सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तापसी पन्नूच्या कपड्यांवर बोललं तर त्याची झाडाझडती? इथे मायबोलीवरच किती आयडीज् संघ स्वयंसेवकांच्या गणवेशाबद्दल हिडीस कॉमेंट करतात त्याचं काय करायचं?
>>>
संघस्वयंसेवकांनीही तापसी पन्नूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा.

संघस्वयंसेवकांनीही तापसी पन्नूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा.
त्यांनी आधीच कंगनाला मखरात बसवले आहे.

ऋन्मेष, ड्यू आयडी शेमिंगला आज्याबात दाद देव नका!

सगळे आंतरजालीय आयडी आपले अल्टर इगोच असतात. ड्यू असल्याने काय फरक पडणार ? फक्त ड्यू आयडीने सभ्य राहावे इतकेच, जे तुम्ही राहात असावा.

>>>>सगळे आंतरजालीय आयडी आपले अल्टर इगोच असतात. ड्यू असल्याने काय फरक पडणार ? फक्त ड्यू आयडीने सभ्य राहावे इतकेच, जे तुम्ही राहात असावा.>>>आल्टर इगोबद्दल, मस्त लिहीलय.

कॉमी धन्यवाद Happy

फक्त ड्यू आयडीने सभ्य राहावे इतकेच, जे तुम्ही राहात असावा. >>> हो, नक्कीच. कारण मला माझ्या प्रत्येक आयडीचे आणि त्यातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे श्रेय घ्यायला आवडते Happy

माझ्या प्रत्येक आयडीचे आणि त्यातून लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे श्रेय घ्यायला आवडते >> सभेतल्या टाळ्याखाऊ वाक्यासारखं विधान आहे हे.

त्यावेळी जे ट्रॉलिंग झालं होतं ते नक्कीच खूप हिणकस होतं . पण निदान याबाबतीत तरी 100 % दोष लोकांचा नव्हता असं वाटतं . आणि ट्रॉलिंग करणारे 100 % लोक संघीच होते असंही वाटत नाही .

नेपोटीझमच्या बाबतीत जसे सामान्य लोक आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत , सामान्य कुटुंबातून आलेल्या असंख्य गुणी अभिनेता / अभिनेत्रींना उखडून कुठच्या कुठे फेकून देऊन आपल्या लेकाला / लेकीला सगळ्या संधी मिळतील हे निश्चित करू आणि जनता आपलं काही बिघडवू शकत नाही हा कॉन्फिडन्स या स्टार्सना असतो .

त्याचप्रकारे तैमूर हे नाव ठेवण्यामागे भारत देशाचा आणि हिंदू जनतेचा अपमान करण्याचा हेतू होता असं तेव्हाही वाटलं होतं आणि आताही तेच वाटतं . तैमुर नावाचा अर्थ आवडल्यामुळे वगैरे नाही तर कसा आम्हाला तैमुरलंग आदरणीय आहे हे दाखवून देण्यासाठी मुद्दाम ते नाव निवडलं असण्याचीच शक्यता आहे . थोडक्यात काफरांच्या शिरांचे ढीग लावण्याचं त्याचं कृत्य आदरणीय होतं , स्तुत्य होतं , तो महान धर्मयोद्धा होता हेच सैफ अली खानला मान्य आहे , हे तो त्यातून सांगत आहे . आणि जनता यावर काय करू शकते ? काहीही करू शकत नाही .

हे इथे जन्मले , इथल्या संसाधनांचा वापर करून स्टार झाले , 25 -30 वर्षांपूर्वी इस्लामप्रेम उघड व्यक्त करण्याची यांची छाती नव्हती कारण 200 रुपयांचं तिकीट घेऊन सिनेमा पाहायला कोणी फिरकलं नसतं त्यामुळे सर्वधर्मसमभावाचा / हिंदू प्रियत्वाचा बुरखा घेऊन राहिले आणि आता कोट्यवधी रुपये साठले आहेत , आता जनतेची फिकीर करायची गरज उरलेली नाही , तेव्हा बघा तुमच्या नाकावर टिच्चून मुलाचं नाव तैमुर ठेवतो की नाही , काय करणार तुम्ही ( तुम्ही काफर ) ? असा हेतू वाटतो . इस्लामप्रेम असण्यात काही गैर नाही , प्रत्येकाला स्वतःचा धर्म प्रिय असण्यात काहीच चूक नाही . पण इस्लाम मधला सर्वात वाईट भाग , जे नॉन - मुस्लिम आहेत त्यांची हत्या करण्यात काहीच गैर नाही वगैरे वगैरे - नेमका तोच भाग रिप्रेझेंट करणाऱ्या क्रूरकर्म्याचं नाव यांनी निवडावं हा योगायोग / नावाचा अर्थ आवडला म्हणून केलेली निवड अजिबात वाटत नाही . सुंदर अर्थ असलेली आणखी खंडीभर मुस्लिम नावं असतील जी रक्तपिपासू कट्टर धार्मिक आक्रमकांची नव्हती .

हा आरोप बिनबुडाचा कशावरून नाही ? बॉलिवूडमधले काही मुस्लिम वारंवार जाणीवपूर्वक हिंदू धर्माचा अपमान करत असल्याची भरपूर उदाहरणं आहेत . याकूब मेमन गुन्हेगार नाही असं ट्विट सलमान खानने केल्याचं आठवत असेल .. याला का एवढी तळमळ ? यांच्या निष्ठा नेमक्या कुठे आहेत असा प्रश्न अशा घटनांतून पडतो .

तेव्हा ट्रॉलिंग हे इतर काहीही करू शकत नसल्याच्या असहाय्य रागातून जनतेने दिलेली प्रतिक्रिया होती असं वाटतं .

25 -30 वर्षांपूर्वी इस्लामप्रेम उघड व्यक्त करण्याची यांची छाती नव्हती >>
इस्लामप्रेम उघड पणे दाखवायला आपल्या देशात वेगळी छाती असावी लागती का?

मी तर राजकारण चर्चेत उलटे ऐकतो. काँग्रेस काळात इस्लाम प्रेम उघड व्यक्त केले जायचे. आता हिंदुत्ववादी भाजप काळात हिंमत होत नाही वगैरे.. असो, मला यातले फार कळत नाही.

पण सैफ अली खानला अनेक देशावरच्या चित्रपटात देशभक्त, सैनिकाची भूमिका करताना पाहिले आहे. तानाजी चित्रपटात देखील तो होता. त्यामुळे त्याचा स्वतःचा काही अजेंडा असावा असे ठामपणे सांगता येत नाही.

तैमूर या शब्दाचा अर्थ चांगला आहे.
मला वाटते सैफला पर्यायस्वातंत्र्य आहे जे की त्याच्यावरती टीका करण्याचे आपल्यालाही आहे.
पण तो मुस्लिम आहे त्याच्याही आधी भारताच नागरिक नाही का? त्याने मुद्दाम अमके अमके नाव ठेवल हे आपले प्रोजेक्शन असू शकतेच ना? कदाचित ते त्याच्या डोक्यात नसेलही. किंबहुना तैमुर या नावाला लावलेला बट्टा पुसायचा त्याचा प्रयत्न असेल कारण मूळ अर्थ छान आहे - सेल्फ मेड/ स्टील असा काहीतरी आहे.

भ्रमर - बॉयकॉट मोहीम राबवण्याचा अपार उत्साह ज्यांना आहे ते करणारच आहेत .. सामान्य माणसांनी या सगळ्यावरून स्वतःचं रक्त आटवायची गरज नाही . पिक्चर हिट होवो वा फ्लॉप आता या सेलेब्रिटींना फारसा काही फरक पडत नाही . आपण फुकट रागा द्वेषाने आपलं मन कशाला भरून टाकायचं आणि पिक्चर फ्लॉप करायची खुमखुमी डोक्यात जाऊ द्यायची . ज्यांना 2 घटकांचं मनोरंजन हवं आहे ते पाहतील , ज्यांना इंटरेस्ट नाही , कलाकारांचं वागणं खटकतं ते नाही पाहणार ..

लोकांनी इतकी वर्षं भरभरून प्रेम दिल्यानंतर करिना बाई म्हणतात आम्ही आमंत्रण देतो का तुम्हाला चित्रपट पाहायला , नका येऊ आमचं काही बिघडत नाही , कालपरवाच्या तापसी पन्नूच्या डोक्यात यशाची धुंदी अशी काही जाते की ती आता माझा सिनेमा बॉयकॉट करा असं आव्हान देते .. विशिष्ट धर्माबद्दल द्वेष निदान मला तरी नाहीये , पण हा जो माज आहे त्यामुळे राग वगैरे येत नाही पण मन उडतं .. यांच्यालेखी सामान्य माणसाची ही किंमत आहे तर का यांना बघायला जा थिएटरात अशी भावना झाली आहे ..

तरीही कंटेंट अति उत्कृष्ट वगैरे असला तर नावडीला मुरड घालून पाहणार नाहीच असंही काही नाही . आमीर खानचीही काही वक्तव्यं खटकली आहेत , द्वेष वगैरे अजिबात नाही .. दंगल रिलीज झाला होता त्यावेळी थिएटर मध्ये जाऊन पाहिला असता पण काही कारणांमुळे नाही पाहता आला , ती रुखरुख अजून वाटते , तसंच चक दे इंडिया . असे सिनेमे दहा वर्षातून एखाद दुसरे बनतात , त्यावेळी एखाद्या ऍक्टरच्या काही खटकणाऱ्या गोष्टींमुळे ते बघूच नयेत एवढाही राग नाहीये , मुळात रागच नाहीये .. जी आहे ती परिस्थिती अपरिहार्य आहे , ते तसे वागतात याला आपण काही करू शकत नाही . आपण फार त्रास करून न घेणं , फार कट्टर न होणं आपल्या हातात आहे .

कलाकारांचा राग आला पण घटकाभर मनोरंजन तर हवंय हे सुद्धा मान्य आहे मग तिकीट काढून न बघता यूट्यूबवरती फ्री मध्ये पाहावा. साँप भी मरे और लाठी भी ना टूटे !

सैफ -
I’m aware of the heritage of the Turkish ruler and my son was not named after him. He was Timur, my son is Taimur. Perhaps the root is similar but it’s not the same name. Taimur is an ancient Persian name meaning iron. Both my wife and I liked its sound and the meaning. In fact, of all the names I ran by Kareena, she liked this one the best because it’s beautiful and strong. Taimur was the name of a boy he’d grown up with and a cousin too. It’s an old family name like Sara who was also named after a cousin I admired.”

राधानिशा, तुमच्या प्रतिसादातील ही बाब खूप खटकली.
"बॉलिवूड मधले काही मुस्लिम (सलमान खान) अमुक तमुक करतात म्हणून सैफ ने अमुक तमुक केले त्यामागे सुद्धा वाईट उद्दिष्ट आहे. सलमान खान चे उदाहरण देऊन तुम्ही "ह्यांच्या निष्ठा कुठे असतात" असा प्रश्न विचारता हे अतिशय निंदनीय आहे. सलमान खान याकूब मेमन प्रकरण गुगल करून पाहिले असता तुम्ही म्हणता तसे ते कट आणि ड्राय सोपे प्रकरण नाही दिसत. त्या किश्श्यावरून सलमान खान देशद्रोही आहे असे सजेस्ट करणे तितके बरोबर नाही. सलमान वरून जाळे रुंदावून इतर बॉलिवूड मधल्या मुसलमानांना ह्यात ओढणे तर शुद्ध चुकीचे आहे.

प्रश्न पडतो म्हटलं आहे , अमुक एक गोष्ट सिद्ध झाली आहे म्हटलं नाहीये . बेनेफिट ऑफ डाउट दिलेला आहे . प्रश्नही पडू नयेत का एखाद्याला .

व्यक्ती स्वातंत्र्यांचा इतकाही गैरवापर करू नये कि कुणाच्या मुलाचं नाव काय असावं हे आपण ठरवावं.
स्वतः कडं लक्ष द्यावं..स्वतः ची ग्रोथ पाहावी आणि आपल्या देशासाठी काही चांगले करता येईल का हे पाहावे..
जे लोक इतरांबद्दल कुचाळक्या करत बसतात ते स्वतः च्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत..
तो मस्त पैशेवाला नवाबाचा मुलगा आहे..त्याला असल्या गोष्टींनी काही फरक पडत नाही.. वेळ आपला वाया जातो..
आजकालची पिढी सेल्फ ग्रोथकडं लक्ष न देता असल्या फालतू गोष्टीत अडकत चाललेली दिसतेय.. यासाठी इतका वेळ कुठुन येतो यांच्याकडे..

एखाद्या गोष्टीसमोर प्रश्नचिन्ह लावले म्हणजे ते वाक्य इतरांनी तपासायचे नाही किंवा त्याचा मतितार्थ निंदनीय होण्यापासून इम्यून झाला असे काही नसते.

जे की त्याच्यावरती टीका करण्याचे आपल्यालाही आहे.
>>>

सामो,
एखाद्या कलाकाराच्या पर्सनल गोष्टीवरून त्यावर पर्सनल टीका करायचे स्वातंत्र्य आपल्याला आहे का किंवा असावे का याबाबत जरा शंका आहे.

लोकांनी इतकी वर्षं भरभरून प्रेम दिल्यानंतर करिना बाई म्हणतात आम्ही आमंत्रण देतो का तुम्हाला चित्रपट पाहायला , नका येऊ आमचं काही बिघडत नाही
>>>>>

सेहवागने सुद्धा असेच म्हटलेले एकदा..
बेजबाबदार फटका मारून आऊट झाल्यावर पब्लिक नाराज होते त्यावर तो म्हणाला होता की मी बघायला बोलवत नाही त्यांना Happy

Radhanisha- सलमान गणपती ची पूजा करतो हे दिसले नाही का Happy फक्त निगेटिव्ह कशाला बघताय..

मुद्दाम अमके अमके नाव ठेवल हे आपले प्रोजेक्शन असू शकते , कदाचित ते त्याच्या डोक्यात नसेलही - प्रोजेक्शन असण्याची शक्यता आहे .

किंबहुना तैमुर या नावाला लावलेला बट्टा पुसायचा त्याचा प्रयत्न असेल - असंही असू शकेल . अर्थात खात्रीपूर्वक या तीनातली अमुक एक गोष्ट हे मला वैयक्तिकरित्या अजूनही ठरवता येत नाही . भविष्यात काही काळाने कदाचित प्रोजेक्शन असेल तर ते बदलेलही .

अर्थात खात्रीपूर्वक या तीनातली अमुक एक गोष्ट हे मला वैयक्तिकरित्या अजूनही ठरवता येत नाही>>>
२४ तासात मत परिवर्तन झाले. उद्या परत २-३ व्हाट्सएप फॉरवर्ड वाचल्यावर, "25 -30 वर्षांपूर्वी इस्लामप्रेम उघड व्यक्त करण्याची यांची छाती नव्हती" असले ज्ञान पाजळायला मोकळे. डिजिटल माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंटकांचे तुम्ही सॉफ्ट टार्गेट आहात.

सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का? >> दुर्दैवाने नसते.

मी मूळ लेख आणि वरचे सगळे प्रतिसाद चाळून पाहिले. त्यात कुणीही एकही फोटो अपलोड केलेला दिसला नाही. पण वरती नाव मात्र 'ऋन्मेऽऽष फोटो अपलोड २' आहे. नसलेल्या फोटोंबद्दल निषेध! फक्त तेवढा दीपिकाचा फोटो छान आहे.

गरज काय ठरवायची? Who you?
>>>>>

Exactly भरत,
बरेच लोकांना अजून हेच समजले नाहीये की त्याने जे केले ते चूक की बरोबर हा मुद्दा नंतर, पण ते ठरवायचा अधिकार आपल्याला आहे की नाही हा खरा इथला चर्चेचा मुद्दा आहे.

हो, तो सेलिब्रिटी आहे. त्याने जे केले त्याची न्यूज होणार. चर्चा होणार. ती आपल्या कानावर पडणार. आपल्यालाही त्यावर मत व्यक्त करायचा मोह होणार. तो टाळता आला तर उत्तम पण झालाच तरी ते तेवढ्यापुरते करून पुढे जाता यायला हवे.

Pages