काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच बोर होत चाललीय ही सीरियल. हिंदी अभिनेते, त्यांचा अभिनय, हिंदी संवाद, हे सगळंच मराठीपेक्षा सरस आहे. ही मुळी मराठी सीरियल राहिलेलीच नाहीय. 'झी'ने ती त्यांच्या हिंदी चॅनेलवर दाखवावी.

वास्वतिक जीवनात जे इश्यु अजिबात महत्वाचे नसतात ते इश्यु यांच्यासाठी मोठे असतात. घराने का मान, खानदान की इज्जत वगैरे वगैरे.

हो ना.. शिव, त्याचे आई वडिल, इव्हन भाऊ, काका, विश्राम...सगळेच मस्त, सहज अभिनय करतात. आणि इकडे .. गवरी,निशा वहिनी व तिची आई, सगळेच अगदी अ‍ॅव्हरेज अभिनय करतात.
मुळात सिरीयल्स या अभिनयासाठी नसतातच अशी यांची समजूत दिसत्ये.

शिव गौरीच्या प्रेमात का पडला याचे उत्तर मिळाल का?>>>>

बहुतेक त्या वेणू ने "शेजार्‍यांवर प्रेम करा" असे वाक्य कधी तरी वापरले असावे आणि शीव ने त्याचा अर्थ विचारल्यावर त्याने गवरी चे उदाहरण देऊन मराठीत सांगितले असावे..

खरंच बोर होत चाललीय ही सीरियल. हिंदी अभिनेते, त्यांचा अभिनय, हिंदी संवाद, हे सगळंच मराठीपेक्षा सरस आहे. ही मुळी मराठी सीरियल राहिलेलीच नाहीय. 'झी'ने ती त्यांच्या हिंदी चॅनेलवर दाखवावी.>> +१०१

मराठी माणसाला हिंदी मालिका बघण्यासाठी चॅनल बदलायला लागू नये, केवळ या उद्देशानेच ही मालिका चालू ठेवली आहे झी ने.

मागच्या एका भागात शिवच्या दादीकडे एक शेजारीण भोचक चौकश्या करत असते. दादी तिला तिच्या पळून गेलेल्या मुलीवरून टोमणे मारते. जाता जाता बनारसमधल्या त्या बाईने दादीवर कमेंट करताना चक्क 'म्हातारी' हा शब्द वापरला.

ती एक्स्ट्रा कलाकार मराठी होती हे कळलं. पण दिग्दर्शकापासून सगळेच झोपले होते?

सध्या एकंदर पोरकटपणा (जास्त) चाललाय.

आता पुढचा बाँब गौरीबाईंच्या नोकरी करण्याचा.त्यात बनारसमध्ये गुढीपाडवा मराठी पद्धतीने साजरा होणार.

सावंतांकडचा अभिनय , संवाद कमी पडताहेत असं मला वाटत नाही. शुक्ल कुटुंब बनारसी, दकियानुसी, पुरातन इत्यादी असल्याने त्यांचं सगळं ओटीटी आहे. तर सावंत मध्यमवर्गीय पांढरपेशा मुंबईकर मराठी . त्यामुळे त्यांचं सगळं ८ बाय १० त मावेल इतकंच. आजीच एक काय ती जरा कंट्रोल न ठेवणारी.

जिथे आईवडिलांना एकत्र बाहेर जायला परमिशन लागते, त्या घरात वाढलेल्या शिवला सारखे चोचले करावेसे वाटावेत, याचं नवल वाटतं. घरच्यांना खटकेल असं काही ना काही सतत करायचं आणि मग माफी मागायची नाटकं करायची असा त्याचा पॅटर्न झालाय.

आता मालिकेचा कंटाळा आलाय.

भरत सगळ्या पोस्टला +१००

कालचा भाग पण अती होता. हम्मावर खरंच अन्याय झालाय/ होतोय हे पटतंय वेळोवेळी. अर्थात म्हणून तिने गौरीला छळावे असं नाही. पण ते छळणं जस्टिफाय होतंय उगाच. समजा मोठ्या बहिणीला आर्ट्स मध्ये जायला घरुन परवानगी मिळाली नाही आणि मग पाठच्या बहिणीला मात्र ती कॉलेजला जायच्या वयाची झाली कि तिला जाउ दिलं तर मोठ्या बहिणीची चीडचीड होणे स्वाभाविक आहे तसेच.

मागच्या एका भागात शिवच्या दादीकडे एक शेजारीण भोचक चौकश्या करत असते. दादी तिला तिच्या पळून गेलेल्या मुलीवरून टोमणे मारते. जाता जाता बनारसमधल्या त्या बाईने दादीवर कमेंट करताना चक्क 'म्हातारी' हा शब्द वापरला.>>> आ, ती मन्ग्याची आई बनारसमध्ये कशी काय पोहोचली?

गौरी गुढीपाडव्याला सगळ्या शुक्ल खानदानाला मराठी कपडे घालून सेलिब्रेट करण्याची स्वप्न बघतेय. मालिका संपतेय कि काय? आज सरला परत आली. बाकी लोक्सस पण हळूहळू सुधरतील. पाडव्याचा एपिसोड झाला की काही मुद्दाच राहणार नाही दाखवायला.

अजून निशा सुधारायचीय. गोड बातमी कळायचीय.मीतू आणि वेणू च जुळायचय,सरला आणि राम च मार्गी लागायचय

होईल ते गुढी पाडव्यापर्यंत. झी च्या मनात असेल तर
तसाही प्रोमो बघितला होताच गुढीपाडव्याचा ! मालीका सुरु होते वेळी.

जानीला नाहीका बेबीआत्याचा नवरा बस स्टॉप वर सापडला होता .
तसच , गौरीला काहीही सापडू शकतं . गंगाघाटावर सापडेल Happy

>>गौरीला काहीही सापडू शकतं .---

अगदी. काय पण तिला सगळ्यांची तारणहार देवी करुन ठेवलंय. शेवटच्या एपिमध्ये शिव-गौरी ची आरती दाखवावी.

>>> शेवटच्या एपिमध्ये शिव-गौरी ची आरती दाखवावी.
अरे हो स्विट्झर्लँड ला जाण्याचा काही ईम्पॅक्ट नको का? पण त्यात ९ महीने सिरीयल वाढेल.. Proud
परवा त्या शिवला पत्रा वरुन काही तरी आठवते तर तो वीणा वर्ल्ड चा चिंटू कशाला दाखवला? मला वाटलं चिंटूला त्यांची आठवण येतेय. Wink

Lol

पण खरेच मालिका संपते ना ही. 27 फेब्रुवारी पासून नवी मालिका सुरु होतेय की. "गोष्टी प्रेमाच्या " असं कैतरी नाव आहे सिरियलचं. प्रोमोत स्पृहा जोशी - सिद्धार्थ चांदेकर, वैभव तत्ववादी नि जानुबाई अश्या जोड्या दिसल्या.

27 फेब्रुवारी पासून नवी मालिका सुरु होतेय की. "गोष्टी प्रेमाच्या " >>> ती बहुतेक झी-युवावर सुरू होतेय.

किमान नउ महिने म्हणायच का , तुम्हाला ? (झी चा ईतिहास पहाता ) >>> Lol

27 फेब्रुवारी पासून नवी मालिका सुरु होतेय की. "गोष्टी प्रेमाच्या " >>> ती बहुतेक झी-युवावर सुरू होतेय. >>> हो झी युवावर सोम, मंगळ.

ही सिरियल संपणार असं दिसतंय. काल हम्मा आणि गौरी गळे मिळले ना Proud म्हणजे सगळं छान होणार...
तापाची लक्षणं दिसतात तशी ही सिरियल संपण्याची लक्षणं म्हणायची (सरलाला पण परत आणली)
पण काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात (जानीच्या बाबान्च्या गुडघ्याचे ऑपरेशन का नाही झाले सारखे)
तसे निशाला पण लटकवणार..

Pages