निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! नवीन धाग्यासाठी अभिनंदन!

मी टाकलेला फोटो काही केल्या दिसेना Sad

मोरपीस

गप्पांच्या तिसाव्या पानाची लिंक राहिली का वर द्यायची?

Wowww जागू(चालेल ना जागू म्हटलेलं?) खूप छान फोटो आहे, मी आत्ता क्रोम मध्ये बघितला Happy पण IE मध्ये दिसला तर बरं होईल, at least हा पहिला.

नव्या भागाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
पहिले दोन फोटो IE मध्ये दिसत नाहीयेत. क्रोममध्ये जाऊन बघितले. छान आहेत. आणि बाकी सगळे फोटोसुद्धा छान आहेत. ते काष्ठशिल्प मला कळालेच नाही.

हे काही फोटो माझ्या मोबाईलमधले, सुपरमूनचे... कॅमेरा अगदीच साधा आहे त्यामुळे काही ग्रेट इफेक्ट नाहीयेत... Blush

हा संध्याकाळी ७:४०ला जेव्हा चंद्र जास्त जवळ होता. (७:२२ला सगळ्यात जवळ असणार होता)

हा सकाळी ४:३० ला खिडकीच्या काचेतून नाईट मोड वापरून काढलेला.

हा सकाळी ६:३० ला अगेन सेम खिडकीतून... मोड कुठला वापरला आठवत नाही. मी बरेच काही प्रयत्न केले, हा जास्तीत जास्त छान वाटलेला.

मायबोलीवरची पाकृ वाचून एकदा "दाब चिंगरी" बनवली होती. त्यात पंचफोरण म्हणजे काही मसाल्याच्या बियांचे मिश्रण वापरतात. जिरे, मोहरी, मेथ्या, बडीशेप आणि कलौंजी. त्यातल्या थोड्या कलौंजीच्या बिया कुंडीत टाकल्या होत्या.कारण कलौंजी म्हणजे कांद्याच्या बिया असंही कळलं होतं आणि नक्की काय ते माहिती करून घ्यायचं होतं.

त्या रोपांना आता फुलं आली आहेत.

(कलौंजी :Nigella sativa)

1_0.JPG2.jpg3.jpg

आदिजो, कलौंजी म्हणजे कांद्याच्या बिया असं मी पण ऐकलं होतं, त्या पेरूनही बघितल्याहीवर तुमच्या फोटोत आहे तशीच रोपं आली - कांद्याची पात काही आली नाही Happy

प्रस्तावनेतला फोटो मलाही दिसत नाहीये.

ही आमच्या घरची सुस्नात अबोली....

IMG-20161111-WA0014.jpg

आणि निग च्या नवीन धाग्यास मनःपूर्वक शुभेच्छा....

Pages