Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< हारले की इन्ड्या. ऑसीज ची
<< हारले की इन्ड्या. ऑसीज ची बॉडी लॅन्ग्वेज हारल्यासारखी झाली आणि हारलो मात्र आपण >> ३००+ धांवा करूनही भारताला हरवणं एवढ अवघड जात असेल, तर ऑसीजच्या प्रतिमेला पडलेला तडा रुंदावतोच आहे असंच म्हणावं लागेल !!
ह्या मालिकेत धोनी आपला पुढच्या विश्वचषकातील स्थानाचा दावा पक्क्का कारतो आहे, असंच चित्र दिसतंय; यष्टिमागची व पुढची त्याची कामगिरी कौतुकास्पदच आहे !
केदार जाधव ची विकेट हा
केदार जाधव ची विकेट हा टर्निंग पॉइण्ट होता. धोनी थोडा आधी आला असता तर सेटल व्हायला त्याला वेळ मिळाला असता. बॉल बॅटवर येत नव्हता आणि धोनी ला ट्रू बाउन्स असलेल्या विकेट वर असतात तसे फटके मारणे जमत नव्हते, बॉल चा बाउन्स पाहायला ८-१० बॉल्स घालवण्याएवढा वेळ नव्हता. जाधव-पांडे जेव्हा खेळत होते तेव्हा ऑस्ट्रेलियाने गेम सोडल्यात जमा होती. खूप चुका होत होत्या त्यांच्या.
बाय द वे - हर्ष भोगले 'बिझार' म्हण्टला तसे सीन्स शेवटी दिसले. पाउसच दिसत नसताना इतकी कव्हर्स मैदानावर आणून कशाला वेळ घालवला कोणास ठाउक. त्याने तोपर्यंत चांगल्या फ्लो मधे असलेल्या भारताचा फ्लो मोडला. नंतर तो स्टीव्ह स्मिथ ने मागितलेला रिव्यू. इतका डम्ब रिव्यू पहिल्यांदाच पाहिला.
सकाळी रोहित आणि रहाणेनी भारी
सकाळी रोहित आणि रहाणेनी भारी बॅटींग केली एकदम !! एकदम क्लासिक शॉट्स मारत होते दोघेही.
<< केदार जाधव ची विकेट हा
<< केदार जाधव ची विकेट हा टर्निंग पॉइण्ट होता. >> केदार जाधव व पांडे ही जोडी आपला स्वाभाविक, आक्रमक खेळ खेळली असती तर धोनीला तणावाखाली खेळण्याची पाळी आलीच नसती; ती जोडी तसं खेळली नाही याला ऑसीजच्या गोलंदाजीपेक्षां त्या जोडीवर असलेलं संघातल्या स्थानाबद्दलच्या अनिश्चततेचं अतिरिक्त दडपण कारणीभूत असावं.
केदार जाधव व पांडे ही जोडी
केदार जाधव व पांडे ही जोडी आपला स्वाभाविक, आक्रमक खेळ खेळली असती तर धोनीला तणावाखाली खेळण्याची पाळी आलीच नसती; ती जोडी तसं खेळली नाही याला ऑसीजच्या गोलंदाजीपेक्षां त्या जोडीवर असलेलं संघातल्या स्थानाबद्दलच्या अनिश्चततेचं अतिरिक्त दडपण कारणीभूत असावं. >>
भाऊ असहमत . धोनी जर आधी आला असता तर तोही असाच (६९ बॉलमधे ६७ इतका स्लो), कदाचित यापेक्षा जास्त स्लो खेळला असता . त्याला आता फास्ट खेळण जमत नाहीये.
<< भाऊ असहमत . धोनी जर आधी
<< भाऊ असहमत . धोनी जर आधी आला असता तर तोही असाच (६९ बॉलमधे ६७ इतका स्लो), कदाचित यापेक्षा जास्त स्लो खेळला असता . त्याला आता फास्ट खेळण जमत नाहीये.>> केदारजी, धोनीला उतरती कळा लागलीय, असं मलाही वाटत होतं. पण सध्याचे त्याचे 'रिफ्लेक्सेस', स्टॅमिना, 'रनींग बिट्वीन विकेटस' पाहून मात्र तो अजूनही गुणवत्ता, फॉर्म व 'फिनीशर'ची प्रतिमा टिकवून आहे याबद्दल माझी खात्री पटली आहे. कदाचित, सौरवचंही खालील मत वाचून तुम्हाला माझ्याशी सहमत व्हावं असं वाटणंही अशक्य नाही-
Sourav Ganguly, the former Indian captain, credited Virat Kohli for MS Dhoni's success in limited-overs cricket this year. Dhoni has amassed 627 runs in 19 games at an average of 89.57 so far this year, and has staged brilliant rescue acts after the top order has failed. [http://www.cricbuzz.com/cricket-news/97177/india-cricket-captain-virat-k...
मला वाटते रोहित आणि रहाणेनी
मला वाटते रोहित आणि रहाणेनी भारी शॉट्स मारायच्या नादात रन रेट वाढवू शकले नाहित. रनिंग बीटवीन फारच स्लगिश वाटले नेहमीपेक्षा. सरासरी सहाच्या वरचा आस्किंग रेट असताना, पहिल्या पंधरा ओव्हरमधे पॉवर प्ले सुरू असताना रन रेट जर ७-८ चा नसला तर मधल्या ओव्हरस्मधे आस्किंग रेट वाढून शेवटी चेस करणे कठीण होते नि तसेच झाले.
भाऊ, धोनीला पूर्वी सारखे मनात येईल तेंव्हा हुकूमी उचलून मारणे कठीण जाते असे मलाही वाटते. तो मारत नाही किंवा प्रयत्न करत नाही असे नाही पण आधी ज्या बॉल्स ना तो नक्की मारेल असे वाटायचे तेच आज काल ५०-५०% मधे जातात असे वाटते. ह्याचा अर्थ त्याचा फिनिशर किंवा more accurately accumulating finisher हा रोल वठत नाहिये असे नाहि हेही मान्य आहे. त्याच्या किपीम्ग बद्दल सध्या तरी अजिबात प्रश्न नाहीये.
२४२ चा पाठलाग करताना भारताची
२४२ चा पाठलाग करताना भारताची नाबाद शतकी भागीदारी खूपच आश्वासक. अक्षर पटेलबद्दल मागे मीं तो बेरकी गोलंदाज असल्याचं म्हटलं होतं; आज कांहीं अंशीं तरी त्याने तें सार्थ ठरवलं !
आपल्या टीमने त्या हरलेल्या
आपल्या टीमने त्या हरलेल्या मॅचमधे भरपुर स्कोर केला की. साधारण असा मोठा स्कोर असतो तेव्हा आपण १७० १८० वगैरेवर ऑलआउट होऊन फालतु मधे हारल्याच्या कित्येक घटना असल्याने आपण उत्तम खेळलो असेच मी म्हणेन.
५-० ने जिरवायला हवे होते ऑसीजना अशी इच्छा प्रत्येकाचीच होती.
कालची मॅचही भारी होती.
कालची मॅचही भारी होती. शेवटच्या ओव्हर्समधली आपली बॉलिंग भारी होती आणि नंतर रोहीत, रहाणेची बॅटींगही पुन्हा एकदा अतिशय प्रेक्षणीय !!
दोघांनीही सुपर्ब शॉट्स मारले. एकेकाळी सलामीच्या जोडीसाठी आपल्याला जंग जंग पछाडावं लागत असे. त्यामानाने आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत असं वाटतं.
बाकी पोस्ट मॅच सेरेमनीमध्येही मांजर्या फार खडूसपणे प्रश्न विचारतो असं वाटतं !!
<< दोघांनीही सुपर्ब शॉट्स
<< दोघांनीही सुपर्ब शॉट्स मारले. एकेकाळी सलामीच्या जोडीसाठी आपल्याला जंग जंग पछाडावं लागत असे. त्यामानाने आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत असं वाटतं. >> सध्यां, आपण 'बॅटींग ऑर्डर' शेवटून सुरुं केली तरी सामने जिंकू, अशी सुखद परिस्थिती आहे !
ही संपूर्ण सिरीज खरच खूप सुखद
ही संपूर्ण सिरीज खरच खूप सुखद झाली. आपली ओपनिंग, मधल्या फळीतली बॅटींग, स्पिनर्स आणी फास्ट बॉलर्स, डेथ ओव्हर्स सगळच मनासारखं जमून आलं. Hope, this team goes from strength to strength.
काल पाकिस्तान हारेल असं अजिबात वाटत नव्हतं. अगदी ५५/५ असताना सुद्धा ७७ च हवे होते. पण लंकेनं मस्त काढली मॅच.
फे फे रोहित कसा खेळला काल
फे फे रोहित कसा खेळला काल ह्या difficult pitch वर ?
रोहित मस्तच खेळला. संपूर्ण
रोहित मस्तच खेळला. संपूर्ण सिरीज छान खेळला. त्याला सेट व्हायला जो वेळ लागला, त्या वेळेत रहाणे ने पेस सेट केला आणी तो grove मधे आल्यावर, रहाणे ने सपोर्टींग रोल घेतला. मला वाटतं, मागच्या रविवारच्या मॅच मधे पण हा पॅटर्न दिसला होता. रहाणे - शर्मा ही जोडी एकमेकांना छान काँप्लिमेंट करते असं मला वाटतं.
मस्त खेळला रोहित. बघायला मजा
मस्त खेळला रोहित. बघायला मजा आली.
मस्त खेळला रोहित. बघायला मजा
मस्त खेळला रोहित. बघायला मजा आली.
अँडरसनच्या कसोटीतल्या ४००
अँडरसनच्या कसोटीतल्या ४०० विकेटस पूर्ण झाल्या म्हणून इथं आश्चर्य व्यक्त होत असतानाच आज श्रीलंकेच्या हेरथनेही ४०० विकेटस पूर्ण केल्याची बातमी ! हल्लीं अखंड क्रिकेट मालिका चालूच असतात, त्यामुळेही गोलंदाजांच्या पोतडीत विकेटसचा भरणाही अखंड चालूच रहात असावा !!
भाऊ, अँडरसनने ५०० बळींचा
भाऊ, अँडरसनने ५०० बळींचा टप्पा ओलांडला.
सध्या ४००ला फारसा भाव नाही
हेरथ मुरली बरोबर overlap
हेरथ मुरली बरोबर overlap झाल्यामूळे केव्हढा झाकोळला गेला होता. What a savvy bowler he is. First orthodox spinner to claim 400. स्टुअर्ट मॅकगिल पण असाच वॉर्न च्या बरोबर असल्यामूळे मागे पडला होता.
<<भाऊ, अँडरसनने ५०० बळींचा
<<भाऊ, अँडरसनने ५०० बळींचा टप्पा ओलांडला.>> टायपिंग एरर; क्षमस्व.
<< हेरथ मुरली बरोबर overlap झाल्यामूळे केव्हढा झाकोळला गेला होता. .... स्टुअर्ट मॅकगिल पण असाच वॉर्न च्या बरोबर असल्यामूळे मागे पडला होता.>> खरंय. घरचं अधिक बोचरं उदाहरण म्हणजे बेदीमुळे तितक्याच कुवतीच्या बिचार्या शिवलकरला कायमचं काळोखातच रहावं लागलं !!
बिचार्या शिवलकरला >> हो तेही
बिचार्या शिवलकरला >> हो तेही परफेक्ट उदाहरण आहे. परत ह्यात बेदी असल्यामूळे क्रिकेट शिवाय इतर घटकही असणार ह्याची खात्री आहे. राजिंदर गोयल पण असाच सडवला गेला असे वाचल्याचे आठवते.
<< परत ह्यात बेदी असल्यामूळे
<< परत ह्यात बेदी असल्यामूळे क्रिकेट शिवाय इतर घटकही असणार ह्याची खात्री आहे >> निवडसमितीचे अध्यक्ष त्यावेळीं लाला अमरनाथ होते; अध्यक्ष मुंबईचा असता तर कदाचित बेदीच काळोखात राहिला असता !! शिवलकरचं बॅड लक !!
खर तर गावसकर बॉलर म्हणून
खर तर गावसकर बॉलर म्हणून बॉलिंग ओपन करून गेलाय तेंव्हा अजून फास्ट बॉलर घेण्यापेक्षा शिवलकरला खेळवायला हरकत नव्हती
रमाकांत देसाई सोडून अजून तेंव्हा कोण फास्ट बॉलर्स होते हो ? ( नंतर आलेले कपिल नि घावरी बाजूला ठेवतो)
पुढच्या आयपीएल च्या बिडींग
पुढच्या आयपीएल च्या बिडींग च्या वेळी, बेहरेनडॉर्फ वर आरसीबी आणी केकेआर मधे जबरदस्त बिडींग वॉर होणार असा अंदाज आहे.
पुढच्या IPL च्या आधी सगळे
पुढच्या IPL च्या आधी सगळे खेलाडू पूल मधे परत जाणार आहेत. किम्बहुना तसे आधी ठरवले होते. ऐन वेळी बदलून ३-४ ठेवून देतील मूलचे तर माहित नाही. पण सगळे परत गेले तर बर्याच जणांवर बिडींग वॉर होईल. पांड्या बंधू, बुमराह, भुवी, कोहली, रोहित , धवन जबरदस्त डिमांडमधे असतील.
मी फक्त आजच्या मॅच च्या, आणी
मी फक्त आजच्या मॅच च्या, आणी ते सुद्धा पहिल्या ५-६ ओव्हर्स च्या संदर्भात तसं म्हणालो होतो. पण ओव्हरऑल विचार करता, तुझं बरोबर आहे.
हो फे फे, फक्त आजच्या
हो फे फे, फक्त आजच्या सामन्याच्या पहिल्या दहा ओव्हर्स वर जायचे तर नक्कीच. फक्त पिच नि हवामान एकदम फास्ट सीम बॉलिंग साठी अनुकूल होते त्यामूळे आपण टॉस जिंकलो असतो तरी असेच काहिसे बघायला मिळाले असते. किंवा जानेवारीमधे आफ्रिकेमधे नि नंतर Down under काय दिसणार आहे त्याची हि झलक होती असे म्हणूया
भारताचे टीम (टी-२०) जिंकत
भारताचे टीम (टी-२०) जिंकत असताना असं म्हणणं कदाचित धाडसाचं ठरेल. पण भारताची टी-२० टीम, टी-२० साठी योग्य नाही असं मला वाटतं. ही तर वन-डे ची च टीम आहे, जिथे आपला अॅप्रोच हळू हळू इनिंग बिल्ड करून शेवटी हाणामारी करून मोठा स्कोअर करण्याचा असतो. तो तिथे चालतो सुद्धा. पण टी-२० साठी सातत्यानं आक्रमण करणारे ६- ७ फलंदाज टीम मधे हवेत असं मला वाटतं.
पण भारताची टी-२० टीम, टी-२०
पण भारताची टी-२० टीम, टी-२० साठी योग्य नाही असं मला वाटतं. ही तर वन-डे ची च टीम आहे, जिथे आपला अॅप्रोच हळू हळू इनिंग बिल्ड करून शेवटी हाणामारी करून मोठा स्कोअर करण्याचा असतो. तो तिथे चालतो सुद्धा. >> +१
२०१३ नंतर पहिल्यांदा सीरीज
२०१३ नंतर पहिल्यांदा सीरीज हरणार की काय भारतात?!
Pages