सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देऊ देत शिव्या

हिंदू लोक ज्या मुसलमानाला शिव्या देतात , त्या मुसलमानचे जास्त भले होते, तो जास्त जगतो , तो गुन्ह्यातुन सुटतो , त्याची व्यवसाय वृद्धी होते , त्याला जास्त बायका मिळतात

उदा बाबर ते सलमान खान , एम एफ हुसेन , तैमुर
आणि मी

धागा आवडला अर्चना. एकदम सेलेब्रिटी झाल्यावर या अडचणी आल्या तर गांगरून जायला होईल. त्यामुळे तयारीत असलेले बरे. मी पण तयारीला लागते. उद्या जर सुभाष घईंचा फोन आला तर मग नंतर वेळ नाही मिळणार.

https://www.loksatta.com/manoranjan-news/kareena-kapoor-and-saif-ali-kha...>>>>>. पहिले नाव बघा कोणी सुचवलयं. Proud

सैफैनाला कितीही मुले होऊ द्या . तो त्यांचा प्रश्न . पण नावावरुन लोक चिडतायत, मुले झाली म्हणून नाही. अमिरला ३ मुले आहेत म्हणून कोणी त्याला टोकले का? शाहरुखला तीन आहे. सल्लु बाबाचे लगिनच झालेले नाही, त्या वरुन कोणी विशेष टीका टिपणी केलेली नाही.

ऋन्मेष तुला या टिनपाट सेलेब्ज बद्दल खरच कळवळा आहे तर बाकी असहाय्य लोकांबद्दल पण असायला हवा. की, धागा वर यावा म्हणून हे चालले आहे? म्हणजे परत हिंदु- मुस्लिम असे वाद नव्याने वरती यावेत.

रानभुली, ती अर्चना नाही, तो ऋन्मेषचा २ रा आय डी आहे. मी भास्कर, अर्चना, तुमचा अभिषेक, व वरिजीनल ऋन्मेष आहे.

मी आधी असायचे तेव्हा तुअ असायचा. ऋन्मेष हा आयडी होता कि नव्हता लक्षात नाही. तुअ छान लिहीत होता.

प्रत्येक सेलिब्रिटीला लोक ट्रोल करतात का? द्रविड, कुंबळे यांना कधी कोणी ट्रोल केलं आहे का?

जाऊ दे ऋन्मेष. तू कुण्णाकडे लक्ष न देता टिक टॉक बंद झाल्याचे दुष्परिणाम यावर धागा काढ. लोक चांगले घरी राहत होते आता रस्त्यावर उतरले.

मी पण तिकडे सेलेब्रिटी होते. काय सांगू?

म्हणजे तुम्ही पूजा चव्हाणचं भूत की काय? >>>

राजकीय मतभेद आपल्या जागी. पण संबंध चांगले असावेत असे वाटल्याने उत्तर दिले नव्हते. पण राहवले नाही. मला माहीत नाही असे लिहीण्याचा उद्देश काय आहे. माझी टिंगल मला आवडते. पण यात एका जिवंत नसलेल्या मुलीच्या नावाचा वापर हिणकस आहे. मला वाचतानाच अस्वस्थ वाटले होते. हे सांगणे मला गरजेचे वाटले. चेष्टा, मस्करीला ना नाही.

ऋन्मेष नी असे कुठे म्हटले आहे का की अर्चना हा त्यांचा id आहे. जो पर्यंत ते स्वतः असे म्हणणार नाहीत, तोपर्यंत माझा विश्वास नाही

तथाकथित सेलिब्रेटिजबद्दल इतका कळवळा ऋन्मेष यांनाच असू शकतो. आणि त्यांचे अनेक आयडी आहेत त्यामुळे अर्चना = ऋन्मेष हे मला लगेच पटले.

ईथली चर्चा वाचून मायबोलीवर सैफ करीनापेक्षा अर्चना ऋन्मेष मोठे सेलेब्रेटी वाटेल एखाद्यला Happy
प्लीज धाग्यावर बोला
मी एक नवा धागा काढतो दोनचार दिवसात, मी आणि माझे मायबोली आयडीज अश्या नावाचा. जिथे जे आहेत ती सारी लिस्ट देतो, ते काढायची कारणे देतो, म्हणजे नेहमी दर धाग्यात तेच तेच नको. आणि जे आयडी माझे नाहीत त्यांचेही श्रेय उगाच मला नको Happy

ऋ , तू परवडशील त्या सैफिना पेक्षा. या सेलेब्ज पेक्षा सामान्य लोक जास्त कोऑपरेटिव्ह असतात. कारण आपण जनसामान्यात रहातो.

सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?
असते....पण तोपर्यंतच जो पर्यंत ते त्यांच्या खाजगी आयुष्याचे भांडवल करुन त्याआधारे पैसे कमवु इच्छित नाहीत. (आता बघाल तर सरसकट सगळेच सो कॉल्ड सेलेब्रेटी खाजगी आयुष्य चव्हाट्यावर मांडुन फक्त आणी फक्त पैश्यांच्या मागे लागलेले दिसतात)

बरं. विषयांतर बास.
तापसी पन्नूच्या कपड्यांवरून हिणकस कमेंट करणा-या एका संस्कृतीरक्षकाला एमटीव्हीवर बोलावून त्याची शाळा घेतली. चेहरा लपवून ट्रोलिंग करताना वाघ असणारे हे लोक कसे चूहे बनतात ते बघण्यासारखे आहे.
https://www.youtube.com/watch?v=agbL3eLzdkc

सेलेब्रिटीजच्या खासगी विषयावरचा हा उत्तम व्हिडीओ आहे. तसेच ट्रोलिंगबद्दल आणि बुलींगबद्दल डोळे उघडणारा.

तापसी पन्नूच्या कपड्यांवर बोललं तर त्याची झाडाझडती? इथे मायबोलीवरच किती आयडीज् संघ स्वयंसेवकांच्या गणवेशाबद्दल हिडीस कॉमेंट करतात त्याचं काय करायचं?

तापसी पन्नूच्या कपड्यांवर बोललं तर त्याची झाडाझडती? इथे मायबोलीवरच किती आयडीज् संघ स्वयंसेवकांच्या गणवेशाबद्दल हिडीस कॉमेंट करतात त्याचं काय करायचं? >>> या दोन वाक्यांचा आपसात काय संबंध ?
कमेण्ट करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे असे माझ्या प्रतिसादात किंवा त्या व्हिडीओत म्हटलेय का ? तुम्हाला कसे काय समजले ते ?

Pages