नोटबंदी आणि भ्रष्टाचार

Submitted by सई केसकर on 14 December, 2016 - 05:43

गेला महिनाभर नोटबंदी आणि त्यातून जन्माला आलेल्या विविध अपत्यांचा अभ्यास आपण सगळेच करतोय.
निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य, त्याची अंमलबजावणी चांगली की वाईट, आणि त्याचे पुढील परिणाम कसे होतील यावर प्रचंड आणि दमवून टाकणारी चर्चा झाली आहे. पण नोटबंदी चालू असतानाच, हा निर्णय जे बंद करण्यासाठी घेतला आहे त्यालाच तो प्रोत्साहन देऊ लागलाय हे उघड व्हायला लागलेलं आहे, याचं अगदी भक्त सुद्धा समर्थन करतील. तो म्हणजे भ्रष्टाचार.

नोटबंदी जाहीर केल्यापासून दर दिवसाला सरकार नियम बदलू लागले. पहिला एक आठवडा कुठल्याही व्यक्तीला रोख जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा सगळ्या बँकेत मिळायच्या. यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागायचे. आठवड्याभरातच सरकारनी ते बंद केले कारण "काळा पैसा वाले काही नतद्रष्ट लोक", "भोळ्या भाबड्या गरिबांना" आपले पैसे घेऊन लाईनमध्ये उभे करत आहेत अशा बातम्या उघडकीला आल्या. रेल्वेची तिकिटे जुन्या नोटांनी काढायची परवानगीदेखील लगबगीने मागे घेण्यात आली कारण काही दुष्ट काळा पैसा बाळगणारे लोक जुन्या नोटांनी तिकिटं काढून ती लगेच रद्द करू लागले. परिणामी रेल्वेला नव्या नोटा रिफन्ड करता करता नाकी नऊ आले. गृहिणींच्या खात्यात अडीच लाखापर्यंत कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत या आश्वासनाचे एका आठवड्यातच धमकीत रूपांतर झाले. मग मधेच भारतीय बायकांच्या दागिन्यांच्या खणात डोकावण्याची इच्छादेखील व्यक्त झाली (अम्मांनी जाता जाता कान टोचले म्हणून बरं). त्यानंतर प्रधानमंत्रीजींच्या लाडक्या जनधन खात्यांना तंबी द्यावी लागली आणि आज अखेर तो दिवस आला, जेव्हा भ्रष्टाचार मुक्त अशा खाजगी बँकांवरदेखील छापे टाकण्याची वेळआली. महिनाभर ज्या (कॉपरेटिव्ह बँकांना डिवचून) बँकांचे मोदीजी गुणगान करत होते, त्यांच्याच दारी त्यांना पोलीस पाठवायची वेळ आली.

३५ दिवसांत सरकारने ५१ वेगळे वेगळे नियम तयार केले आणि मोडले. आणि त्यावरून सरकारला चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. अर्थात, या कोलांट्या उड्या सरकारच्या बेसावधपाणामुळेच झाल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी घेतलेल्या एका निर्णयातून, गोरगरिबांनाही भ्रष्टाचार करू नका असं सांगायची जेव्हा वेळ येते, तेव्हा प्रश्न चूक बरोबर या चाकोरीच्या बाहेरून बघितला पाहिजे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना भ्रष्टाचार हा असा साधा सोपा काळा-गोरा विषय वाटतो. काही लोक भ्रष्ट असतात, विशेषतः काँग्रेसमधील जवळपास सगळेच लोक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट लोकांनी साठ वर्षं सत्ता बळकावली आणि भारतात भ्रष्टाचार माजला. तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि साठ वर्षं साठलेली घाण साफ करण्यासाठी थोडी कळ सहन केली पाहिजे. आणि बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपण देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा छोटासा त्याग करतोय.

पण या अशा लिनियर विचारसरणीचा एक फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा विचार करून त्यात समाधान मानताना आपण एका खूप मोठ्या धडधडीत वास्तवाकडे पाठ फिरवतोय. ते म्हणजे आपण सगळेच भ्रष्ट आहोत. पुढे जाऊन असं देखील म्हणता येईल की हिंदी सिनेमासारखी भ्रष्ट आणि इमानदार असे दोन गटदेखील नसतात. आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. भ्रष्टाचार कधी घडतो? एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते. आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या इमानदार व्यक्तीला सत्ता मिळते, जी टिकवण्यासाठी तिला आजूबाजूच्या दहा भ्रष्ट व्यक्तींच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करावा लागतो. दोन देवाणघेवाण करणाऱ्या माणसांना एकाच सोयीच्या मार्गाने कर बुडवता येतो (रोकड देऊन) तेव्हा भ्रष्टाचार घडतो. किंवा निकाल काय लावायचा आहे हे आधीच ठरवून जेव्हा एखादा अभ्यास किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तिथे भ्रष्टाचार घडतो.

जेव्हा आपण सत्ता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, कडक स्टार्च केलेला कुडता, जॅकेट घालून लाल दिव्याच्या गाडीतून चाललेला राजकारणी डोळ्यासमोर येतो. पण नोटबंदी करून मोदींनी जनधन खाती बाळगणाऱ्या गरिबांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देऊन टाकली. जी व्यक्ती कर भरण्यास आजन्म पात्र नव्हती, जिला घाई गडबडीत कुठल्यातरी पुढच्या सोयीसाठी बँकेत खाते उघडावे लागले, आणि ते खाते चालू अवस्थेत ठेवण्यासाठी लागणारा पैसादेखील त्या व्यक्तीच्या हातात नाही, अशा व्यक्तींना आहेत ते पैसे खात्यावर जमा करायला भाग पाडून मोदींनी त्यांच्या हाती कधीही नसलेली सत्ता त्यांना मिळवून दिली. आणि अर्थातच भ्रष्टाचार घडण्यासारखी स्थिती निर्माण करून दिली.

जेव्हा एखादी गरीब व्यक्ती १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देते, तेव्हा त्या गुन्ह्याचे समर्थन करायला तिच्याकडे कित्येक भावनिक कारणे असतात. पण सगळ्यात महत्वाचे कारण हे असते की आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. आणि जनधन खात्यांपासून ते २ जी पर्यंत सगळ्या पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला या एकाच मानसिकतेतून बघता येते. भ्रष्टाचार करण्यासारख्या परिस्थितीत आल्यावर भ्रष्टाचार न करणे अवघड असते. आणि मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी,
>>
कसलाही निर्णय घेतला तरीही जर मार्ग काढत असतील तर काहीही न करता गप्प रहायला हवे सर्वांनी नाही का?
<<

तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम लक्षात येत नाहिये.

७-८% टॅक्सचोरांना पकडण्यासाठी अख्ख्या देशाची कॅशबेस्ड इकॉनॉमी बलात्काराने वेठीस धरली गेली आहे. ज्या निरपराध गरीबांना याची झळ पोहोचते आहे त्यांच्यासाठी आमचा ओरडा सुरू आहे.

या सगळ्यातून ना खोट्या नोटा सापडल्या, ना ब्लॅक पैसे. फक्त आणि फक्त कोट्यावधि लोक प्रत्येकी २-१० तास खर्च करून लायनीत उभे राहिलेत. स्वतःचेच पैसे मनोयोगे खर्च करता येईनासे झालेत. ही मध्ययुगीन राजेशाही नाही. "त्या" काळी, नवी लग्न करून आणलेली बायकोही पहिल्या रात्री राजा/बिशप/सरदाराकडे पाठवायची जबरदस्ती इंग्लंडात होती. भारतातल्या गमती वेगळ्या होत्या, हे इतिहास नीट वाचला तर समजेलच. हे "लोकनियुक्त" "मेजॉरिटी' सरकार स्वतःला समजते तरी काय?!

माझ्या देशात एक पंतप्रधा होऊन गेला ज्याने जागतिक मंदीची झळ देशाला पोहोचू दिली नाही. अन हा एक आहे, जो हाताला धरून मंदी देशात घेऊन आलाय!

वाह!

इतकेच हुशार आहेत, तर यापेक्षा अनेक बरे मार्ग होते व आहेत की! आजही फक्त छापे मारूनच चोर पकडले जाताहेत? हे कसे?

कॅॅशलेस साठी एकच पर्याय आहे रोख रुपयाची किंमत अॉनलाईन रुपयेच्या बरोबरीने करणे.
बाकी या धमक्या वगैरे फुस्स होतात

अमितव | 15 December, 2016 - 22:42

कोपरेटिव्ह बँकांवर त्या भ्रष्ट म्हणून ब्लँकेट बॅन आहे. >> खरच?

<<<

अमितव,

वेल्कम टु क्लब. Rofl

त्या बँकांवर मेजॉरिटी "विरोधकांचे" उर्फ नॉन भाजपाचे वर्चस्व आहे, हे कारण आहे, हे सत्य तुम्ही त्या "खरच?" मधून मांडलेत, याबद्दल अभिनंदन.

माझ्या देशात एक पंतप्रधा होऊन गेला ज्याने जागतिक मंदीची झळ देशाला पोहोचू दिली नाही. अन हा एक आहे, जो हाताला धरून मंदी देशात घेऊन आलाय!>>>>>> Lol एकिकडे जरा नीट विधान केलं की लगेच दुसरीकडे हे असं काहीतरी बोलायचं. की गेला सगळा पोस्टीतला बॅलन्स पाताळात.
मंदी कंट्रोल मध्ये राहायला त्या पंतप्रधनानी आणि त्यांच्या सरकारनी किती मोहिमा राबवल्या त्या पण लोकांना माहितच आहे. म्हणलं ना आधी, मोदींच्या चूका सांगताना तुम्ही परफेक्ट बोलता आणि पुढे जरा तटस्थ पणे बघायची वेळ आली की तुमचं घोडं पेंड खातं.

बुआ, ते त्या पक्षासाठी काम करतात आणि जाहीर बोलूनही दाखवतात. मग असं बाजूनं बोलणं एकवेळ समजून घेऊ. पण तुमचं काय? तुमचा बॅलन्स कुठे ढळलाय? कि ते पेठीतल्या काही लोकांसारखं 'आपलं सरकार' आहे असं म्हणणं असल्यानं चुका दिसेनात? Wink

या आणि इतर धाग्यावर चर्चा करताना एक जाणवल.. ते म्हणजे हे की...

-- नोटबंदी / कॅशलेस हा निर्णय किती चुकिचा आहे हे खुप जेनेरिक..व एकीव माहिती वर मान्डणे..
-- मुद्देसुद विचारलेल्या प्रश्नाना बगल देणे...
-- नोटबंदी / कॅशलेस निर्णयचा सकारत्म्क परिणाम "पि हळद हो गोरी" अस लगेच व्हवा अस अपेक्षा करणे..
-- नोटबंदी / कॅशलेस निर्णयचा नकारत्म्क परिणाम बद्दल उथळ वा वरवरच बोलणे.. मुद्द्या मधे गेल की विषय बदलणे...

पेठीतले लोकं? पेठीतले? आमचे एक मास्तर आहेत इथे व्याकरणाचे. त्यांनी जर बघितलं ना हे असं व्यकरण तर तुम्हाला छडीनी प्रसाद देतील ठेवणीतला. Proud
आमचं काय? जो काम करेल किंवा काही चांगलं करायला बघेल त्याच्या बाजूनी बोलू, मत देऊ आणि समजा नाही केलं नीट काम तर विरोधात बोलू. ह्यात काय चूक आहे?

इथल्या समस्त "नावडतीचे मीठ अळणी" टाइप प्रतिक्रिया वाचून आपला वेळ आणि श्रम इथे वाया न घालवण्याचे ठरवले आहे

signing off from this topic

कॉपरेटिव्ह बँकात ५ दिवसात ५००० करोड जमा झाले होते. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/5000-cr-put-into-maha-co-...

एक मुद्दा असाही येतो की आधी लोकं म्हणत होते की काळा पैसा घरात कोणी ठेवत नाही. तो सोने/रिअल इस्टेट इत्यादी मध्ये असतो त्यामुळे नोटबंदी मुळे काही एक फरक पडणार नाहीये. आता बँकावरचे छापे, जनधन अकाउंटसचा काळा पैसे ठेवण्यासाठी वापर, वर लिहले आहे तसे गरीब व्यक्तीने १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देणे यावरून बरीच लोकं काळे धन पैसे रुपात साठवत होती असे दिसते !

झाडू, तुमचा मुद्दा कळला.
माझा मुद्दा वेगळा होता. तो हा होता की, या निर्णयामुळे भ्रष्टाचार वाढलाय असे नसून असली लोकं कोण्त्याही पक्षानी कसलाही निर्णय घेतला तरी पळवाटा शोधुन पुढे जात रहातात तर दोष सरसकट निर्णयाचा नसतो,
दुर्दैव भ्रष्टाचारी नसलेल्या लोकांच.

सुनिधी, तुम्ही म्हणताय त्यावर मी आधीच लिहिलंय. लोक असं करणार याचा अंदाज सरकारला आधी यायला हवा होता असं माझं मत आहे. तुमचं तसं असायलाच हवं असं नाही.

जर इतकं मोठं ऑपरेशन हाती घेतलंय, ते वेल थॉट, वेल प्लान्ड होतं असं अर्थमंत्री सांगत असतील, तर त्यात अशा पळवाटा (किल्ल्याच्या तटबंदीला हत्ती जाईल इतकी मोठी भगदाडं) राहायला नको होती.

पारु, काळा पैसा नोटांच्या रूपात कोणी ठेवत नाही असं नाही, तर काळा पैसा नोटांच्या प्रमाणात साठवण्याचं प्रमाण खूप कमी आहे असं दिसलं आहे. आयकर खात्याच्या रेड्समध्ये ते सरासरी ६% इतकं आढळलंय.

आताही जो काळा पैसा पकडला जाईल, तो एकंदरित काळ्या पैशाच्या, एकंदर जीडीपीच्या किती असेल यावर (आणि नोटाबंदीच्या डायरेक्ट व इन्डायरेक्ट कॉस्ट्सवर) परिणामकारकता अवलंबून राहील.

को ऑपरेटिव्ह बँकांत जास्त अंदाधुंदी असेल, तर नोटा मागील दाराने बदलून देण्यात प्रायव्हेट बँका मागे आहेत का? सरकारी बँकांतली परिस्थिती वेगळी असेल असं खात्रीने म्हणता येईल का? were there enough checks and balances?

पारु, काळा पैसा नोटांच्या रूपात कोणी ठेवत नाही असं नाही, तर काळा पैसा नोटांच्या प्रमाणात साठवण्याचं प्रमाण खूप कमी आहे असं दिसलं आहे. आयकर खात्याच्या रेड्समध्ये ते सरासरी ६% इतकं आढळलंय.>>>>>+१११११

आमच्या वरच्याच मजल्यावर एक लाचखाऊ कपल रहातं. दोघेही प्रचंड हावरे आहेत. आता रीटायर झालेत. MIDC मध्ये दोघेही नोकरीला होते. मध्यंतरी त्यांच्या ऑफिसमध्ये एक बाई लाचेसकट पकडली गेली, आणी ती नेमकी या जोडप्यातल्या माणसाच्या हाताखाली कामाला होती. आता यांचे धाबे दणाणलेय. पण यांनी खाल्लेला बराच काळा पैसा जमिनी, ट्रॅव्हल बसेस, फ्लॅट मध्ये गुंतवलाय. हे त्यांनी आम्हाला १० वर्षापूर्वी सांगीतले होते, जेव्हा त्यांचे सगळ्यांशी बरे संबंध होते.

तो लाचखाऊ माझ्या सासर्‍यांना त्या बाई विषयी सांगायला आला तेव्हा जाम तंतरला होता. प्रत्येक लाचखाऊची शंभरी कधी न कधी भरणारच असे दिसतयं.

एका क्षणासाठी ग्रउहित धरु लोकांना होणारा त्रास, व्यवसायातले नुक्सान ,बुडालेला रोजगार १००% खोटे आहे.

कुणाला कुठलाच त्रास होत नाहीये, कुणाचे कुठलेच नुकसान झालेले नाहिये

फक्त नोटा चापण्ञाचा १६००० कोटी आणि वितरीत करायचा १००० कोटी खर्च तरी Incometax मधे collect झलाय क?
हे tax collection मिलण्यासाठी किमान ३२००० कोटी black money in form of 500 and 1000 notes expose झाला पाहिजे.
तेही नाही झाले तर फारच घाट्याचा व्यवहार आहे. तसे झाले तर इज्जत वाचली.

As expected ३ लाख कोटी (in form of 500 and 1000)पकडले गेले तर decision was not that bad.

लेख अजिबात पटला नाही.
(त्यातुन तो गुलमोहर-ललित लेखनमध्ये, हे आक्रितही पटले नाही Proud )

फक्त प्रत्येक मुद्द्याचा प्रतिवाद लिहिण्यायेवढा वेळ व ताकद नाही.

>>> साती तुमच्या कडुन अशी पोस्ट अपेक्षित नव्हती . <<<< Lol
(चूकीच्या लोकांकडून) चूकीच्या अपेक्षा करणे ही तुमचीच चुक आहे श्रीजी.... Proud टेकिंग दॅट पोस्ट लाईटली..... अ‍ॅज युजुअल.... !

कोण म्हणतंय भगदाड, पळवाटा राहिल्या आहेत?
<<

त्यातून पळून गेलेले हत्ती दिसताहेत की!. चांगले दांडगे अन मस्तवाल!!

श्री | 16 December, 2016 - 10:16

साती तुमच्या कडुन अशी पोस्ट अपेक्षित नव्हती .

<<

हो.
अशा पोस्टी फक्त श्री, किंवा लिंटी सारख्यांनी टाकायला अलाऊड असतात Wink

>>> श्री, कायैना की आमची अक्कल हज्जारदा काढल्यावर आम्ही अशी एकदा काढली! असो! <<<<

"असो" नाही, असो म्हणून विषय सोडुन जाऊ नका..... Wink
मी तुमचीच काय, कुणाचीही "अक्कल" कधि काढली याचे पुरावे द्या....
(म्हणे हज्जारदा अक्कल काढली.... अहो तशी काढली अस्ती तर "त्या" अक्कलेच्या हजार चिंधड्या नस्त्या का उडल्या? Lol )
अन जर मी काढलीच नाही तुमची "अक्कल" वा तुमची "खोड" तर काहून माझ्या वाटेला जाता? उगाच? करमत नाही म्हणून? का वेळ जात नाही म्हणून? Proud
नाऊ, से सॉरी.....

वाईट वाटलं का तुम्हाला?
संपादित करते!
हाय काय नी नाय काय!
ज्यांनी वाचायचं त्यांचं वाचून झालंय!

Pages