कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे. कधी अक्कल येणार आपल्याला, बाबांनो सेलिब्रेटींना सुद्धा स्वत:चे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य जगायचा हक्क असतो जितका तुम्हाला आहे. तुम्ही दोनशे रुपयांचे सिनेमाचे तिकीट घेता ते त्यांचा चित्रपट पाहायला, त्यांच्या आयुष्यात डोकावायला नाही. त्यांच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला चर्चेसाठी आमंत्रण नसते. तुमच्या घरच्या भानगडींबद्दल कोणी बाहेर कुजबूज केली तर तुम्हाला जो राग येतो तोच त्यांनाही येऊ शकतोच. ती संतपदाला पोहोचलेली व्यक्तीमत्वे नाहीत. सो प्लीज गाईज, स्टॉप गॉसिपिंग... एखाद्याच्या नावाची टिंगल उडवली जाण्याचे दु:ख मी चांगल्या प्रकारे समजू शकते.
सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का?
Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 23 December, 2016 - 12:06
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन(डोळ्यावर कंट्रोल ठेवत
हर्पेन(डोळ्यावर कंट्रोल ठेवत सांगत्येय ),
कानडीत ताई म्हणजे आई. सोहा शर्मिला टागोरला सांगत असेल 'ताई मूर चहा कूड री' तर एकवेळ ठिक आहे. पण ताई म्हणजे आई असेल तरी कुणी 'ताई' अशी हाक सहसा आईला मारत नाही. अम्मा, अव्वा म्हणतात.
कामवालीला तर कुणी ताई म्हणत नाही.
म्हणजे अगदी आईचा दर्जा द्यायचाच असेल तर 'अम्मा' 'अव्वा' देखिल म्हणतात.
म्हणजे उर्दूत कसं आपल्या आईची इंट्रो कुणाला द्यायची असेल तर 'आप हमारी वालिदा है' म्हणतात पण आईला हाक मारताना 'वालिदा' अशी हाक मारत नाहीत, अम्मी नाहीतर अम्मीजान म्हणतात तसं!
१) हर्पेन - रावणाने सीतेचे
१) हर्पेन - रावणाने सीतेचे फसवून अपहरण करण्याखेरिज दुसरे काहीही (गैरकृत्य) केले नव्हते.
२) आशूचॅम्प - रावणाने कुबेराच्या सुनेवर अतीप्रसंग केला त्यामुळे तिने तिला शाप दिला होता की यापुढे कुठल्या स्त्री वर जबरस्ती करशील तर डोक्याशी शकले होतील म्हणून रावण सीतेेचे मन जिंकण्याच्या प्रयत्नात होता.
^^^^^^^^^^^^^
या दंतकथांबाबत कोणावर विश्वास ठेवायचा हे समजत नाही
पण मग असा विचार मनात येतो,
अरे या पुराणपुरुषांना काही वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य असते की नाही. राम, रावण आणि सीता त्यांचे काय ते बघून घेतील ना. आपल्याला काय करायचय
सेलेब्रोटींना खाजगी आयुष्य
सेलेब्रोटींना खाजगी आयुष्य असावे असे कितीही म्हटले तरी जे यश अन प्रसिद्धी त्यांनी मिळवली असते त्याची नाही म्हटले तरी त्यांना किंमत मोजावी लागतेच. तैमूर नावाशी निगडीत ऐतिहासिक कारणांमुळे हे नाव ऐकल्यावर जाग्या होणार्या स्मृती व भावना चांगल्या नाहीत. नावाचा अर्थ पोलाद आहे अशी कितीही मखलाशी केली तरी. बाकी चालू द्या.
सहमत आहे सेलीब्रेटी झाल्यावर
सहमत आहे
सेलीब्रेटी झाल्यावर एक जबाबदारीरी येते अंगावर ती निभवावी लागते.
काही बाबतीत मी काहीही करेन असे बोलून चालत नाही. कारण लोकं तुम्हाला फॉलो करत असतात, तुम्ही तुमची इच्छा असो वा नसो काही जणांचे आदर्श असतात.
ऋन्मेष, तुझा फ्लॅन क्लब आहे,
ऋन्मेष, तुझा फ्लॅन क्लब आहे, साती अध्यक्षा आहेत, मी साधारण सद्स्यापासून सक्रीय कार्यकर्ता होण्याच्या मार्गावर आहे (इच्छेचा नसून फक्त वेळेचा अभाव मात्र आहे तूर्तास). अलीकडेच सिर्फ नामही काफी है या धाग्यात तू एक सेलिब्रिटी आहेस हे सिद्ध झालंय.
इथे मायबोलीवर आताच सिद्ध झाले असले तरी इतरत्र तू आधी पासूनच असावास.
तेव्हा सेलिब्रिटी झाल्यावर काय जबाबदारी येते, ती कशी निभवावी वगैरे बाबतीत सविस्तर लिहीच.
मानव! ऋबाळाचं पोटेंशियल मी
मानव!

ऋबाळाचं पोटेंशियल मी पहिल्यापासून ओळखून होते आणि कुणी काहिही म्हणो पण मी त्याचा फॅनक्लब काढलाच.
मग काय लोग आते गये और कारवां बनता गया.
(आणि अजून 'काहिंना' आम्हाला सगळ्ळं इतरांच्या अगोदर कळतं हे सांगूनही पटत नाही.)
श्री कसली ती नावाची कहाणी
श्री कसली ती नावाची कहाणी हहपुवा


दक्षिणा राहू दे ग
ऋन्मेऽऽष, प्वाइन्ट च बोललास पण ज्यात त्यात तुझ्या गर्फ्रेन्ड ला आणू नकोस रे भावा .
तुझी गर्ल्फ़्रेंड शिव भक्त आहे तर तू उमा भक्त हो कि
सुजा, पण ते खरेच आहे म्हणून
सुजा, पण ते खरेच आहे म्हणून आणले. बनवलेली कहाणी नाही. तिची शिवभक्ती मलाही किती आणि कशी भोगावी लागली किंवा लागते आहे हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. नोंद करून ठेवतो.
बरं. मी आता फेसबुकनगरात रपेट
बरं.
मी आता फेसबुकनगरात रपेट मारून आले तेव्हां उलगडा झाला सगळा (हे आधीच कसे सुचले नाही ?)
ज्या फेसबुक पोस्ट किंवा ट्विटरचे स्क्रीनशॉट्स फिरताहेत या मीडीयावर ते पाहून अक्षरशः लाज वाटली. लहान बाळाला कॅन्सर होऊन ते मरून जावं या कसल्या विकृत इच्छा ? त्या दोघांनी बाळाचे नांव बकासुर ठेवू देत, शकुनी ठेवू देत, तैमुर ठेवू देत किंवा चंगेझ ठेवू देत. बाळ मरावं ही इच्छा वाचून शहारा आला अंगावर.
विकासाचे फळ म्हणून ही प्रवृत्ती जोपासली जाणार असेल तर एकवेळ तो विकास नाही झालेला परवडला असे वाटून गेले. काय करायचाय असला विकास करून ? जर्मनी पुन्हा प्रगतीच्या दिशेने चालला आहे पण नाझीवादाबद्दल खूप ऐकू येतंय. माझ्या प्ळखीच्या एका भारतीय कपलला अनुभव आले आहेत. जगभरात द्वेषाचे वातावरण वाढतेय.. हे सहज होत नाही हे नक्की !
हरिनामे बाई, विकासाचे फळ
हरिनामे बाई,
विकासाचे फळ म्हणून ही प्रवृत्ती जोपासली जाणार असेल तर एकवेळ तो विकास नाही झालेला परवडला असे वाटून गेले. काय करायचाय असला विकास करून>>>>>>>>>
म्हणजे विकास करणारे (पक्षी सध्याचे सरकार, पक्षी bjp) अशी प्रवृत्ती (पक्षी नवजात बालकाचा मृत्यू इच्छिणे) जोपासत आहेत या बद्दल आपली खात्री पटली आहे काय?
तुम्ही कुठल्या घटनांकडे पाहून अशी खात्री पटवून घेतलीत हे समजून घ्यायला आवडेल.
बाल तैमुरला हिंदुनी शिव्याशाप
बाल तैमुरला हिंदुनी शिव्याशाप दिल्याचे पाहून परम संतोष जाहला... हिंदुनी शिव्याशाप दिल्या की त्या म्लेंछाचे अधिक चांगले होते. बाबरापासुन सलमानखान ... शेकडो उदाहरणे आहेत.
Someone sbould create bb - "
Someone sbould create bb - " runmesh hya ID chi suruvaateechee tayar keleli Pratima badalun ID magacha cheharyachi Pratima tyachya alikadachya posts madhe adhunmadhun dokavu lagali ahe ka?"
काल च लोकसत्ता मध्ये आलेला हा
काल च लोकसत्ता मध्ये आलेला हा लेख वाचा -
विकता का आमच्या गोष्टी? - http://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-celebrity-gossip-1369492/
तैमूर हे नाव नव्या बाळाला
तैमूर हे नाव नव्या बाळाला ठेवायला भिकार आहे हे पर्सनल मत.अर्थात आजूबाजूला लोकांनी डोरेमॉन मधली नोबिता वगैरे नावे ठेवलेली पाहिल्याने या टूकार वाटण्यात धर्माचा बायस नाहीये.
चांगले मुस्लिम नावच ठेवायचे तर मी रायन(चेतन भगत चा) किंवा फिरोज(इराणी सु शिं चा) सुचवले असते
पण बाळाला किंवा माता पित्याना काही व्हावे अश्या टायपाच्या पोस्ट लिहीणार्यांना शोधून मारले पाहिजे.
माझी गर्लफ्रेंड आहे. अट्टल
माझी गर्लफ्रेंड आहे. अट्टल शिवभक्त. दर सोमवार न चुकता उपवास. मी सुद्धा बहुतेक त्याचेच फळ>>>:-)
Fieoz of Su Shi was Parsi ?
Fieoz of Su Shi was Parsi ?
फिरोज 'इराणी' होता पारसी असे
फिरोज 'इराणी' होता
पारसी असे मेन्शन्ड नाही.
रायन ओबेरॉय होता चेतन भगत चा, पण हे बहुधा मुस्लिम नाव म्हणून पण चालून जावे, काही नावं मिक्स असतात समीर्,कबीर वगैरे तसं.
मुळात मुस्लिमच नाव ठेवायचा
मुळात मुस्लिमच नाव ठेवायचा हट्ट होता हे आपण गृहीत धरत आहोत.
शाहरूखच्या मुलांची नाव आर्यन, राम अशी आहेत.
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे
चिन्मय मांडलेकरच्या मुलाचे नाव जहागीर आहे.
पहिल्या दोन मुलांची नावे सारा
पहिल्या दोन मुलांची नावे सारा आणि इब्राहिम आहेत.त्यामुळे तिसर्याचे नाव पण मुस्लिम/रिमिक्स रेंज मधून हवे असेल हे गृहित.
बाकी नावे कोणी काही ठेवावी.ज्याचा त्याचा प्रश्न.अगदीच 'र्हिदम' 'नोबिता' 'अमारा' वगैरे नावं पाहिली की ठसका लागतो खरा.(सिक्वेन्स,ट्रेबल्,मिडीयन वगैरे पण येतील बहुतेक)
रायन ओबेरॉय>> पंजाबी हिंदू
रायन ओबेरॉय>> पंजाबी हिंदू आहे ग अनु. रायन मुळात ख्रिश्चन नाव आहे.
कोणी आपल्या मुलाचे काय नाव ठेवावे ही मुळात खाजगी गोष्ट आहे. तो तैमुर असेल नाहीतर मूर्ति असेल आपल्याला काय!
तैमूर असेल नाहीतर मूर्ती
तैमूर असेल नाहीतर मूर्ती असेल!>>
मस्तं प्रतिसाद मॅगी!
तैमूर ठेवलं म्हणून हिंदु चिडलेत.
मूर्ती ठेवलं की मुस्लिम चिडले असते कारण त्यांच्यात मूर्तीपूजा मान्य नाही ना!
तैमूर ठेवलं म्हणून हिंदु
तैमूर ठेवलं म्हणून हिंदु चिडलेत.
मूर्ती ठेवलं की मुस्लिम चिडले
>>
मुलांचे नाव ठेवायचे तरी काय मग? सेक्युलर नावे सुचवा मग.
अबकड कखगघ गमभन>>>>>
अबकड

कखगघ
गमभन>>>>>
सस्मित
सस्मित
गमभन! मस्त नाव आहे.
गमभन! मस्त नाव आहे.:-)
अरे नाव ठेवून झाले ना आता
अरे नाव ठेवून झाले ना आता त्यावर शिमगा कशाला?
रायन ... कन्नड राजा. भाग्यदा
रायन ... कन्नड राजा.
भाग्यदा लक्ष्मी ....
दिनकरकोटी तेजधी होळियुव जनकरायना कुमारी बेगा
अशी ओळ आहे.
>>>. सेलिब्रेटींना खाजगी
>>>. सेलिब्रेटींना खाजगी आयुष्य नसते का? <<<<


असते की.... पण लोकांना ते मान्य नसते.....
अगदी अस बघा, की मी काय सेलिब्रटी वगैरे नाहीये
पण इथे माबोवर माझ्या खाजगी आयुष्यात खोडसाळपणे "नाक खुपसण्याचे" , खाजगी आयुष्याचे अपमानास्पद उल्लेख करण्याचे प्रकार अनेकवार झालेत.
माझ्यासारख्या एका किरकोळ आयडीमागिल क्षुल्लक व्यक्तिची ही गत....
मग सेलिब्रिटींना कोण सोडणार? अहो बर्याच लोकांचे पोट अवलंबुन अस्ते हो त्यावर.... त्यातिल गॉसिप (रचण्या)वर....
पण अस्सल सेलिब्रिटी अशा सगळ्या नाक खुपसणार्यांकडे सपशेल दुर्लक्ष करतो......
मी देखिल तस्सेच करतो
>>>> मी चुकून भटक्या
>>>> मी चुकून भटक्या कुत्र्यांच्या धाग्यावर हा प्रतिसाद देऊन आलोय <<<<

Pages