नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स अन्जुतै .
रात्री साडेअकराला असतो रिपीट. दुपारचं माहित नाही. > मला वटत ४-३० / ५ ला असते

आत्याचा नवरा किती गरीब स्वभावाचा दाखवलाय, मला वाटलं अगदी रंगेल वगैरे असेल. मुलगी बघायच्या कार्यक्रमात आत्या मोठ्याने ओरडायला लागली तेव्हा मजा आली.. Lol
चंपा पुर्ण पोस्ट्ला +१.

लक्ष्मीकाका किती गोड आहे, मला फार आवडतो. बकाच्या आधी फोनवरून सल्ला देणारी काकू मस्त. कुठेतरी बघितलं आहे आधी. सेक्स अपिल वगैरे Proud सगळे किती घरगुती दाखवलेत, नो भरजरी साड्या-दागिने आणि मुख्य म्हणजे भाषा, कोल्हापूरी आणि नागपूरीचा ओवरडोस झालाय. आता खानदेशी टोनमधली पण एखादी आली पाहिजे. नणंदेच्या मुलांना अहो-जाहो करणं आमच्यात असतं मागच्या पिढीत, माझ्या सगळ्या मामी आम्हाला आणि माझी आई आत्याच्या मुलांना करते अहो-जाहो, लहान मुलांनाही.

लक्ष्मीकाकाची बायको आधी 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधे होती ना? उमेश कामतच्या घरी राहणारी. गावतल्या शिक्षकाबरोबर लग्न करून पळून आलेली असते.
आत्याचा नवरा सारखा 'अहो पण माझा प्रॉब्लेम?जाऊ दे.. तो काय नंतर बघू..' हेच म्हणतोय.. Proud

बकाच्या आधी फोनवरून सल्ला देणारी काकू मस्त. कुठेतरी बघितलं आहे आधी. >>> मिताली जोशी आहे ती.. पटकथा लिहिल्या आहेत बऱ्याच मालिका-सिनेमांच्या.. अजून एक ओळख म्हणजे Mrs. जितेंद्र जोशी

अरे हो, आत्ता आठवलं कुठे बघितलय ते. जोडी तुझी माझी मध्ये बघितलं होतं, जिजो बरोबर. धन्स कच्चा लिंबू. बकामध्ये कुठे सगळे नातेवाईक असतात, लग्न ठरल्यावर बैठकीत असतात ना तेही मोजकेच. राजकारणात दाखवलेली काकू पण मस्त. एकंदरीत सगळे काका पुढारलेले दिसतात. परागचा एक मित्र जो सारखा मावा खात असतो तो सेन्सिबल वाटतो, दुसरा चुईंगम जादा आगाऊ आहे. परागचा काका पण छान सल्ले देतो, असे लोक हवेत पाठीशी लग्नाचा निर्णय घेताना.

लक्ष्मीकाकाची बायको पहिल्यांदा गुंतता हृदय हे मध्ये होती. गौरी नाव होतं तिचे पल्लवी सुभाषची खास फ्रेंड, मस्त काम करते ती. मग उमेश कामत सिरीयलमध्ये होती, मग त्यानंतर ती वैभवलक्ष्मी मध्ये होती. रा खे चा चा दत्ता तिचा नवरा आहे.

परागचा रात्रभर दारू पिणारा मित्र, कमलामध्ये वकील होता.

गंमत म्हणजे ह्यातली गुंतता ह्रुदय हे ही मालिका फक्त पूर्ण बघितली. बाकी क्वचित मध्ये मध्ये. माझी भाची ह्या क्षेत्रात असल्याने आणि ती गुंततामध्ये होती त्यामुळे काही गोष्टी तिच्याकडून कळतात, ह्यातले बरेच तिचे फेसबुक फ्रेंड्स आहेत आणि माझी भाची माझी फेसबुक फ्रेंड. तिने काही like केलं, कमेंट केलं तर मला येते ती पोस्ट. त्यामुळे माहितेय बरंच.

बापमाणूस - सुर्याने चंद्राला सोडवण्यासाठी मोठं प्लॅनिंग केलं आणि दादासाहेबांना त्याची कल्पनाही दिली नाही?

मग हिरो आहे ना तो. आता सूर्या चंद्रात वैर होणार बहुतेक, सगळे अधिकार सूर्या घेणार. काल नाही बघितला. रोज नाही बघत.

श्या कट्टीबट्टी बोअर होणार आता, अभिज्ञा तडमडली दोघांत. अभिज्ञा एरवी मला आवडते पण कट्टीबट्टीमध्ये बिग नो. मिसफिट.

हो ना. दोघांना कुणी बोलूही देत नाही. अप्पा लगेच तयार झाले. त्याआधीच चि व चिसौका बघत होते, त्यात ते लग्नाआधी एकत्र राहून बघतात आणि ईथे अर्धा तासही खूप झाला म्हणे. त्या अभिज्ञाच्या टाईपचा नाहीये पराग, कशाला टीपी करताहेत Angry

पण तो हॉटेल सीन मस्त धमाल होता. अगदी natural वाटला. दोघांना एकमेकांशी कसं बोलावं आधी कळेना मग गोल गोल बोलत राहिले, टी शर्ट काय, घरचे इतर मेंबर काय, सॉलिड.

बापमाणून सलग दोन भाग बघितले. वेगवान चाललीय सध्या. निशाचा दोन भावात फुट पाडण्याचा डाव काही सक्सेसफुल झाला नाही अजूनतरी. आय जी ला आता राजीनामा द्यायला लागेल किंवा बदली, पत्रकारावर हल्ला केला म्हणून.

त्या अभिज्ञाच्या टाईपचा नाहीये पराग,>>मला वाटतंय तसं मुद्दाम दाखवलंय कारण बरेचदा खूप साध्या मुलांनाही hifi मुलीच आवडतात...असं अनुभवलंय actually..

Btw mala zee survatiche 4 episodes nahi dist ahe..direct 5 va distoy...as ka?koni madat karel ka?

कट्टीबट्टी चा कालचा भाग पण मस्त होता . कथा काय फार पुढे जात नाही पण एक एक सीन्स मस्तच. ती मुन्न्याची आत्या खूपच गोड आहे . "काढा काय हातात मिरवायची गोष्ट आहे का ?? " आणि तो लक्ष्मी काका , ""लीला, तो तांब्या बाजूला ठेवा".पूर्वा आणि परागची भेट पण छान .

परागचं प्रेम असतं अ भा वर पण तिचं नसतं, तिचं कोणावरती असतं आणि आता ब्रेकअप करण्यासाठी ती परागचा वापर करते.

तोच मुलगा नेमका पपी कडच्यांचा नातेवाईक किंवा संबंधित असेल तर तो सांगेल की उद्या पराग आणि ती रिलेशनशिप मध्ये आहेत, बिचारा पराग.

बामामध्ये सूर्याला निशाचा संशय आला आहे असे वाटते. कट्टी बट्टीमध्ये पुढे काय दाखवणार कारण आप्पातर लगेच तयार झाले. लक्क्षीकाकाची बायको सोडणार आहे चक्रिवादळ, तर काहीतरी नोकझोक होईल कदाचित. अप्पा मुलांना फारच घालूनपाडून बोलतात. जावयाचं कोणी ऐकूनच घेत नाही, रोज मरे त्याला कोण रडे अशी गत आहे त्याची. अभा काय परागला येऊन जाऊन मिठ्या मारते खुलेआम आणि तो म्हणतो ईतरांना की मी शिक्षक आहे तर असे वागू नका आणि तसे बोलू नका, अभासमोर बोलती बंद होते वाटतं त्याची.
अभा परागचा किती वाईट पद्धतीने वापर करून घेते आणि हा बुळ्या काहीच बोलत नाही. सगळे किती छान अभिनय करतात, वाटतच नाही मालिका चालू आहे.

हो ना नगर सारख्या ठिकाणी इतका मोकळेपणा अजूनही नसेल, hug चा. डोंबिवलीत नाही मी बघत कुठे तर नगर तसं 12 वर्षापूर्वी तरी पुराणकालीन वाटलेलं मला, तेव्हा जाणं व्ह्यायचे.

कट्टी-बट्टी - अप्पा मुलांना फारच घालूनपाडून बोलतात. जावयाचं कोणी ऐकूनच घेत नाही.. परागची अभासमोर बोलती बंद होते वाटतं...+१

अप्पा पुण्याच्या मुलाला पुराणिक म्हणतात Happy पपीची आई बिचारी सारखी स्वयंपाकच करत असते. लक्ष्मीकाकाची बायको बिनधास्त आहे, घाबरत नाही बिलकुल अप्पांना. कितीही मतभेद असले तरी सगळ्यांना पपीचं भलं व्हावं असंच वाटतंय.

अप्पा पपी सख्खे आजोबा आहेत का ? मग त्या मानाने तिची आई म्हातारी वाटते.
एकेक कलाकार मस्त घेतले आहे . आत्या , दिपकराव , प्रकाशराव , समीर आणि नी , काका-काकूआ, आप्पा आणि तो लीला काका सगळेच एकापेक्शा एक गोड आहेत Happy

Pages