नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या नवीन सुरु होणा-या डॉ. अंजलीमधे बरेच जण आहेत. दुर्वा सिरीयलचा हिरो इथे हिरो आहे हर्षद अतकरी. राजन भिसे आहेत. ती रेशमपण दिसतेय त्याच्या fb पेजवर त्या मठाधिकारी सिरीयल होती त्याची नायिका, मला आवडायची good acting. आमचे जावई पण दिसतायेत योगेश सोमण. फेसबुकवर फोटो बघितला, झी युवाच्या.

अरे पण बन मस्का अर्धवटच झालीये, ८ वाजता जर अंजली सुरू होणार सोमवारी तर मग बळी कुठली जाणार सिरीयल

फ्रेशर्स, लव्ह लग्न सुरूच आहेत आणि फुलपाखरू तर अजून उडलंच नाहीये

बन मस्का मधे सौमित्र-आकृती नाटक करत असतील, मैत्रेयीने शेवटी खर काय ते कबुल करावे म्हणुन.

फुलपाखरु तर अजून ऊडलच नाहीये.. Lol

बन मस्का च्या शुक्रवारच्या भागात पुढील भागात काय होणार हे ही दाखवले. बहुतेक संध्याकाळी ६ वाजता दाखवतील शेवटचे भाग.

फ्रेशर्स संपली का, कारण त्या अनपटबाई स्टार प्रवाहच्या सिरीयलमधे लीड म्हणून येतायेत, कुलस्वामिनी. आज रात्री ८ वाजता. संग्राम साळवी हिरो आहे. तो आवडतो पण त्या रश्मी अनपटमुळे मी नाही बघणार.

बन मस्का रात्री १० वाजता आहे. ते केबलवर स्क्रोल करुन बघतो ना प्रोग्रॅम्स तसं बघितलं तेव्हा समजलं.

फ्रेशर्स मधून रश्मी अनपट गायब झालीय का, लीड रोल वाले दोन सिरीयल्समधे एकावेळी नसतात ना म्हणून विचारते.

हा हा मनवा, बरोबर. मी पहीले दोन भाग बघितले होते.

अंजलीमधे गण्या आहे राखेच्या मधला. ती रेशम फार गोड दिसतेय. अर्धा भाग बघितला आज, फार बघेन असं वाटत नाही. अजून एक दोन दिवस बघेन.

प्रेम हे बरी असते का? >>> असावी बरी कारण दोन दिवस एक स्टोरी असते. मी मागे सुनील बर्वे आणि वीणा जामकर होते ती बघितलेली, छान होती. प्रत्येक आठवडा नवीन जोडी, नवीन स्टोरी असा कन्सेप्ट आहे.

अंजली म्हणुन सिरेल सुरु झाली आहे.
कारेदु मधली अदिती आहे मेन लीड. राजन भिसे, योगेश सोमण, मठाधिपतीच्या सिरेलीतली उर्मी, नाईकांचो गणेशा, इ बरीच मंडळी आहेत.

पण टिपीकलच आहे सगळ. गोगोड, अतिशय्च चांगली, सुसंस्क्रुत, सहनशील हिरोइण. कारेदुत ऑफिस होतं इथे हॉस्पिटल

कारेदुत ऑफिस होतं इथे हॉस्पिटल >>>

म्हणजे तिथे सारखं 'प्रेझेंटेशन' असायचं... इथे दिवसरात्र पेशंटचं बीपी चेक करणार असतील Wink

इथे दिवसरात्र पेशंटचं बीपी चेक करणार असतील>>> Lol
असंच काही नाही. पण अंजली सद्गुणांचा पुतळा होउन वात आणणारे तस्साच.

कुणी पाहत कि नाही आता ल. ल. लो. ???

काव्याने शाल्मलीला काय सांगितले आहे जे राघवला कळता कामा नये अस बजावलं आहे?

श्रीकांतसाठी नविन पात्र आनलयं पूजा नावाच, शेंबड आहे बहुतेक Wink

बन मस्का अपेक्षेप्रमाणे घिस्पिटया वळणावर संपली. असल्या बेभरवश्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय कसला ओढून ताणून आणला.
नशीब संपली

बन मस्का चा शेवट थोडक्यात सांगेल का कोणि ? मी पहिला ब्रेक-अप पाहिला आणि ते प्रकरण इतकं ताणलं की बंद केलं बघणं.

श्रीकांतसाठी नविन पात्र आनलयं पूजा नावाच, शेंबड आहे बहुतेक Wink>> मस्तय ती. मला तरी आवडली. ती पण या ग्रुपमध्ये मस्त मॅच होऊन जाईल. बाकी 'शी'कांतचा ईईईईई किस्सा तिने जेवताना सांगितला ते भयानक होतं.

काव्याने शाल्मलीला काय सांगितले आहे जे राघवला कळता कामा नये अस बजावलं आहे?>> काव्याचं राघववर प्रेम आहे

प्लीज सांगा कोणीतरी बन मस्काचा शेवट.
शेवटचा भाग म्हणून आनंदाने ओझीवर पहिला आणि डेटा वेस्ट केला ! ती कोण आकृती आणि सौमित्रचा साखरपुडा त्याच्या घरात होता, त्याला सगळे सगळे मित्र आणि फक्त आईवडील होते. अर्धा एपिसोड त्यांची बडबड आणि नाचकाम होतं. त्या आकृतीला मुलखाचा मेकअप फासला होता. अक्षरशः दोन्ही गालावर ब्लशचे व्यवस्थित गोल होते Lol सापु आहे आणि तिच्या अंगावर साधीशी साडी आणि मैत्रेयी रडत रडत पैठणीत!
तर साखरपुडा सुरू झाल्यावर सौमित्रचे एकंदरीत आधीची सगळी ब्रेकअप्स बघता हा सापु तरी आयुष्यभर टिकावा असं काहीतरी declare करतात. मग स्लो मो मध्ये सौमित्र अंगठी घालणार इतक्यात मैत्रियी भोकाड पसरून (literally) रडते, सॉरी म्हणते वगैरे, मग सौमित्र आकृती आत जाऊन टाळ्या देत प्लॅन फत्ते म्हणून मिठ्या मारतात. बाहेर येऊन आम्ही दोघे आणि आजी मिळून कसा हा खोटा प्लॅन केला सांगतात. शेवटी एकदाचे मैसौ एकमेकांना अंगठ्या घालतात. हुश्श, काय घीसापिटा शेवट..

Pages