्रेलर चांगला वाटतोय. ( नाइव्ज आउट बद्दल स्वातीशी सहमत!) विद्या बालन मात्र अवघडलेली वाटतेय त्या लूक मधे. अर्थात हे ट्रेलर वरुन बनलेले मत. पाहणार नक्कीच.

रॉकी ऑर रानी कि प्रेम कहानी .. कित्ती स्टिरिओटिप्पिकल विष्॑य.. टु स्टेट्स चं केजो व्हर्जन Uhoh

https://youtu.be/6mdxy3zohEk

ट्रेलर मधे सगळी स्टोरी समजतेय सेम ओल्ड फॉर्म्युला... व्हॉट्स राँग विथ रणवीर ??
आलिया रणवीर पेअर पण अगदीच बकवास दिसतेय , काहीच केमिस्ट्री नाही .. अ‍ॅक्टिंग पण कित्ती लाउड !
जे काही प्लस पॉइंट्स आहेत ते म्हणजे कॉस्च्युम्स, सेट्स, डान्स नंबर्स अ‍ॅज ऑल्वेज !

आलिया रणवीर पेअर पण अगदीच बकवास दिसतेय , काहीच केमिस्ट्री नाही .. अ‍ॅक्टिंग पण कित्ती लाउड ! >>>> +1000000

अगदी अगदी ! म्हणजे स्टारकास्ट वरुनच माझ्या अपेक्षा नव्हत्याच पण ट्रेलर फारच लाउड आणी अ‍ॅव्हरेज आहे... सॉरी टु से पण केजो २५ वर्शात सुद्धा ९०ज च्या बाहेर आलाच नाहिये...अगदीच क्लिशे मुव्हि नेम...तुम क्या मिले गाण पण म्हणे यश चोप्राला ट्रिब्युट आहे पण केमेस्ट्री अगदी मिसिन्ग आहे.

तुम क्या मिले गाण पण म्हणे यश चोप्राला ट्रिब्युट आहे पण केमेस्ट्री अगदी मिसिन्ग आहे. >>> अगदीच! लगेच जाऊन ते गाणं बघितलं. २ ओळींत कंटाळा आला.

भुरभुर बर्फ पडत असून सुद्धा त्यांच्या डोक्यांवरून, केसांवरून ते मिसिंग आहे. Lol

आलिया भट तिच्या आईसारखीच ब्लँड दिसतेय यात अचानक , काय झालं हिला. शिफॉनच्या साड्या, बर्फ, हरवलेलं प्रेम, मूग गिळून त्याग, डोळ्यात आसू ओठांवर हसू = ट्रिब्यूट टू यश चोप्रा .
केजोही नव्या आयडिया विकण्याऐवजी जुन्याच आयडिया नव्या नावाने विकतो. हा टिरब्यूट त्याने अनेकवेळा दिला आहे. इश्कवाला लव्ह काय होतं, तुम्ही देखोंना काय होतं. गाणं बरं वाटलं पण नवीन काही नाही यात.

ललिता प्रीती - खरंच की. Happy

शाहरुख खानच्या 'जवान' या ट्रेलर बघितला. एकदम फुल्ल ऑफ ऍक्शन आहे. नयनतारा, दिपिका पदुकोण आणि विजय सेतूपती पण आहेत. पूर्ण हॉलिवूड स्टाईल सिनेमा आहे बहुतेक.

जवान ट्रेलर म्हणजे ‘हमखास हिट’ कॅटॅगरी दिसतोय, शाहरुख फॅन्स / साउथ मेगास्टार्सचे फॅन नक्की तुटून पडणार पहिल्याच आठवड्यात Happy
स्टोरी नक्की कळत नाहीये , दॅट्स गुड अ‍ॅक्चुअली !

जवान चित्रपट कमल हसनच्या "ओरु कैधियिन डायरी" आणि अमिताभ बच्चनच्या "आखरी रास्ता" वरून घेतलेला आहे. शाहरूख खानचा डबल रोल आहे. अब चा आरा हा कमलच्या ओकैडा चा रीमेक होता. जवान रीमेक नाही, पण प्लॉट सेम आहे.

बवाल चा ट्रेलर बघितला का ? >>> "कहना क्या चाहते हो??" अशी परिस्थिती झाली माझी. वरुण धवन त्या"बंटाई" मोडमधून बाहेरच पडत नाहीये. बद्री की दुल्हनियाँ टाइप दिसतंय सगळं. जान्हवी कपूर फार आवडत नाही.
हिटलरचा संबंध काय असावा कुणास ठाऊक.

अरे हा टकलू लूक सस्पेन्स तरी ठेवायचा ना? हल्ली ट्रेलर मधे सगळंच दाखवून टाकतात.

ट्रेलर आणि टीझर मधे काय फरक असतो ?

परेश मोकाशी चा नवा चित्रपट https://youtu.be/CYCTiCAXGxY?si=EzcmLww-OMKdbS3- इंटरेस्टिंग वाटतोय .हल्ली परत 90 काळ दाखवण्याची फॅशन आलेली दिसते.

वेलकम 3 ट्रेलर https://youtu.be/L0L3GGgRMn0?si=A2_PLS3nKPYAEspk जत्राच दिसतेय यावेळी

बरोबर डिरेक्टर आशिष भेंडे आहेत पण रायटर परेश मोकाशी आहेत म्हणून लिहिलं त्यांचा चित्रपट ,शेवटी चित्रपट लेखकाचा जास्त असतो पण तेव्हडं महत्व लेखकाला कुठे मिळतं.

Pages