Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Dale Steyn, Muttiah
Dale Steyn, Muttiah Muralidaran and Rangana Herath ..
Source: http://www.cricket.com.au/news/shakib-al-hasan-five-wicket-haul-banglade...
वेस्ट इंडिज जिंकल्याचा
वेस्ट इंडिज जिंकल्याचा पूरेपूर आनंद झाला. तेही इंग्लंडमधे.
बांग्ला नि ऑसीज दोघेही तितकेच माजोरी आहेत असे माझे मत आहे. स्मिथ सलग दोन डाव चक्क खेळला नाही. अमलासारखाच त्याचा पर्पल पॅच सुरू झाला का ? स्टार्क नसल्याचा नि हेझलवूड पूर्ण फिट नसल्याचा पुरेपूर फायदा झाला. लंकेमधे हे दोघे होते तेंव्हा हाच बॉलिंग अॅटॅक भारी पडला होता. बांग्ला ला एव्हढ्या लंगड्या अॅटॅकबरोबर नाकि नऊ आले हि चिंतेची गोष्ट आहे. बांग्लादेश मरत मरत जिंकलेय. कमिन्स नि लाय्न खाली खेळून गेले. ऑसी मधे एखादा अजून एक ऑल राऊंडर असता तर बांग्ला हरले असते. चौथ्या डावात ऑसी बांग्लादेशमधल्या टेलर मेड खेळपट्टीवर एव्हढ्या जवळ आले is not really bad.
वेस्ट इंडीजने शेवटच्या दिवशी
वेस्ट इंडीजने शेवटच्या दिवशी अफलातून बॅटींगच्या जोरावर इंग्रजांना अस्मान दाखवलं. अर्थात यात इंग्लंडच्या कमालीच्या दळिद्री फिल्डींगचा तितकाच हात होता हा भाग वेगळा. ब्राथवेट आणि होप दोघांचेही स्लिपमध्ये कूकने कॅचेस सोडले. तरीही रॉस्टन चेस आऊट झाल्यानंतरही इंग्लंडला चान्स होता, पण ब्लॅकवूडच्या काऊंटर अॅटॅकमुळे ते बाराच्या भावात गेले. शेवटी २ रन्स बाकी असताना तो स्टंप झाला हा भाग वेगळा. (इथे १९७१ मध्ये ओव्हलवर ब्रायन लकहर्स्टच्या बॉलवर विश्वनाथ असाच आऊट झालेला आठवलं)! खासकरुन पहिल्या टेस्टमध्ये वाताहात झालेली असताना इंग्लंडमध्ये इंग्लंडला ठोकून काढणं... ब्रिलियंट! एक खास रेकॉर्ड म्हणजे हेडींग्लीच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये दोन्ही इनिंग्जमध्ये सेंच्युरी ठोकणारा शाई होप हा पहिलाच बॅट्समन.
बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला हरवण्याला माझ्यामते तरी फारसा काही अर्थ नाही. एकतर ही मॅच बांग्लादेशात होती. स्मिथ आणि वॉर्नर सोडल्यास आताच्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये एकही धड बॅट्समन नाही आणि हेझलवूड आणि स्टार्क (आणि काही प्रमाणात लायन) वगळता एकही धड बॉलर नाही. विकेटकीपर बॅट्समन म्हणून वेड तर साक्षात धन्यवाद आहे, त्यामुळे बांग्लादेश नशिबवान होते असंच म्हणावं लागेल.
जेम्स अॅण्डरसन ने लॉर्ड्स
जेम्स अॅण्डरसन ने लॉर्ड्स टेस्ट मधे दुसर्या डावात ७ विकेट्स काढून इंग्लंडला मॅच आणि सिरीज जिंकून दिली. एकूणच फास्ट बोलर्सच्या मानाने (आणि इंग्लिश बोलर्स च्या मानाने खूपच जास्त) याचा फिटनेस आणि फॉर्म बराच राहिला आहे. फास्ट बोलर्स चा भर साधारण जास्तीत जास्त दहा वर्षे असतो. अॅण्डरसन च्या स्विंग चा इफेक्ट पहिल्यांदा पाहिल्याचे आठवते ते पाक विरूद्ध २००३ च्या वर्ल्ड कप मधे (जेथे बहुधा त्याच मैदानावर ३-४ दिवसांनी नेहराने तेच त्यांच्यावर परतवले)
तेव्हापासून आत्तापर्यंत अनेकदा त्याने जबरी स्विंग बोलिंग केलेली आहे. ४-५ वर्षे चमकून गायब होणार्या इंग्लिश बोलर्सच्या पार्श्वभूमीवर हा उठून दिसतो.
१० पेक्षा जास्त वर्षे भेदक राहिलेले अगदी अपवाद असतील वासिम अक्रम सारखे. कपिल होता पण तो नंतर परदेशातच जास्त विकेट्स काढत असे. भारतात तो भेदक नव्हता शेवटची ५-६ वर्षे.
World XI वि. पाकीस्तान असे
World XI वि. पाकीस्तान असे सामने होणार आहेत म्हणे. पण World XI मधे एकहि भारतीय खेळाडू नाही याचे आश्चर्य वाटते. सामने पाकीस्तानात असले तर काय झाले? भारतात पाकीस्तानी खेळाडूंना येऊ द्यावे यासाठी इथे कित्येक लोकांनी तावातावाने लिहीले. मग भारतीय खेळाडूंना पाकीस्तानात जायला काय हरकत आहे?
गंमत म्हणजे इतर कुठल्याहि देशाला असे वाटले नाही की भारतीय खेळाडू World XI मधे असायला पाहिजे होते?
काय भानगड आहे?
एकूणच फास्ट बोलर्सच्या मानाने
एकूणच फास्ट बोलर्सच्या मानाने (आणि इंग्लिश बोलर्स च्या मानाने खूपच जास्त) याचा फिटनेस आणि फॉर्म बराच राहिला आहे. >> अरे आत्ताशीच तर तो वर्षभराची गॅप घेऊन आलाय रे जखमी असल्यामूळे.
आणि आल्या आल्या पुन्हा
आणि आल्या आल्या पुन्हा पहिल्यासारखी केलीय बोलिंग. हे कॉमन नाही फास्ट बोलर्स मधे इतके. एक बहुधा अक्रमच असेल जवळजवळ १५+ वर्षे फॉर्म राहिलेला.
अँडरसनच्या कामगिरीचं कौतुक
अँडरसनच्या कामगिरीचं कौतुक आहेच आहे; पण फास्ट गोलंदाजांसाठी निर्दय असणार्या उपखंडातल्या खेळपट्ट्यांवर बहुतांशी गोलंदाजी करूनही दीर्घकाळ भेदक रहाणं, हें वासिम व कपिल यांच्यासाठी अधिक कौतुकास्पद असावं !
एकदम सहमत, भाऊ!
एकदम सहमत, भाऊ!
बीसीसीआयने परवानगी दिली नाही
बीसीसीआयने परवानगी दिली नाही
खर तर नाही फा, आफ्रिकेविरुद्ध
खर तर नाही फा, आफ्रिकेविरुद्ध झगडला होता, विंडीज विरुद्ध घेतल्या विकेट्स. अॅशेस मधे तो पूर्वीच्या स्तराला पोहोचला कि नाही ते कळेल. तोवर जजमेंट पास करण्याची घाई नको . होल्डींग ने त्याच्या पाचशे विकेट्स नंतर त्याच्या मुख्य विकेट्स इंग्लंडमधे आल्या हा * राहणार हे आव्रजून सांगितले बाकी
आपल्याकडे एकदाच टेस्ट सिरिज खेळून गेला नि त्यात तो मेजर फॅक्टर होता असे आठवतय खर. स्विंग होत असेक तर अँडरसन सारखा डेंजर माणूस नाही असे आपले मत झाले आहे.
भाउ मार्शलचे नाव विसरलाय उपखंडांमधे भेदक फास्ट बॉलिंग करणार्यांमधे चक्क ?
जिमी अँडरसन एकदम सायलंट किलर
जिमी अँडरसन एकदम सायलंट किलर निघाला. म्हणजे त्याचे नाव असे मॅग्रा, मार्शल, लिली, वसीम किंवा वॉर्न, मुरली, कुंबळे सारखे नेहेमी टॉप १० ग्रेटेस्ट मध्ये वगैरे कधीच येत नाही. गेल्या १०-१२ वर्षात तो अधेमधेच खेळाच्या पानावर अग्रभागी दिसे. असे असताना त्याने ५०० बळी घेणे हे मला तरी एकदम 'धक्काच' बसला. म्हणजे 'अरे यानं कधी ५०० विकेट घेतल्या' असं झालं
मलाही तसेच वाटले टण्या.
मलाही तसेच वाटले टण्या. मॅग्राथ ने २००५ च्या अॅशेस टेस्ट मधे जेव्हा ५०० वी विकेट घेतली तेव्हा तोपर्यंत तो एकदम दिग्गज वगैरेंत गणला जाउ लागला होता. अॅण्डरसन बद्दल तसे कधी ऐकले नाही. बोलर्स मधला चंदरपॉल दिसतोय
तुमचा क्रिकेटचा व्यासंग कमी
तुमचा क्रिकेटचा व्यासंग कमी पडतोय असे म्हणायला लागेल. त्या रामलाल वाल्या जोक्ससारखे कधीतरी फा तू अमिताभ नि रेल्वेच्यापलीकडे नि टण्या तू नेमाडेंच्या पलीकडे जाऊन येत जा
2008 नंतर, स्ट्रॉस कॅप्टन असताना इंग्लंड चा टेस्ट रेकॉर्ड वाढता ठेवण्याचे मुख्य कारण अँडरसन होता. आधीचा inconsistent बॉलर एकदम बदलून गेला ह्या काळात. तो अधिक फिट पण झाला. इंग्लंडचा ४०० विकेट घेणारा बॉथम नंतर दुसरा बॉलर होता बहुतेक.
पण हाच पॉईण्ट आहे माझा, आणि
पण हाच पॉईण्ट आहे माझा, आणि बहुधा टण्याचाही. इतके करून सुद्धा त्याचे नाव इतके दिसत नाही. मॅग्राथ वगैरेंचे जसे दिसायचे चर्चेत.
कुठे दिसत नाही पण नाव ?
कुठे दिसत नाही पण नाव ? इंग्लंड किंवा ऑसीज फॉलो करत असलास तर भरपूर दिसले असते. इंग्लंडच्या प्रत्येक सिरीजच्या अगोदर अँडरसनचा फॉर्म नि फिटनेस ह्यावर चर्चा होत असे. (२००८ पर्यंत फॉर्म, २०१४ पर्यंत त्याचा पर्टनर नि त्या नंतर त्याचा फिटनेस). फक्त भारत फॉलो करत असलास तर भारताशी इंग्लंडची सिरीज असेल तरच दिसणार ना रे ?
अरे यार तू बेसिक मधे जायला
अरे यार तू बेसिक मधे जायला लागलायस. ठीक आहे. पूर्वी जसे अक्रम, मॅग्राथ वगैरेंची नावे घेतली जायची बोलर्स मधे, सचिन, लारा, पॉण्टिंग बॅट्समेन मधे, तसे कधी अॅण्डरसन बद्दल 'बझ' दिसत नाही. तुला बहुधा वाटते की आहे 'बझ'. दोन ओपिनियन्स. let's leave it there
एग्झॅक्टली फारेंडा.
एग्झॅक्टली फारेंडा.
असाम्या, मी अगदी मॅच बाय मॅच फॉलो करत नसलो तरी अधून मधून क्रिकइन्फोची फेरी मारत असतो. वरती फा ने म्हटल्याप्रमाणे अँडरसनची 'हवा' नाहिये. अगदी आजच्या जमान्यातले फास्ट बोलर म्हटले की डेल स्टेनचे नाव अधिक चर्चेत येत (असे). म्हणून अँडरसनने ५०० विकेट घेतल्या हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला.
दुसरे उदा. द्यायचे तर जे बॅडमिंटन मोठ्या मोठ्या हेडलाइन वाचूनच फॉलो करतात त्यांना रिओ ऑलिंपिकच्या आधी फक्त साइना नेहवालच माहिती होती. ती हारली तेव्हा त्यांना धक्का बसला मात्र सिंधूने रजत पदक मिळवल्यावर 'अरे ही कधी एव्हडी भारी झाली' अशी रिअॅक्शन आली. जे बॅडमिंटन खूप बारकाईने फॉलो करतात त्यांना मात्र तितका आश्चर्याचा धक्का बसला नाही.
असो. तू आता किस पाडशील तेव्हा इथेच थांबतो.
अरे वा. अँडरसन च्या ५००
अरे वा. अँडरसन च्या ५०० विकेट्स च्या निमित्ताने ह्या धाग्याला धुगधुगी आली हे पाहून बरं वाटलं. अँडरसन गेले काही वर्षं ईंग्लंड चा आधारस्तंभ आहे. पण वर फा, टवणे वगैरे लोकांनी लिहील्याप्रमाणे त्याचा 'बझ' मॅकग्रा, वासिम ईतका ऐकू नाही आला. कसा येणार! बझ ऐकू यायला तो काही आयसीसी रँकिंग मधे टॉप वर असलेला सर रविंद्र जडेजा थोडीच आहे! (ह्या वाक्याला उपरोधाचा स्पर्श झालाय असं वाटत असेल, तर तो दोष माझा आहे. मला संपूर्ण उपरोधिकच लिहायचं होतं. जो माणूस त्याच्या टीम मधे सुद्धा चौथा बॉलर म्हणून खेळतो तो जागतिक दर्जाचा प्रथम क्रमांकाचा बॉलर आहे, हे मी मान्य करणं अवघड आहे).
अर्थात ईंग्लंड च्या प्रत्येक सिरीज च्या आधी आणी सिरीज मधे त्याच्याविषयी चर्चा असते. पण एकंदरीतच मला हल्ली क्रिकेटर्स चं ते जुनं स्टारडम कमी झाल्यासारखं वाटतं. अति क्रिकेट मुळे असावं का?
पण एकंदरीतच मला हल्ली
पण एकंदरीतच मला हल्ली क्रिकेटर्स चं ते जुनं स्टारडम कमी झाल्यासारखं वाटतं. अति क्रिकेट मुळे असावं का? >> मलाही वाटते. अति क्रिकेट मूळे का हे सांगणे कठीण आहे. कोहली, धोनी ला अजूनही सॉलिड फॉलोइंग आहे बघ. करिस्मॅटिक प्लेयर्स कमी झाले असे असू शकेल.
'बझ' ऐकला नाहि म्हणजे काय हे मला अजूनही कळले नाहिये पण फा नि टण्याची समजावायची इच्छा नाहीये तेंव्हा सोडून देतो.
त्याचे ५ आणि १० विकेट हॉल्स
त्याचे ५ आणि १० विकेट हॉल्स कमी आहेत का ईतरांपेक्षा? म्हणजे एका मॅच मध्ये ५ आणि दुसरीत १ आणि तिसरीत ० विकेट्स घेण्यापेक्षा २, २, २ अश्या घेतल्या तर ५ घेतल्यावर होतो तसा बझ तयार होत नाही.
२४ ४W, 24 5W, 3 10W असे आहेत
२४ ४W, 24 5W, 3 10W असे आहेत त्याचे.
अक्रमचे २०, २५, ५ नि मॅक्राथ चे २८, २९, ३ , स्टेनचे २५, २६, ५ आहेत. Go figure
हम्म, आपलेच सोर्सेस अपडेट
हम्म, आपलेच सोर्सेस अपडेट करायला पाहिजे असे वाटते.
अजून दोनेक वर्षात ईग्लंडचा लीजेंडरी बॉलर म्हणून बझ ऐकू येईल असे वाटते.
आयपीएल मध्ये पण कमी दिसतो किंवा दिसतच नाही त्यामुळे 'किपिंग टॅब ऑन' होत नसावे.
आयपीएल मध्ये पहिली दोन वर्षे
आयपीएल मध्ये पहिली दोन वर्षे KKR मधे होता बहुतेक पण खेळला नाही का काय असे होते. मग त्याला कोणी, for that matter, मॉर्गन नि पीटरसन वगळता कोणालाच भाव नव्हता गेले वर्ष वगळता.
असाम्या पोल काढ इथे. अँडरसनचा
असाम्या पोल काढ इथे. अँडरसनचा बझ मॅग्रा/अक्रम/स्टेन इतका आहे की नाही असा.
पोल वगैरे काढायचा असल्यास
पोल वगैरे काढायचा असल्यास त्या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती म्हणून ऋन्मेष ला आमंत्रित करावं असा मी प्रस्ताव मांडतो.
आडदांड शरिरयष्टी, आक्रमक
आडदांड शरिरयष्टी, आक्रमक देहबोली, ओसंडून वहाणारा खून्नस अशी एक सर्वसाधारण प्रतिमा असते फास्ट गोलंदाजांची व त्यामुळे फ्लिंटॉफ, शोएब अख्तर सारखे त्या प्रतिमेत चपखल बसणारे गोलंदाज सहज लक्ष वेधून घेतात [अर्थात, याला मॅग्रासारखे दुर्मिळ अपवाद आहेत ]व माध्यमानाही त्यांच्यासोबत मिरवायला सोपं जातं. अँडरसन हा याच्या नेमका विरुद्ध, रिचर्ड हेडलीच्या पठडीतला, 'क्वायेटली एफिशियंट' गोलंदाज असल्याने ५००ची मजल मारेपर्यंतही दुमदुमला नसावा !
]
[ सगळेच यावर तावातावाने गोलंदाजी करताहेत म्हणून मींही हा वाईड बॉल टाकलाय , झालं !
मस्त चालली आहे मॅच.
मस्त चालली आहे मॅच. सुरूवातीच्या स्लॉगिंग नंतर आता क्लासिकल क्रिकेट शॉट्स मारत आहेत त्यामुळे मस्त वाट्त आहे बघायला. केदार जाधव च्या हिटिंग मधे थोडा कॅरिबियन फ्लेवर दिसतोय.
धोनी ला फुल सचिन सारखे
धोनी ला फुल सचिन सारखे रिसेप्शन! मस्त. पांडे चा बॉल थोडा खाली राहिल्याने उडालेला दिसतो. ऑल धोनी शो आता.
वास्तविक ऑस्ट्रेलियाची बॉडी लँग्वेज हरल्यासारखी आहे.
हारले की इन्ड्या. ऑसीज ची
हारले की इन्ड्या. ऑसीज ची बॉडी लॅन्ग्वेज हारल्यासारखी झाली आणि हारलो मात्र आपण
Pages