निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, आहेस कुठे?
पेट्रिया हा तुझा भुभु का? (होता?)>>>>>>>>>अर्रा रा रा रा. वाटच लावली हिने तर! काय ग हे मानुषी? Lol

शोभा ..............अगं मी इथेच आहे. बघ ना खूप दिवसात इकडे माबोवर आले नाही तर टिनाच्या वेलीची वाट लावली. घोर अज्ञान!

परत पाने कधी येतील आणि कुठून? शेंडाच तोडला ना त्याचा >> नव्या फांद्या फुटतील वेलीला. काळजी करु नकोस. Apical dominance असे गूगल करुन पहा. .
कोलियस, तुळस, बेसिल यांचे शेंडे खुडले की रोप जास्त गच्च भरुन येते . Pinching young plants असे शोध.

अलिकडेच पिंटरेस्ट वर कुंडीमधे रोपाच्या भोवती प्लास्टिक फोर्क्स त्याचे काटे वर रहातील असे खोचलेले पाहिले. मांजरींचा उपद्रव कमी होतो म्हणे . करुन पहा हा उपाय आणि भारतातल्या मांजरींना पण लागू पडतो का ते सांग.

अलिकडेच पिंटरेस्ट वर कुंडीमधे रोपाच्या भोवती प्लास्टिक फोर्क्स त्याचे काटे वर रहातील असे खोचलेले पाहिले. मांजरींचा उपद्रव कमी होतो म्हणे . करुन पहा हा उपाय आणि भारतातल्या मांजरींना पण लागू पडतो का ते सांग.>> करुन बघते मेधा..

मानुषीची पोस्ट मस्त आहे.
कुंडीतल्या लिंबाच्या झाडाची पाने, साळुंक्या खाताना पाहिल्या.पहिल्यांदा वाटले काहीतरी मातीतील अळी वगैरे खात असतील्,पण नंतर पाहिले तर पानी तोडून खात होत्या.ह्यावेळी बरीच झाडे आणली गेली.आता जागाच नाही तर दाटीवाटीने ठेवलीत.पण झाडांमुळे की काय माहित नाही पण २ दिवस लालबुड्या बुलबुल येतोय.मस्त वाटतेय.नाहीतर कबुतरे ठरलेली.

जागू, सुंदर फोटो.
जागू, आज, आत्ता ताबडतोब, एक इमेल पाठवलेय. बघतेस का ? Happy

हा आमच्या गॅलरीतला मोगरा. काही केल्या फुलतच नव्हता. पण बहुतेक त्याच्याच फाद्यांना ( सोसायटीच्या बागेतली) आलेली एवढी फुले बघून हाही फुलला बिच्चारा. ३ + ३ = ६ फुलं फुलली. Happy
DSCN2671.jpgDSCN2677.jpg

सद्ध्या ४० ५० च्या वर बहाव्याच्या बिया आणि २० २५ करंजाच्या बिया जमवल्याय..
या सिझन मधे मी निव्वळ फिरत असल्यामुळे काही झाडं लावणं होईल अस दिसेना माझ्याहातून..
काल बहाव्याच्या दोन बिया भिजू घातल्या पाण्यात..उद्या मातीत लावेल म्हणते..एक दोन करंजाची रोपे सुद्धा तयार्‍ करायचा इचार आहे माझा..
बघू कसं जमतं ते..

चिकूच्या बिया टाकून फारसा उपयोग नाही. त्या रूजायला खुप आठवडे लागतात. त्या पेक्षा रोप तयार करून लावलेले बरे.

पाच वर्षांपूर्वी जंगलातून आणलेल्या मोहाच्या बीया रूजवुन एक वर्षाने जमिनीत लावल्या होत्या. आता ते झाड आठ नऊ फुट उंच झालय.
तसच तेव्हाच रतनगुंज ही रुजवली होती. आता ते झाड दहा फुट उंच होऊन त्याला गुंजा लागल्यात.
विलायती चिंच ही रूजवुन आता. मोठ झाड झालय.

सावली..टाळ्या..
गाइडन्स आणि सक्सेसफुल प्रयोगांसाठी अभिनंदन..

धन्यवाद हो!आतातातरी नुसत्याच टाकणार आहे.

अरे वा सगळे झाड लावण्याच्या तयारीला लागले आहेत. खुप छान वाटल.
मीही उंबराची २० झाडे पिशवीत लावली आहेत जी आमच्या जागेत अशीच उगवली होती. ती आता ग्रिन अंब्रेला ग्रुपला देणार आहे ते ती योग्य जागी लावतील. अजून रिठा, तामण च्या बियाही ठेवल्या आहेत.

जागू,
तूमाखमै..बरी आठवण दिलीस..मीपन तामणाची बोंडं आणून ठेवलेली रुजवायला..आता त्यातल्या बिया घेते रुजवायला..
मला सांग ना कश्या रुजवायच्या ते..
त्याचे पंख काढून टाकायचे का महोगनी वृक्षाच्या बियांप्रमाणे ?

विक्रम यंदेला देणार रुजवायला.>> अय्यो... आता विक्रम यंदेला विचारणं आलं..
भरत गोडांबे आणि विक्रम यंदे दोघांनाही विचारते कारण मला त्याच एक झाड घरी लावून बघायच आहे..

Pages