चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mrs. Chatterjee Vs Norway (राणी मुखर्जी) या सिनेमाचा ट्रेलर आला आहे. शीर्षक वाचूनच मायबोलीवरच्या धाग्याची आठवण झाली. भारताने हस्तक्षेप करून मिसेस चटर्जींना त्यांच्या मुलाची कस्टडी मिळवून दिली आहे. सिनेमा याच घटनेवर आहे. ट्रेलर अंगावर येणारा आहे. नक्की पाहणार.
राणि मुखर्जी ही काही आवडती अभिनेत्री नाही. पण तिच्या वाटेला काही सशक्त भूमिका आलेल्या आहेत. त्या तिने चांगल्या निभावल्या आहेत. हा सिनेमा सुद्धा राणीसाठी नाही तर कंटेट साठी पाहणार आहे. राणि या भूमिकेला न्याय देऊ शकेल.

Mrs. Chatterjee Vs Norway
https://www.youtube.com/watch?v=CioDVCtgyN0

परवाच आमच्या घरात या चित्रपटावर चर्चा चालू होती. कारण सत्य घटनेवर आहे

मुलांना हाताने भरवले, सोबत झोपवले, देवाचा टिक्का लावला म्हणून आईबाप त्यांना योग्य वागवत नाहीत म्हणत पोरांना त्यांच्यापासून दूर केले? सिरीअसली?
बाप तसाही त्यात नॉर्वे सिटीजनशिपच्या चक्करमध्ये दाखवला आहे. हा ही खरे तर एक धक्काच. मुले नाही सोबत तरी या माणसाला भलतेच पडलेय. पण ज्या आईशी हे झाले तिच्याबद्दल खरेच वाईट वाटले.

खालच्या लिंकवर वाचल्यास समजेल, भारतात आल्यावर पुन्हा तिला आणखी एक केस लढावी लागली.
https://www.wionews.com/entertainment/mrs-chatterjee-vs-norway-the-real-...

ही बातमी तेव्हा पेपरमध्ये येत होती. मला वाटतं तेव्हा आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात काही भूमिका बजावली होती. मला बरोबर आठवत असेल तर नंतर त्या मुलाला ऑटिझम असल्याचं कळलं होतं.
WION ची लिंक आत्ता वाचली. आता आई आणि मुलं एकत्र रहात आहेत हे वाचून बरं वाटलं.

भारत सरकारने मध्यस्थी करून मुलाची कस्टडी त्याच्या आईवडीलांना द्यायची नसेल तर त्याच्या आजी आजोबांना द्यावी ही यशस्वी शिष्टाई केली होती. नॉर्वेमधे विनापत्य लोकांना दत्तक मूल मिळवून देणारे माफिया पण आहेत असे त्या चर्चेत आले होते. भारतात परत आल्यावर आजी आजोबांकडून मुलाची कायदेशीर कस्टडी ( कायद्याने नाव लावणे) मिळवून देण्यासाठी भारतातल्या कोर्टात अर्ज केला होता.

काकाला दिली होती कस्टडी असे त्या वरच्या बातमीत आहे. तसेच नवऱ्यालाही तिने सोडले. छान केले. अश्या माणसासोबत राहण्यात काही अर्थ नाही.

After a diplomatic row between the two countries, the Norwegian authorities decided to award the custody of the children to their father's brother, enabling him to bring them back to India.

By then Anurup and Sagarika's marriage ran through troubled waters and they separated. Sagarika had to undergo another round of legal battle, this time in India, to get custody of her children. She had alleged that her husband and her in-laws had falsely accused her of being mentally unstable and hence unfit to take care of the two children.

In 2013, Sagarika was granted custody of her children by the court. She now reportedly spends a quiet and private life with her children in Kolkata, India.

आठवते ही घटना. Sad
त्या देशातच अजुन एक वेगळ्या प्रकारची भयंकर घटना झाली होती एका स्त्री डॉक्टरच्या बाबतीत.

वरच्या सिनेमात राणी मुखर्जीने चांगले काम केले असेल पण अभिनयात अजुन सशक्त अभिनेत्री हवी होती, विद्या बालनसारखी.

ती घटना बहुतेक आयर्लंड ची होती का?>>> हो.
ही बातमी शॉक होता एक.. स्वपरिक्षण वगैरे करायला लागली होती पब्लिक.
ह्यावर पिक्चर येतोय आणि ते पण राणी मु. सारखी सशक्त अभिनेत्री. हातातले काम सोडून नक्कीच पाहणार.

विद्या बालन, राणी, शेफाली छाया ह्या आणि इतर ही काही तोडीस तोड आहेत. त्यांना भुमिका मिळत आहेत ही जमेची बाजू आहे.

ताज चा ट्रेलर पहिला
नसरुद्दीन शहा, सुबोध भावे, अदिती राव हैदरी अशी स्टारकास्ट आहे
अकबर, सलीम वगैरेक स्टोरी आहे पण वेगळी वाटत आहे फुल्ल ऑन मसाला ओतलाय
बहुदा ते एम्पायर्स ऑफ मुघल यावर आधारित आहे

ती घटना बहुतेक आयर्लंड ची होती का? >> बहुधा नॉर्वे. त्याच देशात मुलांच्या बाबतीत जगातले सर्वात कडक कायदे आहेत. त्यावरून टीकाही झालेली आहे.

नॉर्वे ची बरोबर आहे(म्हणजे बंगाली कुटुंबाबरोबर घडली ती नॉर्वे मध्ये हे बरोबर आहे)
मी आणि सुनिधी दुसऱ्या एका भूतकाळात घडलेल्या आयर्लंड च्या घटनेबद्दल बोलत होतो.

कपिल शर्मा च्या झिगॅटो चं ट्रेलर पाहिलं.आवडलं.डोळ्यात पाणीही आलं.
चक्क कपिल शर्मा चा अभिनय आवडलाय.

^^^^^
या चित्रपटातल्या हिरविनी मूळ फिमेलच आहेत ना ?

भीडचे ट्रेलर अंगावर आले. आई सेकंड वेव्ह मधे गेली आहे, म्हणून कदाचित. एकुणच इतकी हताश , विचित्र परिस्थिती आणि इतके मृत्यू बघितल्याने मला अजूनही पॅन्डेमिकचा भयंकर ट्रॉमा आहे, बहुतेक मी आता कधीच पूर्वीसारखी होणार नाही. मनाला कुठेतरी हे विसरायचं सुद्धा नाहीये.

घर बंदूक बिर्याणी नावाचा सिनेमा ट्रेलर आला आहे. नागराज मंजुळे पोलिसी खाक्यात शोभतो. पण बाकी पिक्चर बोअर वाटतो आहे. निर्माता मंजुळे आहे आणि दिग्दर्शक कुणी निराळाच आहे.

त्याचा ट्रेलर चांगला आहे. शेफर्ड टोन मधे पार्श्वसंगीत वापरले आहे. संवाद आणि व्हिज्युअल्स यांचा कॉट्रास्ट प्रभावी आहे. पार्श्वसंगीत उत्तम आहे. अजय function at() { [native code] }उल ऐवजी एव्ही प्रफुल्लचंद्र आहेत. हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ मधे येतोय. नाळचा दिग्दर्शक आहे .
नागराज मंजुळेचा सिनेमा आहे असं भासवण्याचा प्रयत्न असल्याने सिनेमा कसा असेल याबाबत शंका वाटते. क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि कार्यकारी निर्माती नामधारी असतात.

Pages