सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
मस्त फोटो!
मस्त फोटो!
आईच्या घरासमोरचा कदंब आत्ता फुललाय! दर वर्षी पावसाळ्यात, अगदी पाऊस लागून राहिलेला असतांना -जेंव्हा आपण छत्री घेऊन चालत असतो, आणि मान वर करून त्याच्याकडे बघायचं राहून जातं - तेंव्हा फुलतो तो. या वर्षी इतक्या लवकर कसा फुलला असेल?
गौरी, हे सगळे उन्हाळा कडक
गौरी, हे सगळे उन्हाळा कडक असायचे संकेत तर नसतील ? कदंब आणि पावसाळा हे अगदी समीकरण होते आतापर्यंत !
व्वा! सुंदर फोटो. निळे
व्वा! सुंदर फोटो. निळे छोटुले पक्षी तर मस्तच!
दिनेशदा, निसर्गचक्रातलं
दिनेशदा, निसर्गचक्रातलं काहीतरी बदलतंय असं वाटतंय. गेल्या आठवड्यात रस्त्यात मेलेले बेडूक पण दिसले. पाऊस होईपर्यंत तेही बाहेर पडत नाहीत ना?
अरेरे गौरी...
अरेरे गौरी...
निसर्गचक्र गंडलय आणि आपण सढळ हस्ताने ते तसे होण्याकरता हातभार लावलाय हे पन आहेच...
अरे कुणी काही शेअर करत जा रे इथपण... पार अमावस्या पोर्णिमेला येतो हा धागा वर..
संत्री मला भरपूर आवडतात..
संत्री मला भरपूर आवडतात..
एकदा खायला म्हणुन घेऊन आली तेव्हा त्यातुन जवळपास ३७ मोठ्ठाल्या बिया निघाल्या.. टम्म फुगलेल्या त्या हेल्दी बिया मी जमा करुन वाळवल्या.
कशा रुजवाव्या ह्या विचारात असताना भरत गोडांबेने ही आयडीया सांगितली.. त्याच्या म्हणण्याप्रमाणे असे सॅपलिंग्स तयार करुन मग ते वेगवेगळे रुजवून वाढवता येतील...अथवा अशीच जर ठेवली तरी त्याचा अरोमा खोलीत आल्हाददायक वातावरण तयार करतो.
मीपन मग असच करुया यावर शिक्कामोर्तब केलं..
पण सगळीच अॅडजेस्टमेंट होती..
कुठल्याही कपाला तिलांजली मला द्यायची नव्हती..हरेकाच्या वेगळ्या आठवणी..एखादा कप तुटला फुटलापन नव्हता..
मग पार्सल म्हणुन आलेला प्लॅस्टीकचा डब्बा घेतला.
त्याला खालून मोठी जाड सुई गरम करुन पाच छिद्र पाडले.
जुन्या जिन्सला कापुन त्याला त्या डब्ब्याभोवती गुंडाळून जवळ तयार असलेली सॅटीनची फुले लावली.
खाली ग्राउंड क्लिअरन्स करीता आयस्क्रिमच्या काड्यांचा स्टँड तयार केला आणि ग्लु गन च्या साह्याने त्याखाली फिक्स केला.
सर्वात तळाशी नारळाचा बुरा, मग माती, बिया आणि वर परत माती अशी भरली.. घरात असलेला सुकुन पडून असलेल्या गोडलिंबाच्या पाल्याला कुस्करुन मातीत मिसळून तोपन टाकला.
चित्रात दिल्याप्रमाणे त्यात सिटू/पेबल्स मात्र अजुन मी टाकले नाही... रोप आल्यावए बघु टाकायचे कि नाही ते..
अब बस इंतजार..
हि जालावरील कल्पना..

.
.


प्रचि मोबाईल मधले असल्याने जरा स्पष्ट करायचे प्रयत्न केले आहे..
प्राथमिक तयारी..
.
.
आणि ह्या बिया.. जालावरील चित्रात भरपूर बिया पेरलेल्या दिसताहेत पण मी मात्र हात आखडता घेतलाय यात.. न जाणो दाटी होउन एक ना धड भाराभार चिंध्या व्हायच्या...
.
टीना, भारी! तुझ्या कल्पकतेला
टीना, भारी! तुझ्या कल्पकतेला सलाम!
मक्याच्या कसात कधी कधी रंगीत
मक्याच्या कसात कधी कधी रंगीत दाणे दिसतात. जनुकिय बदलांमूळे असे होते ( ते नेमके कसे होते ते टिना समजाऊन सांगणार आहे. माझ्यातर्फे फक्त फोटो )
मस्त फोटो दिदा...
मस्त फोटो दिदा...
मी..
कस्काय वर भरत ने सांगितल्याप्रमाणे हा बदल जम्पिंग जिन्स (Jumping Genes) मुळे होतो..
आईच्या घरासमोरचा कदंब आत्ता
आईच्या घरासमोरचा कदंब आत्ता फुललाय! दर वर्षी पावसाळ्यात, अगदी पाऊस लागून राहिलेला असतांना -जेंव्हा आपण छत्री घेऊन चालत असतो, आणि मान वर करून त्याच्याकडे बघायचं राहून जातं - तेंव्हा फुलतो तो. या वर्षी इतक्या लवकर कसा फुलला असेल?>>>>> मुंबईतसुद्धा फुलला आहे.
सुसंध्या निगकर!
सुसंध्या निगकर!

बकुळ चर्चा मस्तच...
बकुळ चर्चा मस्तच...
आमच्या सोसायटीत बहरलेलं बकुळ...:)
शोभा, कसली टप्पोरी फुलं आहेत.
शोभा, कसली टप्पोरी फुलं आहेत... आ हा हा!
कांपो, मस्त टिपलाय, तांबट आहे का?
टीना, मस्तच ग , आता रोप उगवलीत की परत प्र.ची दे ईकडे..
दा, मक्याचे कॉंबीनेशन मस्त मोत्या सारखे..
थँक्यु साय.. बकुळीची फुलं आणि
थँक्यु साय.. बकुळीची फुलं आणि हार्/गजरा मस्तच..
शोभा, फुले छान्च..
केपी, तांबट ...खूप सुरेख.
केपी, तांबट ...खूप सुरेख.
मक्याचे कणीस,मोगरा,बकुळफुले सुंदर
टीना छान कल्पना
टिनिमिनि..सुपर्ब आयडिया
टिनिमिनि..सुपर्ब आयडिया केलीयेस.. मस्त अरोमॅटिक होणारे तुझी खोली..
सर्व फोटो सुंदर.. शोभाच्या मोगर्याचा वास इथपर्यन्त आला...
कांपो, मस्त टिपलाय, तांबट आहे
कांपो, मस्त टिपलाय, तांबट आहे का?>> धन्यवाद लोकहो. हो पांढर्या गालाचा तांबट.
आधी मोगरा व नंतर बकुळ हाय!! दोन्ही अशक्य आवडीची फुले.
टिना बिया उगवल्या तर सांग गं.
टिना बिया उगवल्या तर सांग गं. मी आत्तापर्यंत बरेचदा लिंबाच्या आणि संत्र्याच्या बिया पेरल्यात. लिंबाची ३ - ४ झाड आलीत. आता चांगली २ - ३ फुट उंचही झालीत. पण संत्र्याच्या बिया काही रुजल्या नाहीत. मी बिया न वाळवता तशाच पेरत होते म्हणुन असेल कदाचित. तु वाळवुन लावल्यात म्हणुन म्ह्टल की उगवल्या तर सांग. म्हणजे मी पण पुन्हा लावुन पाहिन.
शोभाताई हा माझा झब्बु . . .
शोभाताई हा माझा झब्बु




.
.
.
हे सकाळी टिपलेले कमळ!
हे सकाळी टिपलेले कमळ!

लाल कमळ!
हे श्वेत कमळ!
स्निग्धाताई, झब्बू मस्तच .
स्निग्धाताई, झब्बू मस्तच . फोटो पण छान काढलेत हो. माझ्यासारखे नाही.

कृष्णा, काय सुरेख आहेत कमळं. टवटवीत. कुठे भेटली?
सर्व फोटो छान!
सर्व फोटो छान!
निळा पक्षी आवडला.
सुंदर कमळं !
सुंदर कमळं !
कुठे दिसली म्हणा. भेटली काय?
कुठे दिसली म्हणा. भेटली काय? तो चिनुक्ष रागवेल हं.
कुठे दिसली म्हणा. >>>>>>>>>>
कुठे दिसली म्हणा. >>>>>>>>>>.ते तर आपण नेहमीच म्हणतो. यांना तुम्ही भेटून त्यांचे फोटो घेतलेत ना? म्हणून कुठे भेटली विचारलं.
कमळच कमळ.. भारी..
कमळच कमळ.. भारी..
हे मी एम्रेस मधे गेलेली तेव्हा काढलेला फोटो.. कमळविरहित कमळ..
कृष्णा, काय सुरेख आहेत कमळं.
कृष्णा, काय सुरेख आहेत कमळं. टवटवीत. कुठे भेटली?>>>
इथेच सकाळी फिरायला जातो एका पार्कात तिथे भेटले!
स्निग्धा, कृष्णा मस्त फोटु...
स्निग्धा, कृष्णा मस्त फोटु...
कमळविरहित कमळ..++टीना कमळाची पानं बघायला पण खुप छान वाटतं हं..
या धाग्याच्या मागच्या एका
या धाग्याच्या मागच्या एका भागात खास लोणच्यासाठी वापरल्या जाणार्या आंब्याच्या एका कलमी जातीवर चर्चा झाली होती. मला आठवते त्याप्रमाणे 'करेल' किंवा 'फर्नेल' असे काहीसे नाव होते त्या जातीचे. हे आंबे अलीकडे मिळतात का? कुठे मिळतात? कसे ओळखायचे?
टीना, किती मस्त केलं आहेस .
टीना, किती मस्त केलं आहेस .
<
मोगरा, बकुळी आणि कमळं सगळेच फोटो सुंदर .
मध्यंतरी गावाला गेले होते , घरचा चाफा
Pages