गेला महिनाभर नोटबंदी आणि त्यातून जन्माला आलेल्या विविध अपत्यांचा अभ्यास आपण सगळेच करतोय.
निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य, त्याची अंमलबजावणी चांगली की वाईट, आणि त्याचे पुढील परिणाम कसे होतील यावर प्रचंड आणि दमवून टाकणारी चर्चा झाली आहे. पण नोटबंदी चालू असतानाच, हा निर्णय जे बंद करण्यासाठी घेतला आहे त्यालाच तो प्रोत्साहन देऊ लागलाय हे उघड व्हायला लागलेलं आहे, याचं अगदी भक्त सुद्धा समर्थन करतील. तो म्हणजे भ्रष्टाचार.
नोटबंदी जाहीर केल्यापासून दर दिवसाला सरकार नियम बदलू लागले. पहिला एक आठवडा कुठल्याही व्यक्तीला रोख जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा सगळ्या बँकेत मिळायच्या. यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागायचे. आठवड्याभरातच सरकारनी ते बंद केले कारण "काळा पैसा वाले काही नतद्रष्ट लोक", "भोळ्या भाबड्या गरिबांना" आपले पैसे घेऊन लाईनमध्ये उभे करत आहेत अशा बातम्या उघडकीला आल्या. रेल्वेची तिकिटे जुन्या नोटांनी काढायची परवानगीदेखील लगबगीने मागे घेण्यात आली कारण काही दुष्ट काळा पैसा बाळगणारे लोक जुन्या नोटांनी तिकिटं काढून ती लगेच रद्द करू लागले. परिणामी रेल्वेला नव्या नोटा रिफन्ड करता करता नाकी नऊ आले. गृहिणींच्या खात्यात अडीच लाखापर्यंत कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत या आश्वासनाचे एका आठवड्यातच धमकीत रूपांतर झाले. मग मधेच भारतीय बायकांच्या दागिन्यांच्या खणात डोकावण्याची इच्छादेखील व्यक्त झाली (अम्मांनी जाता जाता कान टोचले म्हणून बरं). त्यानंतर प्रधानमंत्रीजींच्या लाडक्या जनधन खात्यांना तंबी द्यावी लागली आणि आज अखेर तो दिवस आला, जेव्हा भ्रष्टाचार मुक्त अशा खाजगी बँकांवरदेखील छापे टाकण्याची वेळआली. महिनाभर ज्या (कॉपरेटिव्ह बँकांना डिवचून) बँकांचे मोदीजी गुणगान करत होते, त्यांच्याच दारी त्यांना पोलीस पाठवायची वेळ आली.
३५ दिवसांत सरकारने ५१ वेगळे वेगळे नियम तयार केले आणि मोडले. आणि त्यावरून सरकारला चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. अर्थात, या कोलांट्या उड्या सरकारच्या बेसावधपाणामुळेच झाल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी घेतलेल्या एका निर्णयातून, गोरगरिबांनाही भ्रष्टाचार करू नका असं सांगायची जेव्हा वेळ येते, तेव्हा प्रश्न चूक बरोबर या चाकोरीच्या बाहेरून बघितला पाहिजे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना भ्रष्टाचार हा असा साधा सोपा काळा-गोरा विषय वाटतो. काही लोक भ्रष्ट असतात, विशेषतः काँग्रेसमधील जवळपास सगळेच लोक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट लोकांनी साठ वर्षं सत्ता बळकावली आणि भारतात भ्रष्टाचार माजला. तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि साठ वर्षं साठलेली घाण साफ करण्यासाठी थोडी कळ सहन केली पाहिजे. आणि बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपण देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा छोटासा त्याग करतोय.
पण या अशा लिनियर विचारसरणीचा एक फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा विचार करून त्यात समाधान मानताना आपण एका खूप मोठ्या धडधडीत वास्तवाकडे पाठ फिरवतोय. ते म्हणजे आपण सगळेच भ्रष्ट आहोत. पुढे जाऊन असं देखील म्हणता येईल की हिंदी सिनेमासारखी भ्रष्ट आणि इमानदार असे दोन गटदेखील नसतात. आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. भ्रष्टाचार कधी घडतो? एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते. आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या इमानदार व्यक्तीला सत्ता मिळते, जी टिकवण्यासाठी तिला आजूबाजूच्या दहा भ्रष्ट व्यक्तींच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करावा लागतो. दोन देवाणघेवाण करणाऱ्या माणसांना एकाच सोयीच्या मार्गाने कर बुडवता येतो (रोकड देऊन) तेव्हा भ्रष्टाचार घडतो. किंवा निकाल काय लावायचा आहे हे आधीच ठरवून जेव्हा एखादा अभ्यास किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तिथे भ्रष्टाचार घडतो.
जेव्हा आपण सत्ता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, कडक स्टार्च केलेला कुडता, जॅकेट घालून लाल दिव्याच्या गाडीतून चाललेला राजकारणी डोळ्यासमोर येतो. पण नोटबंदी करून मोदींनी जनधन खाती बाळगणाऱ्या गरिबांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देऊन टाकली. जी व्यक्ती कर भरण्यास आजन्म पात्र नव्हती, जिला घाई गडबडीत कुठल्यातरी पुढच्या सोयीसाठी बँकेत खाते उघडावे लागले, आणि ते खाते चालू अवस्थेत ठेवण्यासाठी लागणारा पैसादेखील त्या व्यक्तीच्या हातात नाही, अशा व्यक्तींना आहेत ते पैसे खात्यावर जमा करायला भाग पाडून मोदींनी त्यांच्या हाती कधीही नसलेली सत्ता त्यांना मिळवून दिली. आणि अर्थातच भ्रष्टाचार घडण्यासारखी स्थिती निर्माण करून दिली.
जेव्हा एखादी गरीब व्यक्ती १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देते, तेव्हा त्या गुन्ह्याचे समर्थन करायला तिच्याकडे कित्येक भावनिक कारणे असतात. पण सगळ्यात महत्वाचे कारण हे असते की आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. आणि जनधन खात्यांपासून ते २ जी पर्यंत सगळ्या पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला या एकाच मानसिकतेतून बघता येते. भ्रष्टाचार करण्यासारख्या परिस्थितीत आल्यावर भ्रष्टाचार न करणे अवघड असते. आणि मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील.
लेख आवडला ..... खरच सर्वांनी
लेख आवडला .....
खरच सर्वांनी विचार केला पाहिजे.
पु.ले.शु.........
छान लेख आहे. आपण सगळेच कधी
छान लेख आहे.
आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील. >>>>> खूप कमी लोक कबूल करतील पण मला पटले.
वेलकम टु द क्लब! <<आपण सगळेच
वेलकम टु द क्लब!
<<आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील. >>>>>
सहमत!
@ साती कुठला क्लब?
@ साती
कुठला क्लब?
सई, कुठल्याही पक्षभक्तीचे
सई,
कुठल्याही पक्षभक्तीचे झापड न लावता जे चुकलंय ते चुकलंय आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे सांगता येणार्यांचा क्लब!
शेवटचा पॅरा आवडला.
शेवटचा पॅरा आवडला.
भ्रष्टाचार परिस्थितीवर अवलंबुन आहे हे मान्य पण अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करता येते का किंवा केली जाते का?
छान लेख आहे.
छान लेख आहे.
लेख आवडला पण सरकारला
लेख आवडला पण सरकारला भ्र्ष्टाचार दिसत नव्हता का ? सोन्याचे शर्ट घालून, फोटो काढून ( काय पण हौस म्हणा, लाज सुद्धा झाकली नसे त्याने ) लावलेले फ्लेक्स दिसत नव्हते का ?
गेल्या कित्येक वर्षात संगीताचे फारसे काम न मिळालेला बप्पी लाहिरी अंगभर सोन्याचे दागिने घालून अगदी विमानतळावरही मिरवतो ( मी बघितलाय ) झाली का त्याची चौकशी ?
सई, कुठल्याही पक्षभक्तीचे
सई,
कुठल्याही पक्षभक्तीचे झापड न लावता जे चुकलंय ते चुकलंय आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे सांगता येणार्यांचा क्लब!
>>>>>>
ह्या क्लबात तुम्ही आहात ??
सकाळी सकाळी लईच करमणूक झाली !
सई, चांगला आहे लेख.
कुठला क्लब? > अहो त्यांनी
कुठला क्लब? > अहो त्यांनी २०१४ साली मोदींवर टीका करण्यासाठी एक क्लब काढलाय , मायबोलीवरचे बरेच दिग्गज त्याचे सभासद आहेत
सई, लेख आवडला पण तो
सई, लेख आवडला पण तो सगळ्यांनाच आवडलेला पॅरा खूप आवडला.
पराग, मलाही खूप हसू आलं पण म्हंटलं जाऊदेत.
लेख सेन्सिबल आहे! पराग, मला
लेख सेन्सिबल आहे!
पराग, मला काय आठवले माहीत आहे का?
ते बिग बॉसमध्ये वाइल्डकार्ड एंट्री आल्यावर लगेच झडप घालून आपल्या कंपूत ओढण्याची धडपड चालते ना?.... अगदी सेम तस्सेच!
आणि इतक्या सोप्या मार्गाने
आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते.
हे असे जगातल्या सगळ्यांनाच लागू पडते.
भारतातच असे होते असे नव्हे.
एकूणच मानवी कायदे हे मानवांचेच दुर्गुण कमी करण्यात असमर्थ ठरतात. या सरकारने कायदे केले म्हणून काय किंवा त्या सरकारने केले म्हणून काय?
ह्या सगळ्याला भारतात राहाताना
ह्या सगळ्याला भारतात राहाताना जी मानसिकता तयार झाली आहे ती कारणीभुत आहे. लोकाना लाचखाउ किंवा कर न भरणार्या धनाढ्य व्यक्तीचे दोन अडीच लाख रुपये पांढरे करुन द्यायला काहीच वाटत नाही. पण तोच माणुस केतीही गरिब असेल तरी चोराचे (लोकाचा वस्तु चोरणारा , दरोडेखोर चोर, कर चोरणारा न्हवे) पैसे पाढरे करुन देणार नाही.
आपल्यासाखी माणसे पण जर सोनार पक्की पावती न देता चार पैसे कमी घेणार असेल तर आपण पण कच्ची पावतीच घेतो. आणि हे जवळजवळ १००% लोक करतात.
आपल्या आजुबाजुला जर भ्रष्ट सरकारी व्यक्ती राहात असेल किंवा भ्रष्टाचार होत असेल तर किती जण पोलीसात तक्रार करतो.
आपल्या देशात पगारदारआणि मोठे कोरपोरेट ( TCS, Infosys, सारखे) सोडुन किती जण कर भरतात
कार चे ईजिन दुरुस्त करणे सोपे असते आणि माणसाचे हार्ट बायपास सर्जरी अवघड असते कारण कार चे एजिन बंद करुन काम करु शकतो पण माणसाचे हार्ट बंद करुन सर्जरी करता येत नाही. त्याचप्रमाणे नोटबंदी मध्ये financial system बंद करता येत नाही कारण तिच system सामन्य माणुस पण वापरत असतो. जिथे जिथे लोकाचा सोई साठी जुन्या नोटा स्विकारायचे ठरवले तिथे तिथे काळा बाजार करणार्या लोकानी दुरुपयोग करुन घेतला. नोटबंदीचा निर्णय झाल्यावर लोकानी विमानतळावर , रेलेवे स्थानकावर रांगा लाउन नको असलेली तिकिटे काढली, सरकार ला ५००/२००० नोटा पुरतिल असे वाटत असताना लोकानी मागच्या दारानी हजारो कोटी रुपयाची कॅश गायब केली. बदली करण्याचे काम RBI च्या नियंत्रण असल्यला बॅकेत असल्याने हे सर्व बाहेर येईल पण ह्यात भरपुर लोक असल्याने सगळ्या गोष्टी बाहेर येईपर्य त बराच वेळ लागेल. ह्यावरुन आपल्या देशात कर न भरण्याची प्रव्रुती/ भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे लक्षात येईल. मला स्वताला ह्यावर विश्वास बसत नाही आहे.
अरारा, एव्हढी वाईट परिस्थिती
अरारा, एव्हढी वाईट परिस्थिती आहे, फक्त भारतातच?
सगळेच भ्रष्टाचारी, कायदे मोडणारे, वेळेवर न येणारे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणारे? सगळेच? फक्त भारतात?
हो बरोबर. हे फक्त भारतातच
हो बरोबर. हे फक्त भारतातच नाही तर जगभर लागू आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत गरीबही भ्रष्टाचारात सामील होऊ लागल्याने सरकारची थोडी पंचाईत झाल्यासारखी वाटते. दुसरं म्हणजे, सरकार ने काही ठराविक रक्कम काळा पैसा म्हणून बँकेत परत येणारच नाही असं समजून काही हिशोब आधीच करून ठेवल्यासारखे वाटत आहेत. त्या हिशोबाचीदेखील वाट लागताना दिसते आहे.
नैतिकतेच्या मुलाम्याखाली सरकार पुन्हा पुन्हा लोकांना विविध मार्गाने बँकेत पैसे भरू नका असेच सांगताना दिसते आहे. नाहीतर कुठल्याही सुद्न्य सरकारने कारवाईच्या धमक्या न देता लोकांना पैसे भरू दिले असते आणि मुदत संपल्यावर चुपचाप करायची त्यांच्यावर कारवाई केली असती. दुसरी अतिशय खटकणारी गोष्ट अशी आहे की आता बँकांवर टाकलेल्या छाप्यांची प्रसिद्धी करून सरकार लोकांचा बँकांवरचा विश्वासदेखील कमकुवत करीत आहे.
हे ऑपरेशन कसं करावं किंवा करायला हवं होतं याचं इथे बसून विच्छेदन करणं जरी सोपं असलं, तरी मला असं वाटत की काही गोष्टी गोपनीय ठेऊन करता येऊ शकत होत्या. लोकांचा पैशावरचा आणि बँकांवरचा विश्वास उडणे हे अर्थव्यवस्थेला फारसे लाभणार नाही.
सई, लेख चांगला आहे पण
सई, लेख चांगला आहे पण मायबोलीवर इतके लेख ह्या संदर्भात लिहिले गेलेत ते वाचून आणि सगळीकडे चाललेलं तेच ते दळण वाचून आता कंटाळा आलाय.
सातीताईंचा क्लब जॉईन करू नका. त्यांचा क्लब म्हणजे टाईम शेअर विकत घ्यायला लावायला कसं एकदम ग्लोरिअस पिक्चर तयार करून तुम्हांला विकतात आणि तुम्ही त्याला बळी पडता आणि मग त्यातच अडकता, तसं आहे ते. पक्षभक्तीचं झापड न लावणारे वगैरे एकदम झूठ आहे.
विसु- मायबोलीवर असा निष्पक्ष क्लब वगैरे नाही तेव्हा त्या फंदात पडू नका.
कुठल्याही पक्षभक्तीचे झापड न
कुठल्याही पक्षभक्तीचे झापड न लावता जे चुकलंय ते चुकलंय आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे सांगता येणार्यांचा क्लब!>>
Can you tell us the right things done by this govt. ?
Also tell us what wrong has been done by previous govt.
सई, गोपनीयता ठेवून काही
सई,
गोपनीयता ठेवून काही गोष्टी करता आल्या असत्या हे पटत नाही. खरे तर नव्या नोटा तयार ठेवणे हे गुप्तपणे करताच आले नसते. आणि तेच करता येत नसेल तर बाकी गोष्टी गुप्तपणे करून तरी काय उपयोग?
नोट प्रेसमध्ये एक नवी नोट छापली गेली की बातमी दोन तासात देशाला कळेल अशी अवस्था आहे. ती नॉट छापली जाण्याअगोदर त्यासाठीची जी काही टेक्निकल तयारी असेल तीसुद्धा व्हायरल झाली असती. त्यामुळेच पाचशेची नवी नोट आधीच छापणे अशक्य होते. मूळ हेतूलाच सुरुंग लागला असता. दोन हजारची नोट छापणे शक्य होते पण ती नोट घेऊन सामान्य माणूस खरेदी करू शकणार नाही अशी अवस्था काही काळ राहणारच होती. (आता दोन हजाराचे सुट्टे अनेक ठिकाणी दिले जात आहेत).
ह्याशिवाय, गोपनीयता बाळगणे ही एक पॉलिसी होती. आज कोट्यावधींची नोटांच्या अभावाने अडचण होत आहे. पण त्याचवेळी भारती विद्यापीठासारख्या संस्थेत पुढील काही महिन्यांचे पगार आगाऊ रोखीत वाटण्यात आले. अल्टिमेटली हे पैसे सिस्टीममध्ये येणार. त्याचा कर शासनाला मिळणार.
सई, चांगला लेख. हिंदी
सई, चांगला लेख. हिंदी सिनेमावाला पॅरा व शेवटचा पॅरा खासकरून आवडले. बाकी तुम्ही नोटाबंदी व भ्रष्टाचारावर लिहिले असले, तरी बाकी मुद्दे इथे येतीलच, ह्याची खात्री बाळगा.
----Can you tell ua the right
----Can you tell ua the right things done by this govt ??? ----
Not a single thing, including accepting invitation from President to form a Govt without giving a white paper on Economic condition of Country that time.
----Also tell us what wrong has been done by previous Govt ----
Not a single thing, in all their previous govt.
:g
हे ऑपरेशन कसं करावं किंवा
हे ऑपरेशन कसं करावं किंवा करायला हवं होतं याचं इथे बसून विच्छेदन करणं जरी सोपं असलं, तरी मला असं वाटत की काही गोष्टी गोपनीय ठेऊन करता येऊ शकत होत्या. लोकांचा पैशावरचा आणि बँकांवरचा विश्वास उडणे हे अर्थव्यवस्थेला फारसे लाभणार नाही. >> सई, तुम्ही हे प्रतिसादांत म्हणालात, म्हणून म्हणतो. अगदी ज्यांची अन्नान्नदशा असते, त्यांना तात्पुरते फूड स्टँप्स, त्यांच्यासाठी लंगर, अशी व्यवस्था करता आली असती. मोठा प्रकल्प झाला असता, तरी राजकीय इच्छाशक्ती असेल तर सरकारच्या यंत्रणेला हे अशक्यप्राय वाटत नाही. नोटाबंदीसारखा मोठा व इर्रिव्हर्सिबल निर्णय घेताना इतर इम्प्लीमेन्टेशनच्या बाबतीत कल्पनाशक्ती व निर्णयशक्ती कमी पडली.
>>. नोटाबंदीसारखा मोठा व
>>. नोटाबंदीसारखा मोठा व इर्रिव्हर्सिबल निर्णय घेताना इतर इम्प्लीमेन्टेशनच्या बाबतीत कल्पनाशक्ती व निर्णयशक्ती कमी पडली.>> सहमत.
अरे अरे , सईंचा धागा आहे,
अरे अरे ,
सईंचा धागा आहे, माझी कोडकौतुके बास झाली!
तरीपण धन्यवाद हं सगळ्यांना!
सई, लेख नीट समजला नाही. आपण
सई, लेख नीट समजला नाही.
आपण सगळेच भ्रष्ट आहोत हे ओव्हरली अपोलोजेटिक जनरलायझेशन वाटले. भ्रष्ट लोकांना व त्यांच्याकडून अडवणूक केली गेल्याने केवळ त्यात सामील होणार्या दोघांना एकाच पातळीवर आणून बसवल्यासारखे.
अॅक्टिव्ह भ्रष्टाचार करणारे प्रामुख्याने दोषी आहेत - जे स्वतःचे काम करायला पैसे मागतात, स्वतःच्या मोबदल्यातील काही/सर्व पैसे पावतीवर न आणता इतर मार्गांनी मागतात असे, किंवा जे स्वतःचे काम करून घ्यायला पैसे घ्या पण आमचे काम करा असे म्हणतात ते. त्यातून अडवणूक झाल्यावर नाईलाजाने जे ते करतात ते "तात्त्विक" पातळीवर दोषी आहेत पण यातील पहिला वर्ग नाहीसा झाला तर दुसरा आपोआप होईल.
असे हजारो लाखो आहेत जे आपले काम करून घ्यायला किंवा कोणाचे काम करून द्यायला कायदाबाह्य मार्गाने पैसे मागत्/देत नाहीत. त्यांना उगाच कशाला यात आणायचे?
आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. >>> यातील प्रॅक्टिकली काय होईल याबद्दलच्या मुद्द्याशी सहमत आहे, पण त्यात एक जरा "गरीब बिचारे" टोन दिसला, तो अनावश्यक आहे. इथे गरीब म्हणजे ज्यांचे खायचे वांदे आहेत अशांबद्दल नाही. गरीब ही एक मोठी वाइड रेंज आहे. त्यात अगदी लोअर मिडल क्लास पासून बरेच येतात. त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कणवपूर्ण भूमिका अनावश्यक आहे.
पराग, नताशा, सायो, बेफी,
पराग, नताशा, सायो, बेफी, स्वरुप, मिंलिंद, श्री
+१००००००००
चांगलं लिहिलय सई. कुठल्याही
चांगलं लिहिलय सई.
कुठल्याही पक्षभक्तीचे झापड न लावता जे चुकलंय ते चुकलंय आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे हे सांगता येणार्यांचा क्लब!>>>>>>
स्वतःच कल्ब निर्माण करायचे, स्वतःच तो क्ल्ब कसा आजिबात पक्षपात वगैरे करत नाही असं दररोज एक मेकांना म्हणायचं आणि ते झालं की त्यावर कळस म्हणून एखाद्या खरच जरा बॅलन्सड लिहिलेलं असलं की त्याला वेलकम टू द क्ल्ब म्हणून आधी आपण आणि आपला क्ल्ब किती भारी ह्याची पावती देऊन टाकायची (स्वतःलाच). कमाल मैंटॅलिटी आहे!
)
खरं तर तुम्ही क्ल्ब वाले मोदींविरोधात काही चांगले मुद्दे उपस्थित पण करता, पण समोरच्यानी पण थोडी बाजू घेतली मोदींची किंवा काही प्रश्न विचारले की तुमचं पित्तं खवळतं. कारण तुम्हाला काही नीट जाणून घेण्यापेक्षा किंवा नीट चर्चा करण्यापेक्षा काय महत्वाचं असेल तर ते म्हणजे "आम्ही बोलतो ते किती योग्य आणि हुशारीचे आहे" येवढच. तुम्ही चर्चेत उतरतानाच समोरच्या माणसाला काही अक्कल नाही हे गृहित धरून उतरता.
हे काँग्रेसची बाजू घेणं काय किंवा मुद्दाम ट्रंपुले, हॅपी ट्रंपिंग वगैरे सारखी पोरकट विधानं ही फक्त विरोधा करता विरोध अन चर्चे करता चर्चा करुन फक्त पौष्टिक बाहुल्या नाचवत ठेवून आपण स्वतः काहीतरी खुप भारी आहोत (खरं तर वेळ जात नसतो) हे प्रुव करत बसायचं (कोणाला? देव जाणे कोणाला.
आपण सगळेच भ्रष्ट आहोत हे ओव्हरली अपोलोजेटिक जनरलायझेशन वाटले. भ्रष्ट लोकांना व त्यांच्याकडून अडवणूक केली गेल्याने केवळ त्यात सामील होणार्या दोघांना एकाच पातळीवर आणून बसवल्यासारखे.>>>>>> हा पण एक महत्चाचा मुद्दा मांडलाय ह्यात फा. खुप भ्रष्टाचार करणारे लोकं, ही एक कॅटेगरी आहे (ज्यांच्या कडे खुप पैसा सुद्धा आहे) आणि मग इतर ज्यांच्याकडे पैसा नाही पण स्वतःची आर्थिक परिस्थिती आणि सरकार नी निर्माण केलेली परिस्थिती ह्याला अनुसरुन मग लहान सहान भ्रष्टाचार होतो, जो बर्यापैकी मेंटॅलिटीचा भाग आहे, त्याबद्दल सुद्धा लिहिलय. आपली बरीच जनता ह्या दुसर्या कॅटेगरीत पडते आणि हे छोट्या छोट्या भ्रष्टाचारांची सम टोटल खुप मोठी होऊ लागते.
जो भ्रष्टाचार पार
जो भ्रष्टाचार पार तळागाळापासून अगदी वरपर्यंत पोसला गेला आहे गेल्या ५० वर्षांत, तो असा महिन्याभरात नाहीसा व्हावा असं म्हणता? धन्य आहे.
अहो, घरात एखाद्या वस्तूची जागा बदलली तर दहा वेळेला आपला हात आधीच्या जागी जातो. त्याचा सराव व्हायला वेळ लागतो. इथे १३० कोटी लोकांच्या सवयी बदलायच्या आहेत. भ्रष्टाचाराची सवय असलेले तो करणारच! पण कॅशलेस इकॉनॉमी जस जशी वाढत जाईल तसा तो आपोआप कमी होईल. म्हणजे मागणार्यांनी लाच मागितली तरी देणार्याकडे कॅशच नसेल, तो म्हणेल देतो पण चेकघ्या. एकदा का व्यवहार बॅकेत घेला की त्याच्या पाऊलखूणा राहातात. हे सगळं घडायला वेळ द्यायला हवा.
भ्रष्टाचाराला आळा घालणे हे ह्या नोट्बंदीचं पहिलं उद्देश्य नसून ते याचं बाय प्रॉड्क्ट आहे.
त्याची मेन उद्दीष्टं वगैरे कळायला अनिल बोकील यांची सर्वात पहिली मुलाखत माझा कट्टा वरची लक्ष देऊन ऐका, विचार करा. असो. गुडलक!
बोकिल नंतरच्या मुलाखतीत तर
बोकिल नंतरच्या मुलाखतीत तर सरकार वर टीका करतोय. जे सांगितले ते केलेच नाही जे सरकारला सोईस्कर होते तेवढेच केले.
पहिली बरोबर बाकीच्या सुध्दा बघा. अपेक्षाभंग झाल्यानंतर माणूस खरे बोलतो. असे म्हणतात.
त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत
त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कणवपूर्ण भूमिका अनावश्यक आहे ----+१
इथे १३० कोटी लोकांच्या सवयी बदलायच्या आहेत. ----- +१
रोकड हातात ठेवणे, पैसा-अडका लपवून ठेवणं ह्या सवयी सामान्य लोकांच्या शतकभरापेक्षा अधिक काळ व्यतित केलेल्या पारतंत्र्यामुळे झालेल्या असाव्यात.
Pages