नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लव लग्न लोचा मध्ये काय मूर्खपणा चालवला आहे :वैताग:

राघव आणि काव्याचं कॉलेजछाप प्रेमप्रकरण बघून बघून कंटाळा आला. काल तर त्या राघवच्या मागेमागे तो चोर (की वेडा) काव्याच्या घरात शिरला तरी त्यांना पत्ता नाही. काव्या आणि राघवचं वय बघता त्यांचं प्रेम थोडं मॅच्युअर दाखवायला हरकत नव्हती. पण लवीडवी टाईप बावळटपणाचा कहर चालला आहे अगदी.

दुसरीकडे प्री वेडिंग फोटोशूट मध्ये तो येडा फोटोग्राफर एक पोझ म्हणून श्रीकांत ला आकांशा ला किस करायला सांगतो. श्रीकांत आकांशला गालावर किस करतो फोटोसाठी हे विनयला बघवत नाही तर तो निघून थेट आपल्या गावी जातो कोणालाही न सांगता. इकडे आकांशा आता फुकटच मिस्टर विनय हर्ट झाले म्हणून या सगळ्यांच्या घरात येऊन शाल्मलीपाशी रडत बसलीये. आता जर एवढीच विनयच्या मनाची काळजी होती तर लग्नाला हो म्हणताना अक्कल कुठे गेली होती?

किती दिवस झाले ही दोन प्रेमप्रकरण आहेत तिथेच तेच तेच दळण दळत बसली आहेत. स्टोरी काही पुढे जात नाही. शाल्मलीचं पोट जितकं दाखवत आहेत त्यावरून तिला नक्की कितवा महिना चालू आहे याचाही काही अंदाज येत नाही. सुमित अमेरिकेला कधी जाणारे माहीत नाही. मालिका झी मराठी च्या डेली सोप्स च्या वाटेला लागली की काय कोणास ठाऊक. ती रुद्रम इतकी वेगात जातेय की अर्धा तास कमी पडतोय खूप. आणि यांना अर्ध्या तासाच्या स्लॉट मध्ये सुद्धा काय दाखवावं कळत नाहीये.

@ पियू >>>> अगदी माझ्या मनातील लिहीलय तुम्ही .
लललो खुप बोअर करतेय.
ते एकटे काकाच थोडे शहाणे बाकी सगळे विचारशक्तीच्या पलीकडचे आहेत

तो माठ विनय असा कसा गावी जाऊ शकतो , नोकरीचे कायय

'लललो' म्हणजे फालतुपणा चालू आहे.
आता विनय लग्न थांबवऩार म्हऩजे काय 'मेरे यार की शादी है' पिच्चर सारखं करणार का?

काल ओझीवर (बहुतेक) परवाचा भाग बघितला. नवीन तर काही घडले नाही फारसे. पण शाल्मली आणि अभिराम (की अभिमान?) श्रीकांतचं लग्न मोडावं म्हणून सुमीतला तिकडे अमेरिकेतून कोणत्यातरी मुलीची मदत घ्यायला सांगतात (मी सुरुवातीचे एपिसोड न बघितल्याने मला काही लिंक लागली नाही). देवजाणे किती दिवस हे प्रकरण चिघळत ठेवणारेत.

आता श्रीकांतचे वडील 2 दिवसांसाठी गावाला जाताहेत पत्रिका द्यायला तेवढ्यात बाकी येडछाप पब्लिक नक्की काहीतरी घोळ घालणार. ती श्रीकांतची आई तर डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं करतेय. तिला एवढ्या हिंट्स मिळूनपण आकांक्षाच्या भावना ओळखू येत नाहीयेत. आणि आकांक्षा म्हणे यांचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे Uhoh

इकडे राघव काव्याच्या वडिलांना भेटायला येतो आणि (अपेक्षेप्रमाणे) त्यांना तो आवडत नाही. ते काव्याला दुसऱ्या कोणालातरी शोधायला सांगतात. किती फिल्मी आहे हे? लललो कडून ही अपेक्षा नव्हती. आणि ते मागे काव्याच्या घरात यांच्या मागेमागे चोर शिरला होता त्याचं काय झालं काय माहित.

त्यातल्या त्यात विनयने आकांक्षाला (योगायोगाने का होईना) एकटं गाठून विचारायचं धाडस केलं की "तू या लग्नाने सुखी/ आनंदी आहेस का? मी तुझ्याशिवाय राहणं अशक्य आहे" वगैरे वगैरे. या सीनमध्ये विनयने बऱ्यापैकी गट्स दाखवलेत. पण ती आकांक्षा नेहेमीप्रमाणे इमोशनल डायलॉग टाकून तिथून सटकते. दुसऱ्या दिवशीही विनयला "आता आपण लांबच बरे" असं सांगते. तिच्या ऑफिसमधल्या मुलीही पत्रिका दिल्यावर तिला म्हणतात की "तुला श्रीकांत कधीपासून आवडायला लागला? तू आम्हाला लग्न ठरल्याचं इतक्या उशीरा का सांगते आहेस? विनयचं काय?" इ.इ. त्यावर तिच्याकडे काही उत्तर नसते.

यांच्याकडे ही 2 लव्ह/ लग्न / लोचे सोडल्यास काहीच दाखवण्यासारखे उरले नसावे. याआधी ते बिनसंसारी बाबा वगैरे एपिसोड्स कसले कॉमेडी झाले होते. असो..

एकता कपुरच्या सिरीयल पेक्षा जास्त बिनडोकपणा चाललाय..
आकांक्षाला, लग्न नको म्हंटलं तर श्रीकांतला वाईट वाटेल याची काळजी पडलीये.. Lol मग विनयच्या वाईट वाटण्याचं काय !!??
सगळे अेकएकटे plan करतायत ते लग्न मोडण्याचे. एकमेकांपासुन लपवुन..एकत्र काहीतरी आयड्या काढली तर सिर ीयल लवकर संपणारे का लेखकाला पुढे काही काम राहणार नाहीये..??

श्रीकांतचं लग्न मोडावं म्हणून सुमीतला तिकडे अमेरिकेतून कोणत्यातरी मुलीची मदत घ्यायला सांगतात (मी सुरुवातीचे एपिसोड न बघितल्याने मला काही लिंक लागली नाही)...... त्या अमेरिकन मुलीचे नाव 'अॅमा' जी श्रीकांतची मैत्रीण आहे. मागे एकदा ती अचानक भारतात श्रीकांतला भेटायला आली होती, पण तेव्हा तो घरी नसल्यामुळे राघवने तिला आपल्या घरी बोलावून चहा वगैरे दिला व गप्पा मारताना राघव कोरिओग्राफर आहे हे कळल्यावर तिने स्वतःच्या मर्जीने राघवला डान्स करून दाखवायला सुरुवात केली आणि अचानक पाय मुरगळून राघवच्या अंगावर पडली होती. नेमक्या त्याच वेळेस श्रीकांत व मोरे काकू तेथे आल्याने श्रीकांतचा असा गैरसमज झाला की राघव त्या 'अॅमा' वर अतिप्रसंग करायचा प्रयत्न करत होता. खूप चिघळले होते हे प्रकरण. अगदी विनय, सुमित, राघव यांना घरातून बाहेर काढण्याइतपत गेले होते. त्यांनी सामान बाहेर काढलेही होते पण काकूंनी योग्य वेळी मोरे काकांना बोलावून घेतले (जे योगा कॅम्पसाठी कुठेतरी बाहेरगावी गेले होते). मग मोरे काकांनी प्रत्यक्ष 'अॅमा'ला बोलावून खरे काय झाले ते विचारले असता तिने सांगितले की, "मीच राघवच्या अंगावर पडले, त्याने मला काहीही केले नव्हते." (प्रत्यक्षात त्या श्रीकांतलाही हे सत्य माहित होते, परंतु त्याला कोणत्याही कारणाने या तिघांना बाहेर काढायचे असल्याने त्याने हे सत्य लपवून ठेवले.)

काव्याच्या घरात यांच्या मागेमागे चोर शिरला होता त्याचं काय झालं काय माहित..... राघव घरात शिरताना त्याचे जॅकेट बाहेर पडले होते. नेमके तेच जॅकेट घालून तो चोर घरात शिरला व पुढे काव्याच्या बाबांनी त्याला पकडून त्याला मारायला सुरुवात केल्यावर काव्याने "त्याला मारू नका, तो माझा बॉयफ्रेंड' आहे" असे सांगितले! Lol मग त्याचा चेहरा दाखवल्यावर तिने कबूल केले की हा माझा बॉयफ्रेंड नाही, माझा बॉयफ्रेंड दुसरा आहे!!! (अर्थात ज्या दरवाज्यातून काव्या-राघव आत आले त्याच दरवाज्यातून त्यांच्याच मागे-मागे आलेला चोर त्यांच्या लक्षात न येणे, हा खरोखरच मूर्खपणा दाखवला!!!)

विनयचं काय?..... चिंता नसावी. विनयचे आकांक्षाशीच लग्न होणार आहे. शाल्मली-अभिमान, राघव-काव्या, विनयचे आई-बाबा या सगळ्यांनीच त्यासाठी आपापले प्लॅन्स बनवले आहेत. आता पाहूया कोणता प्लॅन यशस्वी होतो ते!!!

विक्षिप्त_मुलगा..
स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.

विनयचं काय?..... चिंता नसावी. विनयचे आकांक्षाशीच लग्न होणार आहे. >> ते आम्हालाही माहीत आहे हो. पण हे सगळं इतकं ताणत आहेत की बोर व्हायला लागले आहे. म्हणजे हीच झी मराठीची मालिका असती तर काही फरक पडला नसता. युवाची मालिका आहे आणि याआधी त्यांनी (लललो) चांगले एपिसोड्स दिले आहेत म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत थोड्याफार.

म्हणजे हीच झी मराठीची मालिका असती तर काही फरक पडला नसता. युवाची मालिका आहे ..... अहो 'युवा' सुद्धा 'झी'चेच चॅनेल आहे. 'झी युवा' असे पूर्ण नाव आहे त्याचे!!!

सुमीत ने सोडली का शिरेल की आहे अजुन.... सध्यातरी त्याला फोनवरून बोलताना दाखवत आहेत याचा अर्थ सोडली नसावी. कारण सुमितची गर्लफ्रेंड 'सौम्या' (अक्षया गुरव) हिने खरोखर सीरिअल सोडली आहे. (तिच्या खऱ्या आयुष्यातील लग्नासाठी तिने सुमितशी ब्रेकअप केला!) तसेच राघवचा डान्स अकादमीमधील असिस्टंट 'मितेश' (ज्याचा शोच्या आदल्या दिवशीच पाय मुरगळला होता) तो, सुमितचे आई-बाबा यांनी सुद्धा सीरिअल सोडलेली दिसते!

सौम्या, मितेश, सुमितचे आई-बाबा यांनी सीरिअल सोडलेली दिसते! >>>

या सर्वांच्या कितीतरी आधी मी पण ही सिरियल सोडली Proud

लप्रि Lol

आता मी काहीही बोलले तरी विक्षिप्त_मुलगा लललो ची बाजू घ्यायला धावून येतील. पण मालिकेत कैच्याकै बालिशपणा चालू आहे. श्रीकांत आणि आकांक्षाचे लग्न मोडण्याचे प्रयत्न तर हास्यास्पद सुद्धा म्हणवत नाहीयेत.

कालच्या एपिसोडमध्ये राघवने ठेवलेले ते दूध दुसरे कोणीतरी पिणार हे अगदी स्पष्ट होते. त्या वेडपट शाल्मलीने बोलावलेली मुलगी आहे तीही अशीच ऐनवेळी घात करणार. ह्या असल्या पाचकळपणाऐवजी शेवटी हे लग्न इमोशनल ड्रॅमा होऊनच थांबणार आहे हे स्पष्ट आहे. तरीही लेखक प्रेक्षकांना वेडं ठरवायची एकही संधी सोडत नाहीयेत.

शिवाय कालच्या एपिसोडमध्ये ते गुरुजी विनयवर कसे हुकूम सोडत होते? दोन्हीकडचा माणूस असला तरी नक्की कोणाचा कोण आहे, नक्की काय संबंध आहेत हे कळल्याशिवाय गुरुजी असे कोणालाही कामं सांगत नाहीत. बरं.. सांगून सांगून काय सांगितलं तर आधीच मोकळे असलेले टोपलीतले हार मोकळे करून ठेवा. Uhoh असो.. मालिकेत इतका मूर्खपणा चाललाय की हे त्यापुढे काहीच नव्हते.

बादवे विनय आणि आकांक्षाच्या लग्नानंतर ही मालिका संपेल का? की मग राघव आणि काव्याचे दळण दळत बसतील?

ललिता-प्रीती Lol Lol

सिरिअसली यार ..काय होते ते सुरुवातीचे एपिसोडस ..न आता काय झालंय...कचरा केलाय अगदी

रच्याकने सुमित कुठे दिसत नाही ... फक्त त्याच्या साठी पाहत होते अधून मधून...सोडत असशील तर very good बाबा Happy u deserve better than this

आता मी काहीही बोलले तरी विक्षिप्त_मुलगा लललो ची बाजू घ्यायला धावून येतील.... Proud Proud Proud
मी कधीच 'लललो'ची बाजू घेतली नाही, फक्त आपल्याला काही गोष्टींची 'लिंक' लागत नव्हती, त्याचे स्पष्टीकरण दिले. असो. निदान त्यानिमित्ताने तरी माबोवर कोणीतरी माझी दखल घेत आहे ही समाधानाची बाब!!! Happy

बाकी मी 'लललो'ची बाजू घ्यायला मी काही त्यांचा कथा/पटकथालेखक, दिग्दर्शक, निर्माता वा कलाकार नाही! (मी सक्षम कुलकर्णीचा फॅन आहे, हा एकच मुद्दा होऊ शकतो 'लललो'ची बाजू घ्यायला!)

मला घो असला हवा नावाचा सिनेमा लागला होता टीव्हीवर काही दिवसांपूर्वी त्यात ओंकार गोवर्धन आणि राधिका आपटे हिरो-हिरवीण होते. चांगला होता चित्रपट हलकाफुलका आणि बाकी कलाकारही मातब्बर होते जसे रिमा, नीना, रविंद्र मंकणी, निखिल रत्नपारखी, शर्वरी लोहोकरे ईत्यादी.

बरं वि_मु

आजही विनय हिम्मत करून आकांशाला म्हणाला, "तू म्हणालीस तर आत्ता मी बाहेर जाऊन सगळ्यांना समजावेन. पण तू माझ्याशी लग्न कर" आणि आजही तेच रडके दळण दळले त्या आकांशा ने.. "आयुष्यात आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतातच असं नाही वगैरे. पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात माझं तुझ्यावरचं प्रेम कायम राहील अँड ऑल."

भंपक कुठची. आता जर श्रीकांतशी लग्न करणारच आहे तर सारखं विनयला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे कश्याला सांगत बसते? आणि त्याला मिठ्या मारून गळे का काढते? असोच.

थँक गॉड. सौम्या एंट्रीनंतर मालिका सोडली ते. मला ती आवडत नाही आणि ओंकार, रुचिता जोडी आवडायची. ती नसणार म्हणून टाटा बाय बाय केलं.

आचरटपणा चा कहर चाललाय
नवऱ्या मुलाला जमाल गोटा दिला की लग्न मोडेल अशी युक्ती करणाऱ्या लोकांच्या मेंदूला रॉयल सॅल्यूट

कुठल्या तारेत हे लोक असे प्रसंग घुसडू शकतात हेच कळत नाही.
आणि आता हे लग्न मोडूच नये, आकांक्षा इतक्या अट्टाहासाने पायावर कुर्हाड मारून घ्यायला ठाम असेल तर हरकत काय आहे.
काव्याचं सुमितवर, सुमितच सौम्या वर जीवापाड प्रेम होतच की, पण मूव्ह ऑन झालेच की, तसेच विन्या चे करावं,
पण नाही, कमालीचे अ आणि आ प्रसंग दाखवून मिट्ट गोड पाक नरड्या खाली उतरवणार

आशुचँप +१००
एक रुद्रम सोडुन काही चांगल राहीलं नाही युवा वर.

आशुचँप +१००
एक रुद्रम सोडुन काही चांगल राहीलं नाही युवा वर.

>> +१२३४५६७८९

श्रीकांत ला वाईट दाखवायचं म्हणून काय वाट्टेल ते प्रसंग कोंबलेत अक्षरशः
आई बेशुद्ध पडली तरी त्याला लग्न करायचे दाखवून किती आपण खालच्या दर्जाला उतरत आहोत याची कल्पना निर्माते दिग्दर्शक यांना येत नसेल का?
का त्यांचे मेंदू तितके बाथड आहेत

कचराच केलाय मालिकेचा.
आता ह्या काकुने २ माठांचं बोलणं ऐक्लं असेल खोलीतलं म्ह णुन कदाचीत ती बेशुध्द पडली असेल.
नाहीतर हा सगळा प्लॅन असेल आधीपासुनच त्यांचा ह्या २ माठांनी कबुल कराव म्हणुन असं काहीतरी दाखवतील. Lol

Pages