क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! अभिनव मुकुंद आला ओपन करायला? गेल्या काही मॅचेस तो राहुल होता ना? की विजय? लक्षात नाही.

या लंकेच्या खेळाडूंची नावे बघून कोणीतरी त्यांना Let me explain you the concept of initials असे समजावयाला हवे. पाच पाच लेटर्स आहेत हेराथ आणि त्या दुसर्‍या एकाच्या नावात. त्या चमिण्डा वास च्या नावात तर आडनावापेक्षा इनिशियल्स ची अक्षरे जास्त होती :).

लंकेतील परश्या जर "तुझ्या नावाचं मी इनिशलं टॅटूनं गोंदलं" करत असतील तर लिटरली हात भरून आलोया अवस्था होत असेल त्यांची.

मस्त! अभिनव मुकुंद आला ओपन करायला? गेल्या काही मॅचेस तो राहुल होता ना? की विजय? >> ते दोघे injured आहेत.

यल्स ची अक्षरे जास्त होती >> Lol

६०० धावा करून श्रीलंकेचे ५ गडी बाद झालेले आहेत.. प्रत्यक्षात ६, कारण एक खेळाडू खेळणारच नाहीये.. काल बिचर्‍याचं बोट फ्रॅक्चर झालं धवनचा कॅच सोडला तेव्हा..

धवन सुटला होता काल.. त्या मानानी आज तसे संथ खेळले आपले खेळाडू... रहाणे कुठेतरी शिंकतोच राव. मस्त चान्स होता शतक मारायचा. पंड्या बराच खालती आला आणि वन डे इनिंग खेळला.. शामीनी पण ३० धावा केल्या.. कोहली वगळता सगळ्यांनी दोन अंकी धावा केल्या ह्या डावात.

पंड्या विसरला बहुतेक टेस्ट मॅच चालू आहे ते.. ६ चौके, ६ षटकार ! १००+ चा स्ट्राइक रेट !!
लंबी रेस का घोडा है.. बहुत आगे जाएगा.

पंड्याने पहिल्या सेशन मधे १०७ रन्स केले. पण वाचले की ते वाढवलेले सेशन होते, कारण आपली शेवटची जोडी खेळत होती.

भारताच्या कोणीच आत्तापर्यंत एका सेशन मधे १००+ केलेले नसावेत. सेहवाग एकदा खूप जवळ आला होता असे लक्षात आहे.

फा, सेहवाग चा थोडक्यात हुकलेला रेकॉर्ड, पहिल्या सेशन मधे सेंच्युरी चा होता.

वन डे च्या टीम मधे काही अपेक्षित आणी काही अनपेक्षित बदल आहेत. पंत ला एकाच मॅच नंतर काढतील असं वाटलं नव्हतं. ठाकूर, चहल वगैरे ची निवड अपेक्षित होती.

धन्यवाद फेरफटका. मला अंधुक आठवत होते.

एम एस के प्रसाद च्या मुलाखतीबद्दलची बातमी क्रिकइन्फो मधे जरा स्फोटक पद्धतीने आली आहे. पण नीट वाचले तर तो उगाच काडी लावायला बोलला नाही. प्रश्नच असा विचारला होता की धोनीचे नाव कोहलीइतकेच आपोआप गृहीत धरले जाते का. तरीही त्याने त्यावर एकदम बरोबर उत्तर दिले आहे. आणि तरीही या पत्रकाराने मुद्दाम कुरापत काढल्यासारखे शीर्षक दिले आहे.

भारताच्या कोणीच आत्तापर्यंत एका सेशन मधे १००+ केलेले नसावेत. सेहवाग एकदा खूप जवळ आला होता असे लक्षात आहे.
>>
फारुख इन्जिनीअरने १९६६-६७ मध्ये ४६ बॉलमध्ये ९४ धावा लंचपूर्वी काढल्या होत्या. शेवटच्या दोन ओव्हर्मध्ये इन्जीनीअरने १ -१ रन काढली आणि स्ट्राईक सरदेसाइकडे गेला आणि सरदेसाइने ५-५ बॉल्स खेळून काढले.त्यावेळी फार प्लानिन्ग करून खेळायची पद्धत नव्हती नाही तर इन्जिनीअरला स्ट्राइक देऊन हे झाले असते. १० बॉल फुकट गेले आणि सहाच रन काढायच्या होत्या. जे दोन बॉल खेळले ते अडवलेले चौकार होते Sad

इंग्लंड-विंडीज टेस्ट मॅच मधे तिसर्‍या दिवशी वेस्ट इंडिज पहिल्या डावात ४४/१ वरून पुढे दोनदा ऑल आउट होउन मॅच हरली. म्हणजे त्यांचे ९ लोक एकाच दिवसांत दोन आउट झाले असे होउ शकले असते - पण पहिल्या आणि दुसर्‍या डावात नाबाद राहिलेले बॅट्समेन वेगळे आहेत. म्हणजे एकूण ८ खेळाडू या एकाच दिवसांत दोनदा आउट झाले.

मी हे सुद्धा चेक करत होतो की कोणी असा नग आहे का की जो त्याच बोलर कडून परत आउट झाला - पण तसा एकही दिसला नाही Happy

एकेकाळी इंग्लंड सिरीज म्हणजे राखीव कुरण होते विंडिज वाल्यांचे - लॉइड-रिचर्ड्सच्या कप्तानपदाच्या काळात.

वेस्ट ईंडिज क्रिकेट ची अवस्था फारच केविलवाणी झालीये.

आजची भारत- लंका मॅच चुरशीची होईल असं वाटत असतानाच परत एकतर्फी झाली. धवन मिळालेल्या संधीचं सोनच काय पण प्लॅटीनम करतोय.

हो, पाहिली आणी आवडली. काही काही मोमेंट्स बघताना त्या लाईव्ह बघताना जी एक्साईटमेंट, हळहळ वगैरे वाटली होती, ते सगळं पुन्हा तसच वाटलं.

मजा आली दुसर्‍या मॅच मधे. भुवी काय क्लासी खेळला. "रिस्ट स्पिन वाचता न येणे" हे आज कल In दिसतेय. भुवीला फक्त शॉर्ट बॉल टाकण्याचे डावपेच एका लिमिट नंतर अनाकलनीय होते. धोनी नि मलिंगा दोघेही पूर्वीचे राहिले नाहित हे दिसायला लागलय पण धोनी अजूनही ice veins ठेवून खेळू शकतो हे सहीच आहे.

काल केदार जाधवला चांगला चान्स होता पण घालवला बेट्याने. रोहीत व धोनीने मस्त काढली मॅच.

बुमराह ने कडक बॉलींग केली. मजा आली.

पराग, सही पकडे है! Happy पण असं नाहीये. सद्ध्या खूप बिझी आहे. छान खेळला नो-हीट. Wink

आज वेस्ट इंडीज जबरदस्त जिंकले. मस्त झाली टेस्ट मॅच.

वेस्ट इंडीज ने इंग्रजांना हरविले हे अगदी भारी.. ४थ्या डावात तिनशेच्यावर धावा करुन हरविले हे जास्त विशेष!
परंतु विंडीजच्या दोन्ही डावात दोनच फलंदाज खेळले बाकीचे प्रभाव नाही पाडू शकले!

दोन फलंदाज तरी खेळले हे ही महत्त्वाचे आहे.. आधी आपण वेस्ट इंडीजला गेलो होतो तेव्हा अजूनच वाईट अवस्था होती..

बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला.

ऑसीच्या दुसर्‍या डावात वॉर्नर खेळला नसता तर अजून वाईट हार झाली असती!
अभिनंदन बांग्लादेशाचे ऐतिहासिक विजयासाठी!

लागोपाठ दोन दिवसात दोन टेस्ट मॅचेस प्रचंड चुरशीच्या झाल्या. बांग्लादेश पण जबरदस्त जिंकले. >>> टोटली. मस्त मॅचेस.

टोटली. मस्त मॅचेस.>>>

अश्या खालील रँकच्या संघाकडून हारताना हारणारा आपला संघ नाही ही सगळ्यात सुखावह बाब असते! Wink

Bangladesh's superstar all rounder Shakib Al Hasan becomes one of just four players to have a five-wicket haul against every other Test-playing nation.. ही भारीच कामगिरी म्हणायची !

Pages