कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.
सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?
Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फनी वगैरे प्रतिक्रिया यायला
फनी वगैरे प्रतिक्रिया यायला लागल्या कि ट्रोल्सचे मुद्दे संपले हे समजून जायचं असतं.
इथे आलेली इतर नावे पाहिली तर ती मुस्लीम नसल्यामुळे त्यांच्या बाबतीत वादंग झालेलं नाही हे उघड आहे. नाव जुने आहे ते क्रूरकर्मा वगैरे कितीही एक्स्प्लेनेशन्स दिले तरीही आपल्याकडच्या अशाच क्रूरकर्म्यांची नावे का चालतात याचे समाधाना होईल हा खुलासा करणे अशक्य आहे असे दिसल्याने मग वेड्यात काढणा-या प्रतिक्रिया येतील. हा शेवटचा हातखंडा प्रयोग असतो. कारण त्यात कुठलाही मुद्दा मांडण्याची आवश्यकता नसते.
बघा शेवटी त्या सैफने भारतियांचा अपमान करणारे नाव मुद्दामून ठेवले हा प्रचार हा कळीचा मुद्दा आहे. यातून काय सांगायचेय ? कि यांना कितीही डोक्यावर बसवा ते "असेच" वागणार. यातून निष्ठांबद्दलही शंका घेता येतात. व्हॉट्स अप स्कूल मधून ग्रॅज्युएशन करणारी जनता यांच्य सुदैवाने बक्क्ळ असल्याने अशा प्रचाराचे फावते. मग सैफच्या निमित्ताने तिन्ही खान आणि एकूणच एका समुदायाविरुद्ध द्वेषाची पेरणी लगे हाथ करता येते. गुजरातेत खानांचे सिनेमे न पाहणा-यांची संख्या लक्षणीय आहे. राजस्थान, हरियाणामधेही आहे. एकूणच प्रसिद्ध मुस्लीम व्यकफ्ट, सेलेब्रिटीज हे सॉफ्ट टार्गेट होत राहणार. एका दगडात कित्येक पक्षी मारता येत असतील तर का नाही असे इश्यूज घेतले जाणार ? अशा मोहीमा सातत्याने चालत राहणार आहेत.
अशोक, परशुराम असे नाव ठेवणा-यांची मानसिकता ओरिसाविरोधी / क्षत्रियविरोधी अशी हाकाटी सुद्धा पेटवता येईलच. अशक्य नाही ते. फक्त राजकारणाची गरज असली पाहीजे. आज ती गरज नाही. उद्या असल्यास यू टर्न मारून अशोक नावाबद्दलही चर्चा सुरू झाल्यास नवल वाटणार नाही.
या मोहीमेचा भाग असलेल्यांच्य प्रतिक्रियांना माझ्या लेखी काडीचेही महत्व नाही. त्यांचा हलकटपणा बंद होईल अशी अपेक्षा करणे हा माणूस म्हणून जन्माला येऊन केलेला सर्वात मोठा मूर्खपणा असेल.
या भाषणाला मी स्टँडिंग
या भाषणाला मी स्टँडिंग ओव्हेशन देत आहे.
तैमुर् हे तैमुरलिंगाचं नाव
तैमुर् हे तैमुरलिंगाचं नाव आहे मान्य आहे>>>>:फिदी: हिंदु करुन टाकला रीयाने याला.:फिदी: अगं तो तैमुरलंग आहे.
तैमूर the lane असे आहे ते...
तैमूर the lane
असे आहे ते... लेन म्हणजे लंगडा
सपना, तुमचा मुद्दा मजबूत आहे,
सपना, तुमचा मुद्दा मजबूत आहे, इतिहासाकडे बघायची नजर लोडेड आहे लोकांची! मराठ्यांच्या बाबतीत राजस्थान बंगाल गुजरात प्रांतात त्यावेळी काय भावना होती हे बघत नाही लोक, पंडीत नेहरूंनी शिवाजी महाराजांचा तर चक्क लुटारू का काहीसा उल्लेख केला होता! द्रविड विरुद्ध आर्य संघर्ष, इत्यादी बऱ्याच घटना असतात पण लोक इतिहासाकडे बघतांना आजच्या दृष्टीकोनातून बघतात ते चूक आहे!
सगळे मुस्लिम क्रुरच असतात ह्या सिंगल आयडियाचा प्रचार प्रसार करणे आयसिस च्या कृत्यांपेक्षा कमी नाही!
नानाकळा शिवाजी महाराजांचा
नानाकळा
शिवाजी महाराजांचा लुटारू असा उल्लेख असल्यावरूनही अधून मधून वाद चालू असतात. पण सुरतलुटीच्या नंतर तिथल्या जनतेची भावना काय असेल हे आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यातून आता शिवाजी महाराज दैवत झाल्याने भावना भडकवण्याचे साधन होत चालले आहे. स्वतः महाराजांच्या काळात त्यांचा असा उल्लेख झाल्याने कुणाच्या भावना दुखावल्या नसत्या. एकूणच भारतीय उपखंड हा कठीण भूभाग आहे.
जगाचा इतिहास टोळ्यांनी घडवलेला आहे. सर्वात क्रूरकर्मा म्हणून गाजलेला चंगेझखान हा मुस्लीम नसून बौद्ध होता. कारण त्या वेळी मुस्लीम धर्म मंगोलिया आणि पर्शियात नव्हता. मुस्लीम धर्माचा उदय होऊन पर्शियात त्याचे आगमन झाल्यानंतर चंगेझखानाचे वंशज मुस्लीम झाले. पण त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत काही एक बदल झाला नाही. भारतात पेंढारी किंवा काही गुन्हेगार जमातींच्या पद्धती क्रूर होत्या तशाच या मंगोलियन टोळ्यांच्या होत्या. इतक्या की चीनच्या सम्राटाने भिंतच बांधली होती. याच चंगेझखानाचा वंशज तैमूर खान होता. त्याचे नाव तैमूर लेन किंवा लंग कसे झाले हा वेगळा विषय.
पण तैमूर एकमेव नव्हे. त्याच्या आधीही हे नाव अस्तित्वात होते आणि नंतरही अनेकांचे नाव तैमूर होते. सगळेच तैमूर काही क्रूरकर्मा नसतात. सगळेच अशोक नरसंहार करूनच पश्चात्ताप करत नाहीत. शिवाजी नाव असलेले सगळेच परकियांशी लढा देत नाहीत. किंवा सूरत मधे शिवाजी हे नाव त्याज्यही नाही. परशुराम हे नाव क्षत्रियांनी टाकून दिलेले नाही.
विनाकारण त्यावरून अर्धवट माहितीवरून आपले पाजळत रहायचं.. यासाठीच देश सोडून निर्लज्जपणे जावं असा विचार हज्जारदा मनात येतो. अशा मूर्खांच्या सहवासात राहण्यापेक्षा ते केव्हांही बरं..
एगझॅक्टली! फूट इंच माहित
एगझॅक्टली! फूट इंच माहित नसण्याचे उदाहरण त्यासाठीच दिले होते!
एकाच व्यक्तीने अनेक नावांनी
एकाच व्यक्तीने अनेक नावांनी अशा विषयावरचे धागे काढून गंमत पाहण्याच्या या वृत्तीला ओळखून असल्याने अशा धाग्यांवर खरं तर हिरीरीने भाग घेत नाही. पण काही प्रतिक्रिया पाहून राहवत नाही हे ही खरेच
माझी या व्यक्तीला विनंती आहे. एकाच नावाने जे चालू आहे ते पुरेसे आहे. आख्खी भुतावळ जमा करण्याच्या विकृत मोहाला आवर घालावा.
>>>>आता शिवाजी महाराज दैवत
>>>>आता शिवाजी महाराज दैवत झाल्याने भावना भडकवण्याचे साधन होत चालले आहे. स्वतः महाराजांच्या काळात त्यांचा असा उल्लेख झाल्याने कुणाच्या भावना दुखावल्या नसत्या. एकूणच भारतीय उपखंड हा कठीण भूभाग आहे.<<<<
अनुमोदन
धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद
धाग्यावर बरेच अवांतर प्रतिसाद चालू असल्याने किंवा धागा किंचित वेगळ्या मार्गाने जातान दिसल्याने त्या दिवशी ऑनलाईन येउनही या धाग्यावर लिहायचे टाळले होते.
तैमूर नावामागचा ईतिहास मलाही हा धागा काढताना माहीत नव्हते. व्हॉटसप पोस्ट मध्ये होता तसा मोडका तोडका पण एवढ्या मोठ्या पोस्टना वाचायचे कष्ट मी सहसा घेत नाही.
तैमूर हा एक मुस्लिम राजा होता, जसे की अकबर, औरंगजेब, हुमायून वगैरे आणि त्याच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव एका हिंदू-मुस्लिम जोडप्याने ठेवले म्हणून काही संघटनांनी गदारोळ चालवला असे वाटलेले.
तर या पार्श्वभूमीवर एखाद्या प्रसिद्ध क्रूरकर्माचे नाव मी तरी नाझ्या मुलाचे ठेवले नसते हे प्रामाणिकपणे सांगते.
मात्र त्याच्यबरोबर ज्याने ठेवले आहे त्यावर आक्षेप घ्यायचाही मला काहीएक हक्क नाही हे देखील माझेच मत आहे.
@ तैमूर माझ्यासाठी हा विषय ईथेच संपतो.
पण सेलेब्रेटींच्या खाजगी आयुष्यात डोकावायची आपल्या सर्वांनाच सवय असल्याने हा धागा कदाचित ईथेच संपणार नाही, या निमित्ताने माझा मायबोलीवरचा पहिला शंभर नंबरी धागा झाला. द्विशतकासाठी मलाच शुभेच्छा. हॅपी गॉसिपिंग
पण सेलेब्रेटींच्या खाजगी
पण सेलेब्रेटींच्या खाजगी आयुष्यात डोकावायची आपल्या सर्वांनाच सवय असल्याने
>>> सरसकटीकरण नका हो करु.. धन्यवाद!
तैमूरलंगच्या समर्थनार्थ पोस्ट
तैमूरलंगच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणारे सर्व लोक महान आहेत.
शिवाजीला लुटारू म्हणाले होते नेहरू ते सुद्धा ज्यांना योग्य वाटते ते तर अजुनच महान आहेत.
बास कळाली अनेकांची मानसिकता. नविन वर्षात जन्माला येणार्या सर्वांची नावे आत्ताच सुचवून ठेवा त्यांच्या पालकांना.
जरा अवांतर : खाली दिलेल्या लिन्कमधे जग्गी वासुदेव यांचे विचार ऐका. २४ व्या मिनिटाला ते काय म्हणतात हे आवर्जुन ऐका.
https://www.youtube.com/watch?v=lRxmg213lBc
आता जग्गी ठरवणार का कुणाचे
आता जग्गी ठरवणार का कुणाचे नाव काय ठेवायचे ? उद्या शरद पोंक्षे नामक व्यक्तीची लिंक देऊन गांधीविचार काय आहे आवर्जून ऐका असे म्हणायला कमी करणार नाहीत
हायला , हे एक ह्यांचं अजबच !
हायला , हे एक ह्यांचं अजबच ! स्वतः संसार न करणारे , लग्न न करणारे , केलेच तर त्यातून पळालेले .... असले लोक प्रपंच नेटका कसा करावा , मुले दोन काढावीत की दहा , त्यांची नावे काय ठेवावीत , ह्यांची चिंता करत असतात.
तैमूरलंगच्या समर्थनार्थ पोस्ट
तैमूरलंगच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिणारे सर्व लोक महान आहेत.
धन्यवाद
यासाठीच देश सोडून निर्लज्जपणे
यासाठीच देश सोडून निर्लज्जपणे जावं असा विचार हज्जारदा मनात येतो.
<<
अच्छा. देश सोडून जाणारे निर्लज्ज असतात तर!
नेमके काय जिव्हारी लागलेय
नेमके काय जिव्हारी लागलेय ?

>>
ताई / दादा वगैरे - ह्या असल्या फालतू गोष्टी जिव्हारी लागण्याइतका विखार परमेश्वर कृपेने नाहिये माझ्यात फारशा कुठल्याच बाबतीत!
तुमच वाक्य खरच फनी वाटलं. जर ते क्षम्य असतं तर त्याला इतकी उपरती झाली असती का? कुठल्याही न्याय व्यवस्थेमागचं तत्व बदल्याकरता शिक्षा असावं का सुधारण्यासाठी शिक्षा? सुधारण्यासाठी हे उत्तर असेल तर ज्यानं स्वत:च्या बेसिक मधे येवढा मोठा बदल घडवून आणला / त्या घटनेनं बदल घडून आला - त्यानंतरही त्या बद्दल तुमच्या मनात येवढा विखार का?
अंगुलीमाल - वाल्मिकी ह्या सगळ्या गोष्टी जे सांगतात - तीच गोष्ट अशोक सांगतो. कितीही पतीत असला तरी अंतरंगात बदल घडतो तेव्हा तो पतीत रहात नाही. त्याचं सोनं होतं.
माझा ह्या philosophy वर पक्का विश्वास आहे. सोनं होणं हे प्रत्येक माणसाचं ध्येय असावं हा आशावाद आहे - त्यामुळेच तुमच्या वाक्यात जिव्हारी लागण्यासारखं काही सापडलं नाही!
अंगुलीमाल - वाल्मिकी ह्या
अंगुलीमाल - वाल्मिकी ह्या सगळ्या गोष्टी जे सांगतात - तीच गोष्ट अशोक सांगतो. कितीही पतीत असला तरी अंतरंगात बदल घडतो तेव्हा तो पतीत रहात नाही. त्याचं सोनं होतं.
<<
अगदी अगदी
मा. मोदींचंही असंच (याच लॉजिकने) सोनं झालंय ना/का?
राजाने शत्रूचा नाश केला तर तो
राजाने शत्रूचा नाश केला तर तो हिंसक व पापी ठरतो का?
>>राजाने शत्रूचा नाश केला तर
>>राजाने शत्रूचा नाश केला तर तो हिंसक व पापी ठरतो का?
नाही, पण - - -
शत्रूसैन्याचा नाश करणे ठीक आहे, पण सर्वसामान्य लोकांवर अनन्वित अत्याचार करणे हे सर्वथैव चूक, हिंसक आणि पाप आहे. हे सारे न केल्यामुळेच शिवाजी महाराजांचे वेगळेपण उठून दिसते. ज्यांनी सुरतेच्या लुटीत सुद्धा कधी उगाचच जबर कत्तली केल्या नाहीत.
बर्र्र्र्र्र्र्र्र म्हणजे
बर्र्र्र्र्र्र्र्र
म्हणजे तलवारीने ठार केले तर तो पापी
अन त्याचे सगळे पैसे लुटून नंतर तो भुकेने मेला , तर तो राजा मात्र किती दयाळू !!
पण सर्वसामान्य लोकांवर
पण सर्वसामान्य लोकांवर अनन्वित अत्याचार करणे हे सर्वथैव चूक, हिंसक आणि पाप आहे.
<<
म्हणजे (नोटबंदीसारखे) लहानसहान अत्याचार केले तर चालतात का?
उठा ले रे बाबा (अॅडमिन)
उठा ले रे बाबा (अॅडमिन) मेरेको नही, इन दोनोंको
नानबा/ई तुमचे खुलासे हे कीव
नानबा/ई
तुमचे खुलासे हे कीव करण्याच्याही पलिकडे गेले आहेत त्यामुळे चर्चा करणे थांबवत आहे. तुमचे अद्वितीय मत तुम्हालाच लखलाभ ...
राजाने माणसं मारायची सोडली की
राजाने माणसं मारायची सोडली की तो पवित्र झाला का ? मग खाटिक, सैनिक , जल्लाद .. हे सगळे पापीच की काय ?
<<<यासाठीच देश सोडून
<<<यासाठीच देश सोडून निर्लज्जपणे जावं असा विचार हज्जारदा मनात येतो. अशा मूर्खांच्या सहवासात राहण्यापेक्षा ते केव्हांही बरं..>>>
मूर्ख लोक आहेत म्हणून देश सोडणार असाल तर जरा विचार करा. दुसर्या देशांत भारतातल्या लोकांपेक्षा संख्येने जास्त नि जास्त मूर्ख माणसे भेटतील. अनुभवावरून सांगतो हो.
बाकी कुठल्याहि देशात काहीहि कारणाने जायला लाज कशाची? अहो केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार याने मनुजा चातुर्य येतसे फार! मग लाज कसली?
नमस्कार / जयभीम
गल्ली चुकली होती ( देवनागरीत लिहीण्यासाठी मायबोलीचा वापर होतो. कधी कधी आपण मायबोलीवर आहोत हे विअसरून सेव्ह्चे बटण दाबले जाते )
वाचलं का कुणी ?
<<<शिवाजी महाराजांचा लुटारू
<<<शिवाजी महाराजांचा लुटारू असा उल्लेख असल्यावरूनही अधून मधून वाद चालू असतात. >>>
नुसते शिवाजी महाराजांबद्दल सुरतमधेच नव्हे तर अख्ख्या बंगालमधे सर्व मराठ्यांना लुटारू म्हणून ओळखतात, कारण नानासाहेब पेशवे नि रघूजी भोसले यांनी बंगालमधे जाऊन युद्ध केले नि दोघांनीहि तिथल्या लोकांना लुटले.
हो हो, गब्बरची भीती
हो हो, गब्बरची भीती घालाय्च्या शोलेतल्या आया तशा पारंपरिक बंगाली अंगाईगीतांत बडगींची (म्हणजे बारगीर मराठ्यांची) भीती घालतात
असो. धागा काय, पोस्टी काय.... कायपण!
सैफ करीना यांना दुसरा मुलगा
सैफ करीना यांना दुसरा मुलगा होताच पुन्हा तैमूरच्या वेळी चवताळलेले ट्रोलर पुन्हा जागे झालेत.
तेव्हा काय पातळी गाठली होती कल्पना नाही, पण आता अक्षरशा पातळी सोडून कहर करत आहेत.
सेलेब्रेटींचे वैयक्तिक ट्रोलिंग होणे दुर्दैवी आहे हे एक झाले.
पण दुसरे म्हणजे सामान्य लोकांच्या मनात द्बेषभावना किती ठासून भरली जात आहे.
भले असे द्वेष मनात असलेली लोकं बहुसंख्य नसतील. पण नक्कीच लक्षणीय आहेत आणि हा चिंतेचा विषय आहे असे मला वाटते.
Pages