Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुढीपाडव्यानंतर संपणार असेल,
गुढीपाडव्यानंतर संपणार असेल, गुढी उभारणार बनारसमधे काहीतरी प्रोमो बघितला.
आता गौरीच्या नोकरीवरून
आता गौरीच्या नोकरीवरून इंटरेस्टिंग होतंय प्रकरण. शिवच्या तोंडून "कशाला हवी २०,०००(फक्त) रुपयांची ही नोकरी अशा अर्थाचे शब्द निघून गेलेत. आज तो मुंबईला नावं ठेवणार आहे.
ईरिटेटिंग म्हणायचय का भरत
ईरिटेटिंग म्हणायचय का भरत तुम्हाला?
अम्मा एका रात्रीत बदलली हे
अम्मा एका रात्रीत बदलली हे काय पटले नाय्
व्हॅलेन्टाइन डे ला पण शिवला
व्हॅलेन्टाइन डे ला पण शिवला चांगला शर्ट मिळाला नाही का??? मी जेव्हा कधी बघते तेव्हा बरेचदा तोच काळा हलव्याचा शर्ट असतो त्याचा.
हो...निधी...
हो...निधी...
पण तो अभिनय किती छान करतो! हिच्या पुढे तर खूपच!
"नौकरी की जिद छोड दिजीए ना गौरीजी..." किती आर्जवाने म्हणत होता !
गोग्गोड नात्यात पहिल्यांदाच काहीतरी ट्विस्ट दाखवताहेत.
आणि ही गवरी कायम अशी "मेड अप"
आणि ही गवरी कायम अशी "मेड अप" मोड मधेच कशी काय असते ! काय त्या हेअर स्टाईल्स ! इतके केस वाढले तिचे बनारसला जाऊन? बनारस मधे हेअर पार्लर्स काढायला हवेत. इथून नेऊया लोकांना -ब्यूटी अँड स्पा टूरींग!
त्या अम्माला चालला का
त्या अम्माला चालला का वँलेन्टाईन?
त्या गौरीने काय बंडल सारी नेसलेली... अरेरे काय तो रंग आणि काय ती केसभुषा. ब्लॉउज इतका गचाळ घातलेला की क्लोजाप मश्ये भयानक दिसत होता .
त्या आधी मातकट साडी नेसलेली... नुसतं ध्यान.
झंपी हात मिलाओ, मी हेच
झंपी हात मिलाओ, मी हेच लिहायला आले होते, भयानक ब्लाऊज घातले होते गवारीने काल.

आणि तो डान्स करायला बोलवतो तर ती उगिचच शून्यात का बघत राहिली होती ते त्या भगवंताला ठाउक
बाकी बोर च
नोकरीवरून वाद विवाद सुरू झाले, शिव व्यवस्थित बोलत होता, तर ही म्हणाली मुम्बईचा काय संबंध. शिव मुम्बईच्या अयुश्याविशयी बोलत होता.. तर हिचं कायतरी निराळंच
काळा हलव्याचा शर्ट असतो
काळा हलव्याचा शर्ट असतो त्याचा. >>> हो हो, प्रोमो असतात ते बघते मी (चु भु किंवा १०० दिवसच्या वेळी), तर हाच शर्ट दिसतो.
ईथला वेणु आता झी युवा वरच्या
ईथला वेणु आता झी युवा वरच्या ' लव लग्न' मधे आलाय. एकदम खडुस, शिष्ठ आणि कायम ताठ्यात असणार्या रोल मधे.
काहे दिया परदेस ला एपिसोड्स
काहे दिया परदेस ला एपिसोड्स वाढवून मिळाले वाटतं, आता शिव गौरी वेगळे राहतात असं काहितरी दिसलं प्रोमोत.
नव्या वळणावर म्हणे...
काय छ्ळवाद आहे
छळवाद कुणाचा, दक्षिणा.......
छळवाद कुणाचा, दक्षिणा....... गवरीचा की..................................................प्रेक्षकांचा ?
मला जे ज्ये ना अगदी involved
मला जे ज्ये ना अगदी involved होऊन सिरियल्स बघतात त्यांची काळजी वाटते. माझी आई विशेषतः, प्राईम टाईम झी च्या सगळ्या, रिपीट्स दुसऱ्या दिवशी प्रवाह आणि कलर्स. त्यात तिला चर्चा करायची तर आम्ही मुली बघत नाही त्यामुळे ती करू शकत नाही, इथे वेगवेगळ्या सिरियल्सचं वाचून वाटायला लागलंय की दोन तास आईकडे जाऊन तिला सिरीयलविषयी खदखद व्यक्त करायची असेल तर ऐकून घेऊया, कारण फोन केला की तिने विषय काढला की मी लगेच आई सिरीयलचे विषय नकोत म्हणून फटकारते तिला. इथे मात्र मी वाचायला येते.
काय योगायोग आहे. तिकडे निशा
काय योगायोग आहे. तिकडे निशा घराबाहेर आणि इकडे गौरी
व्हॅलेन्टाइन डे च्या प्रोमो
व्हॅलेन्टाइन डे च्या प्रोमो मधे ते हिरवळीवर निळा गालिचा(?), बाजुने रंगीत साड्या आणि फुगे!! बनारस सुधारले की काय? आणि येवढ्यातच स्वित्झर्लंड ला जाऊन आल्यावर लगेचच त्या रंगीत साड्या आणि फुग्यांची काय ती मातब्बरी!
रंगीत साड्या......! :खोखो:..
रंगीत साड्या......! :खोखो:...
आणि त्या लावून कुणी दिल्या अशा दोरीवर वाळत टाकल्या सारख्या? (साड्या स्वतःच्या दुकानातूनच आणल्या होत्या वाटतं शिवने !)
निळा गालीचा नसून मला ती टर्फ मॅट का काय म्हणतात ना ती वाटली! शिवने माफक नृत्य केले. गवरीला बहुतेक तेही येत नाही म्हणून ती नुसतीच शून्यात बघत होती.
आणि ही नंतर एकटीच गंगातीरी जाऊन बसली? कमाले!!
सावंतांच काही खर नाही.
सावंतांच काही खर नाही. मुलग्याचं हे असं आणि गौरीचं ते तस
आता त्यांना खरं वाटेल " काहे दिया ( झक मारायला ) परदेश "
बहुधा गवरी मुंबईला परत येतेय.
बहुधा गवरी मुंबईला परत येतेय..
मला वाटतं तिथेच वेगळं घर घेऊन
मला वाटतं तिथेच वेगळं घर घेऊन नोकरी करेल.
ती पंजाबी ड्रेस मध्ये दाखवली
ती पंजाबी ड्रेस मध्ये दाखवली आहे. आणि घर मुंबईचेच वाटले.
सरला अगोदर बरी वाटायची,नंतर
सरला अगोदर बरी वाटायची,नंतर तिला वेंधळी दाखवली ,आता तर ती वेडसर वाटतेयं
सावंतांच काही खर नाही.
सावंतांच काही खर नाही. मुलग्याचं हे असं आणि गौरीचं ते तस
आता त्यांना खरं वाटेल " काहे दिया ( झक मारायला ) परदेश " >> मला एक म्हण आठवली
बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा
दक्षे
दक्षे
दक्षिणाताईला म्हणी मात्र
गौरी काल क्यूट दिसत होती पण
गौरी काल क्यूट दिसत होती पण लाल बिलोज हिरवी काटन साडी. तिला बाबांचा मेसेज येतो. ते छान वाटले. शिव मधला टिपिकल नवरा आता समोर यायला लागला आहे.
काल काय झालं? थोड्क्यात कुणी
काल काय झालं? थोड्क्यात कुणी आढावा घेईल काय?
बाईल वेडी लेक पिसा, जावई
बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तो ही तसा >>>
भारी दक्षे.
दोघांनी गुपचूप बाहेर फिरायला
दोघांनी गुपचूप बाहेर फिरायला जा, केसांत गजरे माळा, हनीमूनला जा, तिथे पाश्चिमात्य कपडे घालून फोटोही काढा असली सुधारकी कार्ये करणार्या शिवकुमार शुक्लना बायकोने नोकरी केलेली मात्र चालणार नाही. कारण काय, तर म्हणे ती माझ्या वाट्याला येणार नाही. पण तिने स्वैपाकघराच्या, दादीच्या, हम्माच्या वाट्याला आलेलं तो चालवून घेईल.
शिवाय गौरीच्या वीस हजार रुपड्यांनी फरक पडत नाही. तो स्वतः किती लाख कमवतो त्याच्या नोकरीतून?
मालिकांमधल्या पात्रांनी कोणाची तरी माफी मागणे अशी स्पर्धा ठेवली, तर शिव सहज जिंकेल. दर दोन एपिसोडमागे आहेच एक माफी.
चॅनेल बदला नशीब बदलेल POW
चॅनेल बदला नशीब बदलेल
POW बघा.
Pages