रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तसा काय नाय भाऊ. माका पण नायकान्सोबत खेळ खेळुचा वाटता, पण ता माका घाबरता आनी मग गुरवाक बोलु पहातात.Dancing Devil

आनी ह्यां 'टी-२०'च्या धाग्यावरून -

अहो, गांवच्या गुरवाचा फोन होता- " आतां सेमी-फायनल आहे. ऑस्ट्रेलियासारखीच
वे. इंडीजवरही 'लिंबू-मिरचीची करणी' करायची असेल, तर डबल पैसे पडतील !"
karani.JPG

तां शनवारचो भाग चुकलो माजो . कोणी अपडेट देतलो काय न्येमका काय काय जाला तां..
(स्वगतः काय मालवणी वर कमांड येत चालली आहे.. येस्स !)

काय नाय. दत्ती हट्ट करुन गणेशला घरी घेऊन येते. डॉ. नी खर तर गणेशला तिथेच ( दवाखान्यात ) ठेवा असे सान्गीतलेले असतानाही ही त्याला घरी आणते. गणेशची जखम बरी होण्यासारखी असते, पण घरात त्याला आराम मिळत नाही. ठोकळी वैतागुन रागवते की गणेशला अन्डर ओब्झरव्हेशन का नाही ठवले. तिची काळजी समजण्यासारखी असते. पण ठोकळ्यासकट सगळे तिची विनन्ती धुडकावुन लावतात. मग माई आणी दत्ती गुरवाला बोलवा असे दत्ताला सान्गतात, तो पान्डुला सान्गतो आणी म्हणतो की गुरवाक सान्ग की गणेशला ट्रकने उदवले म्हणून घरा कडे बोलवलेय. पान्डु नेहेमीप्रमाणे घोळ घालतो आणी गुरवाला सान्गतो की रघुनाथकाकाना ट्रकने उडवले म्हणून घराकडे बोलवलय.:हहगलो: ( माझ्या लहान मुलीला सुद्धा यातला जोक कळला.:फिदी: ) ती म्हणाली बहुतेक पान्डु असे म्हणेल की गणेशने ट्रकला उडवले. पण असे झाले नाय. मग दत्ती ओलेत्याने देवासमोर साकडे घालते

गुरव येतात आणी ठोकळीशी त्यान्ची प्रेमाची बाचाबाची होते. मग म्हणतात की सगळे भयन्कर आहे आणी बाहेर पळतात त्रेवढ्यात गणेशचा मित्र त्याना रागाने पहाताना दिसल्यावर ते घरात येऊन दत्ताला सान्गतात की मला ( कायमचे ) पोचव.

दत्ताला सान्गतात की मला ( कायमचे ) पोचव.>>> Proud

त्या द्तीने अर्चीस ची नजर उतरवुन तांदुळ चुलीत टाकताना ज्याचे आहे त्याच्यावर जाउदे असं म्हणणं आणि गणेशला अपघात होणं.. म्ह्णजे गणेशने केल होतं की काय्य्य्य?

भाऊ. Lol

पांडु घोळ घालतो हे माहित असताना पण त्यालाच निरोप पोचवायची कामे का सांगतात??? Uhoh

त्या द्तीने अर्चीस ची नजर उतरवुन तांदुळ चुलीत टाकताना ज्याचे आहे त्याच्यावर जाउदे असं म्हणणं आणि गणेशला अपघात होणं.. म्ह्णजे गणेशने केल होतं की काय्य्य्य?>> पाॅईंट आहे. Happy नाहीतरी गणोबा या मुंबैकरांचा रागच करत असतो ना

पांडु घोळ घालतो हे माहित असताना पण त्यालाच निरोप पोचवायची कामे का सांगतात??? >>>> ती ऑलमोस्ट सगळ्याच शिरेलीची खासियत आहे. थोडस अवांतर चालवुन घ्या, नांदा सौखभरे मध्ये पण दिवाळीच्या लाडवांची ऑर्डर एअरपोर्टवर नेउन देण्यासाठी विसरभोळ्या काकाची निवड केली होती.. तिथेही त्याला एकट्यालाच पाठवल होत आणि बाकीचे घरात चिंता करत बसले होते..

पांडु घोळ घालतो हे माहित असताना पण त्यालाच निरोप पोचवायची कामे का सांगतात??? अ ओ, आता काय करायचं

>>

नाही तर काय? फोन करायचा नाहीतर अभिरामला पाठवायचे बाईकवरुन.

अभिरामला पाठवायचे बाईकवरुन>> अभिरामच्या बाइकचा जीपीआरएस बाय डिफॉल्ट त्याला देविकाच्या घराचा रस्ताच दाखवते, म्हणून नसेल पाठवला Wink

मित Lol

काय एकेक सगळे बहरलेत इथे, भाऊकाका आणि रश्मी भारी हा.

अरे पण ती भगवती कुठे आहे? (शिरेलीमधली नाही हा, इथली).

अरे पण ती भगवती कुठे आहे? (शिरेलीमधली नाही हा, इथली). >> कोणत्या शिरेलीत भगवती आहे????

आपल्या भगवतीचा लाँग विकेंड होता असेल ना... आज रात्री म्हणजे तिच्या सकाळी उगवेल ती इथे. Happy

माहिती नाही शिरेलीत आहे कि नाही, मी कुठे बघते कोणती शिरेल, इथंच वाचते. असेल ब्वा नाव एखाद्या शिरेलीत तर ते वाटायला नको म्हणून लिवलं.

हा अशोक बघते येता जाता. आज नवीन बघेन रिपीट टेलिकास्ट.

>>पांडु घोळ घालतो हे माहित असताना पण त्यालाच निरोप पोचवायची कामे का सांगतात???

+१

>>अभिरामच्या बाइकचा जीपीआरएस बाय डिफॉल्ट त्याला देविकाच्या घराचा रस्ताच दाखवते
>>त्या अभिरामाक बरो क्धी चकवो नाय लागलान... जीपीयस चकवा रेसिस्टंट आसा काय त्याचो?

Happy

निलिमा महान आहे. मी तिच्या जागी असते तर एकदा सांगून लोक ऐकत नाहीत म्हटल्यावर गप्प बसले असते. घाला काय घालायचाय तो गोंधळ. ही मात्र अंनिस ची कार्यकर्ती असल्यासारखी दरवेळी घरातल्यांना मांजरीसारखी आडवी जाते आणि मग 'तुम्हाला एव्हढं कसं कळत नाही', 'ही अंधश्रध्दा आहे' आणि 'माधव तू सुध्दा' ही ठेवणीतली वाक्यं काढते. पै़की शेवटचं वाक्य तिने इतक्यांदा म्ह्टलेय की तो ज्युलियस सिझर पण 'et tu Brute' ऐवजी 'Et tu Madhav' म्हणेल की काय असं वाटतं मला. Sad

गुरवाला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचं अ‍ॅवॉर्ड द्यायला हवं. काल नाईक लोकांची टरकवायला उगाच घाबरल्याची अ‍ॅक्टींग करत होता असं मला वाटलं. घराबाहेर जाऊन त्याने वर काय पाहिलं? तिथे सुशल्या तर नव्हती. तो अंगणात 'मान वेळावूनी' बघणारा गणेशचा सोबतीच होता ना? कोण आहे तो?

नटसम्राट नानांनी काय आकाशवाणी केली? हे एक स्पष्ट बोलायला काय घेतील देव जाणे!

काल बहुतेक कांगारूंना कोणीतरी आजची मॅच जिंकलात तर 'रात्रीस खेळ चाले' चे फुकट खेळ दाखवू असं सांगितलं असणार म्हणून गाशा गुंडाळून पळाले. किंवा नाना म्हणाले असणार 'घेऊन जा, ह्यांना घेऊन जा'.

सरिता गणेशला म्हणाली 'गणेशा, डोळे उघडून बघ सगळ्यांकडे. बघ, सगळे तुझ्याकडे बघताहेत'. ह्या वाक्याचा काय अर्थ मला सांगा बुवा. त्याने काय राजकीय नेत्यांसारखा एक हात उंचावून दाखवायला हवा का थम्सअप ची साईन करायला हवी होती?

तसंच एक बादली पाणी अंगावर ओतून घेऊन देवासमोर बसल्याने देव काय लवकर गार्‍हाणं ऐकतो का? उद्या हे बघून लोक ओलेत्याने सिध्द्दीविनायकासमोर लाईन लावून उभे राहिले तर बघायला नको Sad

स्वप्ना Rofl कान्गारुनी टान्गारुची भूमिका बजावली. नानान्चा धसका घेतला असेल.:खोखो:
नटसम्राट ! Lol मस्त उपाधी आहे. नानान्ची आकाश वाणी त्यानाच माहीत. बहुतेक गुरवानीच गणेशचा गेम केला असेल, कारण ते त्याच्या मित्राला बघुन घाबरतात आणी आत येऊन दत्ताला सान्गतात की मला घरापर्यन्त सोड.

मित Proud देवीका बहोत खूस होगी ये पढकर, वो तुम्हे साबासी देगी!

माधवला हो, हो, हो, हो असे चार वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येते हे ही नसे थोडके.:खोखो:

>>माधवला हो, हो, हो, हो असे चार वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येते हे ही नसे थोडके

Proud लग्नाआधी निलिमा म्हणाली असेल 'माधव, आय लव्ह यू म्हण ना'. मग माधव म्हणाला असेल 'निलिमा, हो हो हो हो'. हा शब्दशः नंदीबैल आहे Happy

यहा से पचास पचास कोस दूर गावमे जब भूत रातको बाहर निकलता है तो मा कहती है बेटे सो जा, सो जा नही तो नाना नाईक आ जायेगा

>>त्या वकिलाने जमिनीचं काय केलं? दिली का परत?

अजून काही नाही केलं. फक्त माधव आणि दत्ताला म्हणाला की मी तुम्हाला सहज बेघर करू शकतो. कोर्टात नुसती कागदपत्रं तर सादर करायची आहेत. आणि वरती माझ्याकडे कागद नाहीत म्हणाला. त्याला नानांसोबत खोलीत कोंडून घातला पाहिजे. म्हणजे ह्यांचीच काय आजूबाजूच्या लोकांचीसुद्ध्दा जमीन ह्यांच्या नावे करेल. नाना म्हणजे वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. काय समजलेत!

बाकी गुरवाला दत्ताची सोबत का लागणार काही कळलं नाही. दत्ता काय सनी देओल आहे ढाई किलोका हाथ मारायला?

Pages