नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल ओझीवर बघितलं फुलपाखरु. मला फार बोअर झाला पहीला भाग. ती ऋता दिसते छान पण फार बोअर आहे. दुर्वा मध्ये पण फारशी आवडली नव्हती मला ती. नायक यशोमान आपटे बरा वाटला पण अगदी शेवटी दाखवला त्यामुळे काही अंदाज नाही आला. मं दे ची आहे सिरीयल त्यामुळे अपेक्षा किती ठेवणार, बघावीशी काही वाटत नाहीये.

मी पण बघितलं फुलपाखरू. मला पण अजिबातच आवडला नाही पहिला भाग. लई बोअर झालं.

बन मस्का पण संपतेय वाटतं. काल "अंजली" नावाच्या सिरियलचा प्रोमो बघितला. का रे दुरावा वाली अदिती डाॅ. अंजली आहे त्यात.

श्रीकांत-आकांक्षा ची सनई वाजतिये आता श्रीकांत आनि काकुंच्या मनात.
विनयचा बाळवटपणा चालुच आहे.
शाल्मलीच्या बाळाच्या imagination मधे २ दिवस वाया घालवले.
बाळ होणार म्हणुन अभिमान ने श्रीकांत्च्या बिझनेस मधे मदत करणं रिस्की कसं?
पैसा कमवायला तो राघव च्या कॅफेमधे तर काम करणारच आहे न? मग श्रीकांत बरोबर काम केलं तर काय हरकत आहे?

कैच्याकै बावळटपणा सुरू आहे, ते बाळ प्रकरण फलतुगिरी इतकी डोक्यात गेली की बंद च केलं आता बघणं.
बन मस्का त्यात अजून बरी चाललीये, बाकी एकेक करून बंद केलं बघणं.
ती नवीन फुलपाखरू तर भयाण आहे
स्वतःचं फुल स्वतःच शोधत म्हणे
बाकीचे पक्षी आणि भुंगे काय आऊटसोर्स करतात का फुल शोधायला

मध्ये ती आकांक्षा श्रीकांतसोबत नवीन कपडेखरेदीला गेली होती ना? मग अजून वापरायला काढले नाहीत का ते ड्रेस? अजूनही ती अतिशय बंडल असे ते रँडम कुठलीतरी ओढणी, विचित्र शिवलेले कमी उंचीचे टॉप आणि रँडम लेगिंग्ज घालतेय.

प्रेग्नन्ट असल्याचं सांगण्याच्या सीनमध्ये शाल्मली फार क्यूट वाटली पण नंतर कंटाळा आला इतरांच्या बालिश वागण्याचा.

तम्बूचा शेवट

तम्बू सोडून सर्व फरार
तम्बू OLX वर ठेवलाय विकायला Happy

ल.ल.लो . मी खूप दिवसांत पाहिलेलीच नाहीये.
आणि आता त्याचा रात्री १०:०० वाजताचा रिपीट ११:३० ला हलवलाय. Sad

सौम्या ताई लईच फटकळ. एक तर ती सुमीतला मित्रांपासुन तोडणार नाहीतर ह्याच दोघांचं ब्रेक अप होणार.
पार्टीला ड्रींक्स ठेवलेली नाहीत इतक साधं बोलुन विषय संपवता आला असता की. एवढ पुढचं कशाला बोलायचं?

एक तर ती सुमीतला मित्रांपासुन तोडणार नाहीतर ह्याच दोघांचं ब्रेक अप होणार. >>>> नाही बहुतेक. तिच्याबरोबर काम करणारा तिचा मित्र काल तिला म्हणाला, अस का कुणी मित्रांपाअसून दुर जातं. उद्या सुमीत तुला म्हटला कि माझ्याशी बोलू नकोस तर तु बोलायची थांबणार आहेस का. अस काहीतरी. त्यावर सौम्या विचारात पडलेली दिसली.

सौम्या बोअर आहे

हो, तिचा मित्र म्हणाला म्हणुन ती पार्र्टीला तरी तयार झाली. पण हे जे फटकळ बोलणं आहे त्याने काहीतरी घात होणारे.

'पार्टीमधे ड्रिंक्स' हा प्रकार पहिल्यांदा ऐकल्या सारखाच करतिये. लगेच 'बार' होतो का घराचा?

सौम्याला माहीती नाही का हे मित्र बरेचदा ड्रिंक्स घेत असतात, मी बघायचे तेव्हा तर सारखे होते ड्रिंक्सचे सीन. मी कळवलं पण होतं फेसबुकवर त्यांना, तुम्ही अति दाखवताय, उठसुठ. बोअर होतात. तोच तोच पणा वाटतो.

त्या सौम्या ला आवरा रे. काहीही बोलतीये, त्यांचा कंफर्ट महत्त्वाचा नाही म्हणे. माझ्या पार्र्टीला मीच ठरवणार कोण केटरर असणार ते.
हिचं आणि त्या श्रीकांतचच जमवुन द्या. दोघांनाही आवडत नाहीत ही मुलं.

विनय आणि अभि, काव्या-सुमीत नाव घेऊन घोळ करणारचेत आज.

फुलपाखरु मधे प्रसाद ओक चि बहीण झालेली कोण आहे ? आधी कुठल्या सिरीयल मधे होती ती?
चेहरा ओळ्खीचा वाटतोय पण जाम आठवत नाहीये.

श्रीकांत काहे दिया परदेस मध्ये पण आहे! हो ती सिरीयल तर आधी आली.

सौम्यानी प्रत्येक गोष्टीत मधे बोल्लच पाहिजे का?
पार्टी अँड मैत्री स्पॉयलर कुठली

बन मस्का जर कुठे बारी चालली होती तर तिथेही राडा.
झी वाल्यांचे दुर्गुण युवा मध्ये पण आले, काहीतरी उगाचच नाट्यमय काहीतरी घुसडला पाहिजेच का प्रत्येक ठिकणी. साधे सरळ सोपे काही असूच शकत नाही का

परवा ‘फुलपाखरू’चा एक सीन पाहण्यात आला.
नायिका ‘देवपूजा कशाला करायची, त्याच देवाने आईला हिरावून नेलं,’ अशा अर्थाचं काहीतरी बोलत रडत असते. तिचा भाऊ तिला म्हणतो- आजच्या दिवशी असं कशाला बोलतेस?
त्यावर वडील त्याला म्हणतात - बोलू दे तिला. मनातल्या विचारांच्या नदीला व्यक्त होण्याच्या मार्गावर धावू द्यावं
Uhoh
घरगुती संभाषणात असं कुणी बोलतं का? Uhoh

Pages