निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव सगळे फोटो भारी मस्त मस्त. टीना आणि सरिवाचे बघायला मात्र क्रोमात जायला लागेल. मधे टीनाचे इथे पण दिसायला लागले होते आय इ वर, परत काय झालं.

ममो. मस्त सुगंधी टोपली. सुगंध इथे घमघमला!
सरीवाचा फोटो दिसत नाही. Sad

टीना आणि सरिवाचे बघायला मात्र क्रोमात जायला लागेल. >>>>>>>>>..अंजू, क्रोमातून टीनाचा फोटो दिसतोय. सरीवाचा नाही.

हेमाताई, कृष्णाजी, घरची चाफ्याची फुलं................ हेवा वाटतोय मला तुमचा Light 1 आम्ही सहकारनगरला सुरवातीला जेव्हा होतो तेव्हा त्या घराच्या गच्चीत सोनचाफ्याच्या फांद्या आल्या होत्या. तेव्हा अशीच टोपलीभर फुलांची मौज करता आली Happy

आताच्या सोसायटीतही आहे झाड पण ते सोसायटीच्या गेट जवळ आणि हे.......... उंचच उंच. नुसती बघता येतात फुलं Sad

हेमाताई, कृष्णाजी, घरची चाफ्याची फुलं................ हेवा वाटतोय मला तुमचा >>>>>>>>>>>..+११११११११११११११११
आम्हाला ४ फुलं दिसणं ही कठीण आहे. आणि तुमच्याकडे टोपल्या काय, थाळे काय भरून भरून फुलं. Happy

तुमच्याकडे टोपल्या काय, थाळे काय भरून भरून फुलं.>>>

हे वडीलांनी १२-१३ वर्षांपुर्वी घरासमोर लावलेले आता खूप मोठे झालेय! आणि सध्यातर फुलांनी बहरलयं पुर्ण! आमच्या तिर्थरुपांची ही सुगंधीत आठवण!

हेमा ताई, कृष्णा सोनचाफ्याचे फोटो खुप भारी..
खुप आवडीचे फुल.. म्हणुन एक रोप आणलेल.. ते यशस्वी पणे जगवले. २०० च्या जवळपास फुलं येऊन गेलेत. दोन वर्षात.
आता सोनचाफ्याच्या एकुण ५ कुंड्या आहेत.. रोज २, ३ का होईना फुलं मिळत असतात

मी येतो तेव्हा इतक्या पोस्ट आणि अप्रतीम पोस्ट आलेल्या असतात की सगळ्या पहाताना फरफट होते

हे दोन नवे फोटो
white3.jpgwhite eye2.jpg

जो एस मस्तच आलाय फोटो .
चाफ्याची टोपली आवडली खूप आभार . krushna , साय तुमचे हि झब्बू फार सुंदर .
चाफा असतोच मोहवणारा . झाडावरच्या कळीच रूप ही तितकंच लोभस . हा फोटो झाडावरच्या कळीचा .

IMG_20170419_214144.jpg

छानच गं ममो...
इथ पाहून पाहून मला पन सोनचाफा घ्यावासा वाटतोय..

मस्त मस्त फोटो सर्वच. मलापण सोनचाफा लावावासा वाटतोय पण आहेत त्या कुंड्याच ठेवायच्या नाहीयेत आता, सोसायटीला बाहेरुन रंग लावणार आहेत. मी आईकडे ठेवणार आहे. तसं एका विंगच्या मागेपण चालणार आहेत ठेवलेल्या. आमच्या विंगच्या मागे चालतील का, विचारणार आहे मी. आता सगळ्यांना डी विंगच्या मागे ठेवा सांगितलं आहे, आमची बी विंग. पाच विंग्ज आहेत. बघुया. रंग पाण्याने खराब होईल म्हणून पण इथे घरोघरी एसी आहेत आणि त्याचंही पाणी पडत असतं की. असो.

तसंही वर्ष, दोन वर्ष कुणकुण होतीच म्हणून मी काही नवीन लावत नव्हते. आहे ते सांभाळत होते.

जो, चष्मेवाला खासच टीपलायत!!!
हेमा ताई, आ हा! कीती लोभस प्र.ची.
इथ पाहून पाहून मला पन सोनचाफा घ्यावासा वाटतोय.. +++ लौकर घे... Happy

तसं एका विंगच्या मागेपण चालणार आहेत ठेवलेल्या++ मग तीथे काही कुंड्या ठेऊ शकतेस की तु ! Happy

सोनचाफा, चष्मेवाला, बहावा ...सुंदर!
काल हे झाड दिसलं. फुलं करंजासारखीच दिसताहेत, पण पानं वेगळी आहेत. हे कसलं झाड आहे?
20170419_183852
(वरच्या फोटोत मागे दिसणारी गडद रंगाची पानं दुसर्‍या झाडाची आहेत)
20170419_183838
हेच आहे का ते?
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Takoli.html

कृष्णा, मनीमोहोर, सायु... तुमच्या झाडांची दृष्ट काढून टाका प्लीज.
आम्हाला फक्त १० चे ३/४ मिळतात ते चाफे माहिती आहेत. १० चे १०/१२ म्हणजे ऐष.
कुंडीत पण जगते छान, तर लावून पाहिले पाहिजे.

Pages