क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्तू भाऊ, छान आहे तुमच निरीक्षण. ते आशिया खंडातल्या खेळ्पट्ट्यांसाठी व टी२० साठी बरोबर लागू होईल.

पुढचा विश्वचषक ईंग्लंड मध्ये ५० षटकांचा आहे. तिथे जा आणि हाण असे खेळाडू आघाडीला फारसे यशस्वी होत नाहीत. शिवाय ईंग्लंड जरी असले तरी चँपिसन्स चषकाचा अनुभव पाहता कधी कधी ३२५ - ३४० च्या वर धावा करायला लागू शकतात. म्हणून मोठा डाव उभारणारे खेळाडूच संघाला यशस्वी करू देतील असे वाटते.

मी टी२० विश्वचषकाबाबत बोलत आहे. तो विश्वचषक कुठल्याही देशात असेल तरी फलंदाजधार्जिनी खेळपट्टी पुरवण्यात येईल असा अंदाज आहे. वेस्ट इंडीज मधे जे नुकसान झाले ते बघता आता हायस्कोरिंग मॅच होण्यासाठी प्रयत्नशिल असणार.

<< उलट पांडेला मिळेल तसा खेळ सांगितले असते तर तो प्रत्येक बॉल मारु लागला असता १ धाव मिळाली तर रोहीतला असाही स्ट्राईक मिळणारच होती.>> पांडेचं टायमिंग चुकत होतं; एका आत्यंतिक महत्वाच्या षट्कात चारदा त्याची बॅट हवेत फिरली व खरं तर त्यामुळेच तर पुढची गोची झाली !

<< एवढया कॅमेऱ्यांसमोर केले म्हणजे डेअरिंग मानना पडेगा भाई!! >> आणि वर सरळ कबूलीही देवून टाकली व कॅप्टनच्या संमतिनेच केलं गेलं हें, हेंही उघड झालंय ! पाँटींगला बरा म्हणायची पाळी आली आतां !! ऑस्ट्रेलियन बोर्डाने कडक धोरण स्विकारलं हें स्वागतार्ह !

No more gentlemen's game. No more game - just war!
मागे इथे कुणि तरी क्रिकेट खेळाडूंची तुलना सीमेवर लढणार्‍या सैनिकांशी केली होती!
बहुतेक सर्व गोरे लोक तसेच समजतात!

स्मिथ ने स्वतःहून कॅप्टन राहण्यास नकार देऊन CA ला अडचणीतून सोडवले पाहिजे. ह्या मूर्खपणामूळे स्टार्क, हेझलवूड, कमिन्स अशा दर्जेदार बॉलर्सच्या कामगिरीकडे नेहमीच संशयाच्या नजरेने बघितले जाईल Sad

A decent leg spinner, who could bat in a lower middle order, rose to a position of one of the best test batsman in the world, became a captain of one of the strongest teams in world cricket and left the field in tears and humiliation. what a tragedy! what a game!!

फेफ माझ्या डोक्यात हेच आले. खरे तर स्मिथ पुण्याच्या जुन्या टिममध्ये केवळ फिल्डिंगवर पण टिकला होता. त्याने बाउंड्रीच्या बाहेर जाऊन एक अफलातून कॅच घेतला होता (तो इल्लिगल ठरला कारण बाउंड्रीच्या बाहेर उभा असताना उडी मारून त्याने बॉल त्यात एकदा उडवला). जबर ट्रॅजेक्टरी आहे या खेळाडूची.

खेळाडू म्हणून स्मिथ - वॉर्नर ची प्रतिभा अफाट आहे. पण मोहाचा एक क्षण तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतो ह्याचं आणखी एक उदाहरण आहे हे.

Aus ला जबर शिक्षा झालेली बघून छान वाटले.
अहंकार कमी होण्याची शक्यता आहे. आम्ही काहीही केले तरी माफी मिळेल दुर्लक्ष करतील, हा जो माज चढलेला तो बर्याच प्रमाणात कमी होईल

स्मिथ ने स्वतःच्या हाताने माती केली

दत्तू, शिक्षा स्वतः ऑस्ट्रेलियन बोर्ड नेच केली आहे. आयसीसी ने नाही. आयसीसी च्या नियमाप्रमाणे बॉल टँपरिंग ची शिक्षा प्रतिस्पर्धी संघाला ५ रन्स, बॉल बदलणे आणी एखाद्या मॅच चा बॅन, इतकच आहे. आता ह्या उदाहरणातून आयसीसी ने त्यांच्या नियमांचा पुनर्विचार केला तर बरं होईल.

ऑस्ट्रेलियन बोर्ड ने शिक्षा बॉल टँपरींग पेक्षाही Spirit of Cricket as defined by Aussie Board चे उल्लंघन केल्याबद्दल केली आहे. ती ही शिक्षा Corporate Sponsors ने आवाज उठवल्यामूळे झालेली आहे. माझ्या मते एकंदर जो कव्हर अप नि खोटे बोलण्याचा प्रकार झाला, तसेच वॉर्नर नि स्मिथ ने एका ज्युनियर खेळाडूला बकरा बनवले ते बघता दोघांवरही lifetime captaincy ban for National team जरुरी होता. एक खेळाडू म्हणून वर्षभराचा बॅन जास्त वाटतो, ६ महिने बरोबर वाटला होता. बॉल टँपरींग नेहमीच होत आलाय - वेगवेगळ्या स्वरुपामधे नि ICC ने official जाहिर केलेली शिक्षा हि एक मॅच बॅन एव्हढीच आहे हे बघता, मधेच एकदम बदल केला असे वाटतेय.

स्मिथ आणि वॉर्नर परफॉर्मर म्हणून जबरदस्त आहेतच.... त्यांची उणीव फक्त ऑस्ट्रेलियन टीमलाच नाही तर त्यांच्या त्यांच्या IPL टीम्सना पण भासेल.... पण कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो!
एक वर्षांची बंदी म्हणजे फार काही जास्त नाही (कधीकधी नुसत्या दुखापतीनेही खेळाडू सहासहा महीने बाहेर राहतात).... पण इमेजला तडा आणि गमावलेली विश्वासार्हता हे जास्त मोठे नुकसान आहे..... They will bounce back as players पण परत त्यांना कॅप्टन्सी वगैरे मिळणे जरा अवघड वाटतय
या प्रकरणातुन इतरांनी धडा घेतला तर चांगलीच गोष्ट आहे!

बहुतेक ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांना देशांतर्गत क्रिकेट सामन्यात खेळायला परवानगी दिलेली आहे!

"बहुतेक ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्यांना देशांतर्गत क्रिकेट सामन्यात खेळायला परवानगी दिलेली आहे!" -नाही. डोमेस्टिक आणी इंटरनॅशनल, दोन्हीवर बंदी आहे. क्लब क्रिकेट खेळू शकतात आणी ते खेळायला दोघांनाही एन्करेज केलय -क्रिकेट शी संबंध तुटू नये म्हणून.

ओके!

स्मिथची रिप्लेसमेंट म्हणून Heinrich Klaasen चे नाव चर्चेत आहे आणि वॉर्नरसाठी कुशल परेरा!

रोहित शर्मा च्या फॉर्म साठी उपाय म्हणजे त्याने शतक केले की ९ डाव रेस्ट द्यावी नाही तरी ते ९ डाव तो खेळणारच नसतो.. पुन्हा १० व्या डावात तो शतक करेल..

आजपासून अफगाणिस्तानचा टेस्ट-प्लेयिंग नेशन्समध्ये प्रवेश! भारत-अफगाणिस्तान मॅच चालू होते आहे थोड्याच वेळात. होऊ दे चर्चा! भारताने बॅटींग निवडली आहे. (काबूल-बॉर्न) सलिम दुराणीने अफगाण कप्तान असगर स्टॅनिकझाई ह्याला स्मृतिचिन्ह दिले. औचित्यपूर्ण सुरवात!

Afghanistan's first ever Test XI: 1 Mohammad Shahzad, 2 Javed Ahmadi, 3 Rahmat Shah, 4 Asghar Stanikzai (capt), 5 Hashmatullah Shahidi, 6 Mohammad Nabi, 7 Afsar Zazai (wk), 8 Rashid Khan, 9 Yamin Ahmadzai, 10 Wafadar, 11 Mujeeb Ur Rahman.

सही भा Happy

पाच बॅट्समेन आणि पाच बोलर्स घेतले आहेत. पंड्या ऑलराउण्डर धरला असेल, पण टेस्ट मधे तसा आश्विनही खेळतोच लागले तर. दिनेश कार्तिक तर आहेच. ही खरी बॅलन्स्ड टीम वाटते कसोटीला. (धवन च्या ऐवजी कोहली येइल इंग्लंडला बहुधा आणि राहुल ओपन करेल)

भारताबाहेर २ स्पिनर्स खेळवायचे का, हा नेहमीचा प्रश्न आहे. बाकी तू म्हणतोस त्याला अनुमोदन अ‍ॅज कंपोझिशन. मोहम्मद शमी इशांत शर्माच्या जागी वगैरे वगैरे चेंजेसही होतील.

धवन ने आज मारलेली "लंच च्या आत" सेन्च्युरी भारताकडून पहिलीच आहे बहुधा. सेहवाग खूप जवळ आला होता एकदा शतकाच्या पण प्रत्यक्ष झाले लंच नंतर असे अंधुक लक्षात आहे.

हो, व्हिक्टर ट्रंपर, चार्ल्स मॅक्कार्टनी, डॉन ब्रॅडमन, माजिद खान, डेव्हिड वॉर्नर, ह्यानंतर आता शिखर धवन. काँग्रॅट्स!

धवन शतक करून गेला, मग विजयही पावसामुळे बराच वेळ शतकाच्या उंबरठ्यावर राहून मग शतक पूर्ण करून बाद झाला. हे लिहिता लिहिता राहुलही अर्धशतक करून बाद! २८४/३ भारत.

Pages