Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08
२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...
लव्ह लग्न लोचा
फ्रेशर्स
बनमस्का
इथेच टाका तंबू
श्रावण बाळ रॉ़क स्टार....
सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज मी अगदी शेवटचा सीन बघितला.
आज मी अगदी शेवटचा सीन बघितला. काका आलाय त्यापेक्षा काही विशेष झालं का.
शुक्रवारपासूनचे विशेष बघितले
शुक्रवारपासूनचे विशेष बघितले नाहीत. बापमाणूस पण बरेच दिवस नाही बघितली.
आज काढा दिलाय,उद्या चाटण
आज काढा दिलाय,उद्या चाटण देशील
तो काका पपी चा काय करतो
तो काका पपी चा काय करतो पुण्यात. पहिल्या भेटीत चेन देतो का परागला. जे त्याच्या बाबांना आवडलं नाही, बरोबर आहे ना अजून नीट ठरलं नाही तर महागडे गिफ्ट कसं देतो.
कोण कलाकार आहे तो, ओळखीचा वाटतोय. आत्ता रिपिट बघतेय
बिचारा लक्ष्मीकाका, सारखा
बिचारा लक्ष्मीकाका, सारखा वडीलांचा मार खात असतो आणि सगळेच त्याला बिचाऱ्याला तोफेच्या तोंडी देतात.
बऱ्याच दिवसांनी बापमाणूसचा
बऱ्याच दिवसांनी बापमाणूसचा कालचा भाग आत्ता बघितला. तो आय जी अजून आहे इथेच. मागे त्याने पत्रकारांवर हल्ला केला होता तो भाग बघितलेला, सगळीकडे news होती ती. मला वाटलं गेला असेल तो तर आहे अजून.
बापमाणूस - निशाला का सवलत आहे
बापमाणूस - निशाला का सवलत आहे घरच्या कामांमधुन?
आणि सुजाताने जरा कुरकुर केली की लगेच तिला माहेरी पाठवायची भाषा.
कट्टीबट्टी- जावयाने निघून जावं पेोराला घेऊन घरी,शाळेसाठी. काय दशा करून टाकलीये त्याची.राहूदे आत्याला माहेरीच.
मस्त वाटतेय कट्टीबट्टी...मी
मस्त वाटतेय कट्टीबट्टी...मी जरा मागेच आहे..इथल्या प्रतिक्रिया वाचून आत्ता सुरू केली बघणं...मस्तंय पण हलकीफुलकी...अभिनय तर झक्कास आहे पण वातावरण निर्मिती सुद्धा उल्लेखनीय आहे.भाजीबाजार,कापडदुकान , सगळ्यांच्या खोल्या खास आहे...
तोच मुलगा नेमका पपी कडच्यांचा
तोच मुलगा नेमका पपी कडच्यांचा नातेवाईक किंवा संबंधित असेल तर तो सांगेल की उद्या पराग आणि ती रिलेशनशिप मध्ये आहेत, बिचारा पराग >>>> चंद्रकांत काका चा मुलगा US ला आहे ना . तो तर नसेल ?? लग्न मोडलं की आप्पा-चंद्रकांत तेढ आणखी वाढेल
मोक्षू, मी पण आताशा बघायला
मोक्षू, मी पण आताशा बघायला सुरुवात केलीय.
आवडतेय मला पण मालिका.
चंद्रकांत काका चा मुलगा US ला
चंद्रकांत काका चा मुलगा US ला आहे ना >>> हो का. असूही शकेल पण ते काका करतात काय, माझं मिसलय ते. त्यांना एवढा मोठा मुलगा आहे, वाटत नाही.
परागचा उगाच बळी त्या अ भा
परागचा उगाच बळी त्या अ भा साठी.
सोचा ना था सिनेमाची स्टोरी
सोचा ना था सिनेमाची स्टोरी वाटतेय.
काही तरी होऊन यांचे लग्न मोडेल आणि तोपर्यंत हे प्रेमात पडले असतील एकमेकांच्या.
काही म्हणा पण सगळ्यांनी खूप
काही म्हणा पण सगळ्यांनी खूप सहज अभिनय केला आहे. व्यक्तिरेखा पण सुंदर मांडल्या आहेत.
चंदू काकाचा construction चा
चंदू काकाचा construction चा business आहे पुण्यात. त्याने पुराणिक शी लग्न केल म्हणून आप्पांंचा त्याच्या वर राग आहे.निकमांकडे सांगतो त्या च्या मुलाबद्दल. अभा चा तो मित्र प्रतिक, मागे पराग ला फोन करतो तेव्हा त्याचा चेहरा दाखवला नाही. .
कट्टीबट्टी - आज जावयाचा आवाज
कट्टीबट्टी - आज जावयाचा आवाज चढला एकदाची. त्या पोरासाठी तरी आत्याने परत जावं.लक्ष्मीकाका व जावयाची फारच हटाई करतात.
कालचा भाग आवडला. आप्पा आणि
कालचा भाग आवडला. आप्पा आणि चंदू ची भारी जुंपली. ते दोघे , पूर्वाची कुतरओढ ,तिचे dialogues सगळं एकदम genuine . पण काका चॉकलेट वाटल्या सारखे सोनं वाटतोय
मी दोन दिवसाचे भाग कब चे,
मी दोन दिवसाचे भाग कब चे, नेटवर बघेन.
चंदू काकाचा construction चा business आहे पुण्यात. त्याने पुराणिक शी लग्न केल म्हणून आप्पांंचा त्याच्या वर राग आहे. >>> थँक यु स्वस्ति.
प्रतिकचा आवाज ओळखीचा वाटला,
प्रतिकचा आवाज ओळखीचा वाटला, तो शॉट बघितला. त्या अ भा मुळे लग्न मोडणार यांचं. अ भा च्या कॅरॅचं नाव काय आहे.
अभाचं नाव कधी ऐकलं नाही मी
अभाचं नाव कधी ऐकलं नाही मी मालिकेत. प्रतिकला कुठे बघितलंय आठवत नाही पण जुना आहे तो. प्रतिक, अभा आणि परागचं वागणं त्यांच्या वयाला बिलकूल शोभणारं नाही, काॅलेजमधल्या मुलांसारखं, अप्रगल्भ. पराग त्याचे विद्यार्थी कुठेही भेटले की डोळे वटारत असतो आणि स्वत: मात्र लग्न ठरलेलं असून खोटं बोलतो.
बघितली कब दोन्ही एपिसोडस.
बघितली कब दोन्ही एपिसोडस.
परागची काकू गार्गी फुले आहे का, निळू फुले यांची मुलगी. ती वेशभूषापण करतेय याची. छान काम करते. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक सिरीयल होती तेरा भागांची, तेव्हा अशाच असायच्या. त्यात ती नायिका होती; हिरो आठवत नाही पण व्हिलन प्रसाद ओक होता, तिच्या नणंदेचा नवरा दाखवलाय. तेव्हाही छान काम केलेलं तिने.
पप्पीच्या आतेचा नवरा बरा वाटतोय. आत्याच गैरसमज करून घेऊन कजाग वाटतेय. ते दोघं वाद घालत असताना लक्ष्मीकाकांचे एक्स्प्रेशन्स भारी होते.
परागच्या वडलांचा स्वाभिमान घरातले लोक का जपत नाहीयेत. लागलं तर आम्ही आहोत पैशाची मदत करायला, एवढंच सांगायचं. परागचा एक काका अति दारू पिणारा दिसतोय पण मग हे सर्व मिळून त्याची दारू सोडवायचे प्रयत्न का नाही करत.
बैठकीत काहीतरी घोळ होणार, प्रतिक येईल ऐनवेळी बहुतेक. अ भा charactorचं नाव अनुष्का.
प्रतीक म्हणजे अ.भा चा मित्र
प्रतीक म्हणजे अ.भा चा मित्र ना? तो रुद्रम मधे होता ना, मु.ब चा शेजारी, सॉफ्टवेअर ईंजिनीयर.
मला आत्याच्या मुलाचं बोलण आगाऊपणाच वाटतं.
परागच्या आत्याच्या नवर्याला हसण्याची अॅलर्जी आही का? सारखं 'हसायला काय झालं?' काय विचारत असतो.
परागच्या वडलांचा स्वाभिमान घरातले लोक का जपत नाहीयेत. लागलं तर आम्ही आहोत पैशाची मदत करायला, एवढंच सांगायचं... +१
परागच्या दारुड्या काकांचा
परागच्या दारुड्या काकांचा पूर्वी कधीतरी प्रेमभंग झालाय बहुधा.. मागे एकदा indirectly सांगितलंय असं..
अभिज्ञा भावे लाऊड आहे.. अज्जिबातच जमत नाही तिला कुठलाच रोल..
हो, प्रतिक म्हणजे आशिष
हो, प्रतिक म्हणजे आशिष कुलकर्णी. मग तो चंदू काका चा मुलगा नसावा.
परागच्या वडलांचा स्वाभिमान
परागच्या वडलांचा स्वाभिमान घरातले लोक का जपत नाहीयेत. लागलं तर आम्ही आहोत पैशाची मदत करायला, एवढंच सांगायचं...>>>>आत्याचा नवरा महसूल अधिकारी आणि काकी राजकारणात , त्या मुळे बडेजाव आहे.
आत्याचा मुलगा वयापेक्षा जास्त
आत्याचा मुलगा वयापेक्षा जास्त समजदार दाखवलाय आणि वाचनही खूप करतो त्यामुळे असेल जास्त बोलत. आत्याच्या नव-याला वाक्य बोलून झाल्यावर ओठ ताणायची सवय आहे. आत्या माहेरी काही काम करत नाही आणि तिला सतत चांगलं खायला लागतं म्हणून तो तसं बोलतो. आप्पा नविन गोष्टींना विरोध करतात नेहेमी आणि लक्क्षीचा किती अपमान करतात, म्हणूनच त्याच्यात आत्मविश्वास कमी आहे, बिचारा.
आप्पा लेकीला मात्र नाही बोलत
आप्पा लेकीला मात्र नाही बोलत काही.
आशिष कुलकर्णी डायरेक्ट दाखवला का प्रतिक म्हणून, मी आवाज ऐकला तो ओळखीचा वाटला पण तेव्हा सावली, सावली दाखवली.
आ कु असेल तर अ भा आणि आ कु
आ कु असेल तर अ भा आणि आ कु जोडी भारी मस्त दिसेल. करा बाबा लग्न आणि जा एकदाचे, आम्हाला सुखाने पराग पूर्वा स्टोरी बघुदे सुखाने. एक सिरीयल बरी आहे त्यात अतिरेकीपणा नको.
आजच्या भागात येईल आकु. फोन
आजच्या भागात येईल आकु. फोन करतो तो परागला
हो बघितला. ती अ भा वाट लावणार
हो बघितला. ती अ भा वाट लावणार, ती खोटारडेपणा करते आणि पराग साथ देतो ते आता अंगाशी येणार परागच्या.
आज लय भारी जबरदस्त बोलली पुर्वा आत्याला.
Pages