Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08
२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...
लव्ह लग्न लोचा
फ्रेशर्स
बनमस्का
इथेच टाका तंबू
श्रावण बाळ रॉ़क स्टार....
सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालची कथा पण सरधोपट वळणाचीच
कालची कथा पण सरधोपट वळणाचीच होती तरीही आवडली. पर्ण पेठे आणि तो कोण होता?
मी बघितली नाही. मला पर्ण काही
मी बघितली नाही. मला पर्ण काही फारशी आवडत नाही. अक्षय टांकसाळे होता. पेपरमधे वाचलेलं.
अक्षय टांकसाळे होता. >>
अक्षय टांकसाळे होता. >> थॅक्स अंजू. त्याचा चेहरा ओळखीचा वाटला पण नावं माहित नव्हत.
वाय झेड मधे होता तो.
वाय झेड मधे होता तो.
कट्टीबट्टी बघते कधीतरी
कट्टीबट्टी बघते कधीतरी आठवड्यातून एकदा. छान वाटते. नगरी भाषा, साधीसुधी माणसे. कामंपण सर्वच सहज करतात. जरा मालिकेला वेग आला तर रोज बघेन. सध्या क्वचित बघतेय.
गुलमोहर यावेळी स्वानंदीसाठी थोडा वेळ बघितली, फार काही आवडली नाही, तसं बोअर झालं. उमेश क्षितीनंतर ह्यावेळी स्वानंदीसाठी बघुया असं वाटलं आणि वंदना गुप्ते पण होत्या.
कट्टी-बट्टी.. जरा मालिकेला
कट्टी-बट्टी.. जरा मालिकेला वेग आला तर रोज बघेन. सध्या क्वचित बघतेय... +१
चांगली वाटतीये मालिका अजुन तरी.
गुलमोहर यावेळी स्वानंदीसाठी
गुलमोहर यावेळी स्वानंदीसाठी थोडा वेळ बघितली>>> कोण स्वानन्दी?
स्वानंदी टिकेकर सुलू. D ३
स्वानंदी टिकेकर सुलू. D ३ मधली. उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर यांची मुलगी.
बोर होता एपि. तो दाढीधारी कोण
बोर होता एपि. तो दाढीधारी कोण होता वंगु आणि स्वानंदीबरोबर
हो बोअर होतं, अर्थात मी
हो बोअर होतं, अर्थात मी दोन्ही दिवस उशिरा शेवटी अर्धा तास लावलं, तेही काम करता करता येता जाता बघितलं.
तो अक्षय वाघमारे होता दाढीवाला. दादा कोंडके यांचा नातू. कुठल्यातरी मुवीत होता त्यासाठी च ह ये द्या मध्ये आलेला तेव्हा सांगितलं त्याने त्याचे बाबा दादा कोंडके यांचे पुतणे.
क्रोमवरून टाईपलच जात नाहीये.
क्रोमवरून टाईपलच जात नाहीये. तर तो दाढीधारी एवढा पुचाट की मला वाटलं तो तिच्याशी म्हणजे स्वाशी लग्न करणारच नाही. ती अतिगुणी, सहनशील झीची नायिका दाखवली होती.
कट्टी बट्टी मस्त आहे. नगरची भाषा मस्त वाटते ऐकायला, माsssय. दोन्हीकडची माणसं फारच गोड आहेत. ती हिरवीण कमला आहे हे मला झी५ वर कळलं. अभिद्न्या भावे फारच डोक्यात जाते. अप्पा दाखवलेत ते स्टॅचू आॅफ लिबर्टी ह्या नाटकात होते, लेखन आणि दिग्दर्शन पण त्यांचंच होतं. औरंगाबादचे आहेत ते. हिरो नाही आवडला.
हिरो आवडेल हळूहळू, काम छान
हिरो आवडेल हळूहळू, काम छान करतोय, पहिल्या फटक्यात impression पडण्यासारखा नाहीच आहे. अश्विनी कासार गोड आहे. अभिज्ञा मी एकच सीन बघितला. कमलामधला वकील पण यात आहे असं वाटलं मला. मी सध्या विकली वन्स एपिसोड बघतेय. पण आज रात्री बघेन, कांदेपोहे prgm आहे म्हणून. लग्न फिस्कटणार मग दोघे एकमेकांच्या प्रेमात पडणार असं वाचलं होतं.
स्वानंदी टिकेकर सुलू. D ३
स्वानंदी टिकेकर सुलू. D ३ मधली. उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर यांची मुलगी.>>> अच्छा, ती होय.
अप्पा दाखवलेत ते स्टॅचू आॅफ
अप्पा दाखवलेत ते स्टॅचू आॅफ लिबर्टी ह्या नाटकात होते, लेखन आणि दिग्दर्शन पण त्यांचंच होतं. औरंगाबादचे आहेत ते. >>> अप्पा मस्त आहेत.. थोडे थोडे मोहन आगाशेंसारखे दिसतात..
सगळे कलाकार गुणी आहेत.. एकदम natural (अभिज्ञा सोडून)
बापमाणूस व कट्टी- बट्टी
बापमाणूस व कट्टी- बट्टी चांगल्या चालू आहेत. फार भारी नाहीयेत पण ईतर सिरीयल्स पेक्षा काहीतरी वेगळं.
बापमाणूस मधे चंद्रा मरणार वाटतं. गडहिंग्लजची सुन भारी काम करते.
चंद्रा नाही मरणार. निशा
चंद्रा नाही मरणार. निशा रात्री अपरात्री बाहेर फिरते, कारवाया करते आणि रात्री घरी येऊन परत बापाशी चर्चा करते तरी कुण्णाला कळत नाही.
बापमाणूस मधे सुयशपेक्षा
बापमाणूस मधे सुयशपेक्षा पल्लवी पाटील आणि बाकीच्या सर्वांनी कामं छान केली आहेत, नम्रता आवटे आणि तिचा नवरा दाखवला आहे तो विशेष उल्लेखनीय. संग्राम समेळ फार नाही आवडला. हीपण सध्या विकली वन्स बघतेय.
कट्टी बट्टी काल बघितली, सही
कट्टी बट्टी काल बघितली, सही एकदम. काय मधे मधे सहजपणे पंचेस होते, भारीच.
बापमाणूस व कट्टी- बट्टी
बापमाणूस व कट्टी- बट्टी चांगल्या चालू आहेत. फार भारी नाहीयेत पण ईतर सिरीयल्स पेक्षा काहीतरी वेगळं.>>>>
मीपण बघतेय सध्या.
देवाशप्पथ पण चांगली आहे.
देवाशप्पथमध्ये श्लोक
देवाशप्पथमध्ये श्लोक दोघींनाही झुलवतोय याचा मला फार राग येतो. अर्ध्याहून अधिक भाग तर दोघींच्या तूतूमीमीमधेच जातो. कट्टी बट्टी फार छान चालू आहे. नवीन शब्द माहिती होत आहेत, थुत्तरफोडी, फार गुळ काढू नका आणि डुकल्या काढू नकोस
तो प्रोमो दाखवतायेत
तो प्रोमो दाखवतायेत बापमाणूसचा, त्या चंद्राचा शेवट करणार वाटतं
. मग सुर्या पुर्ण ताकदीनीशी उतरेल बहुतेक. हे सर्व गुढीपाडव्याला दाखवणार, सणासुदीला असले स्पेशल भाग बघायचे. मी नाही बघणार.
कट्टी बट्टीमध्ये हिरो चक्क
कट्टी बट्टीमध्ये हिरो चक्क झोपला. जावई भारी आहे. आत्याचा नवरा किती गरीब स्वभावाचा दाखवलाय, मला वाटलं अगदी रंगेल वगैरे असेल. मुलगी बघायच्या कार्यक्रमात आत्या मोठ्याने ओरडायला लागली तेव्हा मजा आली. धमाल चाललीये मालिकेत.
एकदम धमाल आहे, मी तो
एकदम धमाल आहे, मी तो कांदेपोहे प्रोग्रॅम झाला त्या दिवसापासून रोज बघायचं असं ठरवलं. नाहीतर आठवड्यातून एकदा बघत होते. अभिज्ञा खटकते मात्र इथे, नको वाटतात तिचे सीन.
त्या पप्पीच्या पणजोबानी स्वातंत्र्यासाठी काही केलं नाही आणि सर्टिफिकेट हवं होतं त्यांना. निकम गुरुजी बरोबर होते बहुतेक पण आता त्या अति जुन्या गोष्टींचा इशू करणार आजोबा.
हो ना आणि पूर्वाला नेमका तोच
हो ना आणि पूर्वाला नेमका तोच आवडणार. अभिज्ञाचं पात्र अगदी मिसफिट आहे. किती ओवरएक्टिंग करते ती. रच्याकने, माझे एक चुलत आजोबापण होते असे, चूकून स्वासै झालेले. सगळ्यांबरोबर चूकून त्यांनाही जेलमध्ये टाकलं आणि झाले की स्वासै. मग काय, सगळ्या सवलतींचा पूरेपूर उपभोग घेतला त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने पुढची अनेकानेक वर्ष. जे खरे स्वासै होते, ज्यांना देशाबद्दल खरंच प्रेम होतं, अशा कितेकांनी सवलती नाकारल्या.
इथली मत वाचून कट्टी बट्टी
इथली मत वाचून कट्टी बट्टी बघावी का?? विचार करतेय. वेळ कोणती मालिकेची??
निधी साडेसात वाजता संध्याकाळी
निधी साडेसात वाजता संध्याकाळी.
मला तरी सध्या आवडायला लागलीय. चार दिवस झाले मी रोज बघतेय.
Repeat telecast kadhi asto
Repeat telecast kadhi asto katti batticha???
माहीती नाही, समजलं की सांगेन
माहीती नाही, समजलं की सांगेन. मधे आमचं झी युवा बंद केलेलं केबलवाल्याने. हल्लीच सुरु केलंय. मी तेव्हा झी ५ वर बघायचे एखादा एपिसोड.
गेल्या शुक्रवारी आईकडे गेले
गेल्या शुक्रवारी आईकडे गेले होते .
तिने आवर्जून कट्टीबट्टी बघयला लावली . कान्देपोह्याचा कार्यक्रम चालु होता .
धमाल वाटली एकदम मालिका . सगळीच कॅरेक्टर्स मस्तच आहेत .
त्या आत्याकडे बघून खरच वाटत की तिचं पार्लर्र असेल . घरी कोणी मराठी मालिका बघत नाहीत .
ऑनलाईन मिळते का बघायला?
हो स्वस्ति झी 5 वर मिळेल
हो स्वस्ति झी 5 वर मिळेल बघायला, आधी ओझी नाव होतं त्याचं.
Pages