नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मिताताई 'लललो' मध्ये??? >>>>> काल दाखवली ती पुढील भागाच्या प्रोमोत. त्यांची नविन रूममेट म्हणून येतेय.

अखेर काकांनी लग्न मोडलं आ- श्री च !

अस्मिताताई 'लललो' मध्ये??? >>>>> काल दाखवली ती पुढील भागाच्या प्रोमोत. त्यांची नविन रूममेट म्हणून येतेय.....
मग कदाचित सुमित जेव्हा अमेरिकेहून परत येईल तेव्हा त्याचं आणि अस्मिताताईचं सूत जुळेल (सौम्या प्रकरणावरून तोंड (खरतर हृदय!) पोळलेलं असतानासुद्धा!
किंवा मग कदाचित श्रीकांत आणि अस्मिताताई यांचं जुळेल अशीही शक्यता!!!

अस्मिता श्रीकांत साठी असावी. काल पुत्रप्रेमी आई म्हणाली ना त्याच्या वर प्रेम करणारं पण मिळेल कोणीतरी त्याला. लगेच ही हजर.
श्रीकांतला आईच्या तब्येतीपेक्शा स्वतःच लग्न जास्त महत्त्वाचं होतं, हे आईने पहुन देखील त्याचीच बाजु घेत होती काल.

सुमित अस्मिताचं जुळलं तरी चालेल.........
कदाचित मागे कुणीतरी विचारल्याप्रमाणे सुमितने (ओमकार गोवर्धन) 'लललो' सोडली असावी. कारण विनय-आकांक्षा मधील श्रीकांत नावाचा इतका मोठा (साईझनेही!) अडसर दूर होऊनही सुमितला कुणीही कळवल्याचे दाखवले नाही.

श्रीकांतला ती पूजाच चांगली होती. .. +१००००००००००००००००००००००००
रच्याक पूजाचा 'श्रीकांत' नाही, 'शीकांत' !!! Proud Proud Proud

आकांक्षा आणि काव्या बारीक झाल्या आहेत, नागपूरला डोजे चालू होतं आणि अस्मिता जंगलात हरवली होती. पिंट्याची एट्री झाली आहे एवढं बघितलं चॅनल बदलताना.

लव्ह लग्न मध्ये सध्या काय चालू आहे?
मी बघणं सोडलंय.
>>>>>>>>> बघण्यासारखं काही चालू नाही सध्या, त्यामुळे मी ही सोडलयं

बाकी सिरीयल्स लवकर आटोपल्या, ही अजूनही चालू आहे. एवढी लोकप्रिय आहे का ही? सौम्या एंट्रीनंतर मी एक्झिट घेतली.

लव्ह लग्न मध्ये सध्या काय चालू आहे?>>>>>
शाल्मलीचे डोहाळेजेवण नागपूर येथे पार पडले असून तिच्या प्रसूतीपर्यंत अभिमानने गावीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. इकडे स्वतःचे लग्न मोडल्याने अज्ञातवासात गेलेला श्रीकांत पूजाकडे जाऊन खूपच सुधारला असून आता तो आई-वडिलांशी, तसेच राघव, विनय या मुलांशी खूप चांगला वागतो आहे. गावी गेलेल्या अभिमानने राजासोबत (होणार सून ..... मधील 'पिंट्या') भागीदारीत एक नाटक करायचे ठरवून त्यासाठी नायिका शोधण्याचे काम चालू आहे. राघव आणि सर्व मित्र विनयच्या घरी नागपूरला गेलेले असतांना राघवच्या मासाहेबांनी अचानक कॅफेचे रजिस्टर मागवून घेतले आणि कॅफे तोट्यात चालला आहे यावरून आपला सुपुत्र राघवेंद्र विजयेंद्र लव्हेकर यांना खडसावले. त्यांनी पुढील २ महिन्यात कॅफेतून ५ लाखाचा नफा कमावण्यास सांगितला असून राघवने दिवाळीनिमित्त पत्ते खेळताना आपला कॅफे पत्त्यांवर लावला आणि हरला!

राघवने दिवाळीनिमित्त पत्ते खेळताना आपला कॅफे पत्त्यांवर लावला आणि हरला! >>>>>>> म्हणजे मित्रांसोबत खेळताना कि खरचं हरला ?

लव्ह लग्न लोचा संपत आली, काल प्रोमो बघितला नवीन मालिकेचा - बाप माणूस - १८ डिसेंबर पासून सुरु होत आहे.
तसे पण काहीही फालतूपणा चालू होता हे काळात होते कधीतरी प्रोमो बघताना. तसे ही विनय- आकांक्षाचे लग्न लागल्यावर काही बाकी नाही दाखवण्यासारखे आणि बाकी लोचा तर काव्य-ऋतू - राघव चा चालू आहे तो सिरीयल बरोबर संपेल.

नाही, तिची वेळ 9 करणार झी युवा फेसबुकवर वाचलं आणि जिंदगी not out ही out झाली बहुतेक कारण शैलेश दातार कलर्स च्या राधा प्रेम रंगी रंगली मध्ये दिसतायेत.

हो ना. त्या ढोल्या विनयचा एवढा राग येतो. मिस्टर विनय म्हणे Angry जिंदगी कशी गुंडाळता येईल मधेच. अजून तर नीट सुरूच झाली नाहीये ती. लहान मुलांचा खेळ आहे सगळा.

लललो मधली मजाच गेली. विनय आणि आकांशा यांचं अजून लग्न का झालं नाही देवजाणे. मध्ये बघितलं तर तो राजा आणि काव्या आणि राघव आणि ऋतू गळ्यात गळे घालून बसले होते एकमेकांना जळवायला. श्रीकांत चे एकदम मतपरिवर्तन झाले तर आता त्याचे तरी लग्न लावणारे का? शाल्मली ची डिलिव्हरी कधी होणार? की ती जानुबाई सारखी अनादी अनंत काळ प्रेग्नन्ट असणारे?

पियू, मुलगी झाली ना शाल्मलीला.
श्रीकांत गोड बोलायचं नाटक करुन आग लावतेोय सगळ्यांमधे. माठ विनय व माठ राघव त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवुन आहेत. फक्त अभिमान ने त्याला ओळखलय.

एका मैत्रीण्नी बरोबर सतत मी चर्चा केली की इतकी मस्त होती ही सिरियल तर तिला आता बघायचीय.
मी तिला वरची लिंक दिलेली(http://expertblogz.com) पण ती म्हणतेय की, नेमके सगळे भाग गायब आहेत सपटेंबर ५ पासून.

अमेरीकेत आहे ती. कोणाला लिंक माहिती आहे का अमेरीकेतील लोकांसाठी जी ओपन होतेय.

कधी झाला शेवट. काल रात्री मी तीन चार एपि सलग बघितले. ते पैसे परत मिळवले सचिनने आणि मिंकीचं आॅपरेशन होणार हा शेवट होता का.

तो सचिन man of the match trophy मिळवतो आणि त्याची बहिण चालायला लागते.

स्नेहा म्हणजे ज्ञानदा का, सचिनची gf. मला आवडते ती. गोड आहे. आधी पण चिमा च्या सिरीयलमध्ये होती. सुयश टिळक हिरो होता. ती आवडली होती.

आजपासून बापमाणूस नावाची मालिका सुरू होतेय. काल पेप्रात जाहिरात पाहिली.
बघावी काय?

Pages