सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Riyaa...taimur navavarun bawal hotoy ..lokancha asa mhanana ahe ki taimur ne adhi lokavar atyachar kelet... Mhanun Hindu lok ugach bawal kartayt... pan devanchi nava thevlele pan gunhegar hou shaktat...mag tevha lok arda orda ka karat nahi itkech me mhatlay ...
Tula majhi post kalali nahi may b.... aso he ma she po

Riyaa...taimur navavarun bawal hotoy ..lokancha asa mhanana ahe ki taimur ne adhi lokavar atyachar kelet... Mhanun Hindu lok ugach bawal kartayt... pan devanchi nava thevlele pan gunhegar hou shaktat...mag tevha lok arda orda ka karat nahi itkech me mhatlay ...
Tula majhi post kalali nahi may b.... aso he ma she po

एवढी चर्चा वाचुन असे वाटू लागलय की, चर्चा व्हावी म्हणून मुद्दाम असे नाव ठेवले गेलेय की काय.... घटं भिंद्यात, पटं छिंद्यात वगैरे... असो, काही का नाव ठेवेनात, त्यांची मर्जी. तैमूर कोण होता यापेक्षा ते जुनाट नाव आहे, त्यामुळे मला नाही आवडले.

जुनाट नावे ठेवायची नसल्यास एकूण एक देवांची नावे बाद करायला हवीत. कारण देव म्हटले की तो अगदी पुराणकाळातलाच. आणि हो, हे सर्वच धर्मांना लागू. पुन्हा त्यात वाद नको Happy

अगं अनु, तू नाही गं.... मी मी_अनुला उद्देशुन लिहिलीये ती पोस्ट...
तू जे म्हणतेयेस तेच मी म्हणतेय...

मी आपली वाचत राहिले की हिला काय झालं मधेच Rofl

प्रांजल दादा, सॉरी सॉरी... प्रांजल हे मुलीचे नाव पण असते... माझ्याच २-३ मैत्रिणींचे नाव आहे पण प्रांजल हे मुलाचे नावही असते हे लक्षात आले नाही... परत एकदा सॉरी

बाळाचे नाव काय ठेवायचे हा पालकांचा प्रश्न असला तरी प्रसिद्ध व्यक्तींना याबाबत आपसूक काही मर्यादा येतात.
त्या घाणेरड्या हालकट क्रूरकर्म्याचे नाव ठेवून भारताचा फार मोठा अपमान केला आहे. Angry

इकडे जे लोक अशोकाचे उदाहरण देत आहेत त्यांना हे माहित नाही का की, अशोक मुळात या भुमीतलाच होता, तसेच त्याला युद्धात झालेली हानी पाहून उपरती झाली आणि त्याने बुद्धाचा अहिंसेचा मार्ग अनुसरला.
असे काय काय बदल झाले होते त्या सैतानी तैमूरमधे ?

भारताचा अपमान वगैरे जास्तच झालं महेशदादा Proud
एवढंस ते पिल्लू... त्याचं नाव काय ठेवलं त्याने एवढ्या मोठ्या भारताचा अपमान कसा होईल?
एवढ्या एवढ्याश्य बाबतीत भारताचा अपमान व्हावा इतका छोटाय का आपला देश?

रीया, वाच एकदा त्या तैमूरड्याचे कारनामे, मग कळेल तुला की लोकांना त्याच्या नावाचा इतका राग का आहे ? Angry
अरे प्राणसाहेबांच्या खलनायकी भुमिका पाहून कोणी मुलाचे नाव प्राण ठेवले नाही नंतर.
आणि इकडे यांना खर्‍या खर्‍या क्रूरकर्म्याची नावे ठेवायची अवदसा आठवत आहे. Angry

मी वाचलेत... मला नक्कीच त्याचा राग आहे पण जाऊ द्या आता मला तेव्ह तेच एक्स्प्लेन करायचा कंटाळा आलाय

प्राणसाहेबांच्या खलनायकी भुमिका पाहून कोणी मुलाचे नाव प्राण ठेवले नाही नंतर
>>>>>

हे चूक आहे ना पण. हा भारतीय चित्रपटसृष्टीचा अपमान नाही का झाला?

तैमुरने शत्रुंना ठार केले.

हिंदुनीही शत्रुना तितक्याच क्रुरतेने मारलेले आहे.

माया कोडवानी यांनी तर दंगली मधे तलवारी वाटलेल्या. दंगल भडकवली होती अश्या आरोपाखाली जेल मधे आहे.

सगळ्या "माया" नावाच्या मुलींची नावे बदलणार का?

क्रुरकर्मा असेल 'तो' तैमुर...पण
तैमुरलंग तो हाच का जो लंगडा होता म्हणे?
जर तोच हा असेल तर ...तेव्हढा तरी विचार करायचा आम्मी-अब्बुने Sad
(चुभुद्याघ्या...खरेच माहित नाहिये म्हणुन विचारले आहे.)

म्हणूनच तर ते नाव योग्य आहे.... लंगडा असुनही त्याने राज्य केले. त्याच्या वारसाने अखंड हिंदुस्तानसाठी दिल्लीत लाल किल्ला बांधला. कोणत्याही धडधाकट काफराला जे भाग्य लाभले नाही, ते लंगड्याला मिळाले.

म्हणजे भारत भुमी जन्मल्या लोकांनी कापाकापी केलेली चालते.

तोच तर मूळ मुद्दा होता .. तो परदेशी होता !! मग उगाच तो क्रुरकर्मा होता वगैरे शेपूट जोडायचे.

सम्राट अशोकाने नंतर काय केलं म्हणून त्याचे आधीचे कृत्य क्षम्य होते का ? आणि तो या भूमीतलाच होता म्हणजे देशातला म्हणायचेय बहुतेक ! त्या वेळी देश नावाची कल्पना तरी अस्तित्वात असेल का ? असती तर शेजारच्याच राज्यावर स्वारी करून एव्हढे मोठे कांड घडवून आणणारा स्वकीय देशाचा शत्रू नाही का ? परकीयांकडून अपेक्षा ठेवता येत नाही, पण स्वकीयाकडून तर ठेवता येते ना ? आणि तरीही अशोक हे राजेशच्या खालोखाल सर्वाधिक आढळणारे नाव आहे.

पुन्हा पलटून तुम्ही साम्राज्य हा निकष लावणार असाल तर अशोकाचेच साम्राज्य इतैहासातले सर्वात मोठे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात असणारी भूमी आज देशाचा भाग आहे का ? अफगाणिस्तान, रंगून हे प्रदेश त्या साम्राज्यात होते पण दक्षिण भारताकडे साहेबांनी लक्षच दिले नव्हते. मग दक्षिणेचे लोक परकीय का ?

तुम्ही आजच्या नकाशे वापरून तेव्हांचे देशप्रेम ठरवताय का ?
परशुरामानेही २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. हा पण संहारच नाही का ? म्हणजे त्यांच्या दृष्टीने परशुराम देखील क्रूरकर्मा नको का म्हणायला ? तैमूरलंग , अशोक आणि परशुराम यांच्या नरसंहारात काय फरक होता हे जाणून घ्यायला अत्यंत उत्सुक.

मुदत ३१ डिसेंबर. भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे रात्रौ १२ वा पर्यंत.
त्यानंतर या धाग्याकडे ढुंकूनही पहायची इच्छा नाही नव्या वर्षात.

अनिलचेम्बुर तुम्ही मुळ मुद्याला भलत्याच अननेसेसरी ट्रॅकवर नेताय....
तैमुर नाव ठेवण्यात मला काहीही चुक वाटत नाही पण तुम्ही जी कारणं देताय ती फारच चिप आहेत... सॉरी!

मुदत ३१ डिसेंबर. भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे रात्रौ १२ वा पर्यंत.
त्यानंतर या धाग्याकडे ढुंकूनही पहायची इच्छा नाही नव्या वर्षात.

>>>
गरजही नाही पडणार जुन्या धाग्यांची. एकदा उद्या मोदींनी नवीन धमाका केल्यावर चार नवीन धागे जोमाने चालू होतील Happy

तैमुर नाव ठेवण्यात मला काहीही चुक वाटत नाही

हा विषय तिथेच संपतो.

पण नाव न आवडलेले लोक जस्टिफिकेशन देउ शकतात तसे नाव आवडलेलेही देऊ शकतात.

शब्बा खैर ..

अरे,, अबतक चालुच है क्या? काही लोकांना तर हे प्रकरण उद्भवेपर्यंत तैमुर कोण हेही माहित नसेल. असो.! चालुद्यात!

आमच्या हाफिसात आलेल्या नव्या इन्टर्नला फुटात किती इंच असतात हे माहित नव्हते, बराच विचार केल्यावर दहा की काय बोलली... ग्रॅज्युएशन करतेय म्हणे...

प्रत्येकाचे नॉलेज, सामान्य ज्ञान, स्पेशालिटी, वेगवेगळी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकते. जर कोणी ईंजिनीअर असून त्याला हे फूट ईंच कन्वर्शन माहीत नसेल तर समजायचे की बेटा चुकीच्या फिल्डला आलाय,. आणि याला जबाबदार घरच्यांचा दबाव. .. असो, हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.. की असा धागा चालूय आधीच कुठे मायबोलीवर?

Funny staTement! >> बरं. एकूण अंदाज आला...
आधी केले ते क्षम्य होते हे स्टेटमेण्ट फनी होत नाही. खूष ना आता ? नेमके काय जिव्हारी लागलेय ?

Pages