आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
लेटेस्ट एपिसोडची ही लिंक.
लेटेस्ट एपिसोडची ही लिंक. त्यावर आधीचा किंवा नंतरचा एपिसोड पाहण्यासाठी खाली बाण दिलेले आहेत. खालच्या पट्टीत मध्यभागी ऑल एपिसोडचं बटण आहे.
http://www.ozee.com/shows/ratris-khel-chale/video/ratris-khel-chale-epis...
त्याच्या खाली स्क्रॉल केलं तर एपिसोड नंबर आणि दिनांक दिलेला आहे. ही लिंक हेडरमधे टाका प्लीज. नंतर हा प्रतिसाद सापडणार नाही.
आता निलीमा ह्याला scientific
आता निलीमा ह्याला scientific explanation आहे असं मोघम म्हणाली ना तर ते स्पष्टीकरण ती देईपर्यंत तिला विहिरीत टांगून ठेवली पाहिजे. नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचा भात. भारी स्वप्ना,
.
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त
डोहाच्या खोल तळाशी
अतृप्त पसरली छाया
छायाच या सगळ्यामागे आहे असं तर नाही ?
स्वप्ना
स्वप्ना
छायाने नवर्याला पण खाल्लं ना!
छायाने नवर्याला पण खाल्लं ना!
अशोकमामा आणी स्वप्ना सही
अशोकमामा आणी स्वप्ना सही लिहीलय तुम्ही. खरे तर या लोकानी एक प्रेक्षक म्हणून इतरही साईट ( उदा. मायबोली, मिसळ पाव, मनोगत) बघीतल्या पाहीजेत. आजकाल ऑनलाईन मत देणे जर महत्वाचे असते ( उदा. झी गौरव) तर मग हे लोक आपली मते का वाचत नाहीत.
स्वप्ना, ते अनोळखी सन्कट म्हणजे गण्याबद्दलच बोलत असतील, कारण एपिसोड होऊन गेला तरी ३-४ दिवस हे लोक खाली कॅप्शन दाखवतच असतात. खरे तर याना चान्गला वाव होता की ज्या खोलीत गणेश लपलेला असतो त्या ठिकाणीच कुठेतरी अण्णानी फडताळात, कोठीत ती कागदपत्रे ठेवली असतील आणी अर्चिस तिथे गेला की सगळे शोधताना ती कागदपत्रे पण सापडतील. पण या लोकाना कुठलाच प्रसन्ग फुलवता येत नाही.
त्यातुन छायाबाई इथे घरात कुठेच नाहीत, आपल्यातही नाहीत हे या तिघा शुन्भाना आणी माईना आणी ठोकळी व दत्तीला पण कळु नये? ठोकळी सुसल्याला एकटी मुलगी आहे म्हणून शोधायला जाते मग छाया आपल्यात नाही हे कसे या बावळटाना समजत नाही. त्यातुन छायाबाई बाहेरुन घरात येतात तरी कोणी तिला जाब विचारत नाही की बाई, एवढ्या रात्री तू कुठे झिम्मा खेळायला गेली होतीस?
लहानगा अर्चिस आत एकटा अजतो पण दत्तोबा, ठोकळेबा आणी लग्नोबा तिघे पण बाहेरच. मला दत्तीवर हसू आले. या बया सोन्ग घरात गेला. हे ती ज्या पद्धतीने म्हणते ते भारी होते.:हाहा:
अगो शुभांगी.... ~ निलिमाला एक
अगो शुभांगी....
~ निलिमाला एक आई या नात्याने आपल्या मुलाच्या धाडसाचे कौतुक वाटणे साहजिकच ना ! सुंभासारखा उभा असलेला नवरा, उगाचच आरडाओरडा करून धाक निर्माण करणारा एक दीर, तर केवळ दिसायलाच क्लिंट इस्टवूड असलेला लग्नाळू दुसरी दीर....तब्येतीने मात्र गरगरीत....स्वतःच्या घरात शेणाचे पांडव होऊन उभे आहेत आणि पोरगा धाडसाने आत जातो...ही दृश्य प्रेक्षक म्हणून आपल्यालाही भावते. तरी बरे, त्या गणेशाला तसल्या वेषात पाहिल्यावर त्याने भीतिपोटी आरडाओरडाही केला नाही.
(अर्चिसला तू तयार केलेले १ किलो "मारी चोको शेल्स" द्यायला हवेत.)
@ रश्मी..... "ठोकळेबा, दत्तोबा आणि लग्नोबा..." मस्तच. तिघेही नजरेसमोर आले.
ते काळं तोंडवाले
ते काळं तोंडवाले
खरे तर याना चान्गला वाव होता
खरे तर याना चान्गला वाव होता की ज्या खोलीत गणेश लपलेला असतो त्या ठिकाणीच कुठेतरी अण्णानी फडताळात, कोठीत ती कागदपत्रे ठेवली असतील आणी अर्चिस तिथे गेला की सगळे शोधताना ती कागदपत्रे पण सापडतील. पण या लोकाना कुठलाच प्रसन्ग फुलवता येत नाही.>>>+१
या बया सोन्ग घरात गेला. >>
भगवती
किती ईनोसंट!!!
(अर्चिसला तू तयार केलेले १
(अर्चिसला तू तयार केलेले १ किलो "मारी चोको शेल्स" द्यायला हवेत.)>>>
यम्मी!!!
अरे व्वा....अर्चिसला पार्सल
अरे व्वा....अर्चिसला पार्सल पोच झाले आणि त्याने गबागबा खायाला सुरुवातदेखील केली !!
थॅन्क्स शुभांगी....गुड गर्ल.
>>तर केवळ दिसायलाच क्लिंट
>>तर केवळ दिसायलाच क्लिंट इस्टवूड असलेला
असं म्हणू नका हो.
क्लिंट इस्टवूडला संहत सल्फ्युरिक अॅसिड मध्ये नखशिखांत बुडवून काढला तरी अभिरामपेक्षा बरा दिसेल तो. त्याने हे ऐकलं तर त्या विहिरीच्या पाण्याला आस लागलेय तिथे जीव देईल किंवा नाईकाच्या घरासमोरच्या झाडाला टांगून जीव देईल आणि त्यांना आणखी एक दिवा लावावा लागेल तिथे त्याच्यासाठी.
अपडेटेड प्रश्नावली: आजवरचे
अपडेटेड प्रश्नावली:
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची दिसली?
सरिता रडताना डोळ्यांत
सरिता रडताना डोळ्यांत पाण्याचा टिपूस दिसत नव्हता. खोटं रडतेय असं वाटत होतं. वाईच ग्लिसरिन टाकला असता तर बरा झाला असता नै?
मामानु ते मारी चोको शेल्स कसे
मामानु ते मारी चोको शेल्स कसे तब्येतीला (इतकं चोकलेट-क्रीम खाऊ नये etc) हे ठोकळी सायंटीफिकली सांगत बसेल आणि मग गुब्बीला मी नाही देत पण तुझं लेक्चर आवर
, असं होईल. (गुब्बे हलके घे गं) .
अरे हो, तो काळं तोंडवालेचा
अरे हो, तो काळं तोंडवालेचा जोक भारी होता.

मला वाटलं पांडू संकासूराबद्दल बोलतोय की काय पण तो चक्क दत्ताला काळं तोंडवाला म्हणाला. वर पूर्वा पण असली भारी काळं तोंडवाले म्हणल्यावर आमचे बाबा काय म्हणून विचारलं तीने.
रश्मी, स्वप्ना.
रश्मी, स्वप्ना.
पूर्वा ठाम असा की तिचो बापुस
पूर्वा ठाम असा की तिचो बापुस कधी न कधी त्वान्ड काळो करणारच.:खोखो: मला पान्डुची अॅक्टिन्ग खूप आवडली.:फिदी:
पूर्वा ठाम असा की तिचो बापुस
पूर्वा ठाम असा की तिचो बापुस कधी न कधी
त्वान्ड काळो करणारच.>>>> रश्मी आता आहे त्या पेक्षा आणखी काय काळ करणार ?
स्वप्ना_राज... अगो....क्लिंट
स्वप्ना_राज...
अगो....क्लिंट इस्टवूड जगू दे १०० वर्षे. मला तो आठवायचे कारण म्हणजे परवा तो अभिराम बुलेटवरून (बुलेट की होंडा ?) होणार्या बायकोच्या घरी जाताना जेव्हा पाहिले, तेव्हा चक्क मला क्लिंट अशाच एका मोटार सायकलवरून जातानाचा फोटो आठवला....रस्ताही असाच.
क्लिंट इस्टवूडचे अगदीं ' फॉर
क्लिंट इस्टवूडचे अगदीं ' फॉर अ फ्यु मोअर डॉलर्स', 'फिस्ट्फुल ऑफ डॉलर्स' पासून अगणित सिनमा बघलंय. दिसण्याचां तर सोडाच, पण एखाद्या पोरीसाठी अभिरामासारख्यां खुळावणांय त्याच्या प्रतिमेत अजिबात बसणा !
<< ह्म्म! उगाच असे बरेच सीन्स
<< ह्म्म! उगाच असे बरेच सीन्स घुसड्त आहेत.. आणि पुढच्या भागात कोणतेच एक्सप्लेनेशन ही नै देतः >> त्येच्याकरतां, " 'मायबोली - रात्रीस खेळ चाले १ ' , हा धागा बघा " अशी टीप दर एपिसोडच्यानंतर दाखवतले, असां ऐकीवांत आसा !!!
काय करावे आता ? अहो भाऊ....मी
काय करावे आता ? अहो भाऊ....मी दिसण्याबिसण्याच्या संदर्भात नाही आणले क्लिंटला मालवणात....तर मोटार सायकल रायडिंग मुळे मला तो आठवला....आणि मग मी बसविला त्याला पिंपळाखाली अभिरामाच्या जोडीने इतकेच.
<< अहो भाऊ....मी
<< अहो भाऊ....मी दिसण्याबिसण्याच्या संदर्भात नाही आणले क्लिंटला मालवणात....>> अशोकजी, नका हो माझ्या कॉमेंटस सिरीयसली घेवूं ! इस्ट्वूडच्ये खूप सिनेमा मीं बघलंय, ह्यां सांगून जरा इंप्रेशन मारूंक गेलंय , इतक्यांच !!!
आजचो एपिसोड ' वे.इंडीज वि. द. आफ्रिका ' सामन्यामुळे नाय बघलो. थंयचो सस्पेन्स मात्र अफलातून होतो !!
आजचो एपिसोड ' वे.इंडीज वि. द.
आजचो एपिसोड ' वे.इंडीज वि. द. आफ्रिका ' सामन्यामुळे नाय बघलो. थंयचो सस्पेन्स मात्र अफलातून होतो !!>> +१ सस्पेंस साठी. मी रोजच मॅच आणि सिरियल आलटून पालटून बघत असतंय.
(No subject)
मामा आणि भाऊकाका चर्चा भारी
मामा आणि भाऊकाका चर्चा भारी
निलीमा एकीकडे गणेशला
निलीमा एकीकडे गणेशला सुधारायच्या गोष्टी करते आणि दुसरीकडे आर्चीसला ओढत ओढत वर नेते. काहीच झेपले नाही.
आज दत्तीच्या डोळ्यात आसवं
आज दत्तीच्या डोळ्यात आसवं दिसली.
छायाने, 'गणेशला काय झाले, हे
छायाने, 'गणेशला काय झाले, हे मला का नाही सांगीतले?' असा कांगावा करू नये. तिला प्रश्न पडला का नाही, की सगळे बाहेर का व कशासाठी बसलेत?
Pages