Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगं दक्षिणा, तो अण्णांचा
अगं दक्षिणा, तो अण्णांचा झिपर्या टिनपाट मित्र असतो ना, तो बाहेर बसतो राखण म्हणून. अण्णा त्याला पैसे देतात.
अण्णा पण काय आहेत ! घरात लग्नाला आलेली मुलगी आणी या बावळटाला हे सुचतयं ! मला एक कळले नाही, की माधव हा घरात सगळ्यात मोठा, त्या मागे दत्ता मग छाया असते. पहिल्या भागात माधवला १६-१७ वर्षाचा मुलगा दाखवलाय. त्या वेळी अभिराम साधारण २२ ते २५ वर्षाचा असेल जो आता या भागात ७ ते ८ वर्षाचा दाखवलाय. मग आता छायाला दाखवायला नेतात तर माधवचे लग्न झालेलेच नसते की. आणी छायाचा नवरा लग्न झाल्या दिवशीच ढगात जातो. मग छायाचा नक्की किती वेळा दाखवण्याचा प्रोग्राम केलाय?
शेवंता आणी अण्णा बागेत बसले
शेवंता आणी अण्णा बागेत बसले असते तर त्यांनी झाडामागे पळापळी केली असती. मग पुढले प्रसंग घडले असते.
काशीची आई त्या दोघांना पहाते :- गे बाय माजे, ह्यो अण्णा बगा घरात लग्नाची बाय असतांना दुसर्या बाईलेच्या नादाक लागतयं.
मी जाऊन सांगतयं माईनू.
अण्णाचा चुलता :- पाया पडतयं गे तुज्या, असां काहीएक करा नकु, तुका ठावक असां ना तो अण्णा काय कराल ते.
रघुगुरुजी :- अण्णा, तू हे बरां नाही केल्यान. वहिनींना काय वाटेल ?
नेनेवकील :- अण्णा, अता कित्याक नवीन भानगडी करतस? वहिनीना काय वाटेल?
अण्णा : - मी कोणाच्या बापयक भीत नाय, माका वाईच झिम्मा अन फुगड्या खेळान दे. मी म्हातारो झालो की माका कोण चानस देतयं?
शेवंता : अण्णा, मला भिती वाटतेय. मी तुमच्या घराक येऊ का?
बॅकग्राऊंडला गाणे वाजतेय :-https://www.youtube.com/watch?v=iMMYKF79yCY आणी शेवंता नाचतीय.
रश्मी
रश्मी..

https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=HuhL9Sw4ga8
आँ ? ह्यां काय!! हयंसर कोणी
आँ ? ह्यां काय!! हयंसर कोणी येऊक नाय? मागचो सीझन हाऊसफुल गेलो होतो. काल छायाने धुमशान घातल्यानी, आज अण्णांचो हातचो मार खाईल बहुतेक.
आण्णा लैच बेरकी आहे.
आण्णा लैच बेरकी आहे.
शेवंताला शेवंता नाव शोभत नाही.
पाटणकर येडा आहे.
सुसल्या आण्णाची मुलगी नाही. मागच्या भागात ती हिस्सा मागत असते ना?
सुसल्या आण्णाची मुलगी नाही>>>
सुसल्या आण्णाची मुलगी नाही>>>>>> सस्मित, सुसल्या अण्णांचीच मुलगी असते. परवाच्या भागात शेवंता अण्णांना म्हणते की तुमचीच मुलगी आहे, तुमच्यावरच गेलीय. म्हणजे शेवंताला माहीत असते की तिच्या मुलीचा बाप नक्की कोण आहे ते.
ओके. मला वाट्लं तिची आधीचीच
ओके. मला वाट्लं तिची आधीचीच मुलगी आहे.
पण आता लक्षात आलं कथा पुढे गेलीये ते.
पण पाटणकरला एवढ्या वर्षात कसलाच थांगपत्ता लागु नये म्हणजे कमाल झाली ब्वा.
बर. मुलं लहान होती तेव्हा शेवंता गावात आली आण्णांची भेट झा ली ना?
मग मुलं मोठी झालीयेत तरी शेवंता तश्शीच्यातश्शीच दिसतेय. पाटणकर पण.
माईंचा वेणीचा शेपटा जाउन अंबाडा आला वाटतं.
पण तसंही तशी वेणी तेव्हाच्या काळी गावच्या ठिकाणी माईसारखी खेडवळ न शिकलेली बाई सहसा घालत नसेल.
पण तसंही तशी वेणी तेव्हाच्या
पण तसंही तशी वेणी तेव्हाच्या काळी गावच्या ठिकाणी माईसारखी खेडवळ न शिकलेली बाई सहसा घालत नसेल.>>>> हो ना, माईंची नऊवारी साडी नेसणे पाहील्यावर त्यावर अंबाडा किंवा खोपाच हवा. पण माई खरच प्रेमळ आहेत. मलाही हेच वाटतेय की पाटणकरला इतक्या वर्षात काहीच थांगपत्ता लागला नाही?
मग मुलं मोठी झालीयेत तरी शेवंता तश्शीच्यातश्शीच दिसतेय. पाटणकर पण.>>>> अगं शेवंता आणी पाटणकर दोघेही थोडे जाड दाखवलेत. आधीचे भाग बघ, मग कळेल.
गं शेवंता आणी पाटणकर दोघेही
गं शेवंता आणी पाटणकर दोघेही थोडे जाड दाखवलेत. आधीचे भाग बघ, मग कळेल.> होका? आधीचे दोनेक एक भाग अधेमधे पाहिलेत.
आणि अण्णांच्या कृपेस पात्र
आणि अण्णांच्या कृपेस पात्र ठरल्यापासून शेवंताची राहणी थोडी भडक दाखवली आहे...
सगळे कलाकार त्यांच्या वाटेला
सगळे कलाकार त्यांच्या वाटेला आलेली भूमिका सध्यातरी चांगली वठवतायत.
फक्त मोठी छायाच जरा ओव्हर अॅक्टिंग करत होती काल !
छायाला पहायला आलेल्या
छायाला पहायला आलेल्या पाहुण्या स्त्रीने अद्वातद्वा बोलल्यावर आता डँबिस छाया त्या स्त्रीच्या कानाखाली वाजवणार असे वाटत असतानाच अगदी अशक्य वाटेल अशी सपकन कानफाट छायाला मायाळु माईहस्ते मिळाली याचा अश्चर्यमिश्रीत धक्का बसला...!!
कालच्या भागात काशीची आई एवढा
कालच्या भागात काशीची आई एवढा रागराग करुन माईच्या हातातील ओटीच्या नारळाची शेंडी का खुडते..? किती रडवलं तिने माईला...


शेंडी खुडलेला नारळ फेकुन नकळत का होईना माईच्या हातुन खुन झाला हे बघुन जाम हसु आलं...
चांगली अद्दल घडवली छायाला.. झुडुपात रासलिला रचते काय.. अगदी लेक शोभते बापाची..!!
वेडी च आहे छाया ... माई
वेडी च आहे छाया ... माई देवळात जाणार हे माहित असून सुद्धा आपण पण तिथेच गेली रासलीला करायला.
नारळ लागून माणूस मेला?
नारळ लागून माणूस मेला?
छाया कसली आगाव आहे आण्णांची मुलगी शोभते एकदम
नारळ लागून माणूस मेला?>>>
नारळ लागून माणूस मेला?>>>
कोण?
नारळ लागून माणूस मेला?>>>
नारळ लागून माणूस मेला?>>> Uhoh कोण? > >आहो त्या छायाचा पंटर....!!
आणि तुम्हाला ठाऊक नाही काशीची आई माईला किती घालुन-पाडुन बोलली ते..
त्यामुळे माईने रडुन-रडुन आणि रडुन झाल्यानंतर संतापातिरेकाने चिडुन
असा जीव खाऊन शेंडी खुडलेला नारळ भिरकावला की बस्स..! 

माई जर ऑलंपिकमधे गोळाफेक स्पर्धेत असती तर तिने भारतासाठी नक्कीच सुवर्णपदक मिळवलं असतं..!
शेंडी खुडलेला नारळ फेकुन नकळत
शेंडी खुडलेला नारळ फेकुन नकळत का होईना माईच्या हातुन खुन झाला हे बघुन जाम हसु आलं>>>
मला 'अंदाज अपना अपना' चा रॉबर्ट आठवला.. "सर, मैं ट्राय करु, मैं गोलाफेक में चँपियन था !"
माई जर ऑलंपिकमधे गोळाफेक
माई जर ऑलंपिकमधे गोळाफेक स्पर्धेत असती तर तिने भारतासाठी नक्कीच सुवर्णपदक मिळवलं असतं..! Biggrin>>>> काल मी तो सीन बघुन तुफान हसले. माझी मुलगी तर खाली लोळलीच, कारण मला अंदाज आला की हा नारळ नक्कीच कोणाचा तरी मोक्ष करणार. पण छायाला पाहीले तेव्हा वाटले की तिच्या पायावर वगैरे पडला असावा कारण ती जरा लंगडत आली. पण नंतर पाहीले की एक हिरो आडवा झालाय.
कॅमेरामनचे कौतुक करावे लागेल. माई जेव्हा ओटीची तयारी करत असतात तेव्हा छाया किचन मध्ये येऊन डब्यातुन एक लाडु उचलुन खाते. तो तांदळाचा असावा, लांबुन सुद्धा त्याचा मऊपणा कळला. मला तरी निदान तो तांदळाच्या पीठाचा वाटला, रव्याचा नाही.
काशीची आई वेडी नाही बिलंदर आहे. अण्णा जे काही करतात त्यात माईंचा काय दोष? ओटी पण भरु दिली नाही त्या वेडीने.
काशीची आई वेडी नाही बिलंदर
काशीची आई वेडी नाही बिलंदर आहे. अण्णा जे काही करतात त्यात माईंचा काय दोष? ओटी पण भरु दिली नाही त्या वेडीने.>> तेच तर... माई सारख्या सालस बाईला घालुन-पाडुन बोलली. काय वाटलं असेल बिच्यार्या माईच्या जिवाला..
राखेचा मधे काय नाव हो त्या काशीच्या आईचं..?? तुमाब्रे मधे फटाकडी प्रधान बाई२ झाली होती आणि इथे राखेचा मधे अट्ट्ल गावंढळ ध्यान उभं केलंय..
माई जेव्हा ओटीची तयारी करत
माई जेव्हा ओटीची तयारी करत असतात तेव्हा छाया किचन मध्ये येऊन डब्यातुन एक लाडु उचलुन खाते. तो तांदळाचा असावा, लांबुन सुद्धा त्याचा मऊपणा कळला. मला तरी निदान तो तांदळाच्या पीठाचा वाटला, रव्याचा नाही.>> तांदळाच्या लाडवाची रेसिपी द्या ना..!
मी ही सीरियल नेहमी पहात नाही
मी ही सीरियल नेहमी पहात नाही.पण अण्णांचे प्रताप बघून पंचक्रोशीत लवकरच APL काढता येईल असं दिसतंय.....अण्णांच्या पोरांची लीग!बाकी ह्या सिझन मध्ये लोकांची वयं गंडली आहेत जबरदस्त.पांडूला खोलीत attached toilet होता काय?छाया बाहेरख्यली आहे असं सिझन 1मध्ये वाटत नव्हतं.दत्ता half pant मध्ये इनोदी दिसतो.
काशीच्या आईचे नाव नाही ना
काशीच्या आईचे नाव नाही ना माहीत. कारण झी मराठी सोडले तर बाकी चॅनेल्स पहायला वेळ मिळत नाही. त्यातल्या त्यात राखेचा, स्वराज्यरक्षक संभाजी आणी चला हवा येऊ द्या या तिन्ही न चुकता बघतो. त्यामुळे बाकी स्टार व कलर्स बघायला वेळ नसतो.
तांदळाच्या लाडवाची रेसेपी कोकणातले किंवा कर्नाटकातले लोक देऊ शकतील. राळे नावाचा तांदळाचा प्रकार असतो, त्याचे लाडु केले जातात.
काशिच्या आईचं नाव वच्छी ना
काशिच्या आईचं नाव वच्छी ना?वत्सला असेल.पहिल्या एपिसोड मध्यए अण्णा मरायच्या बेतात असताना सगळी भूतं त्याना दिसतात त्यात ह्या काशिच्ं भूतसुध्दा असतंय.म्हणजे तो पण मरतो का?प्रोमो मध्ये माई चार पोरांना जवळ घेउन उभ्या आहेत आणी अण्णा कंदील घेउन पहात आहेत असा सीन होता.त्यात एक मळवट भरलेली बाई होती.ती शेवंता असावी असं वाटलं होतं.पण ते दृश्य फक्त प्रोमोसाठी होतं तर.नवर्यचा आधार गेल्यावर शेवंता वाड्यात घुसयाचा प्रयत्न करणारबहुतेक.त्या वाड्यावर असलेल्या काळ्या सावलीचं काय झालं म्हणे?तिला चुकवून अभिरम जन्माला आला म्हणजे लई पावरबाज असला पाहिजे.
बाकी मला ती शेवंता फार आवडली
बाकी मला ती शेवंता फार आवडली नाही.शेवंता म्हणजे जिला पटाखा किन्वा आयटम म्हणतात तशी असेल असं वाटलं होतं.पण ही शेवंता तशी वाटत नाही.सुसल्यची मात्र कीव आली.रात्री काय काय ऐकायला लागतंय काय माहित तिला.पाटणकरचं घर वनरुम आहे काय?तो मात्र न बोलून शहाणा दिसतो मला.दुसर्यच्ं भविष्य सांगत फिरतो आणि स्वत:च्या पायाखाली काय जळतंय ह्याचा पत्ता नाही??
अरे हो. स्वप्ना तिचे नाव
अरे हो. स्वप्ना तिचे नाव वच्छी दाखवलय, म्हणजे वत्सला. मला वाटले की डिजे तिचे खरे नाव विचारतायत.
शेवंता, वाड्यात रहायलाच येणार असते, पण माई तिला आत येऊ देत नाहीत म्हणून ती समोरच्या झाडाला लटकुन जीव देते. असे माई मागाच्या भागात ( सिरीयल पहिली ) सांगतांना ऐकलय.
अग,ती कसली लटकतेय स्वत:?ते
अग,ती कसली लटकतेय स्वत:?ते झाड खूप उंच दाखवलंय......अमिताभ बच्चन पण स्वत:नाही लटकू शकणार त्यावर.आता ही बया आपल्या डोक्यावर येउन बसणार म्हणुन अण्णाच तिला लटकावत असेल.तेका अधूनमधून T20 खेळन्यात इंटरेस्ट.कसोटी सामना कशाक खेळेल?
माई त्या भिवरीला नाही अडवू शकल्या मग शेवंतला कसं अडवतात??एकदम ज्योती बने ज्वाला होतात का काय?
माईचे काम चांगले होत आहे. पण
माईचे काम चांगले होत आहे. पण त्या फार आरडाओरडा करतात. कधी कधी एकवत नाहि. ओव्ह्रर अॅक्टींग फार करतात.
केबल बंद झाल्यामुळे या सिरीयल
केबल बंद झाल्यामुळे या सिरीयल चे काही भाग चुकलेत .
कोणत्या अॅप वर मिळतील???
Pages