चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कटरिना, सिद्धांत, इशान यांचा "फोन भूत" https://youtu.be/5fTVslrPsL0
(टायगर श्रॉफने जॅकी श्रॉफ सारखं दिसायचं तर इथे जॅकी श्रॉफ टायगर श्रॉफ सारखा दिसतो!!)

फोन भूत चा ट्रेलर आवडला .

हर हर महादेव चा ट्रेलर आला . शरद केळकर आवडला . महाराज म्हणून सुभा , चिमापेक्षा नक्कीच बरा वाटला .

><<<तुम्ही काय हसताय सगळेजण ,गरीबांची 'ओटीटी यात्रा' आहे ही ! जसं टूर्स अँड ट्रॅव्हल्सची लोक सगळं दाखवतो म्हणून एकही धड बघू देत नाहीत तसं आहे हे. हाऊ टू ट्रेन युवर पुष्पक, नकली फरवाले बाबा राम रहीमचे गॉट, ब्रदर बेअरचा जांबुवंत, प्लॅनेट ऑफ एप्सची कॉपी पेस्टेड निएन्डरथलसेना, लॅवेन्डर वल्कलांतली ग्रीकदेवतेसारखी रोमन सीता, अमेझॉनच्या खोऱ्यातले दंडकारण्य, थॉरोत्तम राम, आल्प्सवरचे कैलास, उचल्या नजरेचा लक्ष्मण, >>>>>>

स्वतंत्र धागा झालाच पाहिजे अस्मिता..

अंड्याच्या टरफलात श्रीखंड घातल्याचा भास होतोय या सिनेमातील चित्रे बघून..

हर हर महादेव चा ट्रेलर आला . शरद केळकर आवडला . महाराज म्हणून सुभा , चिमापेक्षा नक्कीच बरा वाटला .>>>>>>>
हेच म्हणणार होतो .

चिन्मय ने महाराजांचा रोलच करू नये म्हणून त्याच्या विरोधात कोर्टात याचिका टाकता असती तर किती बर झालं असते .

हर हर महादेव मध्ये सुबोध भावे शिवाजी महाराज झाला आहे. शरद केळकरने बाजीप्रभूचा रोल केला आहे. शरद केळकरला मराठी नीट येत नाही. तो ग्वाल्हेरचा आहे. ट्रेलर बघून तरी सुबोधचं काम आवडलं. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू वगैरे भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. त्याला भारतभर यश मिळाले तर छान होईल.
फुरोगामी : LOL . मांडलेकर प्रयत्न खूप करतो पण तो काही केल्या महाराज वाटतच नाही Happy

मला शरद केळकर महाराज म्हणून परफेक्ट वाटतो, तानाजी पिक्चर बघितला नाही पण प्रोमोज बघितले. चि मा, सुबोध भावे, म मां यांच्यापेक्षा तो महाराज म्हणून भावतो.

शरद केळकरला मराठी नीट येत नाही. तो ग्वाल्हेरचा आहे. >>> हो, तो मध्यप्रदेशमधल्या गुणाचा आहे, ते ग्वाल्हेरजवळ आहे का ते माहीती नाही, तो एकदा झीच्या प्रोग्रॅममधे आलेला (जीना इसिका नाम है असावं त्याचं नाव), ज्याचं अँकरींग फारुख शेख करायचे. तेव्हा त्याने सांगितलं होतं की तो गुणाचा आहे, त्याची आई तेव्हातरी तिथेच रहात होती आणि तिथून या प्रोग्रॅमसाठी आलेली. मध्यप्रदेशात वाढलेले जसं मराठी बोलतात तसं तो बोलतो.

इथे या पिक्चरमधे तो महाराजांच्या भुमिकेत हवा होता.

सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शरद केळकर सर्वच उत्तम अभिनय करतात आणि तिघेही आवडतात पर्सनली.

शरद माझ्या मैत्रिणीचा सखा आते भाऊ आहे..
मला पण त्याने साकारलेले महाराज आवडतात.
सुबोध भावे च नाक बाकदार नसल्याने तो महाराज वाटत नाही.. पण ची मा आणि मेकप चा 1 इंच थर फासलेल्या , आणि सारख सारखं ," भले शाबास " म्हणणार्या कुलकर्णी बाई जिजाऊ नाहीत हे बघून मी निश्वास सोडलाय...

दृश्यम २ चा ट्रेलर आला. खतरी वाटतोय. पहिला भाग आवडला होता. आता यात अजून काय बघायला मिळेल याची उत्सुकता आहे. अक्षय खन्ना अशा खवट भूमिकांमध्ये मस्त वाटतो. पण खूपच काटकुळा (म्हातारा) दिसतोय यात. बाकी स्टारकास्ट सेमच दिसतेय. बघू.

दिगपाल लंजेकर ने महाराजांच्या सेनापती मंडळी वर बहुतेक आठ सिनेमे बनविणार होता असे वाचल्याचे आठवते .
त्याचा पहिला सिनेमा फर्जंद मोठ्या उत्सुकतेने बघायला गेलो आणि चिन्मय ने केलेला महाराजांचा रोल पाहून पुढील सात सिनेमात काय वाढून ठेवलंय याची कल्पना आली , कारण आठ ही सिनेमात त्याने महाराजांची भूमिका चिन्मय ला देण्याचे कबूल केलं होते .
खांदे ओघळलेला चिन्मय दरीतून उड्डाण घेऊन बुरुजावर पाय ठेवतो ते दृश्य पाहून लांजेकर ला फेसबुक वर बजेट नसेल तर कशाला महाराजांच्या वर सिनेमे बनवता ? व्ही एफ एक्स नाही , महाराजांच्या भूमिके साठी किमान शंतनु मोघे ला तरी घ्यायचे होते , बजेट नाही तर महाराजांवरील सिनेमा नका बनवू !
वैगेरे ! वैगेरे !!! त्याला फेसबुक वरून लेक्चर दिले .
तर बहाद्दरने मला ब्लॉक करून टाकले , मग मी पण इरेला पेटलो आणि फेसबुक ला माझ्या आयुष्यातून कायमचे हद्दपार केले Happy

कडक आहे द्रुश्यम २
मी मध्यंतरी ओरिजिनल भाषेतला बघायचा प्रयत्न केलेला. पण नाही झेपला. बोअर होऊ लागले. मग म्हटले चला आपल्या अजय देवगणची वाट बघूया. सोबत अक्षय खन्ना आहे म्हणजे डबल मेजवानी आहे. खरेतर ट्रिपल.. तब्बू आहेच आपली.. मजा येणार आहे. थिएटरलाच बघायचा हा.. कधी एकदा पिक्चर बघतोय आणि परीक्षणाचा धागा काढतोय असे झालेय Wink

https://www.youtube.com/watch?v=MTECjlKUgEE&ab_channel=HombaleFilms

कांतारा हा जबरदस्त चित्रपट!

( यातला क्लायमॅक्स पाहून लोक बधीर झाले, बायका ओरडल्या वगैरे म्हणे )

परंतु, छायाचित्रण किंवा कथा या दोन्ही बाबतीत अतिशय सरस आहे हा चित्रपट!

अने, भले शाब्बास कुलकर्णीबाई वाचून हसू आले Lol

मी बघितला नाहीये पिक्चर, प्रोमोज बघितले ( मी पिक्चर फार बघत नाही, प्रोमोज बघते ) .

https://youtu.be/kG4BWRyCSo0
जाहिराती हा धाग्याचा विषय नाही माहीत आहे , पण you tube वरील काही जाहिराती असतातच खूप छान .
अगदी हृदयाला डायरेक्ट भिडणाऱ्या .....
या दोन्ही जाहिराती फॉरवर्ड न करता आपण पाहू शकतो ..

छान आहेत जाहीराती. हृदयस्पर्शी. शेअर केल्याबद्दल धन्यवाद
पण तो आमीरचा काय सीन आहे. त्याचे नाव का वापरलेय? ईथे अवांतर आहे. वेगळा धागा काढा तसेच काही असेल तर..

तुम्ही धागा काढला की सुपरडूपर हिट होतो

https://youtu.be/c4d2f9gEvu4
हे घ्या !
तुमच्या अजून एक नवीन धाग्यासाठी मटेरियल पुरवले आहे .
यात हिंदू पद्धतीच्या लग्नात मुलगा मुलीच्या घरी राहायला जातो असा नवीन पायंडा त्यांनी पाडलाय , ज्यात काहीही वावगे नाही .
पण काही राईट विंग वाले उचकले आहेत.

Uunchai - Official Trailer | Amitabh Bachchan, Anupam Kher, Boman Irani | Rajshri Movie
https://www.youtube.com/watch?v=rerwio14Fes

एवरेस्ट चढणारे म्हातारे
ईंटरेस्टींग दिसतेय प्रकरण. चित्रपट जमला की नाही हे बघितल्यावरच समजेल.

Uunchai - Official Trailer | Amitabh Bachchan, Anupam Kher, Boman Irani | Rajshri Movie
https://www.youtube.com/watch?v=rerwio14Fes

एवरेस्ट चढणारे म्हातारे
ईंटरेस्टींग दिसतेय प्रकरण. चित्रपट जमला की नाही हे बघितल्यावरच समजेल.

एवरेस्ट शिखरा वर नाही, एवरेस्ट बेस कँप ट्रेक दिसतोय. का कुणास ठाऊक डॅनीला पाहिल्या क्षणी तो मरणार असेच डोक्यात आले!

एकदा एक राजा सुख शांतीच्या शोधात घर सोडून बाहेर पडतो. एका खेड्यात कोला नावाचा उत्सव सुरू असतो तिथे त्याला वराह देवतेचा वरदहस्त असल्याच्या आणि सुख शांती नांदत असल्याचा साक्षात्कार होतो. ती देवता कोली उत्सवाच्या नर्तकात (पुंजारली) संचारत असते आणि त्यांच्या पिढ्यागत हे सुरू असते. पुंजारली त्या लोकांचे हित जपत असतो त्यांचे सगळे प्रश्न सोडवत असरो. राजा त्या देवतेला पक्षी पुंजारलीला आपल्या सोबत येऊन आपले राज्य सुख शांतीने समृद्ध करण्याची मागणी करतो बदल्यात हजारो एकर जमीन त्या लोकांना देऊ करतो.
आश्वासन मोडल्यास अनर्थ होईल या बोलीवर डील फिक्स होते आणि राजा आणि त्याचे राज्य सुखाने नांदू लागते.

मग काळ बदलतो, राजेशाही जाऊन लोकशाही सरकार स्थापन होते. राजाचा एक वंशज त्या जमिनीवर आपला हक्क सांगून ती परत घेण्याचा प्रयत्न करतो. तो पुंजारली नाराज होऊन तू जमीन ताब्यात घेण्या आधी रक्ताची उलटी होऊन मरशील असा शाप देऊन जंगलात निघुन जातो आणि वराह रूप धारण करून अदृश्य होतो. त्याच्या मागोमाग गेलेला त्याचा लहान मुलगा शिवा हे बघतो.

पुढे मग फॉरेस्ट ऍक्ट वगैरे येतो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक या लोकांना शिकार, जंगलातील सरपण, जडीबुटी आणणे यावर बंधने घालतात त्यांनी काही भागात अतिक्रमण केले आहे असा आरोप करतात आणि आपापल्या जमिनीचा हक्क सिद्ध करायला सांगतात.
राजाचा पुढचा वंशज ज्याला साहेब म्हणतात तो या लोकांशी खूप प्रेमाने वागत असतो, काळजी करू नका तुम्ही असेल ती कागदपत्रे घेऊन या आपण हक्क सिद्ध करू असे आश्वासन देतो, वकील नेमतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना सांभाळतो.

दरम्यान फॉरेस्ट ऑफिसर आणि शिवा यांच्यात वैर निर्माण होते चकमक होते. शिवा फारच उनाड वाह्यात असतो आणि पुंजारलीचे काम त्याचा मानलेला (की चुलत) भाऊ गुरवा बघत असतो. त्याचा खून होतो.

पुढे जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे खरे रूप उघडे पडते आणि मग उघड संघर्ष होतो. वराह देवता शेवटी शिवा मध्ये संचारते.
जो पर्यंत वराह देवतेचा वरदहस्त आहे तो पर्यंत त्या लोकांना कोणी तिथून हकलू शकत नाही.

क्लायमॅक्स मध्ये लोक सुन्न बधिर होतात वगैरे भाकड कथा आहे. सेट अप चांगला आहे. कोला उत्सवातील नर्तक पुंजारली छान साकारला आहे.
तो विरप्पन वरील "आज सामी" गाणे असणारा चित्रपट कुठला, त्या पेक्षा हा कैक पटीने चांगला असे मी म्हणेन.

कांताराचा ट्रेलरच अंगावर आला, ते बघूनच चित्रपट बघायची ईच्छा होत नाही.
काही लोकं तुंबाडशी तुलना करत आहेत. पण तुंबाड क्लासिक वाटला. हा काहीतरीच भडक ट्रेलर वाटतोय.

तो सामी गाणेवाला पिक्चर पुष्पा, मै झुकेगा नही साला. तो साऊथच्या शिट्ट्यामारू पब्लिक कॅटेगरीसाठी होता असे मला वाटते. आपल्याकडेही तसे पिक्चर आवडणार्‍यांना तो आवडला असेल. मी सुद्धा थोडा त्या कॅटेगरीत असल्याने मला थोडा आवडला. तुकड्या तुकड्यात आवडला. आयमीन पुष्पाचा स्वॅग भारीच! त्यावरच पिक्चरचा डोलारा होता.

कांतारा सुद्धा त्या कॅटेगरीतला आहे का?'

नाही.
त्यातील जंगल राज यामुळे या चित्रपटाची सुरवात झाल्यावर त्याची आठवण झाली.

कांतारा आवडला असेल तर ऋषभ शेट्टी चा गरुडा गमन वृषभा वाहन हि पहा.

राज शेट्टी आणि ऋषभ शेट्टी हि जोडगोळी कन्नड सिनेमात चांगले प्रयोग करत आहेत.

Pages