काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीणा वर्ल्डने आयडिया मात्र छान केली. हे सगळं भक्तीभावाने पाहणारे घराघरात आहेत. नक्कीच त्यांच्या टुर्सना फायदा होणार.>> आणि त्यामुळे केसरीला विचार करावा लागेल . पण एक आहे लोक हुशार असतात ते नेहमी कंपेरिझन करून जातात आणि लक्षात येत वीणा वर्ल्ड च्या जास्तीत जास्त परदेशी टूर्स या ओरिएण्टेशन ( बसमधूनच लांबून च जागा दाखवतात .प्रत्यक्ष उतरत नाहीत ) टूर्स असतात आणि केसरी मात्र प्रत्यक्ष प्लेस ला भेट देते . त्या जागेला भेट द्यायची एंट्री फी टूर कॉस्ट मध्ये इन्क्लुड केलेली असते त्यामुळे ट्रीपची ( परदेशी ट्रीपची )कोस्ट वाढते .माझा अनुभव Happy

सिनोरिटा शुक्ल !! Biggrin
शनाया सबनीस सारखं वाटतं ना?
हिच्या चेहेर्‍यावर प्रत्यक्षातही काहीच हावभाव नसतील का सुख दु:खा च्या प्रसंगी?

गौरीचे पँट घालून इतकं ते लाजणं.. आणि तो केबल कार सीन्स अचाट! आत एकदा गेल्यावर काचेवर हात मारणं, हाका मारणं, घाबरणं... कुठल्या गावातून आलीय...
गौरीला रोमँटीक अभिनय म्हणजे डोळे वटारून शिव कडे बघणे इतकच कळतं.
आणि काय तो अनुराग पोर्‍या सारखा ह्यांच्याबरोबर सतत. तो ही गौरीला चिकटून बसलेला केबल कारमध्ये.

आणि तिथे ती सरला आणि राम. लग्न होवून चार वर्षे झाली तरी बायकोचा हात धरत नाही आणि थरथरतो.. सरळ नाही काय मग गे आहे का?
इतके वर्षे काय केलं?

झंपी.... !!

गौरीला रोमँटीक अभिनय म्हणजे डोळे वटारून शिव कडे बघणे इतकच कळतं.--- अगदी अगदी!
आणि पँट वर तर ढीग भर कपडे घालूनच आली बहेर...तरी काय ते लाजणं!
बिकीनी घातल्यागत! आणि हिला सालसा पण करायला लावला......? दिग्दर्शकाचीही पण कमाले. त्याला गवरी म्हणजे काजोल वाटत्येय का?
अनुराग पोर्‍या सारखा असला तरी यांना पाहीजेच ना कुणीतरी ... सतत... !! बावचळल्यागत झालेत दोघेही! पार भेदरुन गेलेत स्वित्झर्लंड मधे!
:रागः

गवरीचे म्हणजे असे झालेय की " खुदा मेहेरबान तो गधी पहेलवान" खरच बथ्थड बाई आहे, त्यामानाने सरलाने धमाल आणली.

बापरे झंपी... खुपच राग आलाय वाटते.

काय तो अनुराग पोर्‍या सारखा ह्यांच्याबरोबर सतत. तो ही गौरीला चिकटून बसलेला केबल कारमध्ये.>>>> तरीही ही ईतकी घाबरली.. मला वाटले एकटीच गेली पुढे, शिवला सोडुन म्हणुन घाबरली.

अर्थात ते सुद्धा पटण्यासारखे नव्हते.. पण असो

Biggrin
म्हणे मुंबई ची मुलगी!! जांभळी बु || ची मुलगी देखिल हिच्या पेक्षा स्मार्ट असेल!
शिव ला मात्र फुल्ल मार्क्स. माठ गवरीला सहन केल्या बद्दल दोन टक्के अधिकच!

मानिनी....तो अनुराग नंतरच्या ट्रीपला बसलेला तिला चिकटून केबल कार मधे.......आधी ही (बावळट पणे!) एकटीच गेलेली !

ओह.. मी तर ही शिरेल बघत नाहीच पण हे विणा वर्ल्ड प्रकरणानंतर मम्मीनेपण बंद केली बघायला.
पण मी ईथे वाचते तुमच्या कमेंट्स, मजा येते

वीणा वर्ल्डने लोकसत्तेत शिवगौरी आणि सुझरलँडबद्दल लिहिलंय. विसरलेलं पाऊच परत करणार्या बाई वीणावाल्याच वाटताहेत.

रविवारचा होम मिनिस्टर मकरसक्रान्त स्पेशल कुणी कुणी पाहीला? शेवटी गौरीच पैठणी जिन्कली.

रविवारचा होम मिनिस्टर मकरसक्रान्त स्पेशल कुणी कुणी पाहीला? शेवटी गौरीच पैठणी जिन्कली >>
मी पाहिला. गवरी संगीतखुर्ची मध्ये पैठणी जिंकली . नाहीतर शनाया २ पैठण्या जिंकली असती .
आणि ती गौरी एकदम प्लेन कॉटन ची काळी साडी घालून अली होती मठ्ठासारखी !
गौरीवर खुदा नाही झी मेहेरबान आहे सध्या .. काल ते रॅप सॉन्ग पाहून लिहिणार्याची कीव आली ..भयानक होते !

आणि ते राम सारख्या वेड्याला शिवने फोटो कसे पाठवले? ते ही हनिमूनचे? जो इतका मागासलेला आहे?

गौरीची ती प्लेन काळी साडी भयाण होती... आणि तो ब्लॉउज. ह्या मुलींना जराही फॅशन सेन्स कसा नाही? आरशात बघत नाहीत?

संक्राती म्हणून इतकी प्लेन काळी साडी...

पाऊच परत करणाऱ्या बाई सुनीला पाटील होत्या.. त्या वीणा पाटीलच्या धाकट्या भावजय आणि वीणा वर्ल्ड च्या पार्टनर आहेत....

आणि ते राम सारख्या वेड्याला शिवने फोटो कसे पाठवले? ते ही हनिमूनचे? >>> लोक आजकाल आपल्या हनिमूनचे (कसकसले) फोटोज फेबुवर टाकतात . आणि अल्बम ला नावही देतात , honeymoonInPhuket'16 .

झंपी........ रॅप साँग महाभयानक होते. अतिच भिकार! म्हणजे कल्पना दारिद्र्याची हद्दच! अगदीच !
ओ गोरीजी....गोरी गोरी....गोरीजी.......आप खुश तो है ना सिर्फ इतना बता दो...ओ गोरीजी........!!
आणि कहर म्हणजे लास्ट्ला गवरीच्या बसक्या आवाजातल्या ओळी.......शिव तू खूप छान गातोस ..पण यापुढे प्लीज गाऊ नकोस हं...! आ ss ल s फ यू...............................!!!!!

आणि खरंच...राम ला का पाठवायचे? उगाच जळवायला? सरलाचं काय चुकलं मग?
निशाचं काय मधेच आणि.....दीड लाख वगैरे...!!!!

प्रेक्षकांच्या सहन शक्तीचा अंत बघतात अगदी!

संतापाने हाताच्या मुठी वळलेली स्माईली!!!! :रागः Sad

शिवच्या डोक्याचे स्क्रू स्वित्झर्लंडमध्ये पडलेत. हनिमूनचे फोटो भावाला पाठवले. भारतात पोचल्यावर घरी फोनही केला नाही. अम्माच्या हाती पेटती काडी देऊन वर तिच्याशी भांडण करून तेलही ओततोय.

मेनका दिवाळी अंकात शुभांगी आणि सखी गोखलेंची मनोगते आलीत. त्यात सखीने सांगितलंय की "काहे दिया परदेसमधली मध्यमवर्गीय आईची भूमिका अस्सल वाटावं म्हणून आई सेटवर रोज बसने जाते. सेट अगदी घराजवळ आहे. पण ती बसनेच प्रवास करते."

नचिकेतला बाळासाठी गळ घातलीय , म्हणजे सावंताना ब्लॅकमेल करण्याचा प्लान दिसतोय .
एकदाका बाळाची चाहुल लागली की मग ही मनमानी करायला मोकळी , मग परत आपले सावंत सापडले कोंडीत .

निशा? आणि सुधारणार? धन्यच___/\___ (जोडलेला हात कोपरापासून आहे, ह्याची गरजूंनी नोंद घ्यावी :फिदी:)
स्माय्ल्या द्या हो कुणी तरी.

मी जे काही तुकडे पाहिले त्यावरून ---
१. शिव-गौरी , हमू वरून परतताना , न कळवता मुम्बईला गेले , त्यावरून घरात गदारोळ . दादीजी नाराज . अम्माला आनंदाच्या उकळ्या.
२.शिवने काढली दादीची समजूत . दादीने केली फोटो बघायची मागणी . शिवची टाळाटाळ . सरला बहुने परस्पर रामचा फोन घेउन दादिला दाखवले फोटो . गौरीने " पतलून" घातलेली बघून दादीला सान्स्क्रुतिक धक्का आणि त्या नाराज . बाबुजींची अम्मावर नाराजी. रामची सरलाबहुवर . सरलाबहुचे सुतोवाच "मैने तो वही किया जो अम्माजीने कहां" . त्यावरून अम्मा आणि शिव मध्ये खडाजंगी.
फोटो रामला पाठवल्याबद्दल गौरी ने दिली शिवला समज . भावाने काहितरी शिकावं म्हणून पाठवले फोटोज - शिवचा खुलासा.
३. शिव-गौरीने काढली दादीजीची समजूत. "वहांपे बहोत ठंड होती है , ऐसेही कपडे पेहनने पडते है . अगर हुम ऐसे कपडे नही पेहनते तो ठंड से बीमार पड सकते थे , और फिर वहां परदेस मे कहा डॉ. , हॉस्पिटल ढून्डेन्गे " शिवची री . आणि दादीजीना आठवण करून देणे की त्यानीच म्हटलं होतं की बदलाव जरूरे होता है , जैसा देस वैसा भेस.
४.अम्माची समजूत काढण्याचा शिव-गौरीचा प्रयत्न विफल. बाबुजीपण चिडले. अम्माचे रागाने कोपग्रुहात (कोठडीत) प्रयाण .
५.दादीजींने टाकला गौरीवर विश्वास . अम्माजीच्या गैरहजरीत गौरी सांभाळू शकते घर.
६.अम्माजीवर घराने टाकलेल्या बहिष्काराने गौरी अस्वस्थ . सरला बहु खुश .
७. दादीजीना ईतके वरशात घर सांभाळ्ण्यासाठे कोणीच लायक व्यक्ती मिळाली नव्हती , आणि आता त्या थकल्या . गौरी सगळं सांभाळू शकते हा त्याना विश्वस वाटतो , म्हणून (डायरेक्ट????) सगळ्या चाव्या तिच्या ताब्यात . सरलाबहुचे व्यथित होउन माहेरी प्रयाण.

हुस्श्स्ष्श्श्श्श.
बाकीचं दूसर्या कोणीतरी टायपा.

स्वस्ति >> Biggrin
दुरदर्शन वरच्या सातच्या बातम्यांच्या थाटात अपडेट टाकलेयस. लय भारी.

आताच चार्ली चापलीन ची एक धमाल फिल्म बघितली फक्त 10 मिनिटेच पण त्यातही मूड एकदम रिफ्रेश होऊन जातो .
आज १०० वर्षा नंतरही त्याची जादू कायम आहे .
सहजच मनात आलं जर गवरीला अशा मूकपटात काम करायची वेळ आली असती तर ...
तिने कसा अभिनय केला असता ..........?
जस्ट इम्याजीन ........................... yellow-smiley-confused-emoticon.gif

Pages