सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?

Submitted by अर्चना सरकार on 23 December, 2016 - 12:06

कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्‍याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्चना,

अगदी योग्य भावना आहेत तुमच्या.

इथे या महाकद्रुक लोकांच्या विकृत ट्वीट्स्/मेसेजेसपाठी 'सैफ अली खान' नामक मुसलमानाने एका हिंदू मुलीशी लग्न केलं हा मूळ इश्यू आहे.

अग्दी त्या निष्पाप जीवाचा मृत्यू व्हावा, त्याच्या आईला, "आपल्याच हिंदू मुलीला" झिका व्हायरसचे इन्फेक्शन असावे असल्या लेव्हलच्या पोस्ट्स आपल्या 'राष्ट्रभक्त' हिंदुत्ववादी भक्तांनी टाकलेल्या आहेत.

हताश व्हायला होतं असला मूर्खपणा पाहून!

आज आमच्या ऑफिसमधील एक सिनिअर लेव्हलच्या सरांनी अचानक माझ्याकडे हाच विषय काढला,
म्हणाले, त्या व्हॉटस्स्प वरच्या सैफ करीनाच्या पोस्टस वाचल्यास का रुनम्या. लोकांना पण काही कामधंदे नाहीत.
मी म्हणालो, हो सर. मला वाटले त्यांचेही विचार अर्चना सरकारसारखे असतील,
पण अचानक त्यांनी ट्रक चेंज केला, गीअर बदलला,
म्हणाले, कश्याला भाव द्यायचा त्या थर्डक्लास लोकांना. लायकी तरी आहे का त्यांची?
मी क्षणात हडबडलो, तरी नेटाने म्हणालो, हो सर.
सर पुढे म्हणाले, एक अभिनय सोडला तर काय आहे त्या लोकांच्यात. सौंदर्य तर काय कोणालाही मिळते. लोकं त्यावर मरतात, भाव देतात. पण आणखी काय गुण असतात त्यांच्यात. संस्कारमुल्ये जी आपल्या अंगी असतात ती जराही नाही. (नक्की कोणती संस्कारमूल्ये त्यांना माझ्यात किंवा स्वत:च्यात दिसली त्यांनाच ठाऊक) निव्वळ पैश्यांमागे धावत असतात. मागे त्या करीना आणि शाहीद कपूरचे प्रकरण गाजलेले. मग त्या सैफलाही पद्मश्री दिले. ह्याला काही अर्थ आहे का. ह्यांव नि त्यांव..... लोकं यांना कश्याला भाव देतात म्हणत पंधरा मिनिटे नॉनस्टॉप बोलले सर Happy

बस हिच कमाल असते ता सेलेबेरेटींची, लोकांना बोलायला आवडते त्यांच्याबद्दल. चांगले वाईट हा मुद्दा मग गौण झाला.

आणि सुपर्रस्टारपद हा तर काटेरी मुकुट झाला. तो पेलायलाही मग एखादा शाहरूखच हवा.

सेलीब्रिटी म्हणजे जे सेल करु शकतात ते सेलीब्रिटी. स्वतःला सतत चर्चेत ठेवणे, त्यासाठी वेगवेगळं पोजिशनिंग स्विकारणे हे केलं जातं. (शाहरुख, अक्षय, आमिर, रनबीर, सर्व लोकांची एक एक पर्सनॅलिटी पब्लिश केली जाते) त्यानुसार त्यांना फिल्म्स, त्यातून जाहिराती मिळतात. त्यांना जाहिरातीत पाहून लोकांनी इम्प्रेस व्हावं ह्यासाठी पब्लिसिटी करत राहावी लागते, म्हणजे जाहिराती मिळाव्या म्हणून कराव्या लागणार्‍या जाहिराती म्हणजे असल्या कॉन्ट्रावर्सी व तत्सम इतर पब्लिसिटी. पब्लिसिटी हे त्यां सेलीब्रिटींचं भांडवल. एखाद्या सेलीब्रिटीने ठरवलं तर कोणाला त्याचं नखसुद्धा किती वाढलं ते कळणार नाही. नाहीतर डोक्यातल्या केसात किती डॅन्डरफचे कण आहेत, आठ दिवस आधी किती होते आता किती, त्याची आकडेवारी माध्यमांमध्ये चर्चिली जाईल...

त्यामुळे सेलिब्रिटी व खाजगी आयुष्य्/व्यक्तिगत आयुष्य हे प्रश्न आपल्या सारख्या सामान्य लोकान्ला पडतात. त्यांनी त्यासाठी प्रोफेशनल्स नियुक्त केले आहेत.

ब्रॅन्डिंग आणि मार्केटींग क्षेत्राचा अभ्यासक-व्यावसायिक म्हणून आलेल्या अनुभवातून व अभ्यासातून मत मांडतोय. खरंच कोणाला प्रांजळपणे काळजी वाटत असेल तर माझा सल्ला आहे की सेलिब्रिटींना इतकंही सिरियसली घ्यायची गरज नाही. त्यांच्या कॉन्ट्रावर्सीज ह्या सोची-समझी चाल असतात. ज्यात सर्व संबंधितांना योग्य तो मोबदला दिला जातो. तैमूर प्रकरण जितकं साधं आणि वरवर दिसतं तितकं ते नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांच्या भावना भडकवणे (चांगल्या-वाईट कोणत्याही बाबतीत) हाही एक मोठा खराखुरा बिजनेस आहे. ट्विटर हॅण्डलच्या धारकापासून ते मिडियाच्या प्रत्येक अवतारापर्यंत सब मिले हुए है जी!

देअर इज मार्केट इन्वॉल्व एवरीव्हेअर! from cradle to grave!!

मला हा संपूर्ण एपिसोड माहीत नाही. थोडंसं कानी आलं पण नेमकं काय चाललंय हे माहीत नाही. सैफ करीनाला मूल झालं हेच माहीत नव्हतं....

पण सेलेब्रिटींना आणि डॉक्टरांना खाजगी आयुष्य असायला हवंच. त्या आयुष्यात त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन बसावं नैतर काहीही करावं, आपल्याला काय त्याचं ? लोकांनी हक्क नको दाखवायला , त्याचबरोबर त्यांनीही पब्लिकशी उद्दाम उर्मटपणा नको करायला. एकूणात बरेचसे सेलेब्रिटी आणि डॉक्टर्स जनरली आदबशीर वागत असतात. अपवाद असणारच..

जे सेल करू शकतात ते सेलेब्रिटी Uhoh सेलेब्रिटीचं स्पेलिंग येतं का? उगीच कशाला काहीही जोडून द्यायचं! खाजगी आयुष्य प्रत्येकाला असते पण त्याचा आदर आपण (भारतीय) करत नाही एवढाच अर्थ आहे या सगळ्याचा.

सेलिब्रिटींना इतकंही सिरियसली घ्यायची गरज नाही. त्यांच्या कॉन्ट्रावर्सीज ह्या सोची-समझी चाल असतात. ज्यात सर्व संबंधितांना योग्य तो मोबदला दिला जातो. तैमूर प्रकरण जितकं साधं आणि वरवर दिसतं तितकं ते नाही. सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांच्या भावना भडकवणे (चांगल्या-वाईट कोणत्याही बाबतीत) हाही एक मोठा खराखुरा बिजनेस आहे. ट्विटर हॅण्डलच्या धारकापासून ते मिडियाच्या प्रत्येक अवतारापर्यंत सब मिले हुए है जी! >> +१११

उपरोध सपशेल फसला आहे. हा उपरोध वापरताना इंग्रजी भाषेचे अज्ञान दिसले नसते तर त्याला काही अर्थ असता. FYI - Celebrity ≠sell.

हे भगवान!!! आप धन्य हो!

चला, करुयात का स्पून फीडींग? करावं लागेल असं वाटतंय. मी मायबोलीवर फार येत नसतो, प्रतिसाद देत नाही, तुमचा गैरसमज होणे साहजिक आहे. गेल्या १४ वर्षांपासून मी जाहिरातक्षेत्रात काम करतोय, ब्रॅन्डींग, पोजिशनिंग, मार्केटींग, कन्झुमर-सायकॉलॉजी हे माझ्या अभ्यासाचे व प्रत्यक्ष व्यवसायाचे भाग आहेत. गेल्या कैक वर्षापासूनच्या जाहिरातक्षेत्रातल्या बदलांचा अभ्यास करतांना, बदलत चाललेल्या वातावरणाचा अभ्यास करतांना काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे सेलीब्रिटी. तुमच्या इंग्रजीत Celebrity !! हे सेलीब्रिटी तयार केले जातात, त्याची एक मोठी इन्डस्ट्री आहे. ह्या इन्डस्ट्रीची जाहिरातजगाला फार गरज असते. वस्तू विकण्यासाठी. तर ह्या सर्व सेलेब्रिटींचे काम कोणत्यातरी वस्तू-सेवांची जाहिरात करणे आहे. अगदी शोभा-डे सारख्या लोकांनाही काही कंपन्या आपला ब्रॅण्डअ‍ॅम्बेसेडर नियुक्त करतात. केवळ आपल्या नावावर-अस्तित्वावर वस्तू विकून देण्याची ज्यांची ताकत आहे ते सेलीब्रिटी असे माझे मत आहे. तर सेलीब्रिटी ह्या इंग्रजी शब्दाचा माझ्या वतीने मी अपभ्रंश करुन त्याची सत्यता विदित केली, म्हणजे नेहमीच करतो. माझ्यासाठी Celebrity = sellebrity. यावर विस्ताराने लिहायची इच्छा आहे. बघूयात कधी जमतं ते.

आता माझं इंग्रजीचं अज्ञान की तुमची समोरच्याला घाईघाईने अपमानित करायची उथळ मानसिकता यापैकी नक्की काय उघडं पडलंय ते बघा म्हणजे झालं.

एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी फॉर देम... फार सहानुभूती बाळगायचे कारण नाही. या क्षेत्रात राहूनही, ज्याना खाजगीपण जपायचे असते ते जपू शकतात आणि जपतातही !

एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी फॉर देम... फार सहानुभूती बाळगायचे कारण नाही. या क्षेत्रात राहूनही, ज्याना खाजगीपण जपायचे असते ते जपू शकतात आणि जपतातही ! >> +१००

माझ्यासाठी Celebrity = sellebrity. यावर विस्ताराने लिहायची इच्छा आहे. बघूयात कधी जमतं ते.
>>>>

लिहा की, काहीतरी वेगळे वाचायला मिळेल.

नानाकळा, सहमत! सेल करु शकतो म्हणून सेलेब्रिटी. त्यांचा धंदा चालावा म्हणून सतत प्रकाश झोतात रहाण्याची सवय असते! सणसणाटी वाक्ये, मुलखती, हा त्याचाच एक भाग!
आणि आपण त्यांना अवास्तव महत्व देतो!

दिनेश +१११११

सनी देवल आणि त्याची बायको.
सुनिल शेट्टी ची बायको... अनिल कपूर ची बायको. इ. लोक मि कधीच गॉसिप मध्ये पाहिले नाहीत.
त्यांचा अभिनय क्षेत्राशी फार संबन्ध नाही ही गोष्ट वेगळी, पण शाहरूख खानची बायको बर्‍याचदा झळकते बातम्यांत. जितेन्द्र ची बायको शोमा कपूर पण प्रोड्युसर आहे पण मी तिला ही फार कमी पाहिलय बातम्यात.

त्यामुळे स्वतःचं खासगी आयुष्य जपावं वाटत असेल तर नक्की जपता येतं.

पण काही इतर लोकांना सो कॉल्ड सेलिब्रिटी व्हायचा सोस असतो, मग नसते धागे विणून, कधी कधी स्वतःचं पर्सनल आयुष्य जाहीर करून ते हौस भागवून घेतात. सोस असा आणि तसा ही...

Celebrity = sellebrity. यावर विस्ताराने लिहायची इच्छा आहे>> खरंच लिहा नक्की Happy

सनी देवल आणि त्याची बायको.
सुनिल शेट्टी ची बायको... अनिल कपूर ची बायको. इ. लोक मि कधीच गॉसिप मध्ये पाहिले नाहीत.>>> +१

Celebrity = sellebrity. यावर विस्ताराने लिहायची इच्छा आहे>>>> लिहा की.आम्च्या ही ज्ञानात भर पडेन.

दक्षिणा.. हे त्याच्याही आधीपासून होते. राजेंद्र कुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र यांनी देखील आपली फॅमिली मिडीयासमोर आणली नव्हती. धर्मेंद्र हेमा प्रकरणात, कधीही त्याच्या बायकोची प्रतिक्रिया वाचली नव्हती. उलट हेमानेच, आपण केले ते चूक होते, असे नंतर जाहीररित्या सांगितले होते.

आणि मिडीया पण या शिवाय जगू शकत नाही. करीना गरोदर राहिल्यावर अमृता सिंग ची प्रतिक्रिया विचारायची काय गरज होती ?

तैमूर च्या नावाबद्दल चर्चा झाली ती खरेच दुर्दैवी, पण करीना आणि सैफ ला ती थांबवताही आली असती.

तैमूर नावाची एवढी चर्चा झाली कारण या नावाच्या एकाने भारतावर आक्रमण करून दिल्ली तख्तावर बसलेल्या मोगल सम्राट तुघलकाला पळवून लावले, हाती सापडलेल्या सैन्याचे व जनतेचे भयंकर हाल केले. नुसते भारतातच नाही तर त्याने जिथे जिथे आक्रमणे केली त्या सगळ्या ठिकाणी त्याने अशीच वाताहत लावली.

भारतीय इतिहासातल्या एक भयानक संहाराला जबाबदार असणाऱ्याचे नाव मुलाला ठेवले याबद्दलचा सखेद राग लोकांकडून व्यक्त केला गेला. मुलाचे नाव अकबर, हुमायून, जहांगीर ठेवले असते तर कोणी लक्ष दिले नसते.

आपल्या मुलाचे नाव आपण काहीही ठेऊ शकतो. पण म्हणून आजवर कोणी रावण नाव ठेवलेले नाही आणि तसा रावण मोठा शिवभक्त होता तरीही.

बहुधा पत्रिकेत तै अक्षर आले असावे. त्यांचा पोरगा त्यांचे चॉईस. पण तैमूर नावामागे असा ईतिहास असेल तर येस्स, लोकांच्या भावना भडकून किंवा भडकावल्या जाऊन चर्चा होणे साहजिक आहे. अर्थात लोकांनाही कश्याला भावना भडकावून घ्यायची गरज आहे हा ही एक प्रश्न आहेच. दैवतांचा अपमान केल्याने भावना भडकतात हे समजू शकतो, पण कोणी आपल्या मुलाचे नाव राक्षसाचे का ठेवेना, आपल्याला काय असाच दृष्टीकोण हवा.

बाकी तैमूरच्या ईतिहासाबद्दलही व्हॉटसपमध्येच वाचले. त्यामुळे ते देखील खरे खोटे कल्पना नव्हती. आणि तशी या प्रकरणामुळे मुद्दाम शोधायला जावे याची गरजही वाटली नाही.

सैफ-करीना यांच्या पुत्राचे नाव "तैमूर" कसे पडले.. वस्तुस्थिती जाणून घ्या.
Wink
वास्तविक करीनाचे हे पहिलेच बाळंतपण असल्याने ते माहेरीच होणे स्वाभाविक होते. बबिताने (करीना ची आई) हिने हे बाळंतपण तिच्या स्वतःच्या माहेरी कर्नाटकात एका छोट्याश्या "देवनुर" या गावी करायचे योजिले होते, कारण तिच्या माहेरी एक "महादेवी अक्का" नामक सुईण बाई घरीच सुरक्षित व नैसर्गिक बाळंतपण करण्यात प्रसिद्ध होती. एकदाच्या यशस्वी बाळंतपणा नंतर पुत्रप्राप्ती आनंदाने बारश्याची तारीख पक्की झाली. समस्त कपूर, खान, खेमू कुटुंब उत्साहाने उपस्थित झाले. भूतकाळाच्या कटू आठवणी विसरून घरच्या तुपाचे डिंकाचे, हळिवाचे लाडू बनवून अमृता सिंग पण वेळेत पोहोचली. देवनुर मधील छोटंसं घर आनंदानं आणि उत्साहानं अक्षरशः खुलून गेलं. सोहाआत्या तर बाळास हातातून ठेवावयास तयार नव्हत्या. "तुला पण पहिला मुलगा होउदे ग सोहा... !" अशा अनेक आज्ज्यांच्या शुभ आशीर्वादाने आत्याबाई लाजून विरघळत होत्या. मूळचे कर्नाटकी घर, म्हणून सर्वत्र कन्नड भाषेचाच धिंगन्ना माजला होता. सोहाआत्या पण हौसेने तोडकं मोडकं कन्नड फोडत होत्या. आलेल्या पाहुण्यांचा उत्तम कानडी पाहुणचार "बररी... नाश्ता तगोरी... चहा कुडरी.." म्हणत गरम गरम उपमा आणि चहाने केला. जे उशिरा आले त्यांनी उपम्याच्या मोकळ्या भांड्याकडे पहात फक्त चहा घोटला.

कुलदैवताचे नाव घेऊन एकदाच बाळाला पाळण्यात घातलं. आणि मुंबईची पहाटेची एस. टी. चुकल्याने सोहाआत्याच्या मोठ्या नणंद बाई, भाऊजी आणि भाच्चा हे तिघे उशिरा उगविले. त्यांना पाहताच डोक्यावर पदर घेऊन सोहाआत्या त्यांच्या पायात पडल्या आणि स्वयंपाक घरातकडे पाहात "ताई.... इकडी मूर चहा कुडरी... !" (ताई.. इकडे तीन चहा द्या... ! ) असे आपुलकीने चित्कारल्या. मुहूर्ताची वेळ पुढे जाऊ नये म्हणून आत्याबाई बाळाचे नाव "कुर्रर्रर्र.. " करावयास धावत त्याच्या काना जवळ परत पोहोचल्या आणि "गोपाळ.. !" असं म्हणणार इतक्यात, खोलीतल्या गर्दी गोंगाटाने स्वयंपाक घरातल्या ताईना नक्की किती कप चहा बनवायचा आहे हे नीट त ऐकू आल्याने, तिने मधेच बोंब मारली... "यष्ट चहा कुडली सोहाआत्या... ?". हे ऐकताच सोहाआत्या बाळाच्या काना मधेच उत्तरल्या.......
"ताई-मूर...!" आणि पाठीत गुद्द्यांच्या भडीमार झाला व अशा प्रकारे गोपाळ चा तैमूर झाला .

सौजन्य : भास्कराचार्यांचे वॉटस्याप Proud

आपल्या मुलाचे नाव आपण काहीही ठेऊ शकतो. पण म्हणून आजवर कोणी रावण नाव ठेवलेले नाही आणि तसा रावण मोठा शिवभक्त होता तरीही.
<<
रावण नावाचे लोक आहेत व असतात.

हे जरा अवांतर -

आणि तसा रावण मोठा शिवभक्त होता तरीही.
>>>>
हे रावणाचे शिवभक्त असणे मी बरेच जणांच्या तोंडून ऐकतो. बरेचदा कौतुक केल्याच्या आविर्भावात.
पण शिवभक्त असणे हे काय क्वालिफिकेशन आहे हे समजत नाही.

म्हणजे आमच्या मुलाला दारू सिगारेट तंबाखू सतरा व्यसने आहेत, जुगारही खे़ळतो, पोरींचाही नाद आहे, मारामार्‍या तर रोजच्याच आहेत. पण तरी न चुकता सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करतो, दर मंगळवारी सिद्धीविनायकला जातो, आणि संकष्टीला उपवास करतो असे झाले हे.... काय लॉजिक आहे, कोण देणार अश्या पोराला आपली पोरगी?

मला वाटते तैमूर नावाबद्दल पहिली प्रतिक्रिया अभारतीय व्यक्तिकडुन आली होती आणि ती तशी आली नसती तर इथले लोक तैमूर कोण हे शोधायच्या भानगडीत पडले नसते.

Pages