रात्रीस खेळ चाले १

Submitted by मी_इंदू on 22 March, 2016 - 01:34

2016 - 1 (1).jpgआपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.

आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443

शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..

पात्र परिचय :

माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट

मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः

१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?

शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .

आज विशेष

अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!

रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न

१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू Happy धनेशचे चान्गले यमक जुळले.

पण ह्या लोकान्ची गम्मत वाटते. यान्चे कायम मागचे सपाट आणी पुढचे पाठ असते. मागे जाहीरातीत गणेश गेल्याचे सुचीत केले. मग काल दाखवलेच नाही ( बरे केले ते, नाहीतर मला वाईट वाटले असते) मायबोली वाचतात की काय हे? गणेश गेल्याचे सुचीत करताना अण्णान्च्या फोटोच्या खोलीचा दरवाजा भीतीदायक पद्धतीने उघडला गेल्याचे दाखवलेय. आता असले काही दाखवु नये म्हणजे झाले.

यांचे दिग्दर्शक,पटकथालेखक,संवादलेखक गजनी असावेत. एक स्टोरी दाखवतात आणि विसरून जातात.

तो सुसल्या वकिलाशी बोलतांना त्याचे (तिचे) कपडे घामाने इतके भिजलेले दाखवलेत (झंपी म्हणाली तसं)..
मी घरात फॅन/ वीज नसेल अशी मनाची समजुत घालून वेळ मारोन नेली. असंही ती त्या माळ्यावरच्या खोलीतंच बसून असते ना मोस्ट ऑफ द टाईम.

पण झंपीच्या भावना पोचल्या.. यक्स..

<< देविकाच्या आयेक कळून चुकलांहा, अभिरामाचो मासो गळाक येवस्थित अडाकलोहा ! गळाचो दोरो कधीं सैल सोडायचो कधी खेचायचो, ह्येच्यात एक्सपर्ट दिसता ती !! >> आज गळाचो दोरो येवस्थित खेचल्यान देविकाच्या आयेन !! Wink

हो ना चान्गलीच जहान्बाज निघाली देविकाची आई. पार घरा पर्यन्त आणुन सोडले तिने देविकाला. आता उद्या दत्ता काय दिवाळी करतो बघु.

देवकी आणी बाकी सार्‍याना धन्यवाद गाणे आवडल्याबद्दल.:स्मित:

इंदू ते खिडकीत होता धनेश कर ग हेडरमध्ये, माझ्याकडून चुकून होती झालं होतं Happy .

आज अर्ध बघितलं आधीचे. शंकुतला नरे ने चांगलं काम केलं, छान सुनावलं वकिलाला.

रश्मी, देवकी थांकू.

वकिलकाका सुसल्याबरोबर तिच्या खोलीत जातात. ती त्यांना चहा देते तेव्हा ते विचारतात की तु वेगळी चुल पेटवलीस का? त्यावर ती हलकासा मानेला झटका देऊन सांगते की हे लोकं मला काय त्यांच्या स्वयंपाकघरात रांधू देणार? मी वेगळी चुल केली आहे. ते म्हणतात की घरात येऊ दिले ना? मग स्वयंपाक घरात पण घेतील. मग ते चहाचा एकच घोट पीतात तेवढ्यात ती पेपरवरच्या सहीचा मुद्दा उपस्थीत करते. म्हणे तुम्हाला नदीकाठची जमिन हवी आहे ना तर मी सही करेन पण मला माझ्या अवशीचे दागीने हवेत. माझ्या आईने जेव्हा झाडाला टांगुन जीव दिला तेव्हा तीच्या अंगावर दागीने होते. पण तिला खाली उतरवल्यावर नाथाने ते सगळे दागीने नाईकांना दिलेत, मला ते मिळवून द्या. इकडे दत्ता कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो. वैतागुन वकिलकाकांना एकेरी संबोधतो. त्यावर माधव समजावण्याचा प्रयत्न करतो. दत्ता म्हणतो कि तुला काय फरक पडणार नाही तु निघून जाशील मुंबईला आणि आम्हला भोगावे लागेल. सरिता माईंना म्हणते, तरी सांगत होते तिला घरातून बाहेर काढा बाहेर काढा पण कोणी ऐकेल तर माझे, त्यावर निलीमा म्हणते कि असे काही होणार नाही कागदपत्र मिळाली कि सगळे प्रश्न सुटतील. दत्ता म्हणतो कि कागदपत्र कुठेय? वकिलाकडेच आहेत. सरिता म्हणते "जमीन वकिलकाकांना मिळाली तर मी गप्प बसणार नाही." त्यावर माई सांगतात की मी जमीन त्यांना मिळू देणार नाही व समजावतात कि तुम्हा भावांमधे एकी नाही हे सगळ्यांना दिसतय, म्हणुन सुसल्याची हिंमत झाली घरात यायची.ते वकिल उंबर्यावरून घरात आले. त्यांची हिम्मत कशी झाली जमीन मागायची.
तेवढ्यात अभिराम फोन बंद करता करता येतो. नाईककाका थोड्यावेळाने खाली येतात. माई त्यांना सांगतात कि तुम्हाला हे वागणे शोभत नाही. ह्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही विश्वासघात केला. वकिलकाका म्हणतात कि मला पण वाईट वाटते असे वागायला पण मला तसे भाग पडले. मला सगळ्यांनी परके केले, निदान ती जमीन नावावर करून त्यांची आठवण म्हणुन ठेवीन. मी मृत्युपत्राप्रमाणे वाटण्या करेन पण जमीन माझ्या नावावर करून द्या. दत्ता म्हणतो की आम्ही सही करणार नाही, ती जमीन तुम्हाला मिळणार नाही मग वकिलकाका पण नीक्षुन सांगतात की वाटण्या पण होणार नाहीत. तेवढ्यात अभिराम पुढे येतो व त्यांना म्हणतो की आम्ही तुमचे सगळे ऐकुन घेतले. ती कागदपत्र घरच्यांना नाही कळणार पण मला इन आणि आउट सगळे माहित आहे. मी प्राॅपर्टी घेईन आणि लग्न पण करेन. तो वकिलकाकांना एक महिन्याची मुदत देतो.
रात्री माई व्हर्यांड्यात येतात तर झाडाखालील दिवा विझला असतो. त्या नाथाच्या बायकोला लावायला सांगतात.तेवढ्यात सरिता येते आणि सांगते कि जे काही चालले आहे ते बरोबर नाही, माई म्हणतात कि मला कळतय पण ही भावंड एकत्र यायला हवीत.
देवीका व तिचे आईवडील जीपमधुन येतांना दाखवतात तिची आई सांगते कि तु फोन लाव. ती फोन लावते आणि सांगते कि आम्ही येतोय, तिची आई फोन लगेच हिसकाऊन घेउन बंद करून टाकते. माई त्याला विचारतात कि काय झाले तो एवढेच सांगतो कि देवीका आईवडिलांबरोबर येतेय. त्या वैतागतात कि कशाला येताय? तुला सांगितले कि थोडा धीर धर म्हणुन. देवीका आणि आईवडील फाटकापर्यंत जीप आणतात. तिची आई सांगते कि बॅग उचला. ते म्हणतात कि कशाला? त्यावर ती म्हणते कि त्याशिवाय हे नाईक लोकं वठणीवर येणार नाहीत. तिचे वडील नाईकांना हाका मारतात, दत्ता धाऊन जातो, माधव त्याला थांबवतो. आणि त्यांना इथे यायचे कारण विचारतो. ते म्हणतात कि आम्ही मुलीला सोडायला आलोय. तुमचा मुलगा हिला फोन करतो, चोरून भेटतो. माई म्हणतात कि तो असे करणार नाही, मग ते उलट तपासणी करतात. सरिता म्हणते कि तुमची मुलगीच भेटत असेल वगैरे पण त्या म्हणतात कि विचारा अभिरामरावांना. शेवटी अभिराम बजावतो कि देवीकाला कोणी बोलायचे नाही. मी तिच्याशीच लग्न करणार आहे आणि तेही येत्या दोन महिन्यात.

वरच्या अपडेटस नंतर आता पोस्टमार्टमः-
१. सुसल्या 'विजय दिनानाथ चौहान... हाईं' स्टाईल ने काल वकील काकांशी का बोलत होती ?
२. नायकांच्या वाड्याला नक्की किती खोल्या - दरवाजे आहेत? किचन खाली असताना, सुसल्याने गरमा गरम वाफाळता चहा माडीवरच्या खोलीत कसा काय पिकवला. वकिल काकांशी सगळे चर्चा करत असताना, अभिराम शेवटी आतून बाहेर येतो. परवा तो फोनवर बाहेर बोलत थांबला होता, काल अचानक आतून बाहेर कसा आला ? आणि तो ही कधी एकदा सगळ्यांचे डायलॉग संपतात आणि मी बाहेर येऊन जमीनीच्या विषयाबरोबर नेहमी प्रमाणेच 'बाबा लगीन' करतो या आवेशात.
३. देविकाचे लाऊडस्पिकर बाबा, आकाशी कलरचा झब्बा-कुर्ता घालून का वावरत होते, बॅगाही होत्याच बरोबर, जमल्यास लगेचच नायकांच्या अंगणात देविका-अभिरामाचा बार उडवून द्यावा असा विचार होता का ?
४. शेवटी भावनांचा उद्रेक होऊन बाष्पगदगदीत झालेल्या देविका कडे अभिराम जातो तेव्हा उगीचच फुलाला-फुल किंवा फुलावर बागडणारा भुंगा असले 'प्रतिकात्मक' काही दाखवतात का अशी धास्ती वाटली Wink

>>परवा तो फोनवर बाहेर बोलत थांबला होता, काल अचानक आतून बाहेर कसा आला ?

मला वाटतं तो मागच्या दाराबाहेर बोलत होता.बोलणं संपल्यावर घरातून पुढच्या भागात आला.

गरमा गरम वाफाळता चहा माडीवरच्या खोलीत कसा काय पिकवला.. किचन तर खाली>>>>>> तिने वेगळी चूल मांडली आहे. असं ती वकीलांना सांगते.
बादवे तिच्या ड्रेसबरोबर एक ओढणी द्यायला हवी होती निलीमाने Uhoh

काल सुशल्या वकिलासोबत बोलताना कसली पोझ घेऊन उभी होती. अगोचर मुलगी आहे अगदी. बाकी देविकाच्या आईवडिलांनी नाईकांच्या घरी यायला रात्रीचा मुहूर्त का काढला? सिरियलीचं नाव सार्थक करायला? मला तर तिच्या आईचा एकंदरीत अवतार बघता देविका अभिरामला 'मै तुम्हारे बच्चेकी मां बननेवाली हू' असं म्हणते का काय अशी जबरदस्त भीती वाटू लागली. कारण ते छायाला बघतात तेव्हा त्या गवताच्या गंजीमागे लपतात. ट्रॅडिशिनली ह्या असल्या जागा म्हणजे 'रूप तेरा मस्ताना' ला खुलं आमंत्रण. Wink

देविकाची आई त्या दिवशी अभिरामला फोनवर म्हणते की तुम्ही फोन करत जाऊ नका लोकांना कळलं तर काय म्हणतील? आता लोकांनी काय ह्यांचा फोन टॅप केलाय त्यांना कळायला? ही मुलुखमैदान बोंबलली तरच कळणार. फोन करायला का आक्षेप? अभिराम काय फोनमधून येऊन देविकाला काय करणार आहे? मला तर ती देविकाच्या आईचं काम करणारी बाई अजिबात आवडत नाही. खूप लाऊड अभिनय करते.

काल माई अभिरामकडे तो वकिलाला बोलतो तेव्हा अभिमानाने काय बघत होती? तो एका अर्थी भावांच्या विरोधातच बोलला. आणि ते कागदपत्रांचं घरातल्यांना कळत नाही म्हणजे काय? तू काय तो शहाणा आणि बाकी सगळे मूर्ख. ह्याला खोपच्यात घेऊन खर्चापानी करायला हवं एकदा. काल कसले मोठे डोळे करून बघत होता. मला तर वाटलंबाहेर येतात आता खोबणीच्या. देविकाची पार अलका कुबल झाली होती. रडताना अशी काही अ‍ॅक्टिंग करते की वाटतं हिच्या पोटातच दुखतंय.

>>बादवे तिच्या ड्रेसबरोबर एक ओढणी द्यायला हवी होती निलीमाने

+१००००००....मी दरवेळी हेच मनात म्हणते. आधी निलिमाचा ड्रेस तिला एव्हढा फिट्ट बसणंच अशक्य आहे. एका धुण्यात एव्हढा आकसला ड्रेस? मला तर तिला पाहिलं की 'मेरे दर्जीसे आज मेरी जंग हो गयी. कल चोली सिलायी आज तंग हो गयी' ह्याच ओळी आठवतात.

मी_इंदू, पुढले प्रश्नः

१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ दिवा लावताना दागिन्यांचा आवाज येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?

आणि एक आत्ता आठवलं साखरपुड्याच्या दिवशी देविका आणि नार्वेकर कंपनी निघत असताना दारावरच्या पोळ्यातून तिच्या अंगावर काहीतरी पडतं, मग ती ओरडते, निलिमा तिचा हात पुसून देते. आणि नाईकांपैकी कोणीतरी ते पोळं काढायला सांगतं. ते काढलं की नाही शेवटी??

भगवती, नाथाच्या बायकोला झाडाजवळ दागिन्यांचा आवाज येतो आणि ती घाबरून पळ काढते ते राहिलं.

>>तो वकिलकाकांना एक महिन्याची मुदत देतो.

मला वाटतं २ महिन्यांची मुदत दिली त्याने.

स्वप्ना Lol सही! निलीमा पण भारीच आहे. असला ड्रेस घरात घालत होती का ती ? हो, मला पण वाटले की अभिरामला मै तुम्हारे बच्चे की मा बनने वाली हू असले आईच्या शिकवणीवरुन बोलते की काय.:फिदी: कारण आईचे बोलणे आणी अविर्भाव तसाच वाटला.

सुसल्या: (वकिलाला चाय देत) मग काय वकिलानू, आजकाल काय चाललाहा?
वकिलः (तिच्याकडे निरखून बघत) काही नाही, फॉग चाललाहा.

आणि तो अभिराम एव्हढा येडचाप आहे की देविकाने तसलं काही म्हटलं असतं तर त्याने विश्वासही ठेवला असता.

मुलुखमैदान Lol अशक्य हसतेय.. ऑफिसमध्ये स्वप्नाच्या कमेंट्स वाचण बंद करायला हव. मेलं मोकळेपणाने हसता पण येत नाही..

<< ते कागदपत्रांचं घरातल्यांना कळत नाही म्हणजे काय? तू काय तो शहाणा आणि बाकी सगळे मूर्ख >> कशात काय नाय तरी अभिराम आत्तांच स्वतःला अर्धा 'कलेक्टर' झाल्याचंच समजतोय ना; म्हणून तो असं म्हणाला !!!
<< 'मेरे दर्जीसे आज मेरी जंग हो गयी. कल चोली सिलायी आज तंग हो गयी' >> 'दर्जा' म्हणा किंवा 'दर्जी', एकंदरीतच या सिरीयलच्या शिलाईत ढिसाळपणाचे धागे बाहेर लोंबकळताना दिसतातच !

Pages