रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< त्यांचं बोलणं आत ये घेऊन जा आणून सोड वाचवा येवढंच असतं.. >> आपण काय सांगतंव तां घरच्ये ऐकणत नाय म्हणान नाना वैतागलेले असतत; " शोधताहास त्ये जमीनीच्ये कागद अण्णान माझ्या अंथरूणाखालीं ठेवलेहत ", असां सांगतहत ते जीवाचो आटापिटा करून !!! Wink

Rofl

स्वप्ना, भाऊ तुमच्या कमेंटस भारी आहेत.

आजकाल तर त्या बेरीनानांचे विव्हळणे पाहुन भीती, दया वगैरे न वाटता हसायलाच येते.

बाकी पुढच्या भागाच्या प्रोमो वरुन तरी वाटतंय की गणेशला पोचवलंच या लोकांनी! बहुतेक अण्णांच्या बाजुला अजुन एक खुर्ची येईल फोटोवाली.

आजच्या भागात मजा ईले ,गुरवा ची पण घाबरगुंडी उडाली . आता काय खर नाय .
नीलिमा चे कोणी ऐकत नाही ,ठोकळयाला ला बुकलून काढले पाहिजे नुसते "हो हो हो हो " करत असतो .
एक गोष्ट पण भीती वाटेल अशी घडत नाय !!

'सस्पेन्स' निर्माण करायला ह्या सिरीयलमधे रोज अगणित बारिक-सारीक घटना पेरल्या जातायेत. त्यांतच अनेक दृश्यं हीं चुका आहेत कीं त्यामागे कांही विचार आहे , हाही घोळ असतोच. एकंदरीतच, 'रात्र लहान, सोंगंच फार', यांत ही मालिका फसतेय, असं आतां वाटायला लागलंय !! 'डुकराच्या शिकारीक जावन, रानकोंबडी घेवन इलो', असोच प्रकार दिसताहा !!!

ट्र्कने उडवलेला मुलगा लगेच चालायला हवा ही दत्तीची अपेक्षा आहे का?

त्या गणेशला झोपू पण देत नाही. जरा डोळे मिटले की म्हणते जरा डोळे उघडून बघ.

मी तेच तर म्हणतेय भाऊकाका, साप साप म्हणून भुई थोपटतात आणि शेवटी डोंगर पोखरुन उंदीर काढणार, हे शिरेलीवाले.

ह्या सस्पेन्स सिरियलला एक आठवडा किंवा जास्तीत जास्त एक महीना एक स्टोरी द्यायला हवी, मग नवीन स्टोरी सुरु करायला हवी तर वेग असेल नाहीतर असंच.

फक्त असंभव ही अपवाद होती, अतिशय मोठी मालिका उत्तमपणे हाताळली होती.

माझ्या अंथरूणाखालीं ठेवलेहत>>> Biggrin
ती एकच अशी जागा आहे, तिथे कोणीही शोधायचे कष्ट घेतले नसणार !

श्वेतांबरा, द्विधाता लिमीटेड एपिसोडस, उत्तम हाताळणी. गहीरे पाणीपण एक आठवडा एक स्टोरी, त्यामुळे वेगवान.

खुप एपिसोडस असूनसुद्धा असंभव उत्तम.

शेवताबंरा हि एकच सिरियल आहे जी मला नाव एकूनच ती भिती आठव्तेय जी लहानपणी व्हायची.

गोष्ट अशी आठवत नाही पण आजही ते एक वातावरण व्हायचे प्रत्येक भाग पाहण्याकरता ते आठवतेय.

लहान असल्याने गोष्ट अशी कळायची नाही लगेच पण श्वेतांबराचा रोल करणारी काय गरागरा डोळे फिअरवायची.
आणि तो एकच सीन आठवतो अजूनही, गवतातून केलेला पाठलाग...

नाहितर हि सिरियल, एक फालतू पणाचा कहर आहे.

तात्यानुं, खरांच " आज रात्रीचो 'ऑस्ट्रेलिया वि. भारत' खेळ बघाच" म्हटलंय मीं;
तुमकां 'रात्रीस खेळ चाले' बघूंक सांगण्याइतको खुळो आसंय काय मीं ?
dialog.JPG

आहे ना... पण भारत-ऑस्ट्रेलियाचा आहे. Wink

भाऊ, चित्र लय भारी!:फिदी: मला ना त्या बेरी नानाना परत बुकलावेसे वाटायला लागलेय.Spanking

मला वाटते की शेवन्तावर त्यान्चा क्रश असावा.:इश्श:How you doing

सारखे आ॑पले याला घेऊन जा नी त्याला घेऊन जा, भुक्कड कुठले. माका उचल असे नाय सान्गत कन्दी.Prayer Hands

आणी गणेशला उगाचच मारलेय. काहीही दाखवतात. मान्य आहे की अशा घटना घडतात अन्धश्रद्धे मुळे. पण वाईट वाटते असे पाहीले की. आता पुढल्या भागात सुसल्या नेने वकिलाना विचारते की माझ्या आईचे खूप दागिने होते, ते मला हवेत.

आणी गणेशला उगाचच मारलेय. >> काय????? गणोबा मेला???? काल काय झालं? मी फक्त दत्ती डोक्यावर कळशीभर पाणी ओतून घेते तेवढा एकच शाॅट पाहिला.

अग तसे डायरेक्ट नाही दाखवले, कारण मी झलक पाहिली तेव्हा असे दाखवले की दत्ती गणेशजवळ विचारायला जाते की कसा आहेस, तर तिचे एकदम मोठ्याने रडणे ऐकु येते, आणी अण्णा न्च्या खोलीचा दरवाजा एकदम उघडतो. आता उद्याच कळेल.

आहे ना... पण भारत-ऑस्ट्रेलियाचा आहे, निधी भारी.

हा रा खे चा मस्त रंगला. जिंकलो.

यस्स... लय भन्नाट झाली मॅच... पण विराटने शेवटी निराशा केली यार..... किती शांतपणे ते विजयाचे सेलिब्रेशन. Uhoh साधी उडी पण नाय.

<< साधी उडी पण नाय >> अख्ख्या देशाक उड्यो मारूंचो चान्स दिल्यान; स्वतः कित्याक उडी मारीत तो !!

अख्ख्या देशाक उड्यो मारूंचो चान्स दिल्यान; स्वतः कित्याक उडी मारीत तो !!>> ता तर हायच पण त्याचा सेलिब्रेशन बघूक माका लय आवडता. अॅग्रेशन लय भारी असता... काल तर सिक्स मारल्यावरपण जा काय धम्माल करत होतो... माका वाटला जिंकल्यार धिंगाणो घालणार ह्यो. पण नाय... दमलो आसात. Happy

<< यस्स... लय भन्नाट झाली मॅच... >> नाईकांक सांगा, टीव्ही घ्येवा आतां, असले मॅची बघा, भायेरच्या जगांत डोकवा ! त्या भुतांकय तितकोच विरंगळो; तसो कायच नाय, म्हणान बसतत झालां तुमकांच खेळवत !! Wink

Pages