What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.
पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.
मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.
मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.
त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.
एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..
असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!
** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.
मी आश्र्विनी आणि पुरोगामी .
मी आश्र्विनी आणि पुरोगामी .
टोकाची मत मांडत आहेत.
भारत सरकार हिंदुत्व वादी आहे म्हणजे विज्ञान ,तंत्र ज्ञान वर लक्ष च देत नाही असा गैर समज झालेला दिसत आहे.
Wa वरील, एफबी वरील बाबा लोकांचे प्रवचन बघून आणि त्यांचे समर्थन करणारे bjp कार्यकर्ते ह्यांच्या कमेंट बघून .
भारत सरकार बजेट मध्ये आज पण research साठी पैश्याची तरतूद करते.
नवीन तंत्र एक तर भारतात विकसित करण्याचे प्रयत्न करते किंवा बाहेरील देशातून आयात करते.
रेल्वे,विमानसेवा,विमान तल आधुनिक तंत्र च आता वापरत आहे.
विविध, collages, shikshan Sanstha आधुनिक युगात च वावरत आहेत...
Covid लस भारताने पण निर्माण केली होती.
Medical scirnce मध्ये पण भारत प्रगती करत आहे.
राजकीय प्रचार वेगळा असतो आणि सरकारी काम वेगळ्या पद्धती नी चालते.
मोठमोठे उद्योग पती हिंदुत्व
मोठमोठे उद्योग पती हिंदुत्व वादी असले तरी प्रगत तंत्र ज्ञान विकसित करण्या कडे च त्यांचा कल असतो.
# मुझे भी कुछ कहना है
# मुझे भी कुछ कहना है
मी उदय .
बाय द वे ते बुली बाई प्रकरण झाले कधी हे कोणाच्या लक्षातही नाही , ते करणाऱ्यांना कायदेशीर समर्थन एकही हिंदू ने दिले नाही .
त्या म्हातरड्या एम एफ हुसेन ने हिंदू देवदेवतांची नग्न चित्र काढून विकली त्या बद्दल तुम्हाला काय म्हणायय आहे ?
त्याला राजआश्रय मुस्लिम देश कतार नेच दिला होता ना ?
बर तो ढोंगी कतार झाकीर नाईक ला पण मानाने बोलवतो ज्याने नुपूर शर्माच्या सुरत सुर मिसळला होता .
नुपूर शर्मा गुन्हेगार आहे तर झाकीर नाईक ला डोक्यावर घेण्याचे कारण काय ?
त्याच धर्मातील असेल तर तो अश्लील बोलू शकतो का ?
एम एफ हुसेन ने नग्न चित्रे त्याच्या सो कॉल्ड आदर्शची का नाही काढली ?
असा प्रश्न तुम्हाला कधीच पडला नाही का ?
रोज युद्धाचे प्रसंग संपले
रोज युद्धाचे प्रसंग संपले तेव्हाच माणसाची प्रगती सुरू झाली.<< ओहा !! मला वाटले
माणुस जेव्हा गरज पडते तेव्हा ती भागवण्यासाठी शोध कार्याच्या मागे लागतो .
युद्धजन्य परिस्थिती, आर्थिक उलथापालथ या काळात गरजा वाढतात त्या भागवण्यासाठी संशोधन वाढीस लागते. युद्धजन्य परिस्थितीत कायद्यच्या चौकटीबाहेर चे संशोधन मोठ्या प्रमाणवर १ ल्या व दुसर्या महायुध्द्दाच्या काळात केले गेले. युद्ध संपल्यावर आर्थिक घडी बिघडलेली होती ती सावरण्यासाठी जे शोध लावले त्याचा व्यवसायीक उपयोग युरोप मधल्या देशांनी केले. ब्रिटीशांनी मोकळे सोडल्यावर युरोपमधिल युद्ध पश्चात परिस्थितीचा उपयोग करुन घेण्याची भारताल ६९ वर्षात गरजच वाटली नसावी. किंवा युरोपमधल्या बदलाचे वारे तत्कालीन राजकारण्यंनी समांन्यापर्यंत पोहोचुच दिले नाहीत. एका धार्मिक चौकटीत समाजाला व्यवस्थीत रित्या जखडून ठेवले. आणि आजुनही ती चौकट तोडण्याचा सध्याच्या सरकारकडून प्रयत्न होतो आहे असे वाटत नाही. मेक इन इंडिय सारखे स्तुत्य उपक्रम काढले जातात आणि जेथे तोंडावर पडतात तिथे धर्माच्या आड लपतात.
भारत सहिष्णू, शांत आणि
भारत सहिष्णू, शांत आणि सुरक्षित असेल तर कधी होतेय भारतात फुटबॉल वर्ल्डकप किंवा ऑलिपिंक्स? >>
केवळ महान logic!
बर तो ढोंगी कतार झाकीर नाईक
बर तो ढोंगी कतार झाकीर नाईक ला पण मानाने बोलवतो ज्याने नुपूर शर्माच्या सुरत सुर मिसळला होता .
कतार काही खूप मोठा सामर्थ्य वान देश नाही.भारत सहज त्याच्या वर दबाव टाकू शकतो.
पण इच्छा हवी त्या साठी.
झाकीर ला पकडायच नसेल तर .?
हे खरं आहे !
हे खरं आहे !
इच्छा शक्तीचा अभाव आहे या सरकार मध्ये किंवा असेही म्हणता येईल झाकीर नाईक ओवेसि गँग भाजप साठी सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत.
ते बोलत राहतील तसे भाजपची आणि एम आय एम ची मते वाढतील .
ओवेसी मुळे त्या भागातील काँग्रेसची अवस्था भाकड म्हशी सारखी झाली तरी लीब्रूज मान्य करत नाही आणि आमची भाकड म्हैस देखील शेर भर दूध देवू शकते च्या वल्गना करत बसतात.
बर लिबृज ना ओवेसी बंधूंच्या फाटक्या तोंडाचा देखील आक्षेप नसतो बरं का ! त्यावेळी त्यांना उकळ्या फुटत असतात ,
सतत भाजप द्वेषमूलक विचार डोक्यात ठेवले असल्यामूळे .....
त्या मुळे ममता पण काँग्रेस
त्या मुळे ममता पण काँग्रेस बरोबर जाण्यास टाळाटाळ करत आहे.
मुस्लिम मत ही bjp विरोधी च आहेत.
पण त्या मतांचे विभाजन bjp barobar घडवून आणत आहे.
अगोदर सेने ला आणि आता शिंदे ना bjp का मस्का मारते.
त्यांचे हट्ट पण पुरवते.
कारण मराठी मत त्यांच्या कडे आहेत.
नाहीतर केंद्रात सत्ता आहे , धन भरपूर आहे .
तरी
कोणालाच बरोबर घेणार नाही अशी भूमिका ते घेत नाहीत..
हे तर राजकीय डावपेच आहेत.
फक्त हिंदू एकवटला तर bjp ला
फक्त हिंदू एकवटला तर bjp ला बाकी कोणाच्याच मताची गरज नाही.
हे तर सरळ आहे.
हिंदू न वर ,त्यांच्या देव देवतांवर जितकी टीका होईल तितके हिंदू bjp कडे जातील..
हे आणि असे च दर वेळेस होते.
आर्थिक बाबी वर मत देण्या इतके मतदार भारतात प्रगल्भ नाहीत.
चांगले काम करून निवडणुका जिंकता येत नाहीत.
सिनेमा मध्ये लफडी,कमी कपडे घातलेल्या अभिनेत्री, असतात च .
लोकांना तेच आवडत त्यांची तीच आवड आहे.
चांगले दर्जेदार कथानक त्यांना नको वाटतं.
https://www.google.co.in/url
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://m.youtube...
दोन्ही देशातील वातावरण जितके
दोन्ही देशातील वातावरण जितके वाईट तितके दोन्ही देशातील राजकारणी खुश असतात.
निवडणुका जिंकायच्या तो हुकमी aikka आहे
पाकिस्तान मध्ये ईश निंदा च्या
पाकिस्तान मध्ये ईश निंदा च्या आरोपाखाली एका चीनी नागरिकाला पोलिसांनी अटक केली .
या पूर्वी ख्रिश्चन आणि हिंदू लोकांना इशनिंदा आरोपाखाली
कायदा हातात घेवून मृत्यू दंड देणारी पाकिस्तानी जनता आता बघायचय काय करते .
त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या
त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. >>> = ११८=९२ = २६, सध्या कितव्या नंबरवर आहे पाक आणि हिंदुस्थान ? तेव्हा २६ नंबरने मागे होतो, ७ वर्षात हिंदुस्थानची लोकसंख्या वाढली असेल मग अजून मागे गेलो असू कदाचित , pls अपडेट द्या किंवा कोणत्या साईटवर पाहता येईल ते सांगा ???
https://worldhappiness.report
https://worldhappiness.report/ed/2022/happiness-benevolence-and-trust-du... ह्या साईट वर जाउन थोडे वाचन केले, स्कोर कसा काढतात ती एक्सेल फाईल बघितली. त्यावरुन असे लक्षात आले की लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स हा खालील सात गोष्टीवर ठरवला जातो. प्रत्येक गोष्टीवर स्कोर काढतात आणि सात स्कोरची बेरिज केली की हॅपीनेस ईंडेक्स येतो.
१> GDP per capita
२> Social support
३> Healthy life expectancy
४) Freedom to make life choices
५) Generosity
६)Perceptions of corruption
७) Dystopia (1.83) + residual
पहिल्या सहा बाबातित साउथ एशिया मधल्या सगळ्या देशापेक्षा भारताचा स्कोर चांगला आहे आणि Dystopia (1.83) + residual चा स्कोर नाही पकडला तर भारत साउथ एशिया मध्ये पहिला आहे. पण भारताचा Dystopia (1.83) + residual स्कोर खुपच कमी आहे त्यामुळे जर सगळ्या गोष्टी पकडल्या तर भारताचा नंबर जगात १३६ वा तर साउथ एशिया मध्ये शेवटुन दुसरा आहे. बांगलादेश ९४ तर पाकिस्तान ११२ आहे.
Dystopia (1.83) + residual काय आहे आणि त्याचा स्कोर कसा काढतात. बाकीच्या बाबतित अंदाज लावता येतो. ज्या देशाचे उत्पन्न जात त्याचा GDP per capita स्कोर चांगला आहे. फक्त Dystopia (1.83) + residual बद्दल काहीच कळले नाही. कोणाला माहित आहे का?
<< सध्या कितव्या नंबरवर आहे
<< सध्या कितव्या नंबरवर आहे पाक आणि हिंदुस्थान ? तेव्हा २६ नंबरने मागे होतो, ७ वर्षात >>
भारतात गेले ७ वर्ष अराजक आहे, त्यामुळे भारताचा नंबर अजून खाली गेला असेल आणि पाकिस्तानात तर आनंद ओसंडून वाहतोय, त्यामुळे त्यांचा हॅपीनेस इंडेक्स नंबर अजून वर गेला असेल आता.
मूळ स्थान सोडून रोजगारासाठी
मूळ स्थान सोडून रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात,शहरात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण जिथे जास्त तिथे unhappy लोकांचे प्रमाण जास्त.
पहिले देशांची नाव बघितली की लक्षेत येईल
हेच गणित कळत नाही .
हेच गणित कळत नाही .
पाकिस्तान गेली कित्तेक वर्ष झाले आय एक एफ , सौदी आणि चायना च्या दयेवर जनतेला पोस्तोय .
साहजिकच हातातोंडाशी कधी तरी गाठ पडत असेल तरी इंडेक्स मध्ये भारताच्या वर ?
कमाल आहे ....
मस्त ध्रुवीकरण होतंय.
मस्त ध्रुवीकरण होतंय.
Dystopia Residual – It is the
.
हे ईंडेक्स बनवण्यासाठी
हे ईंडेक्स बनवण्यासाठी भारतातल्या किती लोकांना विचारले होते? १३२ कोटी पैकी किती लोकांना विचारले तर संख्याशास्त्रानुसार बरोबर सँपल साइझ होतो?
आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मते पाश्चिमात्य देश वेगळ्या चष्म्यातून भारताकडे पहातात. मी सहमत आहे.
आपली संस्कृति फार पुरातन आहे नि आपण ती पाळल्यामुळेच आपण परकीय आक्रमणे, वाढती लोकसंख्या, अजूनहि चीन नि पाकिस्तानच्या आक्रमणांना उत्तर देत प्रचंड प्रगति केली आहे.
आपल्यासमोर अजूनहि काही प्रश्न असतील, पण ते कसे सोडवायचे ते आपणच ठरवले पाहिजे.
उगीच परकीय असे असे म्हणतात ते खरे असेलच असे नाही.
एक सर्वात मोठा इंडेक्स मी मानतो की आजकालच्या कित्येक भारतीय मुलामुलींना परदेशात कायमचे रहायला जावेसे वाटत नाही, भारतातच ते सुखी आहेत. हा सर्वात मोठा पुरावा आहे की भारतात अनेक लोक सुखी आहेत.
अमेरिकेतल्या सारख्या गोळ्या घेऊन लहान मुलांना मारत सुटत नाहीत.
कुटुंब व्यवस्थेचं रहास (योग्य
कुटुंब व्यवस्थेचं रहास (योग्य शब्द लीहता आला नाही) भारतीय लोकांची बचती च सवय मोडून त्याला चंगळवादी बनवले गेले,.
लिव्ह इन,अनैतिक शारीरिक संबंध, आहारात झालेला बदल
हे खूप ठरवून केले गेले.
त्या साठी मोठे प्लॅन करून प्रचार मोहीम राबवली गेली
ह्या सर्व बदला मुळे भारताच्या बल स्थानावर च आघात केला गेला .
असे मला वाटत.
आपल्याला काय वाटतं.
परवा दिवशी अतेरिक्यानी
परवा दिवशी अतेरिक्यानी लष्कराच्या ट्रक वर बॉम्ब फेकून केलेल्या हल्ल्या मुळे ट्रक पेटून पाच जवान शहीद झाले .
त्या जवानांचे निपचित पडलेले मृतदेह पाहून संपूर्ण देश हळहळला .
पण काही मुस्लिम लोकांनी त्या घटनेचे फोटो मीडियावर अतीक अहमद का बदला या टॅग लाईन ने व्हायरल केले .
कसली ही विकृती ?
तुमचा राग मोदी / योगी / आर एस एस / भाजप वर आहे तर त्यांच्यासाठी विकृतीची पातळी गाठा, आमचे काहीही म्हणणे नाही .
पण सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांबाबत काही लोकं हिन वृत्ती जोपासून अतेरिक्याना आणि पाकिस्तान ला सहानुभूति का दर्शवत आहेत ?
या विकृत लोकांबद्दल फॅक्टचेकर जु बेर , राणा , अर्फा गप्प का असावेत ?
त्या साठी मोठे प्लॅन करून
त्या साठी मोठे प्लॅन करून प्रचार मोहीम राबवली गेली
ह्या सर्व बदला मुळे भारताच्या बल स्थानावर च आघात केला गेला .
असे मला वाटत.<<< मग ह्या विरोधात काम केले जाते त्या संघटनेला का विरोध केला जातो.
वीज पडल्या मुळे लष्कराच्या
वीज पडल्या मुळे लष्कराच्या ट्रॅक ला आग लागली अशी बातमी मीडिया नी दिली होती.
काहीच तासात ती बदलून दहशत वादी हल्ला झाल्या मुळे आग लागली अशी बातमी दिसू लागली होती
ते सत्यपाल मलिक ना पण CBI ची
ते सत्यपाल मलिक ना पण CBI ची नोटीस आली म्हणे!
जी 20टुरिझम ग्रुप च्या मीटिंग
जी 20टुरिझम ग्रुप च्या मीटिंग जम्मू काश्मीर मध्ये 22ते
24 मे दरम्यान होणार आहेत .
काश्मीर मध्ये शांतता आहे , जन जीवन सुरळीत चालले असल्याचे मेसेज त्या मीटिंग च्या निमीत्ताने सर्व जगापुढे गेला असता .
पण त्या अगोदर पाकिस्तान पुरस्कृत जैश ए मोहम्मद च्या भेकड अतिेक्यांनी त्यांच्या पवित्र रमजान महिन्यात लष्कराच्या ट्रक वर हल्ला करून पाच जवानांचा अंत घडवून आणला .
बर त्या ट्रक मध्ये रमजान साठीचे रेशन होते असे बातम्यात आले आहे .
आता मोदी काश्मीर मधील मीटिंग इतरत्र शिफ्ट करण्याची शक्यता बिलकुल नाही , पण मीटिंग नंतर त्या पाच जवानांच्या हत्येचा बदला नक्कीच घेतला जाईल असे वाटते.
कारण भारतात अतिरेकी हल्ल्यास जबाबदार असलेल्या तीन चार जणांना पाकिस्तान मध्ये अज्ञात लोकांनी गोळ्या घालून 32 हुरो कडे पाठवल्याच्या बातम्या आल्या होत्या .
एक तर भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान मधील लोकांना पैसे पुरवून त्यांच्या हत्या घडवून आणल्या असाव्यात किंवा आय एस आय ने त्या भाडोत्रिंची गरज संपली म्हणून त्यांना संपवले असावे .
बरं भारतीय लष्करातील पाच जवानांना मारल्या मुळे पाकिस्तान मधील सामान्य लोकांचे हाल अजून वाढतील .
आय एम एफ ने पाकिस्तान वर लादलेल्या अटी मध्ये दहशत वाद्यांवर कंट्रोल करावाच लागेल आणि अतेरिक्याना पत पुरवठा थांबवला तरच पुढील भीक मिळेल असे पूर्वीच ठणकावून सांगितले होते .
थोडक्यात पूंछ मध्ये भ्याड दहशतवादी हल्ला करवून पाकिस्तान ने स्वताच्या पायावर धोंडा मारून घेतला असावा !
आश्चर्य याचे वाटते की भारताच्या शत्रू देशांबद्दल सॉफ्टकॉर्नर असलेल्या ट्विटर किंवा इतर मीडिया गाझी ना
पूंछ हल्यातील जवानांच्या मृत्यूस जबाबदार भाजप असल्याचे पुरावे अजून सापडले नाहीत .
आता २०२४ च्या निवडणुका जश्या
आता २०२४ च्या निवडणुका जश्या जश्या जवळ येतील तसतसे हे आधी वीज पडणे आणि नंतर त्यातून अतिरेकी निघणे सम प्रकार किंवा खराखुरा अतिरेकी हल्ला वाढत जाईल.
आताचा हल्ला सोडून द्या. आगे आगे देखो..
पुरावे सापडायला तीन चार पाच वर्षे लागतात. तोपर्यंत पुढल्या निवडणुकीची वेळ येते. तोपर्यंत इतका propaganda करता येतो की भविष्यात उघड होणार असलेल्या पुराव्यांना अर्थच राहात नाही.
( ताज्या हल्ल्याविषयी लिहिलेले नाही. फक्त पुढची शक्यता वर्तवली आहे.)
हल्ला कोणीही केला तरी माणसांचा जीव जातो. म्हणून तो निंदनीयच असतो.
कदाचित पाकिस्तानी अतेरिक्याना
कदाचित पाकिस्तानी अतेरिक्याना भाजपच सांगत असेल.
इकडे हल्ले करा , म्हणजे पुन्हा आम्ही बहुमतात येवू ?
हो ना ?
आणि आत्ता पर्यंतच्या सगळ्या हल्ल्यात भाजप चे पुरावे सापडले नाही म्हणजे रॉ आणि मिलिटरी अनालीसीस विंग देखील निष्क्रिय झालेली असणार !
शिवाय जम्मू काश्मीर मध्ये तैनात असलेल्या खांग्रेस प्रेमी एकाही लष्करी अधिकाऱ्याला पुलवामा सारख्या घटनेत भाजप वर संशय येवू नये म्हणजे अतीच झाले .
का सत्यपाल सारखे त्यांनाही सध्या देशाच्या सुरक्षितते पेक्षा पैसा महत्वाचा वाटतोय ?
अवघड आहे हो !
भाजपचे पुन्हा सत्तेत येण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे कपट कारस्थान उघडकीस आणण्याचे शिवधनुष्य आपल्या सारख्या देशप्रेमीना उचलावे लागत आहे .
ब्रेवो !!!!!
पाकिस्तानी माजी लष्कर प्रमुख
पाकिस्तानी माजी लष्कर प्रमुख बाजवा ने पत्रकारांसमोर सांगीतले भारता बरोबर युद्ध करण्याच्या परिस्थितीत पाकिस्तान नाही , टँक खराब झाले आहेत , डिझेल साठी पैसे नाहीत .
त्यामुळे लष्कराच्या प्रवकत्याला तातडीने पत्रकार परिषद घेवून भारता बरोबर आम्ही कुठेही युद्ध करू शकतो सांगावे लागले .
थोडक्यात पूर्ण पाकिस्तानची हालत खराब आहे , लोकांना अन्न खायला भेटत नाही पण काश्मिरप्रश्नावरून भारता बरोबर पंगा घ्यायची इच्छा काही मरत नाही .
https://twitter.com/zPopzz
https://twitter.com/zPopzz/status/1652042853604794372?s=19
पाकिस्तान मध्ये रस्त्यांवरील फळांच्या गाड्यावर हल्ले करवून तुटमार ....
Pages