आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
( खिडकीत होता बत्ता )>>>
( खिडकीत होता बत्ता )>>>
ऑफिसात हसवु नका ग मला
असा काय नाय हा! सिनीयर भूत
असा काय नाय हा! सिनीयर भूत हाय बेरीनाना. त्येका बघुक डोळा आपोआप मोठा होतला. मनात भय दाटुक येतला.
दुसरो भूत असा छाया. ही छाया कमी अन पड छाया जास्त वाटता.
तिसरे भूत असा सुसल्या. ता कवा पण येतला अन कुठे पण जाता.
चौथे भूत असा ठोकळी. ता केवा पण डोळे वटारुन रागाने बघताव. छातीत धडधड होता.
पाचवे असा सरीता ती जेवा पहावे तेव्हा भान्डतच असता.
सहावो पान्डु. ता सान्गताव की ता शम्भर दिडशे वर्शाचा असा.
सातवो भूत माधव. एकदम गरीब भूत, कायच पण करुक नाय, निसता मुन्डी हलवुक हो हो हो हो असा चार लयीत बोलता.
आठवो भूत दत्ता ( खिडकीत होता बत्ता ) ता पण सरीतासारखा वसकन अन्गावर येतला.
नववे भूत असा नाथा. त्याच्या चेहेर्या वरचो रन्ग नीट नाय. वर सफेद आणी बाकी काळो असा.
दहावे भूत असा गुरव. एकदम बेरकी, छपरी भूत.
अरे हे काय हे
अरे हे काय हे
रश्मी तै! एडिटलं थोडं तुझ्या
रश्मी तै! एडिटलं थोडं तुझ्या पोस्टीक!!
ए ए ए ए काय हे क्लिओ. लय
ए ए ए ए काय हे क्लिओ. लय भारी.
तिसरो भूत मिळालो नाय तुमका?
तिसरो भूत मिळालो नाय तुमका? ते खय गेलो सुसल्या.
काय सगळ्यांनी लो-बजेट,
काय सगळ्यांनी लो-बजेट, लो-बजेट हिणवणं चालू केलंय..
रियालिस्टीक आहे ही सिरीयल एकदम.
तशी वाटावी म्हणूनच सगळ्यांकडे १-२ जोडच असतात कपड्यांचे असं दाखवलंय! गावातली साधी माणसं ती.
सतत पांढर्या शर्टात वावरणारा मालवणी रजनीकांत..
फ्लोरोसंट कलरच्या दोन साड्या आलटून पालटून नेसणारी मिसेस रजनीकांत..
निळ्या चेक्सचे दोन शर्ट आलटून पालटून घालणारा 'बाबा लगीन' अभिराम..
मोरपंखी रंगाचा ड्रेस, ओढणी कमरेला गुंडाळून त्यात तलवारी सारखा मोबाईल खोचणारी देविका..
पहिल्या प्रोमोपासून आजतागायत एकच चॉकलेटी टी -शर्ट घालणारा पांडू.. (वेडाच तो शेवटी !)
धोतर -बंडी- टोपी अशी साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले गुरव..
निलीमाने दिलेला चॉकलेटी टॉप आवडीने घालणारी , आणि माझ्याकडे पण मोबाईल हां असं चिडवण्याच्या दिवशीच जुने पांढरे परकर-झंपर घालणारी ससुल्या..
होहोहोहो माधव -माशाबा-अर्चिस तर २-३ दिवसांसाठी आले होते, आणुन आणुन कपड्यांचे जोड आणणार तरी किती !
कित्ती कित्ती जळजळीत वास्तव आहे हे ! आता ह्या ओघात काही किरकोळ तपशील निसटले असतील (मागच्या पानांवर अनुत्तरीत प्रश्नांची यादी स्वप्ना_राज यांनी दिलीच आहे.. हेडर मधे पण आता अॅड करायला पाहिजे), तर तेवढे आपण सांभाळून घ्यायला नको का
धन्सं अन्जुताय. टाक्ल्यान ते
धन्सं अन्जुताय. टाक्ल्यान ते पण!!
मित
मित
मित
मित
रश्मीतै, क्लिओ.तै, मितदादा
रश्मीतै, क्लिओ.तै, मितदादा भारी प्रतिसाद
रश्मीतै माणसांच्या आतल्या भुतांचा मी विचारच नव्हता केला.
अडकीत जाऊ बाई खिडकीत
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
गणेशाचे काय यमक जुळेना.:अरेरे:
मित क्लिओ
मित
क्लिओ
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ, >>>>>>>

मित 'ससुल्या' नाही ,
मित 'ससुल्या' नाही , सुसल्या!!
___/\___ रश्मी तै! आर्चिसाचे
___/\___ रश्मी तै!
आर्चिसाचे पण बनव ना गं!
'बाबा लगीन', 'आवशी लगीन' नाही
'बाबा लगीन', 'आवशी लगीन' नाही तर 'उतावळा नवरा' कसे वाटते?
क्लिओ अर्चिसचे पण बनवलय गो.
क्लिओ अर्चिसचे पण बनवलय गो.:फिदी:
sorry !!! मला अभीरामचे नाव
sorry !!! मला अभीरामचे नाव वाटले. अर्चिस चे नाव मुम्बैचा पाव्हणा, चिकना, लाडु
(No subject)
(No subject)
रश्मी ताई... भारी आहे
रश्मी ताई... भारी आहे गाण.....
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
धनेश पक्षाचं नाव आहे.
आड बाई आडोणी, आडाचं पाणी
आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोनी
आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला.
ह्या टाईप म्हणतो.
वा वा!! म्या पण बनवतंय
वा वा!!
म्या पण बनवतंय गो!
लिसन
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अरे धन्य आहात तुम्ही लोकं...
अरे धन्य आहात तुम्ही लोकं...
रा खे चा ने आला कवितेला
रा खे चा ने आला
कवितेला बहर,
काही जणांनी केला,
भन्नाट स्मायल्या,
टाकून कहर.
पाचोळी
. (पाचोळा सैरावैरा नव्हे).
अडकीत जाऊ बाई खिडकीत
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
भोन्डला सम्पला का? चला खिरापत
भोन्डला सम्पला का?:फिदी: चला खिरापत घ्येवा, सुसल्यानी बनवलीय.:डोमा:
नाय्गो उदाहरण दिला, आम्ही असं
नाय्गो उदाहरण दिला, आम्ही असं म्हणतो. अजून वेळ आहे भोंडला संपायला
.
Pages