काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"घरातल्या मोठ्या माणसंच मन दुखवायचं नाहीय पण म्हणून स्वतःच हि मन मारता येत नाहीय" >>>> गौरीला आता ह्या गोष्टीचा साक्षात्कार झाला?

सरला भाभी पोस्ट ग्रॅज्युएट है.. >>> वाचून खुप मोठा मानसिक धक्का बसला मला. अजून ह्या धक्क्यातून सावरली नाहीये मी. Post graduate झालेली बाई इतकी वेन्धळयासारखी कशी काय वागू शकते?

आता पुढच्या भागात ( उद्याच्या ) गौरीचे बाबा तिला मुंबईला घेऊन जातात Happy
गौरीने आधी अगदी एकदम अंगात संचारल्यासारख तडा तडा जाऊ आजींना विचारल तुमच्या घरात सुनेने नोकरी केली तर तिला घराबाहेर काढतात का ? वगैरे वगैरे आणि बाबा आल्यावर मला भीती वाटते . मला भीती वाटते . का ग बाई ?

दोन दिवसापूर्वीच्या भागात गौरीचा एक वाक्य होत - "घरातल्या मोठ्या माणसंच मन दुखवायचं नाहीय पण म्हणून स्वतःच हि मन मारता येत नाहीय" खूप आवडल, मनाला स्पर्शून गेलेल झी च्या इतर मालिकां प्रमाणे सूनने सतत इतरांसाठी त्याग करत रहाणं असं न दाखवता कधीतरी स्वतःचा विचार केला छान वाटलं >>> रुपाली, तुम्ही हि सिरियल हया भागापासून बघायला सुरुवात केलेली आहे का?
सुलु ताई खरंतर ही मालिका मी नियमित पाहत नाही, जान्हवी डोक्यावर पडल्यापासून कुठल्याच मालिका प्रकरणात मी अडकलेच नाही.
मोबाईलवरून टाइपायला जमत नसल्यामुळे थोडा उशीर झाला प्रतिसाद द्यायला

बाबा आले म्हणजे आपणच बाबांना कळवून बोलवून घेतले असं सगळे समजणार म्हणून.

सावंतांचं चुकलंच. गौरी मुंबईत राहून बनारसच्या हापिसात कशी जाणार? की शिवसारखी ट्रान्स्फर कॅन्सल करून घेणार?

बाकी गौरी आणि शिव दोघांची हापिसं मस्त आहेत. हवी तितकी रजा मिळते. हवी तेव्हा ट्रान्सफर मिळते. तुमचा मूड नसेल तर ती कॅन्सलही करता येते.

प्रोमोत बाबांची हाक ऐकून धावत सुटलेल्या गौरीचा पदर बघून संजय लीला भन्सालीची पारो आठवली.
पुढला प्रोमो आणखीनच फिल्मी आहे.

सुलु ताई खरंतर ही मालिका मी नियमित पाहत नाही, जान्हवी डोक्यावर पडल्यापासून कुठल्याच मालिका प्रकरणात मी अडकलेच नाही.>>> तेव्हाच म्हटल , गौरी तुम्हाला इतर सुनान्पेक्षा strong कशी काय वाटली? तुम्ही जर हि सिरियल पहिल्या एपिसोडपासून नियमित बघितली असती ( जर तुमच्याकडे तेवढा patience असेल तर ) तुम्हाला पण पटेल की गौरी सुद्दा 'तशीच' आहे.

सरला भाभी पोस्ट ग्रॅज्युएट है.. >>> वाचून खुप मोठा मानसिक धक्का बसला मला. अजून ह्या धक्क्यातून सावरली नाहीये मी. Post graduate झालेली बाई इतकी वेन्धळयासारखी कशी काय वागू शकते? + १११११११११११११
उगिच काहिहि ......... Angry

पण मला आत्ता कुठे ही लोकं (झी वाले) वास्तवातल्या खर्या अडचणींबद्दल, प्रतिकूल परिस्थिती बद्दल भाष्य करताना दिसत आहेत....बघूया काय दाखवतात पुढे..नेहमी प्रमाणे गुंडाळपट्टी करू नये (की अचानक घरच्यांचं मन द्रवलं वा सरू-बाई शांत-शांत करत बसल्या आणि सगळे खरंच शांत झाले) Lol Lol

ती हम्मा एक वाक्य बरोबर म्हणाली, 'इन दोनों ने एक दुसरे को बिना जाने, पहचाने शादी की है' असंच काहीतरी. अगदी पटले ते.

प्रेमविवाहांत आणि अगदी ठरवून केलेल्या लग्नांत यापेक्षा वेगळं काय असतं?

गौरीला कोठडीत ठेवलेलं, तेव्हा शिव तिला घेऊन बाहेर पडायला तयार झाला होता. आता मात्र हम्माच्या पाया पडतोय.
इतकं शिकून, मुंबईत राहून, वीणा वर्ल्ड सोबत सुझरलंडला फिरून आला तरी डोक्यात बनारसच भरलंय त्याच्या (बायकांनी नोकरी करण्याबाबत). हे त्याच्या लक्षात येतंय म्हणा हळूहळू.

भंपक सिरियल.
सरला बिर्ला पोस्ट ग्रॅज्युएट? Uhoh इतकी मठ्ठ का दाखवली आहे मग ती.

सरला पोग्रॅ आहे तर मग माताजी/दादीजींनी 'हिन्दी सिनेमा संगीत और भजन - एक अतूट रिश्ता' यावर PhD केलीय असही म्हणायचं राहिलं त्यांचं

सरला मठ्ठ नाहीये गं... ती भोळी भाबडी आहे.....खरंच! पोस्ट ग्रॅज्युएशन ने काही माणूस व्यावहारीकता आणि खमकेपणा शिकतोच असं नाही....त्यातून तिला किती कमी एक्स्पोजर मिळालेय! त्यामुळे तिचं विश्व सासू- आजेसासू नवरा यातच सिमीत आहे.
त्यामुळे ती असूही शकेल ....बीए- एम ए!

सरला बिर्ला पोस्ट ग्रॅज्युएट? Uhoh इतकी मठ्ठ का दाखवली आहे मग ती.>>>>>>>>>>>>>>>>>>

ती पी. एच .डी . देखील झालेली दाखवली असती तरी नसते आश्चर्य वाटलं ...

खरं तर यु पी , बिहार च्या बाबतीत हे प्रश्नच पडायला नको .
अलीकड चीच बातमी , ती रुबी राय आठवते का बिहारची युनिव्हर्सीटी टॉपर ?
youtube वर आहेत वीडीयो .
साध्या बेसिक प्रश्नांची उत्तरे येत नव्हती तिला . पोलिटिकल सायन्स चा उच्चार प्रोटिकल सायन्स असा करीत होती
अन त्यात काय शिकवतात असे विचारल्यावर खाना बनाना सिखाते है असे उत्तर दिले होते.

खरं तर यु पी , बिहार च्या बाबतीत हे प्रश्नच पडायला नको .
अलीकड चीच बातमी , ती रुबी राय आठवते का बिहारची युनिव्हर्सीटी टॉपर ?>>> अगदी अगदी . पण टायपाचा कन्टाळा आला होता Happy

शिवचे वडिल L.L.B. आहेत. त्यांच्या घराच्या पाटीवर तसे लिहिले आहे. माताप्रसाद शुक्ला L.L.B.

हो ना. गवरीचे वडिल तिला घेवुन बाहेर पडतात, तेव्हा वाचलं मी. काहीच कळत नाही या सिरिअलवाल्यांचं. L.L.B काय, MBA काय, खाउ आहे की काय बनारसमध्ये!

युपी, एम्पी मधे LLB करणे म्हणजे आपल्याकडे कॉमर्स्,आर्ट्स च ग्रॅज्युशन करण्यासारख असत , घरात भरपुर लॉ केलेली मन्डळि असतात, पण पोटापाण्यासाठि ते वकिली करतिलच अस नाही, साड्या ची दुकान , ड्रेस मटेरियल ,ज्वेलरी ची दुकान हे किवा असे मेन बिजनेस असतात, हे सगळ मुलाच लग्नाच्या बाजारात किमत वाढवण्यासाठी असत.

शिव आणि गौरीच्या ऑफिस मध्ये जसे रजा टाकतात तसे बदलीचा अर्ज करतात. आजचा भग पाहुन असे वाटत आहे की शिव मुंबईच्या ऑफीस मध्ये जाउन सांगेल की मी आजपासुन मुम्बईत काम करणार आहे आणि हा माझा बनारस वरुन बदली करण्य्साठीचा अर्ज.

सरला पोग्रॅ आहे तर मग माताजी/दादीजींनी 'हिन्दी सिनेमा संगीत और भजन - एक अतूट रिश्ता' यावर PhD केलीय असही म्हणायचं राहिलं त्यांचं >> Lol Lol Lol

सुझरलंड
सरला पोग्रॅ आहे तर मग माताजी/दादीजींनी 'हिन्दी सिनेमा संगीत और भजन - एक अतूट रिश्ता' यावर PhD केलीय असही म्हणायचं राहिलं त्यांचं >>> हहगलो

सावंतांच्या मनात काय आहे? तिला मुंबईला न्यायचे? व तिने तिथे नोकरी करायची? गौरीला काय वाटते? हे त्यांनी विचारले की नाही..
अम्मा किती छान अभिनय करतात. अगदी खरा! त्यांचे संवाद ही अतिशय समर्पक व प्रवाही, सच्चे वाटतात. कोण आहे संवाद लेखक कोण जाणे!
बहुदा त्या स्त्री कलाकार ही संवाद लेखनात मदत/ सुचवणी करीत असाव्यात...त्या शिवाय झीला इतके सुंदर व परिणाम कारक लेखन अशक्य आहे.
"गौरी, तुम तो पेहनी हुई साडी सेही बाहर निकल पडी! तुम्हे दिक्कत होती होगी ना...इसलिए तुम्हारे लिये कपडे लायी हूं!
"आजतक, शुक्ल खानदान की कोई भी बहू इस तरह दरवाजे की चौकट लांघ कर बाहर नही गई है, गौरी!, जिस तरहा से तुम बाहर निकली हो!
जो भी तय करना था वो चार दीवारोंके अंदर भी तो हो सकता था नं? आजतक किसीने भी अपने बेटीके ससुराल वालोंका इस तरह अपमान नही किया होगा, जैसे तुम्हारे बाबा ने किया है! वगैरे वगैरे...
इतकं छानदार हिंदी तर हिंदी सिरीयल्स मधेही नाही ऐकायला मिळत......

खास बनारसी (उत्तर प्रदेशीय) हिंदी ऐकायला गोड वाटते. फक्त हम्मा ते हॅ हॅ करते शेवटी ते जाम टोचतं कानांना.

माताप्रसाद शुक्ला - एल. एल. बी. >> Lol आणि चालवतात साडीचे दुकान.>>>>>>>>>>>

त्यात हिणवण्यासारखं काय आहे ?
कुठलेही काम हे कमी नसते ...
तसंही शिक्षणाचा आणि कामाचा प्रत्यक्ष आयुष्यात किती संबंध येतो ?
माझ्या एका परिचिताचं हॉस्पिटल आहे तिथे स्वागत कक्षात एक मुलगा काम करतोय शिक्षण B.E. mech पण काम करतोय रुग्णांचे बिले फाडण्याचे , पर्चेज अन inventory चे .
झालंच निम्मे अधिक पुढारी law केलेले असतात पण करतात नेतेगिरी .

युपी, एम्पी मधे LLB करणे म्हणजे आपल्याकडे कॉमर्स्,आर्ट्स च ग्रॅज्युशन करण्यासारख असत , घरात भरपुर लॉ केलेली मन्डळि असतात, पण पोटापाण्यासाठि ते वकिली करतिलच अस नाही, साड्या ची दुकान , ड्रेस मटेरियल ,ज्वेलरी ची दुकान हे किवा असे मेन बिजनेस असतात, हे सगळ मुलाच लग्नाच्या बाजारात किमत वाढवण्यासाठी असत. >>>>>>>>>>>>>>>>>>>

हे यु .पी .बिहार मध्येच नाही तर ,
महाराष्ट्रात ही आहेत . कित्येक law केलेले व्यक्ती इथे किराणा दुकान , चपलांचे दुकान , दुधाचे दुकान चालवतांना बघतोय एकाची तर बँड पार्टी आहे .दोघे जण तर फुल टाईम पौरोहित्य करतात .
इथे कुठल्याही व्यवसायाला कमी लेखायचा हेतू नाहीये पण साड्यांचे कपड्यांचे दुकान ही त्या मानाने खूप मोठी गोष्ट आहे .मोठ्या गुंतवणुकीचा व्यवसाय आहे तो.

राहुल..खरं आहे. आपल्याकडे कित्येक इंजिनीयर्स बँकेत कामं करतात आणि इंजिनीयरिंग कोण्त्याही ब्रांच मध्ये असलं, तरी सरसकट सॉफ्ट्वेअर मध्ये असतात.

Pages