क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमॉन बॉइज..
१९९७ - बार्बाडोस ची पुनरावृत्ती नका होऊ देऊ Uhoh

एक पुजारा वगळता बाकीचे बाद होण्यामधे स्वतः हातभार लावून गेले आहेत, एकाने जरी थोडा सांयम दाखवला असता तर कदाचित ... पण अर्थात जर आपला कमी प्रतिचा अ‍ॅटॅक आफ्रिकेला १३० मधे गुंडाळतो तर त्यांचा अधिक चांगला अ‍ॅटॅक आपल्या अपुर्‍या तयारीनिशी खेळणार्‍या फलंदाजांना पुरून उरला नसता तर नवल होते.

अश्विन ने दोन इनिंग्स्मधे दहा ओव्हर्स पण टाकल्या नाहियेत, जर त्याला वापरायचे नसेल पुढच्या मॅचमधे स्पिनर घेण्यापेक्षा एक अधिक फलंदाज घ्या . अगदीच ओव्हर रेट ची गरज पडली तर विजय , रोहित किंवा पुजारा टाकतील काही ओव्हर्स.

असामी, अश्विन बद्दलच्या निरीक्षणाला अनुमोदन. अगदीच अंडर-युटिलाईझ केला त्याला.

शिखर धवन भारताकडून मोस्ट कन्सिस्टंट बॅट्समन. दोन्ही इनिंग्ज मधे १६ रन्स!! त्याच्या खालोखाल रोहित शर्मा. ११ आणी मग परफेक्ट टेन.

पण विको म्हणतो तसं पराभवात सुद्धा पॉझिटीव्ह मानसिकता हवी. नुसत्या एकेका इनिंग चा विचार करता, भारताने दुसर्या इनिंग मधे द. अफ्रिकेला ५ रन्स नी हरवलय. Wink

राहूल फॉर धवन आणी रहाणे फॉर शर्मा / पंड्या हे सूत्र पुढचं वर्षभर कायम ठेवायला हवं. पंड्या आणी शर्मा पैकी एकच जण प्लेयिंग ११ मधे असू शकतो.

पंड्या आणी शर्मा पैकी एकच जण प्लेयिंग ११ मधे असू शकतो. >> हे पटतय. माझे मत पांड्याला आहे. त्याचा तुटपुंजा first class अनुभव बघता त्याने नक्कीच योग्य वेळी योग्या तर्‍हेने बॅटींग केली होती. पण अर्थात ह्याने फार फरक पडेल असे मला वाटत नाही. मूळात आफ्रिकेच्या पहिल्या इनिंग मधे आपण त्यांना दोनशे च्या पुढे जाऊ दिले हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. पहिल्या इनिंगच्या स्कोरमधेही तो मुख्य फरक आहे. तिथे कोणी तरी शेपूट गुंडाळू शकेल असा बॉलर हवा होता. त्यासाठी पेस नि मुख्य म्हणजे कंट्रोल असणारा कोणीच आपल्याकडे नाहिये (यादव कडे कंट्रोल नाही) . बुमराह ला त्यासाठी घेतला होता असे मल वाटत होते पण तसे असेल तर त्याने hardly काही overs तेंव्हा टाकल्या, मुख्य बॉलिंग शमी, पांड्या नि भुवी ह्यांनीच केली होती ६ विकेट्स गेल्यावर. अश्विन उपयुक्त ठरला असता पण strangely he was really under-utilized.

धवन ऐवजी राहुल हे पटतय पण विजय फारसा आशादायक वाटला नाही. मोठ्या ब्रेक चा परीणाम कि काय महैत नाही पण strange lapse of concentration in both innings. विजय नि पुजारा तीस overs पर्यंत राहिले कि नंतर कोहली जास्त उपयुक्त ठरतो. राहणे ही हवाच पुढच्या टेस्ट मधे.

राहणे ही हवाच पुढच्या टेस्ट मधे. >> टोटली. मुळात रहाणे ऐवजी रोहित ही टोटल बिनडोक निवड आहे. सलामीला राहुलही फार भरवशाचा नाही. त्यालाही उगाच आक्रमकतेचा आणि इम्प्रोव्हायझेशनचा किडा आहे. विजय आक्रमक खेळणार असेल तर दुसरा स्टेडी हवा. विजय दोन्ही स्टाइलने खेळू शकतो - त्यामुळे तो जर "स्टेडी" असेल तर दुसरा राहुल चालेल. नाहीतर सरळ आश्विन ला पाठवा :). तो जास्त टेक्निकल आहे.

नाहीतर सरळ आश्विन ला पाठवा :). तो जास्त टेक्निकल आहे. >> Happy विनोद म्हणून ठिक आहे पण नको. एव्हढा चांगला बॉलर उगाच इरफान सारखा जायचा. पांड्याला पाठवा. लागला मटका तर सेहवागसारखा धमाल होईल. नाहितर तोही hand eye co-ordination वर ठोकतो.

विजय ह्या मॅच मधे स्ट्रेंज खेळला, पण सहसा, तो पुष्कळ शांतपणे खेळतो. त्यानं तसच खेळावं - खेळेल असं वाटत असल्यामुळे, माझं मत त्याच्या बाजूने आहे. राहूल ला मधेच इंप्रोव्ह करायची हुक्की येते हे खरय आणी त्याची फिल्डींग सुद्धा 'नीड्स इंप्रूव्ह्मेंट' कॅटेगरीत आहे. पण तरिही तो धवन पेक्षा जास्त मान खाली घालून खेळणारा बॅट्समन आहे. टेक्निकली सुद्धा धवन पेक्षा पुष्कळ बरा वाटतो. गेला बाजार पार्थिव पटेल सुद्धा चालेल.

रहाणे विषयी एकमत आहेच.

जर बॉलिंग विकेट असेल, तर रोहीत (४ बॉलर्स बॉलिंग विकेट वर पुरेसे आहेत) नाहीतर पंड्याला खेळवावं.

अश्विन खूप चांगला बॉलर आहे. त्याला खेळवून, व्यवस्थित बॉलिंग द्यायला हवी असं मला वाटतं.

अश्विन ने दोन इनिंग्स्मधे दहा ओव्हर्स पण टाकल्या नाहियेत, जर त्याला वापरायचे नसेल पुढच्या मॅचमधे स्पिनर घेण्यापेक्षा एक अधिक फलंदाज घ्या .
>>>>
या वाक्यात एक तांत्रिक चूक आहे.
जर या सोळाच्या संघातील आफ्रिकेत खेळणारे टॉप सहा फलंदाज काढले तर आश्विन त्यात असेल Happy
आज त्या फिलँडरला कीपर पुढे आणायचा डावपेच फळला, नाहीतर आश्विनने टेंशन द्यायला सुरुवात केलेली.
या सामन्याच्या सुरुवातीलाही मी आश्विनबद्दल पोस्ट टाकलेली,
<<< मधल्या काळात आश्विन फलंदाजी खूप कॅज्युअली करत होता. उद्या मात्र मनावर घेऊन करेल असे वाटतेय. ईथे संघातली जागा टिकवायला त्याला धावा कामात येतील.>>>

पांड्याने जागा फिक्स केली बहुतेक या मालिकेपुरती.
सामन्याच्या आधी सचिननेही पांड्याची पाठराखण केलेली. त्याच्यामुळे संघात बॅलन्स आहे म्हणून.
बुमराहने देखील तुर्तास टिकाकारांना गप्प केले असे वाटतेय. आजच्या त्याच्या विकेट पाहिल्या नाहीत. मात्र आफ्रिकेला १३० मध्ये गुंडाळताना त्याचाही मोठा वाटा आहेच. त्यामुळे हा बॉलिंग अ‍ॅटेक कायम राहील असे वाटते.
फलंदाजीत शर्मा जाऊन रहाणे येईलच. तसे न झाल्यास डोक्याला झटका बसेल.
के एल राहुल येतो का हे बघायचेय, मला तर वाटते येईलच. पण आला तर कोणाच्या जागी हे कोहलीवर सोडूया..

या वाक्यात एक तांत्रिक चूक आहे. .> काही कळले नाहि रे. मी अश्विन बॉलर म्हणून वापरला जात नसेल तर त्याला फलंदाज म्हणून घेण्यापेक्षा खराखुरा फलंदाज घेता येईल असे म्हणतोय.

असामी ते गंमतीने म्हटले आहे. आफ्रिकेत खेळायचे टेकनिक पाहता आपले पहिले सहा फलंदाज काढले तर आश्विन त्यात असेल असा त्याचा अर्थ झाला. आश्विनलाच संघात घेताना सांगायचे की बघ तुला फलंदाज म्हणून घेत आहे. तुझे मुख्य काम ते आहे. त्याउपर पिचमध्ये स्पिनर्सना काही निघेल आणि मग तुझ्या बॉलिंगचा जो काही फायदा होईल तो बोनस झाला . मग तो आणखी सिरीअसली खेळेन.. जर रोहीतला आफ्रिकेत कसोटी फलंदाज म्हणून खेळवत असू तर आश्विनलाही फलंदाज म्हणून खेळवायला हरकत नाही Happy

बाकी एकही स्पिनर्स न घेता भारताने खेळू नये. खुद्द आफ्रिका महाराजला खेळवत असताना..
प्रश्न फक्त ईतकाच उरावा की तो कोण घ्यावा? कुलदीपची गोलंदाजी कोणाला नवखी ठरू शकते का, हा विचारही करून बघायला हवा. गेला बाजार शेपटाला त्याने गंडवले तरी मोलाचे ठरू शकते.. आश्विनही ते करू शकतोच.

ते गंमतीने म्हटले आहे. >> तुझ्या मते गंमतीचा अर्थ काय आहे रे भाऊ नक्की ? Happy

परत एकदा मी लिहितो तेच नीट वाच नि विशेषत" बोल्ड केलेला भाग वाच नि त्याचा अर्थ काय ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे अतिशय साध्या सोप्या मराठीमधे लिहिलेले आहे. तरीही कळले नाही तर ग.फ्रे. ला ती भेटेल तेंव्हा विचार. तरीही नाही कळले तर बागेत दिसणार्‍या पोरांच्या आयांना विचार. पण समजेपर्यंत त्याबद्दल काही लिहू नकोस. Happy

"मी अश्विन बॉलर म्हणून वापरला जात नसेल तर त्याला फलंदाज म्हणून घेण्यापेक्षा खराखुरा फलंदाज घेता येईल असे म्हणतोय."

कोणाला तरी उपकर्णधार म्हणून नेमायचे आणि त्याचे ओव्हर्सिज रेकॉर्ड अफाट असतानाही त्याला टीमच्या बाहेर ठेवायचे. मग आपल्या सर्वात उत्तम कामगिरी केलेल्या (सर्वात जास्त विकेट्स, सर्वात जास्त चेंडूंचा सामना) खेळाडूला बाहेर काढायचे. या लॉजीकने पुढच्या टेस्टला अश्विनपण बाहेर जाऊ शकेल. जोरजोरात स्टँपमाईकमध्ये bc, mc करणे म्हणजे कप्तानी असे नवीन पोरांना वाटू लागले तर त्यात त्यांची चूक नसेल.

"मी अश्विन बॉलर म्हणून वापरला जात नसेल तर त्याला फलंदाज म्हणून घेण्यापेक्षा खराखुरा फलंदाज घेता येईल असे म्हणतोय."
>>>>>>>

आणि मी असे म्हणतोय त्या सो कॉलड खर्‍या खुर्‍या फलंदाजांपेक्षा आश्विन मला भरवश्याचा फलंदाज वाटतोय. Happy
म्हणजे सध्याच्या फॉर्म आणि आफ्रिकेत खेळायच्या टेकनिकवर या संघातील मी सहा खरेखुरे फलंदाज काढले तर त्यात आश्विन येईल. मग तो बॉलिंग टाकतोय की न टाकतोय काही फरक पडत नाही.

बाकी फलंदाजीचे राहू द्या, पण या कसोटीत नक्कीच आश्विनच आपला महत्वाचा गोलंदाज आहे. अगदी त्याने पहिली ओवर टाकल्यापासूनच हे क्लीअर झाले.

तसेच एका साइडने ओवर टाकू शकत असल्याने ईतर वेगवान गोलंदाजांनाही आराम मिळतो. थोडक्यात सामना आफ्रिकेत असला तरी ओवरऑल विचार करता तो मोस्ट वॅल्युएबल प्लेअर आहे.

कोहलीवर बहुतेक सासुरवाडचं जोरदार प्रेशर आहे. शर्मा लोकांना प्रेफरन्स द्यावाच लागतोय. मोहित पण येईल थोड्या दिवसात परत.

राहणेचा सगळ्यात मोठा वीकपॉईंट त्याचा कॉन्फिडन्स वाटतो. अन असं सतत डावललं गेल्यानी तो आण्खीनच कमी होत असणार. He should be given a clean run of (say) 3-4 series to boost his confidence. He will definitely hit the gold faster. लंकेविरुद्ध एक होम सिरीज आऊट ऑफ फॉर्म गेली म्हणून जर सतत बाहेर बसवलं जाणाअर असेल तर अवघड आहे. पण त्याच वेळी अफ्रिकेविरुद्ध तिसर्‍या टेस्टमधे आता त्याला चान्स मिळू नये असंच वाटतंय. कारण जर तो परफॉर्मन्स प्रेशरच्या खाली परत लो स्कोअर वर आऊट झाला तर फॉर्म मिळवणं आणखी अवघड होऊन बसेल.

आणि वेस्ट ईंडीज अन ऑसी विरुद्धच्या वनडे सिरीजमधे त्याचा परफॉर्मन्स 62, 103, 72, 60, 39 (श्रीलंका 5) आणि 5, 55, 70, 53, 61 असताना त्याला वनडे मधूनही बसवणं हे टोटली क्लूलेस आहे.

कोहलीवर बहुतेक सासुरवाडचं जोरदार प्रेशर आहे. शर्मा लोकांना प्रेफरन्स द्यावाच लागतोय. मोहित पण येईल थोड्या दिवसात परत. >>> Lol

कोहलीचे शतक जोरदार होते मात्र. मी आजचा खेळ पाहिला नाही पण काल मस्त खेळत होता तो. तो खेळायला आला की सुरूवातीला ऑफ साइडच्या बॉल्स ला बॅट "हँग" करत टेन्टेटिव्ह हालचाल करायची सवय आहे त्याला. पहिल्या टेस्ट ला बरोब्बर काढला होता. येथेही एकदा ऑल्मोस्ट चकला, पण निक लागली नाही. मात्र एकदा सेट झाल्यावर नेहमीचे शॉट्स आले. एक जबरा स्ट्रेट ड्राइव्हही पाहिला.

विजय ला मात्र 'महाराज' ने भन्नाट काढला. सतत ती ऑफ स्टंप च्या थोड्या बाहेरची लाइन धरली होती - 'कट' शॉट मारायला उद्युक्त करणारी. जोपर्यंत बॉल बर्‍यापैकी लांब होता तोपर्यंत विजय आरामात खेळत होता. मलाही वाटले की कशाला बोलर ओव्हर्स वाया घालवतोय. असले स्पिन हे लोक झोपेतही खेळतील. पण ट्रॅप तेथेच होता. एक बॉल तसाच पण स्टंपच्या अगदी जवळ पडला, आणि विजय कट करायला गेला. तेवढी विड्थ नव्हती, निक लागली आणि कॅच गेला. क्लासिक टेस्ट मॅच विकेट!

एबीडी, पहिल्या टेस्ट मध्ये जसा सुटला तसाच काल पण सुटला होता.. आज सकाळी त्याला लवकर काढला तर जरा आवाक्यात राहातील.. नाहीतर आहेच धावांचा रतीब..

२८७ जिंकायला...

डोकं शांत ठेऊन टेस्ट मेंटॅलिटीनी खेळलो तर सहज जिंकू...
पण... आयपीएल ऑक्शनमधे बायर्सना इंप्रेस करायचं म्हणून ओव्हरअ‍ॅग्रेशन दाखवायला गेलो तर अवघड आहे.

बॉल लो राहतोय हा धोकादायक प्रकार आहे. general SA discipline पाहता मॅच गेली असे धरून चालायला हरकत नाहि. Showing intent and over aggression मधली सीमारेषा भयंकर धुसर आहे. आनंदाची बाब एव्हढीच की आफ्रिकेचे बॅटसमन पण फार धिवून काढत नाहियेत.

उद्या पाउस असला पाहिजे. निदान सकाळीच त्याची लक्षणे तरी दिसायला हवीत. म्हणजे थोडेसे खेळायचेय म्हणत उभे राहायचा प्रयत्न करतील. नाहीतर एक पुजाराची विकेट जाताच आता आपण काही दिवस काढत नाही म्हणत हाराकिरीला सुरुवात व्हायची.
तरी प्रत्येक जण आयुष्यातील बेस्ट रटाळ कसोटी क्रिकेट खेळायचे या हेतूने उतरला तर सामना अनिर्णित राहत वाचूही शकतो.. जिंकणे तर शक्य नाही. कारण काही बॉल खाली राहताहेत तर काही एफर्ट बॉल अचानक उसळताहेत. पिचचा अंदाज आलाय म्हणत शॉट खेळायला जाल तर कधीही बाद व्हाल असे वाटते. एखाद्या पांड्यालाच फार तर तेच जमते तर मारू द्यावे. बाकी तो लुंगी कि नुंगी आणि रबाडा मिळून संपवतील या पिचवर आपल्याला...

बाकी काहीही असो, रोहीत शर्मा उद्या किती मारतो हे बघायला मजा येणार Happy

रोहित शर्मा च्या टेस्ट मधल्या बॅटींग मधे कुठल्याही प्रकारे ‘मजा’ येईल (तुम्ही विरुद्ध पार्टीत नाहीत असं गृहीत धरून) हे म्हणणं धाडसाचं आहे.

११ वर्षं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यावर जर अजून तो नवोदित खेळाडूसारखा खेळत असेल तर, त्याला ‘फीट-ईन‘ करायचा अट्टाहास का?

काल ४ था बळी घेतल्यावर शामी बाहेर गेला होता का? अश्विनला पुढचे षटक का दिले कोहलीने? नाहक अजुन १५-२० धावा दिल्या गेल्या!

ही खेळपट्टी पुजारा, रहाणे ह्या सारख्या अस्सल कसोटी फलंदाजांसाठी आदर्श आहे! त्यावर उभे राहणे महत्वाचे बघुया आता रहाणे तर आधीच बाहेर केवळ मदार पुजारावर!

काल ४ था बळी घेतल्यावर शामी बाहेर गेला होता का?>> सही सवाल! हे जर अ‍ॅग्रेशन असेल तर डिफेन्सिव टॅक्टिक कशाला म्हणायचे?
असो, अ‍ॅग्रेशनची चैन करुन झाली असेल तर कालच्या फाफडूच्या इनिंग्जवरुन आपल्याला बरेच काही शिकता येईल. पण सद्ध्या मोक्याच्या वेळी, एकदम नव्या बॉलरकडून आउट झाल्यावर फक्त शिव्यांचा हिशेब चुकता करण्यातच आपले अ‍ॅग्रेशन उरले आहे.
तेही असो, भुवनेश्वरकुमारला ' सुटेबल कन्डीशन्स' नसल्याने वगळण्यात आले असे कळले. त्यातला अफाट विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी त्याच लॉजिकने इंग्लंडच्या दौर्‍यावर कुणाला बरे वगळावे लागेल?!

संपलीच की आता मॅच.. पुजारा येडपट सारखा रन आऊट झाला.. दोन्ही इनिंग्स मधे रन आउट होणे हा बहुमान मिळवला त्याने... पटेल चा कॅच मस्त घेतला मॉर्केलनी..

लुंगी निघली!! जागतिक क्रमवारीत १ क्र. चा संघ!

खेळ हा खेळ म्हणून घ्यावा तरी बरेचसे अनाकलनिय निर्णय!
मागच्या सामन्यातील चांगला गोलंदाज भुवनेश्वर बाहेर (जो अडचणीला बर्‍यापैकी फलंदाज म्हणून पण उभा राहतो) , अश्या खेळपट्टीवर उभा राहू शकणारा अजिंक्य फलंदाज बाहेर!

भारी!!!

स्टेन परवडला असता!! Happy

Pages