Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजच्या सामन्याने यंदाच्या
आजच्या सामन्याने यंदाच्या आयपीएल फायनलची आठवण करून दिली इंग्रजांना जिंकायची इच्छाच जाणवत नव्हती खेळ पाहताना..
>>इंग्रजांना जिंकायची इच्छाच
>>इंग्रजांना जिंकायची इच्छाच जाणवत नव्हती खेळ पाहताना..<<
भारत-पाक दुश्मनी मानेटाय्ज करण्याचा दुसरा एखादा मार्ग उपल्ब्ध आहे/होता का?..
आपापसातली मॅच कोण जिण्कली हे
आपापसातली मॅच कोण जिण्कली हे आता तरी बघितले जात नाही, मागे कधीतरी पाहिले होते हे.
>>>
१९९९ वर्ल्डकप ला होतं असं.
त्यामुळे सुपर सिक्सला गटात झिम्बाब्वे अव्वल होतं (भारताला हरवून अन साऊथ अफ्रिकेनी बाय दिल्यानी).
अन अफ्रिका - ऑस्ट्रेलिया सेमीफायनल टाय होऊनही (क्लूसनर नी खेचली अन क्लूसनरनीच घालवलेली मॅच) सुपरसिक्स मधल्या विजयामुळे (स्टीव्ह वॉ नी खेचलेली मॅच, गिब्ज नी टाकलेला कॅच) ऑसीज फायनलला पोचले.
अँकी - झिम्बाब्वे ने तेव्हा
अँकी - झिम्बाब्वे ने तेव्हा भारत व द. आफ्रिका दोघांनाही हरवले होते.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65218.html
आणि सेमी फायनल क्लूसनर ने नाही घालवली. त्याने तर ९ हवे असताना पहिल्या दोन बॉल्स वर दोन फोर मारून पुन्हा नंतर एक रन काढायला तो पळालाही होता. डोनाल्ड पळालाच नाही.
आपापसातली मॅच कोण जिण्कली हे
आपापसातली मॅच कोण जिण्कली हे आता तरी बघितले जात नाही, मागे कधीतरी पाहिले होते हे.>>
स्पर्धेची नियमावली ठरवताना आधीच हे अधोरेखित केले जाते ते त्या स्पर्धे पुरते मर्यादित असते असे असावे तेंव्हा गटात जर त्या संघाने हरविलेले असेल आणि दोघांचे गुण सारखे असतील तर गटात जिंकलेला संघ पुढील फेरी साठी पात्र व्हायचा!
सध्याच्या स्पर्धेसाठी तसे नव्हते त्यामुळे गुण समान झाल्यास निव्वळ धावगतीचा पर्याय आणि ते देखिल समान असल्यास गटातील विजेता संघ...
रच्याकने आज बांग्ला पेक्षा भारतच जिंकावा असे इंग्रजांना वाटत असावे त्यामुळे रविवारी चांगली कमाई होईल!
कालची मॅच मधे बर्याच गडबडी
कालची मॅच मधे बर्याच गडबडी दिसल्या आहे. इंग्लंड संघातील सर्वात अनुभवी स्पिनर मोईन अली याला अवघ्या २ षटक टाकण्यास दिली. ते सुध्दा अवघ्या ८ धावांची गरज असताना दुसरे षटक दिले. मधल्या ३६ -३८ षटकांच्या खेळात अजिबात गोलंदाजी दिली का नाही? जिथे जलदगती गोलंदाज चालत नव्हते तेव्हा दोन्ही बाजूंनी रशिद आणि अली या दोन फिरकीपटूना का लावले नाही? फखर आणि अझर या दोन्ही सलामीजोडींनी फिरकीचा सामना संपुर्ण स्पर्धेत केला ५-६ षटकांपेक्षा जास्त केला नव्हता हे इंग्लंडच्या थिंकटँक ला माहीती नव्हते का? खेळपट्टी कशीही असो, समोर कुठला ही संघ असो तरीसुध्दा मागील ९-१० वेळा इंग्लंडने सातत्याने ३०० च्या वर धावा बनवल्या होत्या. शेवटच्या २० षटकांमधे अवघ्या ६०- ७० धावा कशा निघाल्या ते सुध्दा हाती ७ विकेट असताना ? हॉल्स सोडल्यास बाकी सर्व फलंदाजाची सरासरी ५०-६० च्या दरम्यान होती.
हा सर्व प्रकार भारत - पाक सामना होण्याकरीता ?
आणि सेमी फायनल क्लूसनर ने
आणि सेमी फायनल क्लूसनर ने नाही घालवली. त्याने तर ९ हवे असताना पहिल्या दोन बॉल्स वर दोन फोर मारून पुन्हा नंतर एक रन काढायला तो पळालाही होता. डोनाल्ड पळालाच नाही.
>>>
क्लूसनरला एक रन घ्यायला ४ बॉल्स शिल्लक होते. तिसर्या बॉलवर रन न निघाल्यानी तो पॅनिक झाला अन चौथा बॉल जवळच असतानाही पळाला. डोनाल्ड त्या बॉल वर पळायचं एक्सपेक्टंच करत नवता आणि म्हणून लक्षात आल्यावर बॅट टाकून पळाला.
क्लूसनरला थोडा पेशन्स दाखवून उरलेल्या दोन बॉल्स मधे एक रन सहज काढाता आली असती.
झिम्बाबे अफ्रिका मॅच चं मात्र लक्षात नव्हतं.
आय गेस २००३ मधे बहुतेक ते केनिया / झिम्बाब्वे बरोबर न खेळल्यानी पुढे जाऊ शकले नव्हते.
एक विकेट चटकन गेली तरी
एक विकेट चटकन गेली तरी बांगलाने सुरुवात धडाक्यात केली होती. हे पोस्ट लिहिता लिहिता अजून एक विकेट पडली! चला ,गुड!
बंगाली इंग्रजांचे भारत
बंगाली इंग्रजांचे भारत-पाकीस्तानचे फायनलचे स्वप्न तोडतात की काय!?? सध्यातरी ते भारतिय बॉलिंग तोडतायेत!
अश्विनने महमुदुल्लाह चा कॅच
अश्विनने महमुदुल्लाह चा कॅच पकडला असता तर २५० च्या आटोपले असती बांग्लाची टीम.
धन्यवाद केदार जाधव. त्या कॅच ला कोहली चा फॉर्वर्ड ऐवजी हॉरिझाँटल चार्ज... स्मार्ट आणि थॉटफुल्ल..
२६५ तसे चांगले टार्गेट आहे
२६५ तसे चांगले टार्गेट आहे बांगलाच्या दृष्टीने ते लढू शकतात चांगल्या प्रकारे!
आज बॅटिंग बघायला खूप मजा येत
आज बॅटिंग बघायला खूप मजा येत आहे. सुंदर शॉट्स सगळे. कोहलीने आत्ता मारलेला तो थर्ड मॅन चा शॉट सिक्स वाटला. फोरच दिला बहुधा.
आज कोहलीचे टायमिंग तुफान होते
आज कोहलीचे टायमिंग तुफान होते!
मला तर रोहित ऐवजी केदार
मला तर रोहित ऐवजी केदार जाधवला मॅन ऑफ दि मॅच द्यावीशी वाटत आहे.
तमिम आणि मुशफिकुर खेळत असतांना कॉमेंटेटर ३३० चं टार्गेट बोलत होते, 'पेनल्टीचे पाच रन्स' दिल्याचं कारण झालं तेव्हा कोहली आणि धोनी दोघेही विकेट पडत नसल्यामुळे सॉलिड वैतागलेले दिसत होते.
अर्थात बॅटिंग चा फॉर्म बघता ३३० ही मारलेच असते म्हणा कोहली आणि टीम ने.
द्रुष्ट काढावी असे सीमलेसली
द्रुष्ट काढावी असे सीमलेसली खेळलेत आज.
रोहित ने चौथ्या कि पाचव्या ओव्हरमधे फिझ्झ्ला गुडघ्यावर बसून चाबकासारखी मारलेला square drive आजचा shot of the day होता. दिल खुश कर दिया. किती तरि दिवसांनी असा शॉट बघितला. फार क्वचितच हा शॉट दिसतो आजकल वापरलेला.
बांगलादेश ही काय टिम आहे का?
बांगलादेश ही काय टिम आहे का? आमच्या गल्लीतली पोरं मारतील त्याना! दे शुड नॉट इवन बी अलोउड टू पार्टिसिपेट!
त्यांनी पहिले ३०-४० ओवर्स
त्यांनी पहिले ३०-४० ओवर्स आपल्याला हाणलं ना ओ पण! नंतर विकेट्स गेल्या म्हणून बरं झालं.
<<त्यांनी पहिले ३०-४० ओवर्स
<<त्यांनी पहिले ३०-४० ओवर्स आपल्याला हाणलं ना ओ पण! नंतर विकेट्स गेल्या म्हणून बरं झालं.>>
तुम्हीच उत्तर दिलंत ! असो! टीम हरली काम संपले!
फालतुच वाटायची पण इतक्यात
फालतुच वाटायची पण इतक्यात बांग्लादेशींचं रँकिंग वेस्ट इंडीज पाक च्या वरचं आहे ना ?
वर्ल्ड कप मधे त्रास दिला होता आपल्याला
असामी अनुमोदन. रोहित आणि
असामी अनुमोदन. रोहित आणि विराट (आधी धवन पण) कसले जबरी खेळले. बर्याच दिवसांनी अशी क्लासी बॅटींग बघितली. टेक्निकली परफेक्ट, एकदम नजाकतदार वगैरे ! बादवे, रोहित रन्स करतो तेव्हा फेफ कुठे गायब होतात ?
मस्त खेळले काल...
मस्त खेळले काल...
डिफेंडिंग चँपियन्स सारखे. एकदम नो नॉन्सेन्स.
मजा आली (हायलाईट्स पहायला अन) ऑनलाईन फॉलो करायला.
रोहित फ्लो मधे असला की त्याचं टायमिंग केवळ असतं. अन एकदा फ्लो मधे आला की तो डावं उजवं काही बघत नाही. फोडून काढतो.
लोच्या हा आहे की तो अशा मूड मधे फार कमी असतो.
कोहलीचे काल वनडे मधले ८००० पूर्ण झाले. हा टप्पा फक्त १७५ डावांमधे ओलांडला. एबीडी ला याच्यासाठी १८२ डाव लागले होते.
सचिनची बर्यापैकी रेकॉर्ड्स कोहली रिटायर होईपर्यंत स्वतःच्या नावावर करेल असं वाटतंय.
टच वुड.
सर्वात जलद धावा काढण्याचे
सर्वात जलद धावा काढण्याचे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. ते रेकॉर्ड एबी तोडत आहे. एबीने बनवलेले रेकॉर्ड विराट स्वतच्या नावावर करत आहे. तर विराटचे रेकॉर्ड वर हमला हाशिम अमला करत आहे. वर भरीसभर अमला चे रेकॉर्ड डिकॉक तोडत आहे.
हे सगळे एकामागोमाग आहे.
एबी डिव्हिलिअर्स :-____222 213 39 9319
विराट कोहली :- _____183 175 28 8008
हशिम अमला :-_______156 153 10 7186
डिकॉक :- ____________85 85 4 3519
आता अजुन मज्जा!
हे बघा आता अजुन मज्जा!
एक वॉट्सअप फॉव्रड
एक वॉट्सअप फॉव्रड

बांगलादेशने काल एकही एक्सट्रा
बांगलादेशने काल एकही एक्सट्रा रन नाही दिली!
कालची रोहित शर्माची मोहम्मद
कालची रोहित शर्माची मोहम्मद आमिर ने काढलेली विकेट टिपिकल "२-३ बॉल्स बाहेर, मग एक आत" टॅक्टिक वापरून होती. पहिले दोन बॉल सरळ रेषेत बाहेर गेले. लगेच तिसरा स्विंग होउन आत आला. लेफ्ट आर्म बोलर चा आत येणारा बॉल बहुतांश लोकांना खेळायला अवघड जातो (इरफान पठाण ची हॅटट्रिक आठवा). इथे रोहित शर्माचे तेच झाले.
मात्र रिप्ले बघितलात तर बॉल ची सीम पोझिशन रोहित शर्माच्या लेग साइड कडे होती. म्हणजे तो इनस्विंग होणार हे उघड होते. हा इनिंग चा तिसराच बॉल, त्यामुळे दोन्ही साइड्स सारख्याच चकचकीत. त्यामुळे स्विंग कोठे होणार हे सीम पोझिशन वर असते. ओपनिंग बॅट्समन ने हे बघणे व त्याप्रमाणे बॉल च्या दिशेचा अंदाज बांधून खेळणे हे अपेक्षित असते. त्यात भारताचा प्लॅन लगेच हाणामारी सुरू करायची असा सहसा नसतो. म्हणजे बॉल बघून त्याप्रमाणे सुरूवातीला खेळणे हे ही अपेक्षित होते. मग रोहित कसा हुकला - पूर्णपणे लाइन च्या बाहेर खेळला? अनेक कारणे असू शकतातः
- इनस्विंग होणार हे लक्षात आले असेल, पण तरी लाइन चुकली असेल. तो किती स्विंग होईल याची कल्पना नसेल. त्यामुळे बॅट लाइनबाहेर राहिली
- रोहित शर्मा अनेकदा "लेझी" खेळतो असे ऐकले आहे. हा त्यातलाच प्रकार असेल. बॅट टेन्टेटिव्ह खाली आली पण स्विंग जमेस न धरता
बरेचदा नावाजलेले बॅट्समन इतके हुकतात तेव्हा ते आपल्याला दिसते तितके ढोबळ नसते. बहुतांश वेळा स्विंग जमेस धरलेला असतो, पण तो किती होईल याचा अंदाज चुकतो. रोहित चे काय झाले नक्की माहीत नाही.
आज पासून महिला वर्ल्ड कप.
आज पासून महिला वर्ल्ड कप.
भारत इंग्लंड पहिला सामना..
स्मृती मंधना छान खेळतेय!
भारतीय महिलांनी इंग्रजी
भारतीय महिलांनी इंग्रजी महिलांना ३५ धावांनी हरवले!!
भारी झाली मॅच एकदम... बॅटींग
भारी झाली मॅच एकदम... बॅटींग तुफान झाली काल आपली.. पण अजून धावा होऊ शकल्या असत्या. शेवटी ३ रन आऊट झाले तिथे मॅच पूर्णपणे हातात आली. तो पर्यंत मात्र ५०-५० चान्सेस होते.
. पण अजून धावा होऊ शकल्या
. पण अजून धावा होऊ शकल्या असत्या>>>>
पळून धावा काढण्यात कमी पडल्या!! अन्यथा किमान अजून २० धावा नक्की निघाल्या असत्या.
Pages