आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
कान्गारु नानांना बघुन
कान्गारु नानांना बघुन टान्गारु झाले
Good Day नाना म्ह्णुन गाशा गुंडाळून पळाले!!!
(No subject)
बाकी गुरवाला दत्ताची सोबत का
बाकी गुरवाला दत्ताची सोबत का लागणार काही कळलं नाही. दत्ता काय सनी देओल आहे ढाई किलोका हाथ मारायला?>>> नै नै तो यन्ना रास्क्ला रजनीकान्त आहे !!
(No subject)
वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन>>>
वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन>>> ह्यांना घेउन जा, घेउन जा
सांग सांग भोलानाथ गुंता सुटेल
सांग सांग भोलानाथ गुंता सुटेल काय
आण्णांचे पेपर्स सापडून जमिन मिळेल काय
भोलानाथ, सकाळी निलीमा निघेल काय?
सुटकेसमध्ये चिखल भरताना आवाज होईल का?
भोलानाथ, उद्या आहे अभिरामचा पेपर
बाईकवरून खाली पडून फुटेल का रे ढोपर?
भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा
नाना काय बोलतात ते कळेल का रे एकदा?
स्वप्ना भोलानाथ. भोलानाथ
स्वप्ना
भोलानाथ. भोलानाथ खरे सान्गशील काय
स्वप्नाच्या प्रश्नाना उत्तर मिळेल काय!
भोलानाथ, भोलानाथ....
क्लिओ
दत्ता गावठी रजनीकान्त आहे.
माई आणि दत्ता गणेशाच्या
माई आणि दत्ता गणेशाच्या शेजारी बहुतेक रात्रभर बसुन असतात. माई म्हणतात की गुरवाने पण हात टेकले. पुर्वा बाजुलाच अभ्यास करत बसलेली असते. गणेश अजुनही गुंगीत असतो. (चक्क) निलीमा सगळ्यांकरिता चहा घेऊन येते. माई आणि दत्ता चहाला नको म्हणतात तेव्हा ती सांगते कि तुम्ही आणि सरिताने काल रात्रीपासुन काही न खाल्यामुळे पुर्वाने पण काहीच खाल्ले नाही. मग ती पुर्वाला चहा देऊ बघते तर ती नको म्हणते मग निलीमा जराशे डोळे मोठे करून, घे म्हणते. तेवढ्यात गणेश डोळे किलकीले करतो, पुर्वा तसं सांगते माई गणेशाच्या डोक्यावरून हात फिरवतात. इकडुन सरिता धावत येते आणि गणेशाशी बोलू पाहताच तो परत डोळे मिटतो. हे बघुन सरिता जोरजोरात रडू लागते. निलीमा तिला समजावते की त्याला खुप लागले आहे म्हणुन तो ग्लानीत आहे. सरिता परत धावत देव्हार्यात जाते आणि देवांना म्हणते की आजवर मी तुमचे सगळे नीट केले, गणेशाचे बालंट माझ्यावर येवू दे व त्या सरळ मार्गी लेकराला त्रास नको होऊ दे.
गुरव सकाळी सकाळी वकिल काकांकडे येऊन हालहवाल विचारतात, वकिलकाका विचारतात काय चहा घेणार का? गुरव नेहमीप्रमाणे सांगतात की माझं काही नाही जे काही आहे ते त्याचे आहे असं काहितरी उत्तर देतात, तुमचे काय चालले आहे? त्यावर ते म्हणतात की माझे काय नेहमीचेच कोर्ट कचेरी वगैरे. गुरव त्यांना सल्ला देतात की लवकरात लवकर जमीन नावावर करून घ्या भाव दुप्पट होणार आहे. वकिलकाका म्हणतात की जमीन तर माझीच आहे. अभिराम देवीकाला फोन लावतो तर ती मीरच्या वाळवत असते ती फोन घ्यायला बघते तर तिची आई तिला फोन उचलायला परवानगी देत नाही.
इकडे वकिलकाका नाईकांच्या घरी येवुन सांगतात की तुमच्या घरातील सगळ्या गोष्टी गावभर होतात. मला कळल्याबरोबर मी बघायला आलो. मी घरातीलच आहे, मला काळजी वाटणारच वगैरे. पुर्वा पाणी आणुन देते. ते म्हणतात की बरे झाले थोडक्यात निभावले. आता वाटण्याचे काम मार्गी लावू. मला कागदपत्रांवर सह्या करून नदीकाठची जमीन नावावर करून द्या. हे ऐकुन दत्ता चवताळतो व स्वर चढवून म्हणतो की आम्ही सही करणार नाही. माधव काही बोलण्याचा प्रयत्न करतो तर दत्ता त्यांना गप्प बसवतो. निलीमापण भयंकर चिडलेली असते. ती विचारते की जमिनीचे पेपर्स कुठे आहेत? त्यावर ते म्हणतात की मी माधवला सांगीतले आहे की पेपर्स
माझ्याकडे नाहीत पण मी आजवर
माझ्याकडे नाहीत पण मी आजवर प्रामाणिकपणे अण्णांकरिता काम केले आहे, ती जमीन माझीच आहे त्यावर माई म्हणतात की ती जमीन तुम्हाला मिळणार नाही, माझं लेकरू त्यात राबलय. माझ्या मुलांना पण कामे आहेत. माधव निलीमाला मुंबईंला जायचे आहे. गणेशचे हे असे झालेय. छायाचे तर आयुष्यच उध्वस्त झालेय. लवकरात लवकर वाटण्या करा......अभिराम परत देवीकाला फोन लावतो तर ती वाळत टाकलेल्या मीरच्यांवर खराट्याने झाडून कचरा टाकत असते, तिची आई तिच्यावर नजर ठेउनच असते व फोन वाजू द्यायला लावते. नग देवाकाला फोन करायला लावते. देवीका थोडी वैतागते, एकदोन वाक्य बोलल्यावर आई फोन हिसकावुन घेते आणि सांगते कि असे सतत फोन करू नका, काय ते घरच्यांशी बोलून ठरवा.
सगळेच प्रतिसाद भारी
सगळेच प्रतिसाद भारी
रच्याकने वकिलकाकांची
रच्याकने वकिलकाकांची बोलण्याची ढब शरद उपाध्येंसारखी(राशीचक्र) वाटते.
सुसल्या आणी वकील काकांचा
सुसल्या आणी वकील काकांचा संवाद राहिला ना भगवती
अग हो, माझी मुले तेव्हा सारखी
अग हो, माझी मुले तेव्हा सारखी भुकभुक करत होती त्यामुळे वकिलकाकांच्या चहाचे राहीले.
सगळे डिटेल्स देणे तसेही खुप कठीण आहे.
गम्मत केली गो . सुसल्या भारी
गम्मत केली गो .
सुसल्या भारी बोलत होती आज वकिलाला म्हणे , ह्यांना मिळो न मिळो माका माझा हिस्सा होवाक.
हो ना, पण निलीमा पण
हो ना, पण निलीमा पण सुसल्याकडे रागाने बघत होती.
पण, ती चहा कुठून देणार हा
पण, ती चहा कुठून देणार हा प्रश्न आहेच. वरच्या खोलीत कुठे चुल आहे चहा बनवायला?
थर्मासमध्ये भरुन ठेवला असेल.
थर्मासमध्ये भरुन ठेवला असेल.:फिदी: बाकी, भगवती डिटेल्स मस्त दिलेत.
सुसल्या कायम चवताळुन बोलत असते. आणी निलीमाने तिला तो एकच ड्रेस दिलाय का? किती दिवस तोच घालणार? कुबट वास येत असेल म्हणून दत्ती आणी माई भडकत असतील.:फिदी:
ती वाळत टाकलेल्या मीरच्यांवर
ती वाळत टाकलेल्या मीरच्यांवर खराट्याने झाडून कचरा टाकत असते, >> हो ना, मी पण हेच म्हणाले.
त्या वाळणार कधी आणि मसालो होणार कधी.
आणि मिरच्या उन्हात वाळवायच्या त्या अंगणातच मांडवाखाली पसरुन घातल्या होत्या.
रच्याकने वकिलकाकांची बोलण्याची ढब शरद उपाध्येंसारखी(राशीचक्र) वाटते. >>+१. हो आणि खुर्चीत बसायची स्टाईल पण.
रश्मी.
काल दत्ता आणि माईंनी मस्त अॅक्टींग केली.
अभिराम खयच्या रानात उभो होतो???
बाभळीच्या रानात अभिराम
बाभळीच्या रानात अभिराम उभा
काम नाय काज नाय अन बनतो जावई माझा
देविका गो, मिर्च्या कित्याक खुडतास
कोन्डलाय श्वाsssssस माझा
नार गोमटी मी देखणी
कपाळावर पडलीय आठ्यान्ची जाळी
माये गो, व्हिलन कित्याक बनतीस पुसतस घोव माजो
ती वाळत टाकलेल्या मीरच्यांवर
ती वाळत टाकलेल्या मीरच्यांवर खराट्याने झाडून कचरा टाकत असते+१
शरद उपाध्येंसारखी(राशीचक्र) वाटते+१
काही दिवसांनी अभिरामाचा पांडू होऊन 'बाबा लगीन' करत गावभर नाचत फिरणार आहे असं वाटायला लागलंय.
वकील काका घरात येऊन सगळ्यांशी बाचाबाची करत असताना, तो खाली झोपलेला गणेशा गायब झाला !
का त्याला पण ओढून बेरी नानांशेजारी झोपवलान. मारा म्हणाव गप्पा एकमेकांशी हव्या तेवढ्या !
सुसल्या [ सांगूं नकात हां
सुसल्या [ सांगूं नकात हां तिकां, मीं 'सुषमा' नाय म्हटलंय ह्यां] म्हणता, नाथान माझ्या आयेच्ये दागिने ढापल्यान. बरोबर ? आतां ह्यां काय नविनच ! पण सुसल्याचां शिक्षण सही करण्यापुरतां तरी झालांहा, ह्यां बरां !
देविकाच्या आयेक कळून चुकलांहा, अभिरामाचो मासो गळाक येवस्थित अडाकलोहा ! गळाचो दोरो कधीं सैल सोडायचो कधी खेचायचो, ह्येच्यात एक्सपर्ट दिसता ती !!
>>काही दिवसांनी अभिरामाचा
>>काही दिवसांनी अभिरामाचा पांडू होऊन 'बाबा लगीन' करत गावभर नाचत फिरणार आहे असं वाटायला लागलंय.
कालच्या एपिसोडमध्ये माई आणि
कालच्या एपिसोडमध्ये माई आणि निलिमा दोघी वकिलाला बोलल्या हे बरं झालं. सुशल्याचं खरं रूप निलिमासमोर आलं हेही बरं झालं. निलिमा तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघत होती. बाकी त्या सुशल्याला केव्हढा तो घाम. वरती एसी नाही तर कुलर तरी आणा हो. तो निलिमाचा ड्रेस हिला ढगळ व्हायला हवा. जास्तच फिट्ट बसतोय वाटतं. नुसती हिने सही करून जमिन वकिलाला कशी मिळणार? सही सगळ्यांची हवी. काही कागदपत्रं नसताना वकिल जमिन माझीच होणार हे कसं म्हणतोय? त्या गणेशला खालीच का झोपवलाय? वर जागा नाही का? सगळे बाहेरून येतात, पाय न धुता त्या गादीवर बसतात आणि तिथेच त्याला ठेवलंय. त्या दिवशी ती कार पण फाटकाबहेर उभी केली आणि उरलेलं अंतर त्याला चालवत आणलं. आत आणली तर कारला धोका आहे का?
कागदपत्रांशिवाय जमीन अशी
कागदपत्रांशिवाय जमीन अशी हस्तांतरीत करता येते??
जमीनीचे कागद कुठे आहेत हे अजुन माहिती नाही आणि वाटण्यांची भाषा? अस असेल तर उद्या कुणीही उठुन काहीही स्वतःच्या नावावर करुन घेइल. बहुदा ते आण्णा अस्च करत असतील म्हणुन त्या वकीलाने पण तेच चालू ठेवलय पुढे.
बाकी त्या सुसल्याच्या एकटीच्या सहीने न ती जमीन वकीलाच्या नावाचर होणार न तिला एकटीला वाटा मिळणार.
अभिरामची केस 'खानेकू मै,
अभिरामची केस 'खानेकू मै, लडनेकू मेरा बडा भाई' त्यातली आहे. सदोदित त्या देविकाला फोन करत असतो. आणि एकदा फोन उचलला नाही तर माणसाने गप बसावं. मला तर असे २-३ वेळा लोकांनी फोन केला की डोळ्यांत खून चढतो. बरं ही बयो पण फोन म्यूट करत नाही. तो वाजतोय सारखा. दर वेळी तिची आई 'कोणाचो फोन' असं का विचारते? हिच्या मुलीला ओबामा अमेरिकेसून फोन करणार आहे का? हे असं किती वेळा बघायचं आम्ही?
ह्यांना दाखवायला स्टोरी नसली की त्या नानांना आणतात नाहीतर अभिराम देविकाला फोन करतो.
काल निलिमाने पहिल्यान्दाच
काल निलिमाने पहिल्यान्दाच सेन्सिबली आवाज चढवला . दत्ताच्या डोळ्यात भावजयीबद्दल अपार आदर दिसला.
वकील काका घरात येऊन सगळ्यांशी बाचाबाची करत असताना, तो खाली झोपलेला गणेशा गायब झाला ! >> नाय , होता की तिथेच
काल निलिमा स्वयंपाकघरात
काल निलिमा स्वयंपाकघरात गेलेली पाहून मी सोफ्यावरून पडले. नुसतं दत्ताला 'काय खाणार का?' म्हणून विचारत होती. करून समोर आणून ठेवायचं ना. ही काय करून आणेल ह्या भीतीने बहुतेक त्याने नको म्हटलं असांवं. माधवला सुध्दा नुसता चहा विचारत होती. ह्या गावात एकच वकिल आहे तर हे लोक दुसर्या गावातून वकिल का आणत नाहीत? त्यांची मिलीभगत असेल म्हणून?
कायच्या काय होता अगदी कालचा
कायच्या काय होता अगदी कालचा भाग. त्या वकिलाला पण अक्कल नाही का, कागदपत्र कुठे आहेत विचारलं तर माहित नाही म्हणे, आणि ह्याला जमीन नावावर करून हवी आहे. मूर्ख लेकाचा आणि त्या अभिरामला तर कानफटाविशी वाटते मला. कामधाम काही नाही नुसता फोनच करत असतो. अभ्यास पण करत नाही कधी आणि ह्याला आधीच माहित आहे कि तो परीक्षा पास होऊन लगेच कामाला पण लागेल आणि वेगळहि राहू शकेल. भाऊ एवडे जीवाचा आटापिटा करत आहेत जमिनीसाठी आणि ह्याच नुसता माझं लग्न… माझं लग्न हेच तुणतुण वाजतंय.
गावच्या ग्रामपंचायतीतुन निदान
गावच्या ग्रामपंचायतीतुन निदान जमीनीचे भोगवटा पत्र्/प्लॅन तरी आणायचा या लोकांनी. वकिल महा डँबिस दिसतोय या सगळ्यांना पुरुन उरणार तो.
गुरव मधेच का घाबरला? मला तर तो गणेशच त्या गुरवाचा आणि वकिलाचा पर्दाफाश करेल अस वाटतय. काराण त्याचा तो माणूस दिसल्यावर गुरव पळ काढतो. म्हणजे त्याला आधीपासुनच माहिती असणार आपल्याला फसवल जातय ते म्हणुन अग त्यांच्याच चालिने तो त्यांना डुबवणार.
बघावं तेव्हा ती देवीका,
बघावं तेव्हा ती देवीका, मिरच्याच वाळत घालत असते.
काय मसाला बनवतात काय नार्वेकर? आधीच्या भागात सुद्धा ती मिरच्याच वाळत घालत होती. आनि कनवटीला फोन... एकच शॉर्ट देतात तिला. आणि तो एकच घराचा भाग दाखवतात देवीकाच्या.
आणि ती सुशल्या ... काय तो ड्रेस.. अरेरे. सिरियलीत नायिका म्हणून तरी काम करताना शॉट कसा दिसतो त्या ड्रेस्स मध्ये बघायचा ना जरा.... स्वच्छता प्रकारच नाही. **खाली इतका घाण दिसत होता तो ड्रेस. रोजचं नीटनेटकं पण रहात नसतात का ह्या मुली? गचाळ ड्रेस आणि अजागळ वाटत होते ते.
Pages