सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फिरोज 'इराणी' होता
पारसी असे मेन्शन्ड नाही.>>>>
माझ्या माहितितली इराणी आड्नावाची मन्डळी पारसीच आहेत मुस्लीम नाहीत. पण तरीही..अशक्या नाही.

पण मला तरी सुशि.न्चा फिरोज पारसीच वाटत आलाय. (अनुस्वार कसा द्यायचा? )

नेम चुकला आशूचँम्प

उल्लेखलेले वाक्य लिंबूभाऊ या आयडीचे आहे. भाषा तीच असली तरी आयडी वेगळा आहे

तैमुर नाव ठेवणे हा हलकटपणा आहे ? का बरे ?
ते बालक मोठे होऊन हिंदुस्थानवर स्वारी करणार आहे का ? आजपर्यंत परशुराम नाव असलेल्या किती जणांनी आपल्या मातेचे शीर धडावेगळे केलेय ? या नावाला विरोध झाल्याचे कधी ऐकले नाही. याचा अर्थ संपूर्ण हिंदुस्थान मातृद्रोही म्हणावा का ? मग भारत / हिंदुस्थान ही मातृभूमी की पितृभूमी हे एकदा ठरवाच म्हणजे मातांनी कुठल्या देशात जायचे याचा फतवा काढायलाही बरे पडेल.

कसला मूर्खपणा चाललाय सगळा.

सेलिब्रीटी / राजकीय नेते जाऊ द्या. भारतात तर कुणालाच खाजगी आयुष्य नसतं. शेजारी-पाजारी, नातेवाईक, ईतर लोक काय म्हणतील ह्या दबावाखाली बर्याच लोकांचं आयुष्य जातं. दबाव नाही घेतला म्हणून तुमच्या आयुष्यात डोकावणारे लांब जात नाहीत.

बाकी राजकीय नेते आणी फिल्मी सेलिब्रीटींना ही पब्लिसीटी हवीच असते. तो सगळा 'अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी' चा प्रकार असतो.

<<
माझ्यासाठी Celebrity = sellebrity. यावर विस्ताराने लिहायची इच्छा आहे. बघूयात कधी जमतं ते.
>>

वाचायला आवडेल.

Raaaman raghvan ki aslech kahise naav aslela serial killer.....devache naav mhanun devasarkhach hota Nai????

सपना (पहिल्यांदाच) पोस्ट एकदम पटली...

अनू, सॉरी पण तुझा प्रतिसाद (पहिल्यांदाच) अजिबात नाही आवडला..

एखाद्याच्या नावाला भिक्कार वगैरे म्हणायचा हक्क आपल्याला कोण देतं?
त्याच्या आई वडिलांन नाव आवडलं त्यांनी ठेवलं... इतकंच...!

आता नाव तैमुर आहे म्हणून लगेच ते बाळ भविष्यात वाईट घडेल हे इतकं गृहित का धरावं सगळ्यांनी?
मागे एक बलात्काराची बातमी वाचलेली, त्यातल्या नराधमांची नावे राम आणि शिवाजी होती... आता बोला....!

आणि आजपर्यंत कोणीही दुर्योधन, रावण, हिट्लर नाव ठेवलं नाही म्हणून पुढेही कधीच ठेवू नये असं थोडीच आहे. प्रत्येक गोष्ट नेह्मीच 'पहिल्यांदा' कधीतरी होते.

पर्सनली मला तैमुर नाव नाही आवडलं कारण ते फार जुनाट आहे, पण ते झालं माझं मत... त्याने काहीही फरक पडत नाही

शाहरूखच्या मुलांची नाव आर्यन, राम अशी आहेत.
>>
ऋन्मेषा त्याच्या कुठल्या मुलाचं नव राम आहे म्हणे Uhoh

अब्राम आहे ते माहीत आहे

आता नाव तैमुर आहे म्हणून लगेच ते बाळ भविष्यात वाईट घडेल हे इतकं गृहित का धरावं सगळ्यांनी?
>>
सोशियल मिडियावरच्या चर्चा मी वाचल्या नव्हत्या आणि नाहित. मायबोलीचा अपवाद. सगळ्यात पहिल्यांदा बातमी कळली एका नातेवाईंच्या ग्रूप मधे. तिथला एकजण सैफअली खान बरोबर काम करतो. त्यामुळे कुणीतरी कुर्र तैमूर अशी काहीतरी पोस्ट टाकली.
माझी पहिलीच रिॲक्षन - wait - but wasnt taimur the bad guy? अशी होती. तैमूरलंग वाईट होता हे शाळा शिकलेल्या कुणालाही माहित असायला हरकत नाही. त्याकरिता सोशियल मिडिया वाचायची गरज नाही.
आपण जनरली ज्यांचा आपल्याला आदर्श वाटतो त्यानुसार नाव ठेवतो. तैमुर नाव ठेवण्यात सैफ ची महत्त्वाकांक्षा डोकावतेय का उद्दामपणा? हा प्रश्न पडलाच पडला.
दुसर असं कुठल्याही मुसलमानी बाई पुरुषाशी लग्न केल्यावर मु. व्यक्ती कधी दुसऱ्या धर्माचं आचरण करताना दिसतात का? का कायम दुसरी व्यक्तीच कंव्हर्ट होते? मुलं कुठ्ल्या धर्माचं आचरण करतात? बरेच प्रश्न पडलेत ह्या निमित्तानं!

एक तैमुर वाईट असेल कदाचित दुसरा तैमुर देशाचे नाव उज्ज्वलही करेल. एका नरेंद्रांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. एक नरेंद्र अंधश्रद्धेचं दुकान मांडून बसलेत. त्यामुळे नरेंद्र हे नाव ठेवणा-यांना तुम्ही कुठल्या चष्म्यातून पाहणार आहात ?

सैफची महत्वाकांक्षा डोकावेल किंवा आणखी काही. तो तैमुर नाव ठेवेल किंवा नथुराम. आपल्याला काय अधिकार आहे त्याच्या बाळाच्या नावाबद्दल जाहीर चर्चा करायचा ? त्याने गुन्हा केला असेल तर न्यायालये आहेत. कुणी आपल्या बाळाचे नाव काय ठेवावे याबद्दल मोहीमा चालवून समांतर हुकूमशाही नको निर्माण व्हायला. ही सेलेब्रिटींच्याच नाही तर प्रत्येकाच्याच खाजगी जीवनात ढवळाढवळ आहे. तैमुर हे एक कॉमन नाव आहे मुस्लिमांमधे. खाली लिंक दिली आहे. या सर्वांनी तैमुरलंगाचे नाव तरी ऐकले असेल का ?

http://www.news18.com/news/india/taimur-there-are-over-5500-people-by-th...

यातल्या किती जणांनी वाईट कामे केली हे कोण सांगेल ?

या धाग्यावर मी थांबते.

आपण जनरली ज्यांचा आपल्याला आदर्श वाटतो त्यानुसार नाव ठेवतो.
>>>>
असहमत .... माझं नाव प्रियांका गांधी वरुन ठेवण्यात आलंय Sad :भ्याआआआआ:

तैमुर् हे तैमुरलिंगाचं नाव आहे मान्य आहे पण एक साधं नाव असु शकतंच की.... कशाला तरी संबंध जोडलाच जावा असं नाही ना....

कर्ण अनेकांना चांगला वाटतो अनेकांना वाईट पण म्हणुन लोकं करण नाव ठेवायचे थांबले का?

आणि सहदेव/बिभिषण एवढे चांगल्या पार्टीचे असुन पण कोणीच आपल्या मुलाचं नाव सहदेव किंवा बिभिषण ठेवताना दिसत नाही Proud

मला तैमुर नाव ठेवण्यात ना महतवकांषा (मोबाईल वरुन टायपिंग अवघडेय.. समजुन् घ्या) दिसली ना उद्दामपणा

आजपर्यंत परशुराम नाव असलेल्या किती जणांनी आपल्या मातेचे शीर धडावेगळे केलेय ? या नावाला विरोध झाल्याचे कधी ऐकले नाही.>>>>>
त्याच परशुरामानी आईला परत जिवंत करायला पण सांगितले. अर्धवट माहिती देण्यापेक्षा उदाहरण देऊ नका. सैफ नि त्याच्या मुलाचा नाव औरंगझेब ठेवल तरी मला काही घेणं देणं नाही पण त्यासाठी चुकीचे दाखले देऊ नका.

<<<<<एका नरेंद्रांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देताना आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. एक नरेंद्र अंधश्रद्धेचं दुकान मांडून बसलेत. त्यामुळे नरेंद्र हे नाव ठेवणा-यांना तुम्ही कुठल्या चष्म्यातून पाहणार आहात ?>>>> आणि हि जर विचार सरणी असेल तर कुठला परशुराम आणि कुठली त्याची आई????

रीया,
अब्राम नाही अबराम
राम बलराम अबराम

बाकी शाहरूखने आपल्या पिक्चरचे नाव रावण ठेवले आणि त्याचे काय झाले आपण बघितलेच असेल.

एक जेन्युअन शंका,
बाय येनी चान्स असे असू शकत नाही का की सैफ आणि करीना यांना तैमूर नावामागचा ईतिहास माहीत नसावा. जसे ते आलिया भटला राष्ट्रपती की पंतप्रधान कोण ते माहीत नव्हते तसे. सामान्य ज्ञानाबद्दलचे अज्ञान ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. मला स्वत:लाही कोण कसला तैमूर हे माहीत नव्हतेच. किंबहुना कित्येकांना या प्रकरणा नंतरच समजलाय.

Runmesh +११११

त्याच परशुरामानी आईला परत जिवंत करायला पण सांगितले. अर्धवट माहिती देण्यापेक्षा उदाहरण देऊ नका.
>>>>
Mudda to nahiye o tai.... Mudda samajun ghya

Mudda to nahiye o tai.... Mudda samajun ghya>>>>>
ताई नाही वो. Lol
दादा म्हणा पण ताई नाही. Proud
काय राव सगळीकडे स्पष्टीकरण द्यावा लागतंय कि . Angry
प्रांजल मुलाचे नाव प्रांजली मुलीचे नाव.

>> आजपर्यंत परशुराम नाव असलेल्या किती जणांनी आपल्या मातेचे शीर धडावेगळे केलेय ? या नावाला विरोध झाल्याचे कधी ऐकले नाही <<

तथाकथित पुरोगामी मंडळी वर्षानुवर्षं ह्या अर्धवट माहितीआधारे आपल्या अक्क्लेचे तारे तोडताना पाहून भारी गंमत वाटते. Happy

धाग्यात आता काही राम उरला नाही असे वाटत असतानाच परशुराम, नथुराम, अबराम सारे धावून आले Happy

अवांतर - प्रांजल हे नाव मुलींचेही असते. पुरुषांनी मक्तेदारी दाखवू नये Happy

Pages