निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

G.Anurag, मस्त फोटो.

आजच्या लोकसत्तामधील जागूचा लेख वाचा.त्यातील खंड्याच्या ओऴखीच्या छायाचित्रा पाहिल्यानंतर लेखिकेचे नाव पाहिले.
जागू, नशीबवान आहेस ग!इतका सुंदर परिसर तुला लाभलाय.पण त्याहीपेक्षा तुझी तरलता जास्त भावली.कीप इट अप.
तुझ्याबरोबर तुमच्या बागेची सफर घडवून आणलीस.

लेख वाचला..
सुंदर लिहिलायस जागू..
जिप्सीने लक्षात आणून दिलं शीर्षकाबद्दल.. लळा आगला असा की इथे लागला असं हवं होत ते..

इतके दिवस मला क्रोममध्ये जाता येत नव्हतं आणि त्यामुळे फोटो पण बघता येत नव्हते. आता पाहिले! काय मस्त मेजवानी आहे इथे!

गौरी, सुस्वागतम !
असता कुठे हल्ली? खूप दिवसांनी आलात ना? आता नियमित या बरं आणि फोटो घेऊनच या. Happy

शोभा, भरपूर भटकंती केली आहे एवढ्यातच. खूप गंमती इथे सांगायच्यात, फोटो टाकायचे आहेत. Happy
नुकतीच गोव्याला जाऊन आले. तिथे हे झाड पाहिलं ...


साधारण बोराएवढी आहेत ही फळं. काय असेल हे?

या वर्षी मी पण लेकीला, तिच्या मैत्रिणीला सोबत घेऊन थोडे सीड बॉल्स तयार केले आहेत. पण मग वाटलं, हे कुठेतरी टाकून त्या बिया रुजतील अशी आशा धरण्यापेक्षा घरीच रुजवावे, रोपं तयार करावी, ती वर्षभराची झाली, की मग टेकडीवर लावावीत. कारवी, गुंज, सोनसावर, बाळहिरडा, बहावा अशा बिया / सीड बॉल्स आहेत.

भरपूर भटकंती केली आहे एवढ्यातच. खूप गंमती इथे सांगायच्यात, फोटो टाकायचे आहेत>>>>>>>>.व्वा! आम्हाला मेजवानी आहे तर! Happy
ते फळ छानच दिसतय. नाव जाणकार सांगतीलच. Happy

बिया रुजतील अशी आशा धरण्यापेक्षा घरीच रुजवावे, रोपं तयार करावी, ती वर्षभराची झाली, की मग टेकडीवर लावावीत. >>ब्रावो.. मस्तच विचार गौरी..

हॅलो ऑल...
जागू नवा धागा काढ गो..

मस्त फोटो सारेच... Happy

मी आज मैत्रीणीकडून गोकर्णीचा वेल, निशिगंध आनि एक ओव्याचं रोप घेऊन आलीए Happy

IMG-20170724-WA0014.jpgआमच्या बागेतील जास्वंद...

Pages