काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो वीणा वर्ल्ड वाला कोणीतरि बालकलाकार आहे असं सारखं वाटतंय... चींटू किंवा कोणीतरी झालेला >> अर्रे हो ! मला ही तेच वाटत होतं....बहुतेक हा त्याच मालिकेत होता जी खूप वर्षापुर्वी झी वर यायची वीकेन्ड ला सकाळी, त्यात प्रिया बापट होती, हसा चकट्फू नन्तर यायची....हा त्यात होता, त्याच्या सोबत एक जाड्या छोटा मुल्गा पण होता...

का फालतु सिरियल आहे.. काल चुकुन एक सीन पाहिला ज्यात गवरि आनि तिचा तो नवरा DDLJ मधला सीन कॉपि करत होते "अगर वो मुझसे प्यार करति है तो पलटेगी " भयंकर बेकार आहे हे ते हात वगैरे पसरवने ईत्यादि ... Sad Sad

>>करेक्ट , तो बाल कलाकार होता. प्रोमो मधे दाखवलं तेव्हाच वाटलं >> तो 'दे धमाल' सिरिअल मधला बालकलाकार आहे.... अनुराग वरळीकर
गौरी सगळ्या गोष्टी पाहून खुळ्यासारखी किंचाळतेय Uhoh
जान्हवी श्री तरी रोमॅटीक होत होते. हे दोघे याबाबत अगदीच येड्बंबू आहेत... काय अगाध एक्सप्रेशन्स चेहर्‍यावर!! शिवचे जरा तरी ठीकय पण गौरी तर कहर आहे.. कधी कधी तिचा बालविवाह झाला की काय शंका येतेय.

झंपी यांना.. +१०००

ते गौरीला शंभर चिठ्ठ्या लिहुन ठेवण आणि शेवटी शिव दिसणं .. तो काय शिट्या वाजवत बसला होता.. आणि मग गौरीच पळत जाणं.. सगळच बोअर.. आणि जसा तेवढा प्रसंग संपतो तसे नॉर्मल वागायला लागतात.. स्वित्झर्लॅड वाला सिन संपला आता नॉर्मल मोड ऑन

शिवगौरीला दाखवण्याऐवजी स्वित्झर्लंड तरी नीट दाखवा.हे २ दगड पहाण्यापेक्षा बर्फ पाहिलेला बरा.

>>>शिवगौरीला दाखवण्याऐवजी स्वित्झर्लंड तरी नीट दाखवा.हे २ दगड पहाण्यापेक्षा बर्फ पाहिलेला बरा.
किंवा एखादी हिमगौरी वगैरे Lol

आईशप्पथ , ही गौरी मुम्बईचीच आहे ना ?
लोकल ने जाताना आपण पुढे गेलो आणि सोबतची व्यक्ती चढायला न मिळाल्यामुळे मागे राहिली , तर ईच्छित स्थ्ळी उतरून जिथे आहोत तिथे उभ रहायचं , हा साधा नियम माहित नाहिइ का तिला ??????

आणि काय लहान मुलासारखं वागतयेत तिकडे जाउन ?

खरतरं , धड ना लहान मुलांसारखं आणि ना मोठ्या माणसारखं , काहीतरी धेडगुजरी .

२ दगड पहाण्यापेक्षा बर्फ पाहिलेला बरा. Rofl

लोकल ने जाताना आपण पुढे गेलो आणि सोबतची व्यक्ती चढायला न मिळाल्यामुळे मागे राहिली , तर ईच्छित स्थ्ळी उतरून जिथे आहोत तिथे उभ रहायचं , हा साधा नियम माहित नाहिइ का तिला ?????? + १११
खरतर हे समजण्यासाठी मुंबईच असण्याची पण गरज नाहिये Angry

हल्ली गवरी फार किरट्या आवाजत बोलते अस वाटत मला

किरट्या..म्हणजे... सानुनासिक...!

आणि सारखं शिव...शिव........ बावळटा सारखी एकटीच गेली त्या केबल कार मधे...आणि त्यातही एकटं नाही बसवत कुणाला .. चार चार जण बसवतात!! आणि त्यांचा एंट्री पॉईंट आणि उतरण्याचा पॉईंट वेगवेगळे असतात......तिथेच नसतात!
इतकी बुटकी दिसते...अगदी बारा वर्षांची मुलगीच!
मागे राम कपूर- साक्षी तंवर ची 'बडे अच्छे लगते है' यायची ना...त्यातला प्रसंग डिट्टो उचललेला.....पण त्यात फक्त ट्यूब रेल चे दार लागून जाते व प्रिया आत जाते....पुढच्या स्टेशन वर राम (अगोदरच?) पोहोचून तिची वाट बघत थांबलेला असतो...तेव्हा आधी असलेला राग- दुरावा वगैरे विसरुन ती त्याला बिलगते असं फार छान चित्रण घेतलेलं...
इथे म्हणजे....सगळाच आनंदी आनंद!!!

बाप रे सेनोरिटा शुक्ल काय नी काय काय..
माझी लहान मुलगी पण जर अशी एकटी पुढं गेली... तरी नीट सांभाळुन घेईल..

फार जुन्या काळातिल दाखवत आहेत..डायलॉग प्रसंग एकतर कॉपिड किंवा रिपिट...
शिव पहिल्यांदा अवघडल्या सारखा वाटला.. बहुतेक गौरीचे अगम्य हाव्भाव बघुन..
मै सेनोरिटा शुक्ल म्हणताना.. गौरी चे हाव्भाव काय होते ते तिला स्वतःला अगदी तर देवालाही नाहि सांगता येणार

तो अनुराग , पर्सनल मॅनेजर आहे का?
शिव ला टूरची माहिती देण्यापासून , विजा प्रोसेस करण्यापसून सगळ तोच करत होता .
आता त्यांच्याबरोबर टूरला ही आलाय ??

जनरली desk executives आणि tour manager वेगळे असतात ना .

पर्सनलाईज्ड टूर मध्ये असे मॅनेजर असतात का ?

झी साठी वीणावाल्यांनी स्पेशली अ‍ॅरेज केला असेल ग.>>> पण उद्या मी हे पाहून , पर्सनलाईज्ड टूर घेतली तर ???
मला नाही ना मिळणार Wink

वीणा वर्ल्डने आयडिया मात्र छान केली. हे सगळं भक्तीभावाने पाहणारे घराघरात आहेत. नक्कीच त्यांच्या टुर्सना फायदा होणार.

Pages