सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तैमूर बार्बारीक होता या मुद्द्यावरून जर लोक सैफ करिनावर टीका करतात तर रावण शिवभक्त होता, त्याचे शिव तांडव स्तोत्र आजही प्रसिद्ध आहे या मुद्द्यावरून सगळ्या शिवभक्तांनी त्याचा फोटो देवघरात ठेवायला हरकत नसावी.

साधनाजी पॉईंट असा आहे की रावण विद्वान होता वगैरे कोणी गुण म्हणून सांगत असेल तर त्याच्या दोषांसोबत तो गुणही मान्य करेन. आणि अर्थातच त्यानुसार गुणदोषांचे वेटेज करत त्याचा आदर करायचा की अनादर की दुर्लक्ष हे ठरेल.

पण शिवभक्त असणे हा गुण होऊ शकत नाही ईतकेच Happy

रावण नाव ठेवतात. रावण नाव असलेले दोघे तिघे पाहिलेत.
तसंच दुर्योधन पण नाव असतं.

सैफ करीना असो वा आणि कुणी. आपल्या मुलांची नावं काय ठेवायची ते त्यांचं ते बघुन घेतील. लोकांना काय घेणं देणं त्याच्याशी? कुणी तैमुर ठेउदे की कसाब ठेउदेत. ज्याचा त्याचा प्रश्ण..

अनुपम खेरच्या मुलाचे नाव सिकंदर आहे. सिकंदर म्हणजे अलेक्झांडर राजा. जो जग जिंकायला निघाला होता प्रचंड रक्तपात करत करत शेवटी पंजाब राज्यापाशी पोहचला. तिथे पुरु राजाशी युध्द करून कित्येक नागरीक मारले.

अशोका. कलिंगाचे युध्दात इतका भीषण नरसंहार केला ज्याची काही सीमा नाही. आपण केलेला नरसंहार पाहून अशोकाचे मनपरिवर्तन झाले. त्याने बौध्द धर्म स्विकारला आणि जगात शांततेचा प्रसार करू लागला.

अर्जून- महाभारतातील पाच पांडवांपैकी एक. एका बाणात सहस्त्र लक्ष्य साधणारा अद्वितिय योध्दा. महाभारत युध्दात याने एकट्याने जितके सैनिक मारले तितके इतर सर्वांनी मिळून मारले असतील. अशी शौर्यगाथा सांगितली जाते.

ही नावे पण पुढे विचारात घेतली जाणार ?

१. एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी फॉर देम... फार सहानुभूती बाळगायचे कारण नाही. या क्षेत्रात राहूनही, ज्याना खाजगीपण जपायचे असते ते जपू शकतात आणि जपतातही ! >>>> अनुमोदन !

२. गॉसीप करणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती असावी. केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातील मानवाची. जो गॉसीप करत नाही आणि ज्याच्याबद्दल गॉसीप होत नाही असा माणूस विरळाच

३. सेलेब्रिटींच्या खासगी आयुष्याचा अनादर भारताबाहेरही जोरात चालतो. किंबहुना हे खूळ बाहेरूनच आपल्याकडे आलंय. पापाराझी नावाची जमात अजूनही भारताबाहेर जास्त संख्येने असावी.

४. शिवभक्ती चांगलीच! रावणाने शिवभक्तीच्या नावाखाली सीतेला पळवले नव्हते. किंबहुना रावणाने सीतेचे फसवून अपहरण करण्याखेरिज दुसरे काहीही (गैरकृत्य) केले नव्हते.

गॉसीप लगेच माझ्यापर्यंत पोचलं की कोणीतरी मझ्याबद्दल इथे काही लिहितंय, म्हणुन बघायला आलो,
खरंच अख्ख्या पृथ्वीकर मानवाबद्दल कोणी लिहितंय तर..... Wink

४. शिवभक्ती चांगलीच! रावणाने शिवभक्तीच्या नावाखाली सीतेला पळवले नव्हते. किंबहुना रावणाने सीतेचे फसवून अपहरण करण्याखेरिज दुसरे काहीही (गैरकृत्य) केले नव्हते.
>>>>

रावणाने शिवभक्तीच्या नावाखाली सीतेला पळवले की त्या नावावर सीतेला पळवले हा प्रश्नच नाहीये ना मुळात.
कारण शिवभक्तीला कोणीही वाईट म्हणतच नाहीये. ज्याची त्याची श्रद्धा, ज्याची त्याची भक्ती.
पण हा गुण कसा झाला एवढाच प्रश्न आहे.

बाकी सीतेला पळवून नेण्याखेरीज कुठलेही गैरकृत्य केले नव्हते की ऊजेडात आले नव्हते.
एखाद्या स्त्रीचे अपहरण करणे हा काय रस्त्यात चालता चालता ठेच लागण्यासारखा गुन्हा आहे का? जी व्यक्ती हा भलामोठा गुन्हा करू शकते तिने त्या आधी अधलेमधले काहीच केले नाही, थेट या गुन्ह्यापर्यंत झेप घेतली यावर कसा विश्वास ठेवायचा.

चांगला मुद्दा ऋन्मेष!

रच्याकने:
भक्त असणे हा गुण आहे का?
असा धागा होतोय का बघ?

एक समिती असावी. तिच्याकडून आपल्या बाळाचे नाव मंजूर करून घेतले जावे म्हणजे नंतर लोक वाटेल ते बोलणार नाहीत. समितीच्या ऐवजी खापपंचायतीचे अनुभवी धर्माधिकारी ताऊ असले तर क्या कहने !!

आजवर ऐकलेल्या पुराण कथानुसार बहुतेक सगळे राक्षसच शिवभक्त होते. कुठल्या मानवाने शिवभक्ती केलेली कथा आठवत नाहीये. विष्णु, इंद्राच्या आठवतात. पण शिवभक्तीच्या फक्त राक्षसकथाच आठवतात.

एक समिती असावी. तिच्याकडून आपल्या बाळाचे नाव मंजूर करून घेतले जावे म्हणजे नंतर लोक वाटेल ते बोलणार नाहीत.>>> Proud

कुठल्या मानवाने शिवभक्ती केलेली कथा आठवत नाहीये.
>>>
माझी गर्लफ्रेंड आहे. अट्टल शिवभक्त. दर सोमवार न चुकता उपवास. मी सुद्धा बहुतेक त्याचेच फळ. हा झाला योगायोग. सांगायचा मुद्दा हा की मानव शिवभक्त नसतो हे लॉजिक काही पटण्यासारखे नाही. मानवही असतो आणि त्यात स्त्रियाही असतात. अन्यथा शंकराची मंदिरे कोणी बांधलीच नसती.

एक शंका - सीता स्वत:देखील शिवभक्त होती का? ते स्वयंवरातले शिवधनुष्य ते सीतेच्या वेळचेच ना? की द्रौपदीचे? नाही तिचा तर मासा ना? की मग अर्जुनाने त्या माश्याचे डोळा फोडलेले धनुष्य शिवधनुष्य होते? की ते गांडीव?

रावणाने शिवभक्तीच्या नावाखाली सीतेला पळवले की त्या नावावर सीतेला पळवले हा प्रश्नच नाहीये ना मुळात.
कारण शिवभक्तीला कोणीही वाईट म्हणतच नाहीये. ज्याची त्याची श्रद्धा, ज्याची त्याची भक्ती.
पण हा गुण कसा झाला एवढाच प्रश्न आहे.

हारलो मी Proud

हर्पेन, जे बोल्ड केलेय त्यावरून कन्फ्यूज झालोय.
जे वाईट नाही ते गुणामध्ये मोजायचे असे म्हणायचे आहे का?

नानाकळा, तुम्ही तुमच्या क्षेत्राबद्दल जरूर लिहा. मात्र जे सेल करतात ते सेलेब्रिटी हे अत्यंत cliched वाक्य आहे आणि त्यातला उपरोध हा साफ गंडलेला आहे. सारख्या उच्चारांच्या मात्र भिन्न अर्थाच्या दोन इंग्रजी शब्दांना (अर्थाअर्थी काहीही संबंध नसताना) एकत्र आणून सुरु होणाऱ्या वाक्याने तुम्ही जो काही परिच्छेद लिहिला आहे त्याची परिणामकारकता अगदीच कमी झाली आहे. असं माझं वैयक्तिक मत आता तुम्हाला ते पटत नसेल तर राहू दे. The spellings and meaning of the two words 'celebrity' and 'sell' are different and your sentence could at max "sell" as a a poor joke, not as a witty pun or satire as you intend.

रावणाची शिवभक्ती कडक होती.. एका अंगठ्यावर की कायसे उभे राहुन त्याने तपश्चर्या केली , अखेर आपली एकेक मुंडकीही त्यागली , अशी काहीशी कथा आहे.

रावण हे आडनाव असतॅ.

रावण या नावाचे पिठलेही असते. रावण पिठले

बाकी , जगात प्रत्ञेक नावाचा कूणीतर चांगला व वाइटही मनुष्य असतो.

तैमूर हे माझेही लाडके आराध्य नाव आहे.

रावणाने कुबेराच्या सुनेवर अतीप्रसंग केला त्यामुळे तिने तिला शाप दिला होता की यापुढे कुठल्या स्त्री वर जबरस्ती करशील तर डोक्याशी शकले होतील म्हणून रावण सीतेेचे मन जिंकण्याच्या प्रयत्नात होता.

अजून एक भीषण थिएरी म्हणजे, सीता रावणाचीच मुलगी होती आणि वनवासात आपल्या मुलीला त्रास होऊ नये आणि रामासारख्या भणंगाबरोबर राहू नये म्हणून त्याने तिला पळवून आणली.

सगळीकडे च्यायला ऋ बाळ धुमाकुळ घालत असल्यामुळे कुठल्या धाग्यावर काय चाललेय कळत नाहीये. मी चुकून भटक्या कुत्र्यांच्या धाग्यावर हा प्रतिसाद देऊन आलोय

प्रधानजी, राज्याची हालहवाल कशी आहे ?

महाराज,
सुपरिणामच्या धाग्यावर दुष्परिणाम ब्रिगेड उतरलीय.
सेलेब्रिटीज पौराणिक व्यक्तिमत्वांनी हायजॅक केलेत
खाजगी प्रॉब्लेम्स लोक कर्णे घेऊन सांगत फिरताहेत..
भटक्या प्राण्यांचा वाली शोधण्यासाठी नरभक्षक लोक आलेले आहेत.
राज्यातल्या डॉकटरांनी पेट्रोल पंपावर भेसळ सुरू केली आहे आणि देशी दारूच्या दुकानात बसून रेसिपीज शिकवता शिकवता दोन दोन हॉस्पिटल्स चालवताहेत. त्यामुळे त्यांच्याकडे रोकड जमा झालेली आहे.
युके (युनायटेड कोथरुड) मधे एटीम मधे पाच मिनिटात कॅश मिळतेय, इतरत्र उपासमार चालू आहे

बाकी सगळं आलबेल आहे महाराज

मला वाटते तैमूर नावाबद्दल पहिली प्रतिक्रिया अभारतीय व्यक्तिकडुन आली होती आणि ती तशी आली नसती तर इथले लोक तैमूर कोण हे शोधायच्या भानगडीत पडले नसते.
<<

चुकीचे आहे.

दुसरं, "सखेद राग" वगैरे काही नाही, अत्यंत नीच भाषेतली ट्वीट्स आहेत. अक्षरश: लाज वाटते भारतीय हिंदू म्हणवून घ्यायची अशा दर्जाची ट्वीट्स लोकांनी केलेली आहेत.

अगदी सहमत झाडू...लाज वाटावी अशी ट्विट,
यांना सुसंस्कृत, सुशिक्षीत म्हणजे काय शिकवणयाची वेळ आली आहे

Pages