नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजपासून बापमाणूस नावाची मालिका सुरू होतेय >>> ही लललो च्य जागी येतेय ना

म्हणजे लोचा संपली कि काय???
काय दाखविला शेवट???

अन्जु एवढाच दाखवला शेवट?-त्याच्या बहिणीला खरं काय ते कळलं का नाही तो व्हिलन तिला फसवत असतो ते?

बापमाणुस खात्रीने साऊथ चा रिमेक असणारे
प्रोमो वरून तेच वाटतंय
फक्त ढाचा बदलून मराठी केलाय बाकी अ आणि आ प्रसंगाची रेलचेल असणारे

रविंद्र मंकणी आवडतात. त्यांची बायको दाखवली आहे ती कलाकार कोण आहे. सतरा खोल्यांचा वाडा म्हणजे सतराशे साठ माणसं आणि तेवढीच उपकथानकं असणार.

लव्ह लग्न लोचाचा आजचा भाग बघून एक मोठ्ठा प्रतिसाद टाईप केला होता इथे. सेव्ह करताना नेमकं नेट गेलं आणि कमेंट गायब Sad

असो.. मालिका अर्धी फिल्मी नी त्याहून जास्त बालिश होत चाललीये.

बापमाणूस थोडी बघितली, जुना फॉर्म्युला वाटतोय. घरात राजकारण, बाहेर राजकारण. वजनदार family, मोठं कुटुंब. कलाकार काम चांगलं करतायेत. पल्लवी पाटील रुंजी झाली होती, ती चांगला अभिनय करते. मला आवडतो तिचा अभिनय, ह्यात व्हिलन किंवा ग्रे शेड वाली आहे पण आवडलं तिचं काम आज मला. बरेच नवीन कलाकार आहेत. पल्लवीचा नवरा संग्राम समेळ पण आहे यात, टायटल song मध्ये, प्रोमोज मध्ये दिसला.

रुद्रमचे मुडे दिग्दर्शक आहेत.

'बापमाणुस' अंजू म्हणतीये तशीच असेल, जुनाच फोर्म्युला तर आपला पास ह्या सिरीयलला. 'राजकारणाचा वारसदार कोण' ह्यावरच सगळं आहे असं पहिल्या एपीतुन तरी वाटतय.
अजुन ४-५ भाग झाल्यावर नक्की काय ते कळेल एखादा ट्विस्ट आहे का काय.
पुतण्या व पुतणी दादासाहेबांच्या विरुद्ध कारवाया करणार व अति गुणी मुलगा सुयश टिळक त्या हाणुन पाडणार.

पुतण्या व पुतणी दादासाहेबांच्या विरुद्ध कारवाया करणार व अति गुणी मुलगा सुयश टिळक त्या हाणुन पाडणार. >>> हो ना बोअर होणार सर्व तेच तेच. मी त्यामुळेच बघणार नाहीये.

हो आबासाहेब, प्रदीप पवारची मुलगी. ती फार यंग आहे, पण इथे वयस्क दाखवली आहे. रोल जबरदस्त असेल म्हणून स्वीकारला असेल.

हो आबासाहेब, प्रदीप पवारची मुलगी. ती फार यंग आहे, पण इथे वयस्क दाखवली आहे. रोल जबरदस्त असेल म्हणून स्वीकारला असेल.

प्रमोद पवारांची मुलगी वेगळी आहे तिच नाव पूर्वा पवार
हि पूजा पवार ही यंग नाहीये ,झपाटलेला मधे लक्ष्मीकांतची हिराॅईन होती.

प्रमोद पवारांची मुलगी वेगळी आहे तिच नाव पूर्वा पवार >>> हो बरोबर मी confused झाले. वरती चुकून प्रदीप पवार पण लिहिलं. मला हीच वाटली प्रमोद पवारांची मुलगी.

अरे बरोबर, sorry. ही वेगळी मी तिला प्रमोद पवारांची मुलगी समजत होते. हा आता आलं लक्षात ही सर्जाची हिरोईन का, मग यंग नाही एवढी.

सतरा खोल्यांचा वाडा म्हणजे सतराशे साठ माणसं आणि तेवढीच उपकथानकं असणार. बापमाणूस थोडी बघितली, जुना फॉर्म्युला वाटतोय. घरात राजकारण, बाहेर राजकारण. वजनदार family, मोठं कुटुंब>>>>> खर तर हि स्टोरी डेलिसोपची. मग हि सिरियल झीमराठीवर असायला हवी, झी युवावर का आणली? Uhoh

मग हि सिरियल झीमराठीवर असायला हवी, झी युवावर का आणली? >>>>>> रूद्रम नंतर झी युवा वर तरी काय आहे पाहण्या सारखं ???

झी नाम ही काफी है... मराठी काय अन युवा काय.... पाणीच पाणी दोन्हीकडे Wink

सगळीकडे तेच, फक्त झीच्या घसरल्या तरी पेक्षक बघत रहातात. गोठ पण गणपतीपासून पार रसातळाला गेली. ती सरस्वती अजूनही सुरु आहे हे कळलं.

निलकांतीने सोडली का गोठ. शेलारबाई आल्या आहेत तिथे. मानबाचा रिपीट बंद झाल्यापासून बघत नाही, रात्री दोनपर्यंत रूपआयुर का काय विकत असतात झीवर. तुझ्यात जीव रंगला आहे तिथेच आहे, फक्त मास्तरीणबाई आता जर्मन शिकत आहेत. राणा झोपतो आणि ती अभ्यास करते, कसले निरस आहेत दोघं.

निलकांतीने सोडली का गोठ >>> आहेत. मी पण खूप दिवसांनी सलग तीन दिवस बघितली. पण आता त्यांची भूमिका संपणार किंवा गोठ तरी संपणार असा अंदाज. त्यांनी गोठ नाव टाकून मग्ज वाटले टीमला, असं प्रवाह फेसबुकवर वाचलं.

हो आज दिसल्या पाटेकरबाई. सगळ्याच मालिका अ आणि अ आहेत. घाडगेे, राधा प्रेम रंगी रंगली, नकळत सारे घडले आणि लेक माझी लाडकी अगदीच कैच्याकै आहेत. होम मिनिस्टरला टक्कर म्हणून जो कार्यक्रम सुरू केलाय त्यातही काही राम नाही, बांदेकरांना तर अजिबातच टक्कर देऊ शकत नाही.

बापमाणूस च्या जागेवर "गुलमोहर" नावाची नवीन मालिका सुरू होत्ये ना ? कास्टिंग तगडी आहे - विक्रम गोखले, सुहास जोशी, क्षिती जोब आणि अजून बरीच नावं दिसली.

नाही बापमाणूस साडेआठला असतं. गुलमोहर रात्री साडेनऊ सोम मंगळ. शशांक केतकर, संस्कृती बालगुडे पण आहे. गुलमोहर नावाचे नाटक होतं पूर्वी त्यावरून आहे की काय. मराठी माहीती नाही पण हिंदी नाटक होतं. मी लहानपणी नागदा, मध्यप्रदेश इथे बघितलेलं. फार काही आठवत नाही.

हो मी पण प्रोमो पाहिला गुलमोहरचा. उमेश कामत, गिरिजा गोडबोले, श्रेयस तळपदे पण आहेत.
नात्यांचा गुलमोहर फुलला तर आयुष्य सुंदर आहे... असा caption पण दिलाय insta वर.

उमेश कामत आहे का, अरे भारीच. मी उशिरा बघितलं की काय ? वेगवेगळ्या स्टोरीज पण असतील कदाचित.

Insta वर नाहीये मी.

अन्जूताई, तू पण उमेश कामत फॅक्लत आहेस का?? Happy
त्याचं नाव बघितल्यावर मी बघणार हे नक्की केलं. Happy

वेगवेगळ्या स्टोरीज पण असतील कदाचित.>> मला पण असंच वाटतंय.

Pages